मान्सून वेळेपूर्वीच ? । मान्सून व चक्रीवादळाचा मार्ग ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 тра 2024
  • 🛑🛑व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजी नगर🛑🛑
    दिनांक : 20-05-2024
    ⛈⛈या आठवड्याचा हवामान अंदाज⛈⛈
    सोमवार दिनांक 20 मे रोजी विदर्भ व दक्षिण मध्य महाराष्ट्रामधील तुरळक ठिकाण सोडल्यास, गुरुवार दिनांक 23 मे पर्यंत काही तुरळक ठिकाण सोडल्यास हवामान स्थिर राहून तापमानात प्रचंड वाढ होईल. आतापर्यंत वादळी पाऊस व आभाळी हवामान असल्यामुळे एवढा उन्हाळा जाणवला नाही परंतु 25 मे पर्यंत तापमान अधिक राहणार असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा, खानदेश व मध्य महाराष्ट्रात चांगलीच गरमी जाणवेल. जळगाव, अकोला, चंद्रपूर, नागपुर, वर्धा अशा जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअस राहू शकते. मान्सूनचे आगमन अंदमान निकोबार बेटावर झाले असून वेळे आधीच केरळ व महाराष्ट्रात मान्सून पोहोचेल असे सध्याच्या अंदाजानुसार वाटू लागले आहे. 23 व 24 मे दरम्यान एक कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याचे अंदाज आहे याचा मार्ग विदर्भ, ओडीसा, छत्तीसगड असा झाल्यास 27 मे दरम्यान विदर्भ व लगतच्या भागात मोठ्या पावसाचा अंदाज आहे. मात्र ते उत्तराखंड मार्गे गेल्यास ढगाळ व पाऊस पडेल. विदर्भ, मराठवाडा खानदेशात मान्सून कधी येईल याबद्दल सध्या सांगता येत नसल्याने अंदाज आल्यावर देऊ पुढचा अंदाज या आठवड्यातच काही दिवसांनी देऊ पेरणी होईपर्यंत पावसाचे अंदाज आठवड्यातून दोन वेळा देऊ हे युट्युब वर पहात रहा व कॉलवर सुद्धा ऐकत चला.
    👉👉तसेच तूर सोयाबीन कापसाचे पेरणी पर्यंतचे नियोजन महत्वाचे लाईव्ह रोज व्हाइट गोल्ड ट्रस्ट युट्यूब चॅनल वर घेणार आहोत ते आवश्य पहा.
    🟢🟢🌱🌱सोयाबीन बद्दल माहिती🌱🌱🟢🟢
    👉बूस्टरचे स्वसंशोधित बियाणे त्र्यंबक, आश्रय व सई किंवा बुस्टरचे 9305 ,335, 612,726,753 हे सर्व बियाणे सध्या बाजारात उपलब्ध आहे. आपल्या आवडीचे बूस्टरचे वाण मिळाल्यास लगेच खरेदी करून ठेवा, तसेच बूस्टर सोयाबीन बियाण्यावर भव्य लकी ड्रॉ चे सुद्धा आयोजन केले आहे त्याचा सुद्धा फायदा घ्यावा. जास्त क्षेत्रात सोयाबीन पेरायचे असल्यास एकापेक्षा जास्त वाणांची निवड करा.
    👉सोयाबीन बीज प्रक्रियेसाठी पूर्व विदर्भातील प्रत्येक शेतकर्‍यांनी बुरशीनाशक जोरमेट 3 मिली व इतर शेतकऱ्यांनी जोरमेट 3 मिली किंवा पिक्सल 2 ग्रॅम अधिक रिहांश 4 मिली प्रति किलो बियाण्याला पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया अवश्य करा. बीज प्रक्रिया आपण 8-15 दिवस अगोदर सुद्धा करू शकतो. बीज प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीन कोणी ही पेरू नका. रिहांश अधिक बुरशीनाशक अशी बीजप्रक्रिया आपण करावी.
