कविता : तुमच्या आशिर्वादाने | Spruha Joshi | Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: Teamspruhajoshi@gmail.com
    तुमच्या आशिर्वादाने !
    बहाव्याच्या फुलांनी पेटलेला रस्ता
    माझे निष्काळजी, बेफाम पाय
    तो उधळत जाणारे.
    वर या शहराच्या लखलखत्या खुणा,
    त्यांचा माझ्यावर बरसणारा चकचकीत प्रकाश,
    माझे डोळे नकळत दिपत जाणारे...
    अतिशय खूश गर्दीच्या
    अंगावर येणाऱ्या लाटा,
    उसळणारं थिएटर,
    आणि त्यात उसळणारा माझा एकटेपणा..
    नागव्या इच्छा
    पॅशनच्या नावाखाली आसुसलेल्या,
    भडक फॅशनखाली दाबलेल्या..
    तुमचं बोट धरून
    खेळघरातून इथवर आले,
    इथलं झगमगतं इंद्रधनुष्य 'माझं' समजून धावले,
    तुम्ही थांबवलंच नाहीत,
    मीही नाही मग थांबले..
    आता स्वप्नातही तीच लखलख, तीच गर्दी,
    तीच झगमग, तेच रंग!
    अंगावर येणाऱ्या लाटा, उसळणारं थिएटर,
    आणि त्यात उसळणारा माझा एकटेपणा..
    तुमच्या आशिर्वादाने !
    - स्पृहा
    तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    __________________________________
    Travel Vlog Playlist: • Travel Vlog
    खादाडी Playlist: • Khadadi Series
    गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी
    #SpruhaJoshi #Poems #Marathi #kavita #nakoghabru
    ________________________________
    Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
    Instagram: / spruhavarad
    Facebook: / spruhavarad
    Twitter: / spruhavarad
    ____________________________
    DISCLAIMER: This is the official UA-cam channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________

КОМЕНТАРІ • 95

  • @anjaligawai6215
    @anjaligawai6215 6 місяців тому

    खूप सुंदर स्पृहा तू खूप छान सपष्टीकरण देतेस... खूप खोलवर विचार करून कविता लिहिते आणि मग ती आमच्या काळजाला भिडते..😊 मला तुझ्या कविता ऐकून कविता करायला प्रोत्साहन मिळत thanks 😊

  • @sulbhaterdalkar5666
    @sulbhaterdalkar5666 7 місяців тому

    Spruha kavita khup avdli
    ..palkani mulanchya prasiddicha moha velich avrawa.

  • @deepaksable6628
    @deepaksable6628 7 місяців тому

    खूप छान..

  • @manisha.bhosale.739
    @manisha.bhosale.739 7 місяців тому

    अप्रतिम 👌👌👌❤❤

  • @vaishaligawade9285
    @vaishaligawade9285 7 місяців тому

    मस्तच सादरीकरण ,आवडली कविता ,त्यामागचा भाव पण कळलं ,
    चाफा बोले ना ही कविता एकदा घ्या .

  • @chetanapadhye1254
    @chetanapadhye1254 7 місяців тому +1

    स्पृहा तुम्ही कविता नेहमीच छान करत असता आणि त्याही पेक्षा वाचन अप्रतिम बालकलाकाराचे मनोगत फारच छान रितीने व्यक्त केले आहे

  • @kvisualtree
    @kvisualtree 7 місяців тому

    Superb !!!
    Just curious where is 'Jhampya' from De Dhamaal. He was a very mischievous and likable character.

  • @AbhishekSuroshe-xb9xk
    @AbhishekSuroshe-xb9xk 7 місяців тому +2

    Most of the kids and the tens are lost in the disguised world of validation, fame, aesthetics, social media....And for that too we as a society is responsible, to get out of this social dilemma is times need!

  • @yoginijoshi9964
    @yoginijoshi9964 7 місяців тому

    Lakshmikant tamboli yanchi yevdhe dyave kavita aikayla aavdel.

  • @kirtiraikar.1970
    @kirtiraikar.1970 7 місяців тому +1

    चांगली आहे हि कविता सुद्धा... अशाच छान छान कविता आमच्यासमोर सादर करण्यासाठी Thanks & शुभेच्छा 😊

  • @shubhangikulkarni6982
    @shubhangikulkarni6982 7 місяців тому

    व्वा..फारच सुंदर हृदय स्पर्शी आहे..👏💐

  • @lalitauplenchwar2895
    @lalitauplenchwar2895 7 місяців тому

    वास्तविकता दाखवणारी अप्रतिम रचना.

