💐सोयाबीन घरगुती आणि कृषी सेवा केंद्रातील बियाणे उगवण क्षमता चाचणी*💐

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • *घरगुती बियाणे उत्पादन मोहीम 👏🏻 💐सोयाबीन उगवण क्षमता चाचणी*💐
    सोपी पद्धत
    🔢1⃣2⃣3⃣4⃣5⃣6⃣7⃣8⃣9⃣🔟
    1️⃣🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚
    2️⃣🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚
    3️⃣🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚
    4️⃣🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚
    5️⃣🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚
    6️⃣🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚
    7️⃣🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚
    8️⃣🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚
    9️⃣🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚
    🔟🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚🥚
    (👆🏻याप्रमाणे सोयाबीन बियाणे ठेवावे)
    उगवण क्षमता पाहण्याची सोपी पद्धत:-
    सुती पोते किंवा चौकोनी कपडा किंवा वर्तमानपत्र चा पेपर (एकावर एक 5 वर्तमानपत्र) वरील पैकी कोणतीही एक वस्तू घेतल्यास ती पूर्णपणे भिजवून (ओली) घ्यावी. त्यानंतर ती व्यवस्थितपणे जमिनीवर अंथरून ठेवावी.
    नंतर वर दिलेल्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक ओळीमध्ये 10-10 बियांचा वापर करून 10-10 च्या रांगा करून व्यवस्थितपणे बियाणे ठेवून घ्यावे. (वर सुरवातीला दिलेल्या आकृती प्रमाणे करावे)
    यानंतर सदर पोते/वर्तमानपत्र/सुती कापड गोलाकार गुंडाळून घ्यावे. गुंडाळताना ओल्या पोत्यातील बिया हलणार नाहीत याची दक्षता नक्की घ्यावी.
    यानंतर गुंडाळलेल्या पोत्यास कडेला सुतळीने बांधून घ्यावे आणि तीन ते चार दिवस जेथे जास्त उजेड येणार नाही अशा ठिकाणी - सावलीला ठेऊन त्यावर दिवसातून 3-4 वेळा हलकेसे पाणी शिंपडावे.
    तीन ते चार दिवस झाल्यानंतर उगवण झालेली एक एक रांग मोजून घ्यावी. 100 पैकी किती बियाणेस मोड आलेले आहेत असे सुदृढ व निरोगी बियाणे मोजून घ्यावे.
    आपले सोयाबीन बियाणे पेरण्यास योग्य आहे की नाही कसे ओळखावे?
    100 बियांपैकी किमान 70 सुदृढ व निरोगी बियाने मोड आलेले असल्यास सदरील बियाणे पेरणीसाठी योग्य आहे असे समजावे.
    पेरणी साठी किती किलो बियाणे एकरी वापरावे?
    याचं उत्तर अगदी सोप्प आहे. समजा किमान 70% बियाणे व्यवस्थित पणे मोड आलेले उगवले आहे.
    (टक्केवारी कशी काढली तर तुमचं जेवढं बियाणे उगवलं तेवढी टक्केवारी येते. उदा. 80 बियाने उगवले तर 80%)
    किमान 70% किंवा त्याच्या पुढे बियाणे उगवण क्षमता असेल तर सरासरी 30 किलो बियाणे एकरी वापरावे. यानंतर 70% पेक्षा जर तुमची उगवण कमी झाली असेल तर प्रत्येक १% उगवण क्षमता घटसाठी अर्धा किलो जास्तीचे बियाणे वापरावे. समजा 69% उगवण झाली तर 30.5 किलो बियाणे वापरावे. 68% झाली तर 31 किलो.
    चार्ट:- एकरी किती बियाणे वापरावे?
    उगवण क्षमता *- बियाणे*
    70 टक्के - 30.00 किलो
    69 टक्के - 30.50 किलो
    68 टक्के - 31.00 किलो
    67 टक्के - 31.50 किलो
    66 टक्के - 32.00 किलो
    65 टक्के - 32.50 किलो
    64 टक्के - 33.00 किलो
    63 टक्के - 33.50 किलो
    62 टक्के - 34.00 किलो
    61 टक्के - 34.50 किलो
    60 टक्के - 35.00 किलो
    60% पेक्षा कमी उगवणीचे बियाणे वापरू नये.

КОМЕНТАРІ •