    👉सोयाबीनसाठी उगवण पूर्व तननाशक वापरायचे असल्यास बूस्टरचे अमोनि 12.4 ग्रॅम हे पेरणीनंतर तीन दिवसाच्या आत वापरा, या सोबत उगवण आलेले तन असल्यास ओंडो किंवा ग्रामोक्झोन 50 मिली वापरू शकता. तणनाशकांसाठी चार्जिंगचा किंवा साधा पंप वापरून एकरी दीडशे लिटर पाण्याचा वापर करा व गढूळ पाणी वापरू नका.
    👉जास्त वाढ होत असलेल्या जमिनीत सुपर फॉस्फेट एकरी 3 बॅग व पोटॅश 25 किलो, मध्यम वाढ होणाऱ्या जमिनीमध्ये डीएपी, 12:32:16 किंवा 14:35:14, 10:26:26 एकरी एक बॅग अधिक 2 किलो सल्फर WDG किंवा 5 किलो दाणेदार सल्फर व कमी वाढ होणाऱ्या जमिनीत 20:20:0:13 किंवा 24:24:0:8 अधिक पोटॅश हे पेरणी सोबत वापरावे.
    👉75 मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस पडून जमिनी थंड झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका व खोल पेरणी करू नका. वाणानुसार व जमिनीनुसार पेरणीतील दोन तासात अंतर व बियाणे कमी जास्त करा, शक्यतो बीबीएफ पद्धतीने पेरणी करा.
    🟢🟢🌱🌱कापसा बद्दल माहिती🌱🌱🟢🟢
    👉कापसाच्या बियाण्याचा या वर्षी थोडा तुटवडा जाणू शकतो, त्यामुळे लवकर खरेदी करा. शक्यतो चोर बीटी, बीजी 4, बीजी 5 बियाणे घेऊ नका. कापसाचे लागवड मुबलक पाणी असल्यास फ्री मान्सून लागवड करू शकता. कापसाला रेघाट्या किंवा फुल्या पडतानाच खताची पहिली मात्रा द्या त्यात 10:26:26 किंवा DAP अधिक पोटॅश वापरा. कापसामध्ये उगवण पूर्व तननाशक वापरायचे असल्यास लागवड झाल्यावर तीन दिवसाच्या आत किंवा धूळपेरणी केल्यास पाऊस पडल्यावर तीन दिवसाच्या आत बूस्टरचे हेक तणनाशक 300 मिली प्रति एकर ओलाव्यात वापरा. कापसाच्या धूळपेरणी बद्दल सांगणे शक्य नाही आम्हाला अंदाज आल्यास आम्ही सांगू, दादा लाड किंवा अति घनदाट लागवड पद्धतीचा वापर करायचा असल्यास व्हाईट गोल्ड ट्रस्ट यूट्यूब चैनल वर असे व्हिडिओ अवश्य पहा.
    🟢🟢🟢🌱🌱तुरी बद्दल माहिती🌱🌱🟢🟢🟢
    👉बूस्टरची पांढरी तूर बीडीएन 711 व पांढरी नवीन गोदावरी तसेच लाल तुरीमध्ये बूस्टर बीडीएन 716 बाजारात उपलब्ध आहे. मिळाल्यास बूस्टरची तूर बियाणे घ्या बूस्टर तूर बियाण्यासोबत 10 ग्रॅम चे ट्रायकोडर्माचे पॅकेट लावलेले आहे त्यात 10 मिली पाणी टाकून विरघळून एक किलो बियाण्याला लावूनच तूर पेरणी करा. इतर बियाणे असल्यास ट्रायकोबुस्ट डीएक्स बियाण्याला 10 ग्रॅम ते 20 ग्रॅम लावा, व्हाईट गोल्ड पॅटर्न तुरीची लागवड करा जास्त दाट पेरणी किंवा लागवड टाळा.
    #मान्सून #पावसाळा #हवामानअंदाज #चक्रीवादळ #शेती #agri #agriculture #shetimitra #farming #पेरणी #लागवड

