"स्वागत-गीत",गायिका- श्यामला(ज्योत्स्ना)जोशी , गीत-पंढरीनाथ सोनवणे, संगीत-मोहम्मद हुसेन.नाशिक.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • 🌹🌹🌹// श्री //🌹🌹🌹
    💐 एक माझ्या जीवनाच्या प्रवासातील पहिली जुनी आठवण आणि पहिली मोठी संधी 💐
    साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ नासिक रोड.
    खंडोबा मंदिर स्टाॕप. संचालित,
    एस.एम.जोशी अघ्यापक विद्यालय नामांतर समारंभ
    ह्या कार्यक्रम चा शुभांरंभ
    २०/सप्टेंबर/१९८९ साली होता.. त्या निमित्त स्वागतगीत,प्रार्थना तसेच वंदेमातरम् सादर करण्यात आले.
    वीणा धारिणी सरस्वती तव
    हे स्वागत गीताचे
    लेखन प्रसिध्द कवि श्री.पंढरीनाथ सोनवणे यांनी केलं त्या स्वागत गीताला संगीत सुप्रसिद्ध कै.नौशाद संगीतकारांचे असिस्टंट प्रसिध्द संगीतकार मोहम्मद हूसेन यांनी दिले.
    तसेच प्रसिध्द हिंदी संगीतकार मोहम्मद हुसेन यांनी मराठी गीताला संगीत देऊन नामावंत गायकांकडून व वादकांकडून
    साधारण १०ते १२ दिवस मेहनतीने रियाजाची तयारी करून भव्यसोहळ्यात स्वागत गीत सादर केले..
    त्यावेळी एस.एम.जोशी अघ्यापक विद्यालय नामांतर समारंभ
    या उदघाटनाला
    मा.श्री.मधू दंडवते साहेबउपस्थित होते.
    त्यांनी या स्वागत गीताचे भरभरून कौतुक ही केले .
    अभिमानाची गोष्ट अशी आहे
    की या "स्वागत गीत वीणा धारिणी सरस्वती तव" हे गीत गाण्यासाठी गायिका म्हणून तेव्हा पहिल्यांदा माझी निवड करण्यात आली हे मी माझं खुप मोठं भाग्य समजते. आणि आजही मी माझा कार्यक्रम असो वा कुणाचा स्वागत गीत " वीणा धारणी सरस्वती तव हे गीत सादर करते..
    गीतकार , संगीतकार , गायक , वादक यांची एकमताने प्रयत्न होणे महत्त्वाचे असते. जीभेवर सरस्वती अन् डोळ्यांसमोर गदिमा व बाबुजी नेहमी आसावेत...
    स्वागत गीत
    वीणा धारिणी सरस्वती तव जिव्हाग्रावर वसो,
    सरस्वतीच्या मंदिरात या स्वागत तुमचे असो // धृ //
    या गोदेच्या जलप्रवाही
    सुधाकलश सांडला,
    मंगल पावन तीर्थ प्राशुनी
    पिंड असे पोसला,
    या तिर्थाची पानवनता तव
    मनी अहर्निश वसो // १ //
    प्रसन्न इथल्या वातावरणी
    वीणारव गुंजती,
    वीणारव तो ऐकून
    ज्ञानी कलावंत जन्मती ,
    ही ज्ञानाची ही दानाची
    भुमी सकला स्मरो // २ //
    ज्ञान ज्योत ही घेऊन हाती
    दाही दिशांना उजळा,
    बीजे पेरूनी भवती पिकवा
    सन्मार्गाचा मळा,
    अज्ञानाच्या घन अंधारी
    प्रकाश सकला दिसो // ३ //
    गीत- पंढरीनाथ सोनवणे.नाशिक
    संगीत-मोहम्मद हूसेन.नाशिक
    गायिका- श्यामला(ज्योत्स्ना)जोशी.नाशिक
    💐💐💐💐💐💐💐💐
    #sarswati
    #sarswatipuja
    #sarswatipujasong

КОМЕНТАРІ •