संध्याकाळचे श्लोक Sandhyakalche Shlok | Shubham Karoti Kalyanam | Sandhya Aarti | Ganpati Stotra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 чер 2024
  • संध्याकाळचे श्लोक Sandhyakalche Shlok | Shubham Karoti Kalyanam | Sandhya Aarti | Ganpati Stotra | Sandhyakalche Shlok In Marathi
    🔔 सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की आपण @NovaMarathiBhakti चॅनेलला Subscribe करावे आणि भजनांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर Share करावे व Like जरूर करावे. धन्यवाद.
    bit.ly/NovaMarathiBhakti
    📱 Listen to Your Favourite Bhakti Songs, Get Full Lyrics & Meaning, Visit our Website
    www.NovaSpiritualIndia.com
    Popular Videos
    🙏🏻 Vitthalachi Aarti - Yei Ho Vitthale - • येई ओ विठ्ठले Yei Ho V...
    🙏🏻 Pandharpurat Kay Vajat Gajat - • Pandharpurat Kay Vajat...
    🙏🏻 Jya Sukha Karne Dev Vedavala - • Jya Sukha Karne Dev Ve...
    🙏🏻 Vithalachya Pai Vit - • Vithalachya Pai Vit Za...
    🙏🏻 Dehachi Tijori Bhaktichach Theva - • देहाची तिजोरी भक्तीचाच...
    Song Listing
    00:00 - शुभं करोती कल्याणम (Shubham Karoti Kalyanam)
    02:14 - मारुती स्तोत्र (Bhimrupi Maharudra Stotra)
    06:55 - गणपती स्तोत्र (Pranamya Shirasa Devam Stotram)
    10:33 - मनाचे श्लोक (Manache Shlok)
    16:17 - पसायदान (Pasaydan)
    Lyrics:
    1) Shubham Karoti Kalyanam
    शुभम कुरुत्वं कल्याणम आरोग्यम धनसंपदा
    शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते
    दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार
    दिव्यला देखून नमस्कार
    तिळाचे तेल कापसाची वात
    दिवा जळो मध्यान्हरात
    दिवा लावला देवांपाशी
    उजेड पडला तुळशीपाशीं
    माझा नमस्कार सर्व देवांपाशी
    ऐक लक्ष्मि बैस बाजे
    माझे घर तुला साजे
    घरातली पीडा बाहेर जावो
    बाहेरची लक्ष्मि घरांत येवो
    घरच्या घरधण्याला उदंड आयुष्य लाभो
    2) Bhimrupi Maharudra Stotra
    भीमरूपी महारुद्रा
    वज्रहनुमान मारुती
    वनारी अंजनीसूता
    रामदूता प्रभंजना
    महाबळी प्राणदाता
    सकळां उठवी बळें
    सौख्यकारी दुःखहारी
    दुत वैष्णव गायका
    दीननाथा हरीरूपा
    सुंदरा जगदांतरा
    पाताळदेवताहंता
    भव्यसिंदूरलेपना
    लोकनाथा जगन्नाथा
    प्राणनाथा पुरातना
    पुण्यवंता पुण्यशीला
    पावना परितोषका
    ध्वजांगे उचली बाहो
    आवेशें लोटला पुढें
    काळाग्नी काळरुद्राग्नी
    देखतां कांपती भयें
    ब्रह्मांडे माईलें नेणों
    आवळे दंतपंगती
    नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा
    भ्रुकुटी ताठिल्या बळें
    पुच्छ ते मुरडिले माथा
    किरीटी कुंडले बरीं
    सुवर्ण कटी कांसोटी
    घंटा किंकिणी नागरा
    ठकारे पर्वता ऐसा
    नेटका सडपातळू
    चपळांग पाहतां मोठे
    महाविद्युल्लतेपरी
    कोटिच्या कोटि उड्डाणें
    झेपावे उत्तरेकडे
    मंद्राद्रीसारिखा द्रोणू
    क्रोधें उत्पाटिला बळें
    आणिला मागुतीं नेला
    आला गेला मनोगती
    मनासी टाकिलें मागें
    गतीसी तुळणा नसे
    अणुपासोनि ब्रह्मांडा
    एवढा होत जातसे
    तयासी तुळणा कैसी
    मेरू मंदार धाकुटे
    ब्रह्मांडाभोवतें वेढें
    वज्रपुच्छें करू शकें
    तयासी तुळणा कैची
    ब्रह्मांडी पाहता नसे
    आरक्त देखिलें डोळा
    ग्रासिलें सूर्यमंडळा
    वाढतां वाढतां वाढें
    भेदिलें शून्यमंडळा
    धनधान्य पशूवृद्धि
    पुत्रपौत्र समग्रही
    पावती रूपविद्यादी
    स्तोत्रपाठें करूनियां
    भूतप्रेतसमंधादी
    रोगव्याधी समस्तही
    नासती तूटती चिंता