КОМЕНТАРІ • 242

  • @user-gp6md8fy1y
    @user-gp6md8fy1y 27 днів тому +30

    सर आपल्याला उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो कारण आपण जे अन्नदात्या ला सदैव मोलाचे मार्गदर्शन करता ते आम्हाला मिळत राहो हीच अपेक्षा नमस्कार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому +1

      नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या सोबत असू द्या ...धन्यवाद !

  • @Sharadwayalwayal
    @Sharadwayalwayal 27 днів тому +18

    गजानन दादाचे जाहीर आभार एकदम जबरदस्त माहिती

  • @NutanGadge1905
    @NutanGadge1905 26 днів тому +7

    अचुक हवामान अंदाज व शेतकऱ्यांसाठी ची तळमळ या साठी खूप खूप धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼

  • @VilasJadhav-df9ge
    @VilasJadhav-df9ge 27 днів тому +26

    नमस्कार सर, तुमचा रोज लाईव्ह घेण्याचा निर्णय खूप आवडला .
    आपण शेतकरयांसाठी खूप मेहनत घेता
    तुमचे खुप खुप आभार.

  • @sbj26193
    @sbj26193 27 днів тому +12

    जाधव सर
    आपल्याला खुप खुप धन्यवाद सर,
    मी आपले व्हिडीओ सुरवाती पासून बघतो.
    तुम्ही दिलेली माहिती लवकर समजून जाते. त्यामुळे शेती करण्यास खूपच सोपं झालं.
    सर
    तुमचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे......
    शेवटी मनापासून धन्यवाद सर.🎉🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому +1

      नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या सोबत असू द्या यामुळं आमचा सुद्धा काम करण्याचा उत्साह वाढतो ... आपले आभार !

  • @santoshchamalate5629
    @santoshchamalate5629 27 днів тому +8

    खूप छान उपयुक्त माहिती दिली. आपल्याला खूप खूप धन्यवाद सर जी

  • @RamaSaknare
    @RamaSaknare 27 днів тому +6

    एकदम चांगली माहिती देता साहेब तुम्ही आठवड्यातून दोनदा हवामान अंदाज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @dnyaneshwarraut6586
    @dnyaneshwarraut6586 27 днів тому +4

    जाधव साहेब यांचे मार्गदर्शन, नियोजन पुर्वक माहिती नेहमीच मोलाची असते धन्यवाद जाधव साहेब.

  • @dipakaingle5655
    @dipakaingle5655 26 днів тому +3

    Khup Chan Mahiti Dili

  • @Patil5542
    @Patil5542 26 днів тому +2

    अत्यंत महत्वाची बातमी शेतकऱ्यासाठी

  • @mpjagdalecreation8318
    @mpjagdalecreation8318 27 днів тому +4

    अचूक अंदाज आणि छान माहिती...

  • @Jitendrashinde-dm4fu
    @Jitendrashinde-dm4fu 26 днів тому +2

    Sir namskar tumche aani Machindra Bangar saranche andaj perfect astat

  • @babasahebdighe4577
    @babasahebdighe4577 26 днів тому +2

    सर तुम्ही दिलेल्या शिफारशीनुसार शेती करत आहे तुमच्या मार्गदर्शनाने भरपूर फायदा होत आहे.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому +1

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !

  • @RahulNarwade-rz8hv
    @RahulNarwade-rz8hv 27 днів тому +2

    एकदम छान माहीती दिली सर

  • @nitinrathodbanjara2804
    @nitinrathodbanjara2804 27 днів тому +5

    Khab chhan mahiti dili sir dhanyavad 🙏🙏❤

  • @pandurangshewale9013
    @pandurangshewale9013 27 днів тому +3

    खूपच छान माहिती सर असेच पेरणी होई पर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा , आम्ही दर सोमवारी हवामान अंदाज देत असतो, हवामान अंदाज आणि कृषी सल्ला च्या अधिक माहितीसाठी या चॅनेल वरील व्हिडीओ पहा

    • @pandurangshewale9013
      @pandurangshewale9013 27 днів тому

      Thanks

  • @arjunlonkar4729
    @arjunlonkar4729 27 днів тому +2

    सर आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार

  • @user-yf2ge9cg6c
    @user-yf2ge9cg6c 27 днів тому +3

    नमस्कार भाऊ खूपच छान माहिती आहे

  • @user-wo6rg2cn2i
    @user-wo6rg2cn2i 27 днів тому +3

    जय महाराष्ट्र

  • @vinodpatil9796
    @vinodpatil9796 27 днів тому +2

    Thanks sir ji

  • @tajmohammadsayyad1503
    @tajmohammadsayyad1503 27 днів тому +4

    खूप छान माहिती दिली आहे

  • @motiramchoudhari2133
    @motiramchoudhari2133 24 дні тому

    Khup chan mahiti dili sir.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  24 дні тому

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @dnyaneshwardeulkar759
    @dnyaneshwardeulkar759 24 дні тому

