घाटकोपरमधल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू....!!!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • काल पूर्व उपनगरातल्या घाटकोपरमध्ये १२० फूट उंच होर्डिंग कोसळलेल्या दुर्घटनेत आता पर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला. तर ७० पेक्षा अधिक जण जखमी झाले. १५ हजार चौरस फुटांचं होर्डिंग काल संध्याकाळी पेट्रोल पंपवर कोसळलं.. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु असताना ही दुर्घटना घडली..
    याच प्रकरणी अजून एक महत्वाची बातमी समोर आलीये.. होर्डिंग लावताना पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. या प्रकरणात पालिकेनं होर्डिंग लावणाऱ्या एजन्सीला नोटिस बजावली आहे. पालिका कमाल ४० बाय ४० चौरस फुटांचं होर्डिंग लावण्यास परवानगी देते. पण कोसळलेलं होर्डिंग १२० बाय १२० चौरस फुटांचं होतं व त्याचा आकार १५ हजार चौरस फूट होता...
    पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ घटनास्थळी असून दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याच काम युद्धपातळीवर सुरु आहे.. मात्र मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे..
    #news #newsupdate #dailynews #india #maharashtra #pune #punenews #update #newstatus #newstodayupdate #newstoday #todaynews #todaynewsupdates #today

КОМЕНТАРІ •