#DnyanBhartiMarathiPodcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • प्रवीण माळी ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट…
    मित्र हो, नमस्कार.
    तुम्हा सगळ्यांचं मी किशोर कुळकर्णी ज्ञानभारती मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. आजच्या व्यक्तीविशेष मध्ये आपण अहिराणी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण अशा एकपात्री प्रयोग सादर करणाऱ्या अहिराणीचे पुरस्कर्ते, हाडाचे शिक्षक प्रवीण माळी यांच्याशी बातचित करत आहोत.
    दिवसा विद्यार्थ्यांना शिकविणे आणि रात्री एकपात्री नाट्य प्रयोगातून लोकांचे प्रबोधन करून हास्याचा खळखळाट निर्माण करून आजच्या भारतीय संस्कृतीत निर्माण झालेल्या विकृतीवर प्रकाशझोत टाकणार्‍या नाट्यवेडे शिक्षक प्रविण शांताराम माळी यांच्या समाजप्रबोधनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांच्या अहिराणी भाषेतील २८० एकपात्री नाट्य प्रयोगांची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये करण्यात आली आहे.
    ‘आयतं पोयतं सख्यान’ हा धमाल अहिराणी एकपात्री प्रयोग गाजवणारे प्रवीण माळी, प्रेक्षकांना हसवून-हसवून पूर्णपणे लोटपोट करतात. सखोल मनोरंजनातून परिपक्व समाजप्रबोधन करत संपूर्ण खान्देशासह, महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्राबाहेर गुजरातमध्ये देखील या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सन्मान देखील मिळालेल आहेत.
    #Contact
    Pravin Mali
    +91 98812 61778
    Kishor Kulkarni
    +91 94 20607059

КОМЕНТАРІ •

  • @jjdesale
    @jjdesale 3 роки тому +1

    हासिखुशी जागर मायबोलीना, मित्रवर्य प्रवीण दादा म्हणजे खान्देश मातीना मूर्तिमंत अवलिया.... भाषानी गोडी संगे, संस्कार, परंपरा आनी ज्ञान देत प्रबोधनपर अद्वितीय एकपात्री अभिनेता प्रवीण दादा...👌👌👌ज्ञानभारतीद्वारा किशोर दादा, आपण उत्तम बहुगुणी आदर्श शिक्षक, मनभावन कलाकार यांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला आहे. आभार आनी आदर तुम्हना👍👍👍

  • @dattatrayjoshi5628
    @dattatrayjoshi5628 2 роки тому

    छान