जागतिक जल दिन | 22 March | Jal Divas
Вставка
- Опубліковано 7 лис 2024
- आज 'जागतिक जल दिवस' आहे.उन्हाळा सुरु झालेला आहे आणि त्याच्या भीषण झळा आता आपल्याला आता जाणवू लागल्या आहेत. आपल्याला माहितच आहे कि महाराष्ट्रातल्या काही भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. माणसांना प्यायला सुद्धा पाणी मिळत नाहीये.अशा ठिकाणी राहणाऱ्या एका शेतकरी बांधवाची आणि त्याच्या खिन्न तेची व्यथा सांगणारी हि कविता मी लिहायचा छोटासा प्रयत्न केला आहे.आपल्या सारख्या शहरात राहणाऱ्या माणसांना मी विनंती करीत आहे. त्या आपल्या गावाकडील बांधवाचं म्हणणं आपल्या पर्यंत पोहचवणारी कविता मी आता तुमच्या समोर सादर करीत आहे.
शीर्षक-माझ्या शहरातल्या भावा....
आज करितो विनंती, माझ्या शहरातल्या भावा...
मोल पाण्याचे जाण तू , नको घालवू रे वाया.
माझी गाय तडफडे, नाही पाजायला थेंब.
तूझ्या घरात श्रीमंत, टब वाहतो भरून.
नदी नाले सुकलेले, नाही भरते ओंजळ.
तुझ्या शहरातला नाला, सदा असतो भरून.
कश्या तुझ्या घरातल्या, चकाकती रे फारश्या.
माझी भेगाळली भूमी,नाही पाहवत दशा.
नवी खोदली विहीर,आत निघाली कोरड.
तुझ्या स्वामिंग पुलास, आला कोठुनिया झरा.
मोल पाण्याचे केवढे, कधी जाणशील भावा.
थेंब थेंब अमृताचा, नको घालवू तू वाया.
रे माझ्या शहरातल्या भावा....
Sir tumchya academy madhe rahnyachi vyavstha ahe ka
Mee shubham dhanraj dhole Nagpur la rahto tumchya academy baddl Instagram var bagitl