76 Bol Gori Bol Tera Kaun Piya | Prem Yatra | Pt. Raju Sawar | CP.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • A series of songs performed by Pt. Raju Sawar for CP members on the topic of 'Prem' (Love).

КОМЕНТАРІ • 22

  • @vidyah6
    @vidyah6 3 місяці тому +1

    दत्त 🌹🙏
    पंडितजी ..दत्त🌹🙏🙏
    बोल गोरी बोल तेरा कौन पिया...🌹🙏
    या जीवाचा पिया...🙏🌹दत्त परमेश्वर🌹🙏त्याच्या अगाधतेचे एक ..साधे ... सरल..स्वरूप...जेव्हा या जीवात भीनू लागते...तेव्हा उमगते ...
    या जीवात त्याच्या प्रती प्रेम ...भक्ती चा जन्म देणारा ..आणि त्या प्रेमाच्या पावलाने..जीवाला स्वतःचे स्वरूप दर्शवित निघालेला...गाभ्याचा गाभा..खरा परमेश्वर...जेव्हा उमजू लागतो ..तेव्हा ही गोरी गाऊ लागते.... नाम तो उसका..
    🙏🌹दत्त🌹🙏 ...दुनिया ने उसीका नाम लिया....🌹🙏
    दत्त .... दत्त 🌹🌹🙏🙏
    🙏🌹दत्त🌹🙏

  • @manasinikam108
    @manasinikam108 3 місяці тому +1

    ❤️ दत्त प्रेमयात्रा रचना क्र. 76 ❤️
    🌹 बोल गोरी बोल तेरा कौन पिया 🌹
    माझ्या प्रिय प्रेमा, पंडितजी मागे एका अवसरात बोलले होते, की कधी कधी खूप अगाध गोष्टीही खूप सहज अवस्थेत प्रकट होतात.. जिथे अत्यंत सहजता असते तिथेच परमेश्वर सापडतो. मला हे तेव्हा खरंच समजलं नव्हतं. डोक्यातल्या चमत्कारांच्या संकल्पना तुझे दर्शन गमावत होत्या.. पण आता तो खोट्याचा पडदा गेला... आणि तुझे खरे दर्शन झाले! 🥹🙇‍♀❤️ हे दर्शन... Oh My My... 🙇‍♀ निशब्द!
    मेरे पिया, तुझे दर्शन खूप सहज आहे.. तू खरंच खूप साधा आहेस. दिसणार्‍या स्वरूपाच्या पार दडलेलं तुझं खरं स्वरूप... आणि ते प्रेमाने भरलेले, भारलेले डोळे... आणि तुझे ते विशाल हृदय, जे स्वतःला या जीवावर उधळते आहे... 