  • @raviarote8563
    @raviarote8563 7 місяців тому

    Spruha Very heart touching subject

    • @nitinvaidya3013
      @nitinvaidya3013 7 місяців тому

      सुंदर कविता 👌👌

  • @jayashreevaze5627
    @jayashreevaze5627 7 місяців тому

    अप्रतिम कविता. यथार्थ वर्णन. सुंदर सादरीकरण

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 7 місяців тому

    खूप छान एकाच वेळी उत्सुकता वाढवणारा आणि मनाला चटका लावून जाणारा विषय मांडलात आजची आपली कविता खूप आवडली आपण आपल्या मुलांना कुठली स्वप्नं दाखवतो त्यावर बरंच अवलंबून आहे आणि महत्वाचं हे की त्यांना स्वप्नातुन वेळीच जागं करता आलं पाहिजे स्वप्नाने सुद्धा वेळेवर संपलं पाहिजे आपल्याला नमस्कार आणी धन्यवाद 🙏🙏🙏

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 7 місяців тому +1

    Uttam kavita chi choice aahe .

  • @Tuch_tuzi_olakh
    @Tuch_tuzi_olakh 7 місяців тому

    Spruha tai aga mla ek kavita aikaychi ahe ti mazya khup javlchi kavita ahe - dipak mandila tula soniyache taat

  • @asmitahedaoo3050
    @asmitahedaoo3050 7 місяців тому

    खूप छान कविता आणि सादरीकरण...

  • @NamrataPawar-k8b
    @NamrataPawar-k8b 7 місяців тому

    खुप खुप छान
    अप्रतिम कविता!!
    Lot's of love and respect for u spruha Tai..🙌❤

  • @ajay1712
    @ajay1712 7 місяців тому

    शब्दांची उत्कृष्ट निवड व मांडणी ❤

  • @meghnakulkarni7295
    @meghnakulkarni7295 7 місяців тому

    खूप सुंदर कविता , छान .इतका सखोल विचार करणारी तू आणि तुझ्या कविता मी नेहमीच ऐकते बघते तुला खूप आशिर्वाद 😊

  • @shwetashinde3248
    @shwetashinde3248 7 місяців тому

    किती सुंदर स्पृहा ताई...अंगावर काटा आला अगदी

  • @geetamandage6379
    @geetamandage6379 7 місяців тому

    खूपच छान कविता 😊

  • @mPOWword
    @mPOWword 7 місяців тому

    Awesome, amazing, ace poem Spruha you ROCK!🤩👏🏾❤️
    Upbringing of children is being taken very much for granted. Also with the advent of smart phones and social media connected parenting is getting diluted. Thanks for the recommendation, will definitely watch First Act.

  • @varshafaye3696
    @varshafaye3696 7 місяців тому

    खुप छान स्पृहा , वेगळा विशय विचार करायला लावणारा .

  • @atulbhosaleofficial
    @atulbhosaleofficial 7 місяців тому

    वैचारिक कविता...अंतर्मुख करायला लावणारी...👌👌👌

  • @pranavvaidya5775
    @pranavvaidya5775 7 місяців тому

    वास्तवाची बाजू शब्दांद्वारे खूप उत्कृष्ट मांडली आहे.👌✨

  • @Abhishekdev3083
    @Abhishekdev3083 7 місяців тому

    मस्तच आहे कविता 👌

  • @srj4real
    @srj4real 7 місяців тому

    Khup sundar Kavita... 👏❤

  • @surekhadharmadhikari2352
    @surekhadharmadhikari2352 7 місяців тому

    ❤ स्पृहा अतिशय जवळचा न् जिव्हाळ्याच्या विषयाला स्पर्श केलायस ! खरच प्रेमळ पालक अन् जबाबदार नागरिक दोन्ही नात्यांनी तुझं अभिनंदन या कवितेसाठी ... 🎉🎉🎉 ह्या वयात केवळ तो चकचकाटच आवडतो पण त्याची क्षणभंगूरता ओळखण्याचं हे वयच नसतं ना !अर्थात ह्या गोष्टी मी एक शिक्षिका म्हणून खूप जवळून अनुभवल्यात

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 6 місяців тому

    Tai mala Tumcha team madhe yeicha asel kavita sadarikarna sathi practice ani programs tar Kay process ahe please sang

