बळीराजाची लेकरं/Bailpola /बैलपोळा कोठुरे/ Bull Animal Festival Maharashtra 2021 HD.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • #बैलपोळा2021
    • | Bail Pola Festival 2...
    #बैलपोळा
    "माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पाेशिंदा त्याच्या भाळी लिहीलेला रातदीस कामधंदा"
    "शेतामधी माझी खाेप तीला बाेराटीची झाप.तिथं राबताे कष्टताे माझा शेतकरी बाप"
    एका कवीने केलेलं हे शेतकर्याचं मुर्तीमंत वर्णन.शेतकर्याच्या घराचे अंगण म्हटले की पहील्यांदा डाेळ्यासमाेर येते डाव्या किंवा उजव्या बाजुला दावणीला बांधलेली जनावरे.आेट्यावर बसुन येणार्या जाणार्यावर करडी नजर ठेऊन असलेला कुत्रा.त्यांच्या पाणी पिण्यासाठी केलेली साेय वगैरे वगैरे ..दावणीची जनावरे आणि शेतकरी यांचे अतुट नाते असते.ते पदाेपदी पहायला मिळते.ज्याच्या घरी गाय , म्हैस , बैल असतात त्या घराला सुट्टी म्हणजे काय हे माहीत नसते.राेजची वैरण काडी , शेणकूर करणे हा शेतकरी दादाच्या राेजच्या दिनक्रमाचाच भाग असताे
    पुरातन काळापासूनच आपल्या संस्कृतीत भुतदयेचा जागर केलेला आहे.ताे इतका आहे की प्रत्येक सणांच्या पार्श्वभूमीवर निसर्गातील जीव जंतूंच्या संरक्षणाची अप्रत्यक्ष रीत्या जबाबदारीची जाणिव जुन्या पिढीने नव्या पिढीला करुन दिलेली आहे.याचा प्रत्यय वेळोवेळी आपल्याला येत असताे.आज पिठाेरी अमावास्या म्हणजेच पाेळा शेतीसाठी मदत करणाऱ्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस.विशेषतः बैल हा प्राणी शेतीसाठी शेतकरी बंधूच्या जवळचा आहे.अत्यंत इमानेइतबारे आपला मालक सांगेल तसं शेतीत राबण्यात आणि या काळ्या आईची सेवा करण्यातच त्याची खरी धन्यता आहे.असं ताे मानताे.हल्लीच्या काळात पशुधन कमी झाले आहे.मुळात शेतीसाठी बैल ही संकल्पनाच नष्ट हाेण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे हाैसेखातर का हाेईना सधन शेतकरी हे पशुधन सांभाळतात त्यांची सेवा करतात.
    कितीही यांत्रिकीकरण झाले, कीतीही अधुनिक शेती झाली तरी शेती शेतकरी आणि बैल हे नातं अतूट राहणार आहे.पाेळा आला की बाजारात झुंबड उडणार आहे सर्जा राजा सजणार आहे, घरासमोर सुवासिनी ह्या पशुधनाला ओवाळून नैवेद्य भरवणार आहे.मानव पुन्हा एकदा निसर्गाकडे धाव घेणार आहे.
    #balirajache_leker
    #बळीराजाची_लेकरं
    #Baliraja #2021बैलपोळा
    #pratap_mogal
    #Tergaonrace
    #cowvideos
    #buey

КОМЕНТАРІ • 151