    सर तुमच बोलन एकूण खुप चांगल वाटत सर असेच आम्हाला मार्गदर्शन करा सर धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  24 дні тому

      आपले सुद्धा धन्यवाद 🙏

  • @user-gj2xi2fc7g
    @user-gj2xi2fc7g 27 днів тому +4

    You are a great sar

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 25 днів тому

    छान छान माहिती 🎉

  • @dattatraychaware6407
    @dattatraychaware6407 27 днів тому +3

    अचुक माहिती सर🎉

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i 27 днів тому +2

    खुप छान माहिती दिली सर🎉

  • @namdevchavhan2897
    @namdevchavhan2897 27 днів тому +2

    धन्यवाद जाधव सर माहिती दिल्याबदल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏

  • @AishwaryaPundakar
    @AishwaryaPundakar 26 днів тому

    अचूक हवामानाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      आपले सुद्धा धन्यवाद

  • @rajuchavan1634
    @rajuchavan1634 27 днів тому +2

    छान माहिती दिली

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 27 днів тому +2

    छान माहिती सांगितली . सर्व programme बघतो ❤

  • @user-ns3ec8gk8w
    @user-ns3ec8gk8w 27 днів тому +2

    Dhanyvad sar

  • @BanduKakade
    @BanduKakade 26 днів тому +1

    धन्यवाद सर

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 27 днів тому +1

    छान माहिती

  • @RBKadam777
    @RBKadam777 26 днів тому

    शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर धन्यवाद..🙏

  • @sopankale9115
    @sopankale9115 27 днів тому +1

    सर तुमचे मार्गदर्शन खुपच छान आहे

  • @anantadhawas860
    @anantadhawas860 27 днів тому +1

    धन्यवाद जी

  • @tukaramchougule6368
    @tukaramchougule6368 27 днів тому +1

    छान उपक्रम

  • @vrundaraju
    @vrundaraju 27 днів тому +1

    खुप छान सर

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 27 днів тому +2

    Thanks Sir 🙏🙏

  • @user-mg7fr9kd7o
    @user-mg7fr9kd7o 27 днів тому +2

    खूप छान माहिती दिली आहे दादा 🙏🙏 आपन शेतकरी वर्गाकररीत खूप मनापासून मेहनत करता 🙏 धन्यवाद

  • @shivdasshelke2148
    @shivdasshelke2148 27 днів тому +1

    🙏🙏

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 27 днів тому +1

    धन्यवाद

  • @shriramrakte3092
    @shriramrakte3092 27 днів тому +1

    👌🙏🏻

  • @subhirpatil2697
    @subhirpatil2697 27 днів тому +1

    👍🙏

  • @dhanrajdobale9564
    @dhanrajdobale9564 27 днів тому +2

    At * ta *karanja (ghadge) dist* wardha माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.

  • @user-yl7zn1dh8b
    @user-yl7zn1dh8b 27 днів тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shamkantmahajan204
    @shamkantmahajan204 27 днів тому

    Ok Thanks

  • @ankushkhawale992
    @ankushkhawale992 27 днів тому

    Tank you ❤

  • @user-ze9lv1jg5n
    @user-ze9lv1jg5n 27 днів тому +1

    नमस्कार सर खरंच आपण सांगतात तसे कपाशी बियाण्याची शोर्टेज येणार आहे सर सर आपला हवामान अंदाज अचूक असतो आजची माहिती खूप छान होती सर कपाशी बियाण्याला बीज प्रक्रिया कोणती करावी कारण गेल्यावर्षी तुडतुडे यांनी कवळे कोमटे खाल्ली होती तेलुगु सन्मान काय करावे धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      नमस्कार दादा , आज सायं ७ व लाईव्ह पहा त्या मध्ये बीज प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती देऊ

  • @kapilatram2766
    @kapilatram2766 26 днів тому

    🎉🎉🎉🎉🎉

  • @abhipatil7900
    @abhipatil7900 27 днів тому

  • @narendrajamdar2323
    @narendrajamdar2323 27 днів тому +2

    Sir.live.chan

  • @Jitendrashinde-dm4fu
    @Jitendrashinde-dm4fu 25 днів тому

    Sir namskar koradvahumadhe 6/4/1.5 sathi acri tur biyane kiti lagel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  22 дні тому

      नमस्कार दादा , लागवडीसाठी एकरी १ किलो लागेल

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 27 днів тому +1

    Sir tumch live aso ki. Havaman andaj aso mla ase vat te ki mi onlin class madhe aahe. Khup chan vat te sir 💯

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      नमस्कार दादा , तुमची प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले धन्यवाद !