  • @RahulPatil-gm7gf
    @RahulPatil-gm7gf 7 місяців тому

    👌👌👌

  • @harsh_artandpoetry
    @harsh_artandpoetry 7 місяців тому

    एक ढळढळीत वास्तव....छान व्यक्त केले....👍

  • @chaitalichhapanimohan3241
    @chaitalichhapanimohan3241 7 місяців тому

    Mam mla tumche thoda guidence hava hota

  • @rasikmitra4582
    @rasikmitra4582 7 місяців тому

    मॅडमजी,, तुम्ही माझी कविता सादरीकरण करणार का कळवा 🙏🏻🙏🏻

  • @bhaminikulkarni6587
    @bhaminikulkarni6587 7 місяців тому

    Tumhi ek Kavita wachali hoti
    Vegla vyache bharich sukh ti mala khup bhavte thanks

  • @kishorogale826
    @kishorogale826 7 місяців тому

    किशोर कदम..सौमित्र यांची एखादी कविता ऐकवा.

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 7 місяців тому

    Tumcha kavita chi wat baghat hoto.

  • @manishadeshpande9184
    @manishadeshpande9184 7 місяців тому

    स्प्रूहा ताई तुझ्या कविता एकूण मला ही लिहावे वाटते
    जर मी कविता किंवा इतर काही लिखाण केले तर एक मार्ग दर्शक बनून मार्ग दर्शन करशील का ? मला ते खूप आवडेल
    फोर्स करत नाही फक्त तु आवडतेस म्हणून विचारते
    बाकी काही नाही❤❤
    तू केलेल मार्ग दर्शन आवडेल

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 7 місяців тому

    Tumcha ek kavita ekda sadar kara ,Karan tumhi uttam kavita lihta

  • @pranalimagi9984
    @pranalimagi9984 7 місяців тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t 7 місяців тому

    👌👌

  • @mrunalpatil2786
    @mrunalpatil2786 7 місяців тому

    Really eye opener❤

  • @seemadeshmukh1462
    @seemadeshmukh1462 7 місяців тому

    Agdi mental tuzhya kvitetun utarla!👍🙏

  • @pardipcheddu2443
    @pardipcheddu2443 7 місяців тому

    Nice

  • @sudhabhat171
    @sudhabhat171 7 місяців тому

    बाप रे किती माझ्या मनातले प्रश्न ह्या कवितेत मांडले आहे.मला तर हीच भीती वाटते. चमण्या कलाकारांना पाहून!!!

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 7 місяців тому

    Apratim kavita ❤❤❤

  • @janhavigangal4903
    @janhavigangal4903 6 місяців тому

    कविता, व कवितेचा आशय फारच चांगला, विचार करायला लावणारा, अंतर्मुख करणारा... नक्कीच!
    आपलं संवेदनशील मन त्यातून व्यक्त होतं. तुम्हाला योग्य मार्गावर ठेवणारे आईवडील आहेत म्हणून परमेश्वराचे आभार ही मानलेत, व ते योग्यच आहे!
    पालकांनी हे ध्यानात ठेवावे हे खरेच, पण आपण स्वत: रिॲलिटी शोज मध्ये anchoring करता... तेव्हा केवळ प्रयोग चटकदार व्हावा म्हणून या बालकलाकारांना खूप जास्तच चढवलं जातं, उदोउदो केला जातो,असं नाही वाटत?
    साहजिकच पालक व मुलं त्याला बळी पडतात,
    योग्य ते कौतुक व्हावं पण अवास्तव नको, ही anchorची, परीक्षांची, व कार्यक्रमाच्या दिग्दर्शक/निर्मात्यांची पण जबाबदारी आहे. नाही का?
    तरच ती तुमच्या कवितेची पुढची पायरी ठरेल

  • @suvarnachinti1140
    @suvarnachinti1140 7 місяців тому

    Sank.. via spruha show please dupari / sandhyakali have ahet punyat ratri ch astat ….🙏🏼🌸

  • @smitadeshpande1910
    @smitadeshpande1910 7 місяців тому

    खूप छान अणि भावपूर्ण

  • @SwaroopkulkarniPoetry
    @SwaroopkulkarniPoetry 5 місяців тому

    सुंदर कविता!! खर आहे की लहानपणीच सेलिब्रिटीचा टॅग लागलेली बहुतांश मुले ही आयुष्यातला एक फुलपाखरी टीनेजर काळ हा त्याच कोषात किंवा दडपणात घालवताना दिसतात!!

