यशवंतगड रेडी - एक अद्भुत अनुभव - Yashwantgad Redi - A voyager's tale

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2020
  • वेंगुर्ला तालुक्यातील रेडी इथं असलेला हा मराठा इतिहासातला एक हिरा. रेडीच्या खाडीच्या मुखावर बांधलेला रेडीचा यशवंतगड. चालुक्यकालीन बंदर रेडी आज खाणकाम आणि स्वयंभू गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. इथं जवळच हा किल्लाही आवर्जून पाहावा असा आहे. ग्रँट डफ या इंग्लिश इतिहासकाराच्या मते हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवीसन १६६२ मध्ये बांधला. परंतु बहुतेक हा किल्ला वाडीच्या सावंतांकडे होता आणि त्यांचं विजापूरच्या आदिलशाहीच्या वतीने इथं शासन होतं. छत्रपती शिवरायांनी हा किल्ला दुरुस्त करून भक्कम केला आणि त्याला यशवंतगड नाव दिलं. इसवीसन ६१०च्या सुमारास चालुक्य राजा स्वामीराजा हा रेडीचा शासक होता. त्यानंतर १६६२ मध्ये किल्ला स्वराज्यात आला. मग वाडीच्या सावंतांकडे किल्ला असताना १८१८ ला पोर्तुगीजांनी हल्ला केला पण त्यांना यश मिळाले नाही. पुढे १८१९ मध्ये इंग्लिशांनी हा किल्ला संभाजी सावंतांकडून जिंकून घेतला. किल्ल्याच्या सभोवताली असलेला खंदक आता जवळजवळ बुजला आहे आणि एका वाड्याच्या बांधकामाचे अवशेष आणि काही स्तंभ इथं दिसतात. जुन्या पडक्या विहिरी, मंदिर असे अवशेष इथं पाहता येतात. दक्षिणेला तेरेखोल आणि उत्तरेला शिरोडा अशा ठिकाणी हा किल्ला आहे. मालवणपासून सुमारे सव्वा तासात इथं पोहोचता येते. गोव्यातील गोंगाटापासून सुटका करून घेऊन निवांत समुद्रस्नान करण्यासाठी इथं अनेक विदेशी पर्यटकही येतात. daryafirasti.com/2020/08/24/m...
    Situated about 70km from Malvan, Redi is located almost on the Maharashtra Goa border. Not too far from Fort Terekhol or Tiracol. Tourists who want to escape the crowds and din of Goa often come here. The history of this location goes about 1400 back in time to the era of Chalukyan kings. The Adilshahi kingdom ruled on this fort till 1662 when Chhatrapati Shivaji Maharaj defeated the Bijapur army and took control of this fort. This is when the fort was christened Yashwantgad.

КОМЕНТАРІ •