  • @anandraothadke7424
    @anandraothadke7424 27 днів тому

    Sir.katekarul tun aamchya shetat jast yete konte tunnashak vaparave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      नमस्कार दादा , या शेतात पीक कोणते घेणार आहे

  • @Jitendrashinde-dm4fu
    @Jitendrashinde-dm4fu 26 днів тому

    Sir koradvahusathi aapli Booser 716 kinva ankur charu lavavi booster tur Dondaicha ,yetthe kuthe milel?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  25 днів тому

      नमस्कार दादा, दोंडाईचा - इंडो बीज सप्लायर्स 7744016666

  • @sanjaybhore464
    @sanjaybhore464 24 дні тому

    सर आपला क्रृषि क्षेत्रातील गाडा अभ्यास आहे व सर्व माहिती अनुभवातून असते

  • @ashishaswale2441
    @ashishaswale2441 27 днів тому

    Vange lavtani stamp extra use kru skto kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      नमस्कार दादा ,चालेल

  • @amarmule4053
    @amarmule4053 27 днів тому

    Sir Apli jmin madhyam ahe kont soyabin chan ahe jast utpadhan yenyasathi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा , आज सायं ७ वाजता लाईव्ह पहा
      ua-cam.com/users/liveUjeywKOLz0Y?si=3C2c_jcvXE62m5NA

  • @raviugale3284
    @raviugale3284 27 днів тому +1

    मोक्ष भारी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा , हो चांगली जात आहे

  • @vishals.8815
    @vishals.8815 27 днів тому

    Pungab duk che guru

  • @rameshp3334
    @rameshp3334 27 днів тому

    Sar......adilabad la apli utpadhne kuthe miltat ? Patta dyava.....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      नमस्कार दादा , सतगुरू ऍग्रो एजन्सीज ७३५०४८१०४८

  • @roshanwade8672
    @roshanwade8672 27 днів тому +1

    सोयाबीन आणि तूर बूस्टर बियाणे कुठे मिळेल चांदूरबाजार आणि परतवाडा येथे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा , आसेगाव पूर्णा - अशोक पेस्टीसाईडस & फर्टिलायझर 9422956737
      विचोरी - साई ऍग्रो एजन्सी 9730371241
      परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151
      परतवाडा - अभिनव कृषी उद्योग 9822200560

  • @bankersakash5959
    @bankersakash5959 27 днів тому

    Sir Maka पिकाचे व्वस्थापन बद्दल सांगा..variety chi nawe सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому +1

      नमस्कार दादा , मका पेरणी संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू धन्यवाद

  • @rushikeshgawande75
    @rushikeshgawande75 24 дні тому

    Sir sambhajinagar la Ajeet 155 milte ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  23 дні тому

      नमस्कार दादा , मार्केट मध्ये चौकशी करा

  • @swapnilghode1840
    @swapnilghode1840 27 днів тому

    सर , रीहंश आणि जोर्मेट ची बीजप्रक्रिया केल्यानंतर बुस्टर बॅग सोबत मिळालेलं छोटा पॅकेट त्याचा कसा उपयोग करावा?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      नमस्कार दादा , जोरमेट वापरल्या नंतर बॅग मधील थायरम लावण्याची गरज नाही.

  • @mohammedyunus7935
    @mohammedyunus7935 27 днів тому

    Namaskar sir

  • @babasahebghodke3038
    @babasahebghodke3038 27 днів тому +1

    मला तर तुमच अक्षरशा वेड लागलय? धन्यवाद आभार सर.