🥹🙇‍♀ I'm finished here! तुझी प्रस्तुती प्रस्तुत करायला dictionary ही तोकडी! माझ्या प्रेमा, तू खरंच जग से निराला आहेस! तुझी निशानी या तोकड्या शब्दांनी काय सांगावी? इथे डोळे उघडले की कणाकणात तुझेच दर्शन सजले आहे! यात बहेरूपीयासारखं, फसवण्यासारखं काहीच नाहीये! ये छांव-धूप का खेलही तो तेरी लीला है। तुझे स्वरूप बदलणे म्हणजे प्रत्यक्षात जिवाचे दर्शन समृद्ध करणे आहे! हृदया, हे दर्शन खूपच अजब आहे! मला आता सामान्यामधेच असामान्य दिसायला लागलं आहे. हे दर्शन विश्वास ठेवायच्याही पार आहे. नुसतंच ऐकलं असतं तर कदाचित विश्वास ठेवलाही नसता, पण मी ते प्रत्यक्ष बघते आहे. खऱ्या दर्शनाला विश्वासाची गरजच काय? शंकराची परिस्थिती कशीही असली तरी संसार झालाच ना! कारण तिथे खरे प्रेम होते. खऱ्या प्रेमाला काही लागतच नाही. खरे प्रेम सगळ्या परिस्थितीवर आपोआपच मात करते. त्याची शक्तीच मोठी विलक्षण आहे.. खूप नाजुक... पण खूप strong! 🙇‍♀❤️
    हृदया, किती गोड ना! लौकिक प्रेमात प्रेम कमी आणि व्यवहारच जास्त दिसतो. पारलौकिक प्रेमात मात्र प्रेम सोडून दुसरं काहीच दिसत नाही.. हे लगेच समजणारे व समजून संपणारे प्रेम नाही.. हे जागणारे प्रेम आहे. जगातले सगळे गुण प्रेमातूनच तर उगवले आहेत! काय बोलणार या प्रेमावर? जितके बोलू तितके कमीच! खोली लाटांमधे येत नाही हे पक्के! 🥺
    प्रेम ही दिव्य नशाच आहे..
    धाडस असे जन्मते की जग ओलांडते..
    हृदय हृदयाला हृदयाने भेटते..
    अकारण आनंदाचे कारण बनते..
    नित्यनाविन्याचे पुस्तक नाचते..
    जीवन जीवनाला स्वप्नवत बनवते..
    अस्तित्वाचे अस्तित्वाशी नाते जुळते..
    फुल आणि भुंग्याचे अनादीचे नाते सांगते..
    ते नाते जगते, रिक्त होते, आणि पुन्हा नव्याने जगते..
    उंचीत उंची आणि खोलीत खोली गाठते..
    प्रेमाच्या श्रीमंतीने प्रेमच इथे श्रीमंत बनते.. धन्य धन्य होते 🙇‍♀
    एवढं बोलूनही जे बोलायचं होतं ते शब्दात आलंच नाहिये! शेवटी प्रेम व्यक्त होऊनही अव्यक्तच राहिलं आहे.. 🥹❤️ निशब्द... तू घेशील ना समजून..🙇‍♀
    पंडितजी,
    एखाद्या गोष्टीला किती उंच बघावे हे तुमच्याकडून शिकावे! तुमचे प्रमेय दत्त परमेश्वराने आम्हाला दिले! धन्य! 🙇‍♀ तुम्हाला हृदयापासून खूप खूप khuuuup धन्यवाद!🌹🙏
    🙏🌹 दत्त! 🌹🙏