  • @kokanmeva8760
    @kokanmeva8760 7 місяців тому

    ❤❤ अप्रतिम सादरीकरण, विषय आणि आशय.. दुर्दैवाने खरं आहे हे😢

  • @deepaliraut7620
    @deepaliraut7620 7 місяців тому

    Spruha tu vachaleli "chandra pahila navhta" ya aashyachi sahajivnachya vastavikatevar bhashya karnare kavita me ekda eikali...khup aawdali pan tya ater kitihi search keli tari gavali nahi punha.tula lakshat aali asel tar ya channel var tuzyakdun punha eikayla nakki aawdel."tumchya aashirwadane"hi kavita pan apratim...sunder lakshavedhi...

  • @anjaligokhale4503
    @anjaligokhale4503 5 місяців тому

    खूप च सुंदर

  • @samruddhikadam2038
    @samruddhikadam2038 7 місяців тому +1

    ❤ Always loved to listen you spruha....🎉
    Really current time situation of midia connected child artists.
    Very nice and touching poem and ur presentation 👌👌👌👍

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 7 місяців тому +1

    Kitti sunder, Spruha! Pani aale dolyat!!❤❤

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 7 місяців тому +2

    वाह ..... स्पृहा , किती मार्मिक लिहिले आहेस .... खूप वैचारिक आहे आणि अगदी सध्याच्या काळातले वास्तव दर्शवणारी कविता आहे . खरंच असे मनात येते नेहेमी , की , इतके सारे रिॲलिटी शोज होतात , तेव्हा खूप प्रसिद्धी मिळते , त्यात हुरळून जाऊ नये या बाल कलाकारांनी . पालकांनी पण सजगतेने त्यांना नीट मार्गदर्शन करावे . तुझे सादरीकरण तर मस्तच ग ..... 👌👌👌👌

  • @deepakkarnik1876
    @deepakkarnik1876 7 місяців тому +1

    स्पृहा, खरच खूप खूप छान आहे कविता.हे असं सुचणं नक्कीच असामान्य वाटतं

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 7 місяців тому +2

    तूही मुलांचे रिॲलिटी शोज चालवलेस, पण इतक्या संवेदनशीलतेने व्यक्त झालीस हे खूप छान आहे. त्या हर्षद नायबळला बघून खरंच असेच काही विचार उमटायचे...यांचं पुढे काय? खूप यथार्थ!!

  • @ShailaSarode-xc8vr
    @ShailaSarode-xc8vr 7 місяців тому +2

    👌👌स्पृहा, सध्याच्या झगमगत्या दुनियेत एका वाट चुकलेल्या बालकलाकाराचे हृदयस्पर्शी मनोगत किती आत्मीयतेने व्यक्त केलेस तू, खरच वास्तवता दिसली तुझ्या या कवितेत.. आजच्या पालकांना विचार करायला लावणारी आहे ही कविता. खूप शुभेच्छा 💐

  • @NandiniKhandalkar
    @NandiniKhandalkar 7 місяців тому +1

    I'm so proud of you ma'am!!!❤

  • @mazelikhan3627
    @mazelikhan3627 7 місяців тому +1

    छान आहे कविता लाईक सबस्क्राईब केव्हाच केलं आहे. पण शेअर करून कोणीही आजकाल ऐकत किंवा वाचत नाही. छान दिसते आहे ❤

  • @MohitShinde-s8l
    @MohitShinde-s8l 7 місяців тому +1

    तुझ्या आशिर्वादाने अम्हाला खुप चांगले विचार आणि उचार तसेच तुझ्या कविता ऐकून मन खूप सुंदर विचार करत आणी खुप आनंदित जगता येत यासाठीच तुला लाखो शुभेच्या काळजी घे. थँक्यू सो मच. ❤

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 7 місяців тому +1

    सत्य परिस्थितीवर प्रकाश टाकणारी कविता..खरच पालकांचा रोल या झगमगत्या दुनियेत अतिशय महत्त्वाचाच आहे. धन्यवाद स्पृहा 🙏🙏

  • @rutujadahibhate8286
    @rutujadahibhate8286 7 місяців тому

    Spruha ma'am I watched your only one video and after that video I subscribed your channel. I like your personality lot. Aikat ch rahavese watte 😊❤

  • @snehalchavan4782
    @snehalchavan4782 7 місяців тому

    स्पृहा ताई एक कविता करशील का आता पुढच्या महिन्यात छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास सुरू होईल तर त्यांच्यावर एखादी कविता ऐकायला खूप खूप आवडेल आम्हाला...❤

  • @jayeshshah29
    @jayeshshah29 7 місяців тому

    Fantastic thought, Spruha. Always wondered what happened to the kids. Thanks for sharing this poignant poem.