  • @mahendrabhonde7970
    @mahendrabhonde7970 27 днів тому +1

    सर नमस्कार जी सर 🙏

  • @shivajisatpute7744
    @shivajisatpute7744 27 днів тому

    सर नमस्कार हळदीची माहिती द्या कि सर बियाणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा , हळद व अद्रक संपूर्ण माहिती देऊ चित्रकार सरांचे गुरुवारी लाईव्ह पाहावे

  • @Himalay_Wagh
    @Himalay_Wagh 25 днів тому

    *सर, पेंडीमिथालिन तन नाशक उगवनिपूर्व कापूस किंवा सोयाबीन दोन्ही मध्ये चालते का, प्लिज सांगा....*

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  25 днів тому

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @Himalay_Wagh
    @Himalay_Wagh 22 дні тому +1

    *Sir... मग कपाशी साठी बेड आता पाडून घेऊ की पाऊस आल्यावर करू, समजत नाही सर 😕*

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  22 дні тому

      नमस्कार दादा , शेत तयार झाले असेल आता पडून ठेवू शकता

  • @anirudhkale1610
    @anirudhkale1610 27 днів тому

    तुमचे cotton che बियाणे उपलब्ध आहेत का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा , पुढील वर्षी देऊ

  • @SharadNalawade-rn5re
    @SharadNalawade-rn5re 27 днів тому

    सर मी तुमचा आणि तुमच्या कार्य क्रमांचा ऋणी आहे परंतु तुम्ही माहिती

    • @SharadNalawade-rn5re
      @SharadNalawade-rn5re 27 днів тому

      दिलेल्या औषधे व खते आणि बियाणे मिळत नाही काही मिळत नसल्याने गरजे पोटी जे मिळेल ते घ्या व लागत मी राहणार कन्नड तालुक्यातील गाव कानडगाव जिल्हा संभाजीनगर शरद नलावडे असे अनेक शेतकरी आहेत माझ्यासारखे

  • @shubhamgaming2433
    @shubhamgaming2433 26 днів тому

    सर आमच्या अंजनगाव सुर्जी आणि अकोट अकोला अजित 155 कापसाची बॅग ब्लॅक मध्ये 1400 विकत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      नमस्कार दादा , याला पर्यायी जात निवडा

  • @swapnilghode1840
    @swapnilghode1840 27 днів тому +1

    नमस्कार सर, अश्रेय ७७७७ ची 25 किलोची पॅकिंग आहे तर एकरी बियाणे किती पेरायचे सर जमीन मध्यम भरी आहे ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      नमस्कार दादा , एकरी २५ किलो पेरणी करू शकता

  • @narendratapre457
    @narendratapre457 27 днів тому

    जोरमेट हदगाव तामसा येथे मिळेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा, हदगाव - शिल्पा कृषी भांडार 9588611621
      पळसा - सचिन कृषी सेवा केंद्र 9403746628
      तमसा - जांभळेकर ट्रेडिंग कंपनी 8007581199

  • @swapnilkuyate7013
    @swapnilkuyate7013 27 днів тому +1

    Sar pause jasti ahe ka ya varshi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा , सरासरी एवढा राहील किंवा या पेक्षा जास्त राहू शकते

  • @gajananpatil1191
    @gajananpatil1191 27 днів тому

    Namaskar sar aashray 7777 Ekari kiti kilo biyane perni karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      नमस्कार दादा , एकरी २५ किलो

  • @atmarambakal8990
    @atmarambakal8990 27 днів тому

    जालना जिल्हा मधे बियाणे कोठे मिळेल मि जाफराबाद किंवा भोकरदन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा , भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
      भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 27 днів тому +1

    सोयाबीन 612 हेघरचे आहे तर बीज प्रक्रिया कोणती करावी

    • @Farming_Green007
      @Farming_Green007 27 днів тому

      वर्डेंन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा , जोरमेट ३ मिली + रिहांश ४ मिली प्रति किलो बियाणे प्रमाण

  • @rajeshpund4064
    @rajeshpund4064 27 днів тому

    सोयाबीन आणि कापसाची बीज प्रक्रिया कशी करावी? FIR नुसार f kiti diwas आधी, I कीती दीवस आधी आणि R किती दिवस आधी?
    कृपया मार्गदर्शन करावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      नमस्कार दादा , आज सायं लाईव्ह पहा

  • @balajirathod8223
    @balajirathod8223 27 днів тому

    अकलकोट ला कोटे दुकानाचे नाव सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