    आनंदे भीमदर्शनें
    हे धरा पंधरा श्लोकी
    लाभली शोभली बरी
    दृढदेहो निसंदेहो
    संख्या चन्द्रकळागुणें
    रामदासी अग्रगण्यू
    कपिकुळासि मंडणू
    रामरूपी अंतरात्मा
    दर्शनें दोष नासती
    इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम्
    3) Pranamya Shirasa Devam Stotram
    ॐ श्री गणेशाय नमः
    श्री नारद उवाच
    प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
    भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थसिद्धये
    प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
    तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्
    लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
    सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम्
    नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम्
    एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्
    द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः
    न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः
    विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
    पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम्
    जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभे
    संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः
    अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत्
    तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः
    इति श्री नारदपुराणे संकटनाशनम नाम
    श्री गणपति स्तोत्रम सम्पूर्णम
    श्री गजानना अर्पणमस्तु
    4) Manache Shlok
    गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा
    मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
    नमूं शारदा मूळ चत्वार वाचा
    गमूं पंथ आनंत या राघवाचा
    मना सज्जना भक्तिपंथेचि जावें
    तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें
    जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें
    जनीं वंद्य ते सर्व भावे करावे
    प्रभाते मनी राम चिंतीत जावा
    पुढे वैखरी राम आधी वदावा
    सदाचार हा थोर सांडूं नये तो
    जनीं तोचि तो मानवी धन्य होतो
    मना वासना दुष्ट कामा न ये रे
    मना सर्वथा पापबुद्धी नको रे
    मना सर्वथा नीति सोडूं नको हो
    मना अंतरीं सार वीचार राहो
    मना पापसंकल्प सोडूनि द्यावा
    मना सत्यसंकल्प जीवीं धरावा
    मना कल्पना ते नको वीषयांची
    विकारे घडे हो जनी सर्व ची ची
    नको रे मना क्रोध हा खेदकारी
    नको रे मना काम नाना विकारी
    नको रे मना सर्वदा अंगिकारू
    नको रे मना मत्सरु दंभ भारु
    मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे
    मना बोलणे नीच सोशीत जावें
    स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे
    मना सर्व लोकांसि रे नीववावें
    देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी
    मना सज्जना हेचि क्रीया धरावी
    मना चंदनाचे परी त्वां झिजावे
    परी अंतरीं सज्जना नीववावे
    Join Us
    ⦿ UA-cam: bit.ly/NovaMarathiBhakti
    ⦿ Facebook: / novaspiritualindia
    ⦿ Instagram: / nova.spiritual.india
    ⦿ Android App: bit.ly/BhajanBhaktiApp
    ⦿ Website: www.medianova.in
    #SandhyakalcheShlok #ShubhamKarotiKalyanam #SandhyaAarti

КОМЕНТАРІ • 2

  • @NovaMarathiBhakti
    @NovaMarathiBhakti  2 місяці тому

    Ganpati Stotra - Pranamya Shirasa Devam with Lyrics
    ua-cam.com/video/xTjP2U-czxo/v-deo.html

  • @swatianiketkadav9146
    @swatianiketkadav9146 2 місяці тому

    Khup chan Rutuja😊