  • @dikshadeshpande1744
    @dikshadeshpande1744 2 місяці тому

    🙏दत्त 🙏🌹♥️👏☺️👏👏🙏🌹🌹🌹🌹

  • @rajubhansali649
    @rajubhansali649 3 місяці тому +1

    दत्त 🙏🌹❤️🎵🥁🎺🎷🎶🎹🎻💝

  • @vinodranade6967
    @vinodranade6967 3 місяці тому

    दत्त

  • @shilpathakurdesai4358
    @shilpathakurdesai4358 3 місяці тому

    ❤दत्त!आनंद😊

  • @anilpuranik568
    @anilpuranik568 2 місяці тому

    श्रीराम समर्थ!
    श्रीशंकरभगवानांबद्दल अत्यंत हीन शब्दप्रयोग केलेत. उदा. भिकारडा वगैरे. मूळ गीताचा अर्थ तो असला तरी शब्दप्रयोग सौम्य आहेत. सबब UNSUBCRIBED व DISLIKE करीत आहे.
    जय श्रीराम!

  • @yogitapandit6606
    @yogitapandit6606 3 місяці тому

    🙏🏻💞दत्त💞🙏🏻
    🌳प्रेमयात्रा : रचना : ७६🌳
    🦋.. बोल गोरी बोल तेरा कौन पिया!!.... बोल तूही बोल मेरा कौन पिया!!....🦋
    🌸पंडितजींनी अतिशय सुंदर गायलेले गीतरुपी सूत्र नी त्याचा केलेला अप्रतिम विस्तार; बघण्याचा, जगण्याचा सुंदर डोळा देऊन जाते🙇🏻‍♀🙏🏻.
    "दत्तात्रया"!!..
    तुझ्या राज्यात सगळंच अव्याख्य होऊन बसले आहे, मग तो संसार का असेना. ज्याक्षणी कृपेने तुझ्या सानिध्यात माझा प्रवेश करविला त्याच क्षणांपासून खरं जगणे सुरू जाहले, तोचं जीवनातला खरा उदय, अन् अन्यथेचा अस्त हा संसारही मायेचा न राहता त्यातला तुझा संसार दर्शनात आला, दिवस रात्रीचे वर्तुळाबाहेर अपरिवर्तन ठाण मांडून बसले आहे, याचा बोध जाहला. सर्वात्मक असूनही सर्वातीत, काळावर ज्याचा अंमल तो कालातीत हेच दर्शन मला 'जगण्याचा संसार' देऊन गेले जो तुझ्या व्याप्तीचा आहे धन्य!🙏🏻.
    साच प्रेम असेल तर धाडस जन्माला येते नई! मग जग सोडावं लागलं तरी चालेल, जोगी व्हावं लागलं तरी चालेल. खुसरो दरिया प्रेम का, उल्टी वाकी धार। जो उतरा सो डूब गया, जो डूबा सो पार।
    प्रेम जितकं नाजूक तितकंच ते प्रखरही म्हणूनच पार्वती स्मशानाचं सोनं करू शकली नई! धन्य🙏🏻
    साक्षी होऊन पाहता.. तू अगाध, जीव अज्ञेय दिसे.. असे असूनही जीव परमेश्वर एकमेकांत वसे.. किती ही करुणा!!... कृपा!!!.. 🥺🙏🏻युगानुयुगे उलटूनही प्रेम निभावणे चालूच जसे.. चिरंजीवाचे चिरंतन चिरंजीव प्रेम हे भाग्यात चिरंजीवा तूच सजविलेस, तुझे सौभाग्याने पावन केलेस. धन्य!🙇🏻‍♀🙏🏻
    तुझ्या शाश्वत प्रेमाने ..….....…..……!!! ही कोणती शांती प्रसवली?!!.. शांतता ही कसली? जिने स्तब्ध केले आहे.. अश्रूंनाही खिळवून ठेवले आहे🥺🙏🏻 आर्ततेतील शांतता पहिल्यांदा जगते आहे.. हा निःशब्द विस्तार ?? आकाश माझ्यात की मी आकाशात, ही अनुभूती विलक्षण, धुंदीलाही भान आहे, जणू मला प्यायलेल्या आकाशाला मीच प्राशिले अन् तरीही दोघेही सघन रिक्तही, मुक्तही.. धन्य!🙏🏻.
    "दत्तात्रया"!!..
    माझ्या हृदया!!.. माझ्या प्राणा!!.. तुझं प्रेम तुझ्यासारखेचं सादगीने नटलेलं, अत्यांतीक प्राणार्पणाने जगावे असे आहे, शाश्वत प्रेम अर्पण, समर्पणा पलीकडे होऊन बसले आहे. श्वासांचा पुरावा द्यावा लागत नाही, जिवंतता श्वासांचा गाव सांगून जाते नई! धन्य🙏🏻
    तू अन् तुझे प्रेम एकवाद्वितीय! धन्य!🙏🏻🙇🏻‍♀
    ❤️दत्त❤️
    पंडितजी हृदयपूर्वक धन्यवाद!🙇🏻‍♀🙏🏻
    निमित्त हेरिटेज उत्सव अन् किती सुंदर अवसर मिळाला. त्यातली सूत्रे, त्यांचा विस्तार! अतिशय उंच, सखोल, अप्रतिम! आज पुन्हा नव्याने.. ती केलेली धमाल, त्या शिट्ट्या, त्या टाळ्या अन् उत्सव संपन्न होत असताना उठलेला दत्त!!🙏🏻 जगला गेला धमाल आली! आपले खूप खूप खूप धन्यवाद! आनंदाचा आनंद! दत्त!🙇🏻‍♀🙏🏻.