  • @gauravghuse8855
    @gauravghuse8855 27 днів тому +1

    सर आदित्य सीड्स ची मोक्षा कपाशी बदल माहिती दयावी

    • @armaanali2450
      @armaanali2450 27 днів тому +1

      Changli variaty ayee medium kalavadi ayee

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому +1

      नमस्कार दादा , चांगली जात आहे

  • @ankushkhawale992
    @ankushkhawale992 27 днів тому

    सर आमची कांदा कोणता तारखी पर्यंत घरी आणावे शेत मदे च आहे सदा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा , या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होईल

  • @prafulmunde1952
    @prafulmunde1952 27 днів тому

    राम राम सर

  • @UmeshDhakne
    @UmeshDhakne 26 днів тому

    नमस्कार सर

  • @ashokraogade1869
    @ashokraogade1869 26 днів тому

    सर हळद पिकाबद्दल माहिती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा -ua-cam.com/users/livetb92SaLuni8?si=byHNuGzS2j7AsslO

  • @djanka8652
    @djanka8652 25 днів тому

    नमस्कार सर🙏, जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात बुस्टर बियाण्याचे अधिकृत वितरक नाहीय... कृपया करून सर माझी मदत करावी 🙏... औंदा तुमच्या मार्गदर्शनाने शेती करायची आहे. आपण देत असलेल्या माहितीसाठी धन्यवाद 🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  22 дні тому

      नमस्कार दादा , सध्या चोपडा तालुक्यात बूस्टर परीस ची उत्पादने उपलब्ध नाही

  • @pravindakhare8297
    @pravindakhare8297 27 днів тому +1

    नमस्कार

  • @narayanshingne4860
    @narayanshingne4860 27 днів тому

    हलक्या जमिनीसाठी सोयाबीनची सर्वात चांगली जात कोणती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      नमस्कार दादा , बूस्टर ८३३५ ( त्र्यंबक ) बूस्टर ८८८८ ( सई ) बूस्टर ९३०५, ३३५, ६१२ या जाती चांगल्या आहे

  • @funwithcutesister8923
    @funwithcutesister8923 27 днів тому

    कमी वाढ होणाऱ्या क्षेत्रात एकरी 20.20.00.13. किंवा 24.24.00.08 किती किलो द्यायला हवे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому +1

      नमस्कार दादा , एकरी १ बॅग

  • @nanasahebtirukhe1741
    @nanasahebtirukhe1741 27 днів тому

    Hi

  • @yogeshgunge1128
    @yogeshgunge1128 22 дні тому

    Sir mala job chi garj ahe... mi Bsc computer zal ahe......ekde lonar madhe kahi kam asel tr sangav..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा ,सध्या जागा खाली नाही पुढल्या वर्षी जागा निघाल्या वर कळवू

  • @uddhavjagtap954
    @uddhavjagtap954 27 днів тому

    सर ता -आष्टी जि -बीड तूर बियाणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      कडा - किसान क्रांती कृषी भंडार 9421340991

  • @mpjagdalecreation8318
    @mpjagdalecreation8318 27 днів тому

    आत्ता 7 वाजता सातारा येथे जोराचे वारे आणि पाऊस सुरू आहे. 20 मे 24

  • @laxmankhanpate
    @laxmankhanpate 24 дні тому

    जितुर ला बूस्टर काम कोणाकडे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  23 дні тому

      नमस्कार दादा , जिंतूर - श्री भाग्यलक्ष्मी कृषी केंद्र 9850225546
      जिंतूर (संभाजीनगर) - श्वेता ऍग्रो 9421461062

  • @lifesgood94
    @lifesgood94 26 днів тому +1

    Mala vatte 1 junepasun perni hotparyant Roj video takava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      नमस्कार दादा, आठवड्यातून दोन वेळा हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न करू . धन्यवाद !

  • @swapniljagtap9334
    @swapniljagtap9334 27 днів тому

    सर 1जुन ला सोयाबिन लागवड करु शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा , सोयाबीन पेरणी ७५ मिली मीटर पाऊस पडून जमीन थंड झाल्या नंतर करावे

    • @dhanajaygond4747
      @dhanajaygond4747 27 днів тому

      नमस्कार साहेब ता अहमदपूर जी लातूर कुठे मिळेल बियाणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      अहमदपूर - पवन कृषी सेवा केंद्र 9960608704
      हाडोलती - राजेश्वर कृषी केंद्र 8888667366
      शिरूर ताजबंद - तोंडारे कृषी सेवा केंद्र 9423776659