  • @pvk1964
    @pvk1964 7 місяців тому

    तुमचे कविता सादरीकरण खूप प्रसन्न करणारे असते.... त्यामुळे कविता ऐकायला खूप छान वाटते

  • @anjalikulkarni951
    @anjalikulkarni951 7 місяців тому

    Pl link of first act

  • @maheshrajurkar3857
    @maheshrajurkar3857 7 місяців тому

    स्पृहा...खरेच खूप छान आणि अंतर्मुख करणारी ही कविता. खरंय मुलांची स्वप्नच जणू विकतोय.....

  • @nandkumarnigade1233
    @nandkumarnigade1233 7 місяців тому

    अप्रतिम स्पृहा अंतर्मुख करणारी 🎉

  • @apsdhinchak5656
    @apsdhinchak5656 7 місяців тому

    Khupach Sunder shabd mandle aahet... Apratim agdi nehmi pramanexh😊

  • @anirudhakutre4920
    @anirudhakutre4920 7 місяців тому

    नमस्कार 🙏😃, आज खरच खुप छान वाटतंय तुझ्या विडिओ ला पहिले like आणी पहिली कंमेंट देताना

  • @suvarnachinti1140
    @suvarnachinti1140 7 місяців тому

    Bal kalakar ahe he pan samjat nasnarya mulanche reels baghun vait vatate. Changla vishay nivadla ahe parents ni vichar kela pahije…… 🙏🏼🌸

  • @rasikmitra4582
    @rasikmitra4582 7 місяців тому

    मॅडमजी,, खूप छान कविता सुंदर सादरीकरण 💐💐

  • @ashasawant948
    @ashasawant948 7 місяців тому

    वास्तव दाखवणारी अर्थपूर्ण, भावपूर्ण, कविता.खूप प्रेम.

  • @medhaekadi4130
    @medhaekadi4130 7 місяців тому

    अतिशय वास्तव वादी कविता । मन भरून आले ।

  • @saritakulkarni3503
    @saritakulkarni3503 7 місяців тому

    भावस्पर्शी कविता.धन्यवाद।

  • @yogeshlokare6414
    @yogeshlokare6414 7 місяців тому

    Great !!

  • @geetajoshi7255
    @geetajoshi7255 7 місяців тому

    खूप सुंदर मनाला भावणारी

  • @navnathkumbhar4101
    @navnathkumbhar4101 7 місяців тому

    Kiti sopya shabdat tumhi itak sagal mandta.. khup mast vatal... 👍👍😊😊

  • @vaibhaveekale8861
    @vaibhaveekale8861 7 місяців тому

    स्पृहा, अंतर्मुख करून गेली ही कविता ❤❤

  • @bhaminikulkarni6587
    @bhaminikulkarni6587 7 місяців тому

    Khupach sunder aahe Kavita
    Me tumchya sarv Kavita ekat aste

  • @Libra6
    @Libra6 7 місяців тому

    Spruhaniya, shravaniya, superb poem. Really today child actors have lost their childhood, especially in age of mobiles smartphones, internet. Tya sagalya emotions present karnari poem, superb and hats off to you.

  • @SnehMadhurya
    @SnehMadhurya 7 місяців тому

    खूप छान 👌👌

  • @susheelvibhandik4190
    @susheelvibhandik4190 7 місяців тому

    अप्रतिम कविता👌

  • @sushamatupe5355
    @sushamatupe5355 7 місяців тому

    अप्रतिम कविता 👍👌❤

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 7 місяців тому

    Apartim kavita mam

  • @mugdhasharma3387
    @mugdhasharma3387 7 місяців тому

    Khup chhan, Spruha

  • @kishorogale826
    @kishorogale826 7 місяців тому

    अत्यंत वास्तववादी कविता..!

  • @PushpaMane-uu5yk
    @PushpaMane-uu5yk 7 місяців тому

    खूप छान

  • @suwarnananoti7542
    @suwarnananoti7542 7 місяців тому

    ही कविता ही आतून हलवून टाकणारी !

  • @suprabhajoshi3032
    @suprabhajoshi3032 7 місяців тому

    कविता खूप सुंदर आहे. आजच वास्तवच माडलय या कवितेत. पालकांनाच हल्ली वाटत आपलं मूल सगळ्या क्षेत्रात चमकले पाहिजे पण त्याला नक्की कशात गोडी आहे ते समजून घेऊन ते करण्यासाठी उत्तेजन दिलं पाहिजे. महत्वाचे म्हणजे कितीही मोठे नाव झाले तरी आपले पाय जमिनीवर कसे ठेवायचे त्याचीही समज दिली पाहिजे. असो कविता तर तू उत्तम करतेसच अशाच.करून ऐकवत रहा.❤👌👌❤