  • @priyankaambulkar3438
    @priyankaambulkar3438 3 місяці тому

    🙏🏻🌹 दत्त 🌹🙏🏻
    🙏🏻🌹 प्रेमयात्रा : हेरिटेज उत्सव, बाणेर : सूत्र क्र 76 - बोल गोरी बोल तेरा कौन पिया... 🌹🙏🏻
    दत्तात्रया, आजच्या सूत्रातून तू जो प्रेमाचा उच्च दर्जा मांडला आहेस त्याला तोड नाही. तसं हे गाणं खूपच परिचयाचं आहे आणि तरीही आज त्याचा असा नवा परिचय झाला की दृष्टी नवीन होऊन गेली. तू कितीही जुना विषय निवडलास तरी त्यात नाविन्य भरून त्याला वर्तमानात आणल्याशिवाय राहात नाही. धन्य 🙏🏻🙏🏻🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️
    दत्तात्रया, बोल गोरी बोल तेरा कौन पिया? किती सरळ प्रश्न आहे? वाटतो सरळ पण भलताच तिरका आहे. त्याचे सरळ उत्तर दिले तर माणसाचा दृष्टिकोन बदलतो. लपवले तरी त्यातून संदेह जन्माला येतो. शेवटी त्याला एक मनोरंजक वळण द्यायचे आणि मोकळे व्हायचे. दोष मुक्तीचा नाही, तर झेपावणाऱ्या नजरांचा आहे. मला हा प्रश्न विचारला तर माझे उत्तर मात्र ठरलेले आहे... कोणते? तर... जो हाकेला ओ देतो तो माझा, दुःखाला जो खो देतो तो माझा, उपकारातून सुटका करून अकारण, उद्धाराला हो देतो तो माझा! 🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️ तुला सांगते दत्तात्रया, परमेश्वरासाठी परमेश्वर ही संकल्पनाच या जगात अस्तित्वात नाही. जो तो आपापल्या इच्छा आकांक्षांमधे इतका गुंतून पडला आहे, की त्याच्यापुढे परमेश्वर टिकतच नाही. इथे परमेश्वराचे वर्णन तर सापडते, पण परमेश्वर कुठे सापडतोय? सगळे वर्णनावरूनच अंदाज बांधणारे आहेत. तू मात्र तुझ्या अवसराच्या रूपाने सत्याचा डाव मांडला आहेस. दृश्यामधले सरणे समजून घ्यावे, पोकळीतले उरणे समजून घ्यावे, कात टाकुनी साप म्हणाला मजसी, भरण्यामधले भरणे समजून घ्यावे. या ओळी तुझ्याशिवाय कुणाला सुचणार आहेत? दत्तात्रया, परमेश्वर हा मनोरंजनाच्या अंगाने प्रकटच होत नाही बघ! या विषयाची मस्करी होऊच शकत नाही. स्वरूप कोणतेही असो, परमेश्वर हा परमेश्वरच राहतो. 🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️
    गाणं चिडवाचिडवीच्या स्वरूपात असलं तरी पंडितजींनी त्यातून परमेश्वर अगदी समरसून मांडला आहे. खऱ्या प्रेमाचे कंगोरे त्यातून व्यवस्थित उलगडले गेले आहेत. प्रेम परिस्थितीप्रमाणे बदलत नाही तर परिस्थिती आपल्याप्रमाणे बदलते हेच खरे! खेळ चंद्र सूर्याचा नभाला विचारू नका. वाढण्यात मरणे का वयाला विचारू नका. काही प्रश्न उत्तरे मिळूनही सुटत नाहीत. असे प्रश्न केवळ समजूनच घ्यावे लागतात.
    पंडितजी, तुम्हाला हृदयापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
    धन्य 🙏🏻🙏🏻🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️
    🙏🏻🌹 दत्त 🌹🙏🏻

