ओले बोंबील फ्राय , क्रिस्पी, चटपटीत ओले बोंबील फ्राय.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лип 2024
  • ओले बोंबील फ्राय , क्रिस्पी चटपटीत ओले बोंबील फ्राय
    ओले बोंबील फ्राय करण्याची पद्धत.
    * बोंबील हे अगदी ताजे असावे
    * बोंबील जाड जर असतील तर मधोमध चिरा पाडाव्या
    म्हणजे बोंबील पसरट होऊन बोंबील कड़क होण्यास मदत होईल.
    * बोंबलातील पाणी निघण्यासाठी बोंबलाला हळद, मीठ, आणि लिंबू लावून अर्धा तास एका चाळणी मध्ये ठेवावे म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल.
    * अर्ध्या तासानंतर बोंबलाला
    * लाल तिखट
    * अद्रक, लसुन , हिरवी मिरची, आणि कोथिंबीरचं वाटण
    * चाट मसाला
    * धने जिरे पावडर
    हे सर्व मसाले चोळावे
    * तांदळाचे पीठ , बारीक रवा, आणि लाल तिखटाचं कोटिंग करा.
    * तेल क** गरम झाल्यानंतर बोंबलाला पिठाचं कोटिंग करून बोंबील तळावे.
    * बोंबील तळताना दोन बोंबला मध्ये अंतर ठेवायचे फुगतात आणि एकमेकांना चिकटून तुटतात.
    * पहिली बाजू कडक फ्राय झाल्याशिवाय बोंबील पलटी करू नये.

КОМЕНТАРІ •