राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीतर्फे वारकरी संमेलनाचे आयोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • - राज्यप्रमुख हभप आबा महाराज मोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती
    - संमेलनाध्यक्षपदी हभप बापूसाहेब देहूकर, स्वागताध्यक्षपदी जयंत पाटील
    - उद्घाटनप्रसंगी युगेंद्र पवार, तर समारोपावेळी शरद पवार यांची उपस्थिती
    पुणे, ता. २३: राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पहिल्या वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (ता. २५) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत शुभारंभ लॉन्स, डीपी रोड, म्हात्रे पुलाजवळ, पुणे येथे होणाऱ्या या संमेलनात राज्यभरातून वारकरी सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल (आबा) महाराज मोरे, राज्य उपाध्यक्ष हभप मुबारक महाराज शेख, युवा वारकरी विभाग संपर्कप्रमुख हभप सुरज महाराज लवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    आबा महाराज मोरे म्हणाले, "वारकरी संमेलनाध्यक्षपदी संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माजी अध्यक्ष हभप बापूसाहेब महाराज देहूकर, तर स्वागताध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आहेत. संमेलनाचे उद्घाटन रविवारी सकाळी १० वाजता हभप भारत महाराज जाधव, हभप राजाभाऊ चोपदार, हभप राजेंद्र येप्रे महाराज व युवा नेते युगेंद्र श्रीनिवास पवार यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पहिल्या वारकरी संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. संमेलनात दुपारी ३.३० वाजता 'धर्म व राजकारण' या विषयावर जयंत पाटील यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ संपादक संजय आवटे घेणार आहेत."
    "उद्घाटनानंतर 'महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी संप्रदायाचे योगदान' या विषयावर आयोजित परिसंवादात संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रफिक सय्यद, हभप गणेश महाराज फरताळे, हभप राजेंद्र येप्रे महाराज वक्ते म्हणून सहभागी होतील. परिसंवादाचे अध्यक्षस्थान हभप बालाजी महाराज जाधव भूषविणार आहेत. "दुपारच्या सत्रात हभप ज्ञानेश्वर महाराज रक्षक यांच्या अध्यक्षेतेखालील परिसंवादात हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर, हभप गणेश महाराज फरताळे, हभप ज्योतीताई जाधव सहभागी होतील. दिंडी सोहळ्याकरिता भजन साहित्य प्रदान व पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे," असेही आबा महाराज मोरे यांनी नमूद केले.
    संमेलनात हभप भगवतीताई बाबामहाराज सातारकर, भारत महाराज घोगरे, तुळशीराम महाराज सरकटे, जलाल महाराज सय्यद, महादेव महाराज बोराडे यांच्यासह वारकरी संप्रदायातील इतर अनेक महाराज, संत साहित्याचे अभ्यासक, तसेच खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, अमर काळे, भास्कर भगरे, सुरेश म्हात्रे, बजरंग सोनवणे, निलेश लंके, धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, अशोक पवार, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, सुमन पाटील, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, मानसिंग नाईक, लिज्जत पापडचे सुरेश कोते, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.
    विवेकाची, एकात्मतेची पेरणी व्हावी
    संयोजन समितीमध्ये हभप शामसुंदर सोन्नर महाराज, राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी खटकाळे, डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप, बिल्डर सेलचे अध्यक्ष मिलिंद पाटील, ज्ञानोबा-तुकारामचे संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांचा समावेश आहे. वारकरी संप्रदाय वैश्विक विचारांचा, जातीभेदाच्या पलीकडे जाऊन एकात्मतेचा संदेश देतो. शिव-फुले-शाहू-आंबेडकरांनी हाच वारसा पुढे नेत आपल्याला प्रेरणा दिली. वारकरी संप्रदायाचा हाच विचार घेऊन समाजात विवेकाची, सर्व जाती-धर्माच्या एकात्मतेची पेरणी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीची स्थापना झाली आहे. शरद पवार यांच्या आशीर्वादाने, जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आबा महाराज मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही आध्यात्मिक व वारकरी आघाडी राज्यभर कार्यरत असल्याचे हभप मुबारक महाराज शेख म्हणाले.

КОМЕНТАРІ •