  • @nileshpandit6766
    @nileshpandit6766 3 місяці тому

    दत्त! 🙏
    🌸 प्रेम यात्रा 🌸
    🌼 बोल गोरी बोल तेरा कौन पिया....🌼
    दत्त प्रभू 🙏.....
    हे प्रेम गीत बोध पुष्प होऊन जीवास सुगंधीत करत चालले आहे. प्रत्येक वेळेला ते स्वतःची नवीन पाकळी उलगडून जीवास दाखवते आहे.
    त्या क्षणाला ते फुल एकच आहे पण प्रत्येक पाकळी तुझे नावीन्य सांगते आहे. 🙏
    तू अनंता चा दाता आहेस 🙏 माहित नाही अशी किती पुष्य तुझ्या जवळ आहेत आणि त्याच्या प्रत्येक पाकळ्या नविन्याने नाटल्या आहेत.
    आज चे सूत्र ही असेच आहे तू कुठे बोध रूपात, तर कुठं आनंद रूपात, तर कुठे मुक्तीच्या रूपात, कुठे ज्ञानाच्या रूपात, कुठे कुठे प्रेमाच्या रूपात, अश्या अनेक रूपात मला तूच दिसतो आहेस. बघ ना सूत्रांत थोडी चिडवा चिडवी दिसते, कुठे ईर्षा, कुठे प्रेम, कुठे सत्य, थोडी नोकझोक. पण तुझं अस्तित्व सगळ्यात राहून एकदम विलिप्त आहे. एकच वेळी तू आहेस आणि एकच वेळी नाहीस. 🙏
    आता मला तू जीवास दिलेले सूत्राचे स्मरण होत आहे घेऊन घागरीत या सागर जगायचा. 🙏
    पण आता माझी अवस्था विलक्षण जाणवते आहे.
    या घागरीत सागराचे पाणी टाकणारा तूच 🙏
    पण मग हे पाणी आता पुन्हां या घागरीला सागरात घेऊन चालले आहे.
    तुझे निर्धारण या जीवास माहित नाही तू म्हणतोस म्हणून मीही म्हणतो. मागचे काही माहित नाही पण तुझी अनंतात तूच दिलेले डोळे दीपवू लागले आहेत. ही असं झालं आहे घागरी च्या आत सागर मध्ये घागर आणि बाहेर अनंत सागर. 🙏
    खूप खूप अफाट अचाट विराट अगदी हात 🙏 जोडले तरी पत्ता न लागणारे. 🙏
    मी निशब्द 🙏.......
    सत्याची गाठ पडली की बाकी सर्व गायब होऊ लागते. उरते फक्त सत्य सत्य आणि नित्य सत्य. 🙏
    मनाचे, क्षणिक अशाश्वत खेळ खूप बुजरे असतात.
    तू 🙏मात्र असा खेळ मांडला आहेस की जीव जिवाच्या पार तुझ्या कृपेनें तुझ्या सवे जायला आता मागत आहे. पण हे मागणे तूच ढकललं आहेस. शाश्वत तहान आपोआप तूच आपोआप निर्माण केली आहेस, आणि ती भागवतही आहेस. पण हिसुद्धा तुझ्या सारखी नविन्याने नटली आहे जरा नवीन दिसले की आत तहान उठते. 🙏 आणि तू ती क्षमवतो. 🙏 बघ ना आता जीव कुठल्या कुठे येऊन बसला आहे.
    हे परमेश्वरा 🙏 हे निराकारा 🙏 हे करुणेच्या दाता 🙏 आता असं झालं आहे तुझे माझ्यात असणे आता माझे होणे झाले आहे.🙏
    शब्दांत न बसणार कस मांडायचे. 🙏
    पण ही अडचण फक्त जीवाची आहे कारण तू तर सर्वज्ञ आहेस.🙏
    मग हात जोडायचे 🙏 तुला पहात राहायचं.........🙏
    अनंताकडे सरकायचे 🙏......
    पंडितजी आपणाला हृदय पूर्वक धन्यवाद 🙏
    धन्य 🙏
    प्रेम 🌹आनंद
    दत्त! 🫂🙏🌸🙏

  • @ravindrataksale2151
    @ravindrataksale2151 3 місяці тому

    🙏🙏🙏 दत्त 🙏🙏🙏
    प्रेम यात्रा रचना 76
    --- बोल गोरी बोल तेरा कौन -----
    आनंद बक्षी यांनी या गीतामधून असा संदेश दिला आहे, प्रेमाला या जगात फार व्यावहारिक पणे घेतले जाते. संपत्ती आणि सौन्दर्य या विषयांना महत्व दिले जाते.
    प्रेयसी या गीतात म्हणते, माझे प्रेम आत्ताचे नाही, तर युगांपासून चालत आलेले आहे. तुम्ही कितीही मला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही.
    लौकिकातील हे मत ठाम असले की, त्याला पारलौकिक दर्जा प्राप्त होतो. स्वर्ग इथेच निर्माण होतो.
    पंडितजींनी या सूत्रातून असे स्पष्ट केले आहे की, जग अध्यात्म करायला लागलेल्या जीवाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. म्हातारपणी करण्याच्या गोष्टी तु आत्ता करतोस. तुझे जीवन वाया घालवू नकोस.
    जीव जर जगाच्या बहकण्यात आला, तर तो आयुष्यातील काळ फुकट घालवितो.