Ep:4 | गोकर्ण महाबळेश्वर लिंगाची उत्पत्ती 🤔 कशी झाली ?? | Gokarna |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 сер 2023
  • #श्रीक्षेत्र_गोकर्ण_महाबळेश्वर
    स्थान: कर्नाटक उत्तर,कन्नड जिल्हा*
    विशेष:- शंकराचे आत्मलिंग,श्रीपाद श्रीवल्लभ ३ वर्षे वास्तव्य
    श्री क्षेत्र गोकर्ण येथील आत्मलिंग
    या क्षेत्राचा उल्लेख श्रीमद् गुरुचरित्र या ग्रंथात आढळतो.येथे श्रीपाद श्रीवल्लभ घरातून निघाल्यानंतर तीर्थ क्षेत्रे फिरत असता याठिकाणी ३ वर्षे राहिल्याचा उल्लेख आढळतो हे अतिशय पुरातन शिव मंदिर असून अत्यंत प्रासादिक तीर्थक्षेत्र आहे. अनेक जन्मांची पापे येथे केवळ दर्शनाने नाश पावतात असा क्षेत्रामहात्म्यात उल्लेख आहे.
    आत्मलिंगाची स्थापना झालेली पाहून रावणाने संतापून आत्मलिंगासोबत आणलेली सर्व सामग्री इतरत्र फेकून दिली.(उदा.आत्मलिंग आणलेला डब्बा,डब्ब्याचे झाकण,आत्मलिंगावर टाकलेले कापड,धागा इ.) या चारही वस्तू वेगवेगळया ठिकाणी जाऊन पडल्या.गोकर्ण महाबळेश्वरबरोबरच या चारही ठिकाणांस धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. भगवान शंकर व पार्वती यांनी खालीप्रमाणे या ठिकाणांस पंचक्षेत्र असे नाव दिले👇🏻👇🏻
    १) गोकर्ण महाबळेश्वर- महादेवांचे मुख्य आत्मलिंग
    २) सज्जेश्वर- आत्मलिंग आणलेला डबा पडला ते ठिकाण (३५ कि. मी. अंतर)
    ३) धारेश्वर- आत्मलिंगास बांधून ठेवलेला धागा पडला ते ठिकाण (४५ कि.मी. अंतर)
    ४) गुनावंतेश्वर- जेथे आत्मलिंगाचे झाकण पडले ते ठिकाण (६० कि.मी. अंतर)
    ५) मुरुडेश्वर- आत्मलिंगास झाकलेले कापड ज्या ठिकाण पडले ते ठिकाण (७० कि.मी.अंतर)
    अशा प्रकारे भगवान शंकरांच्या आत्मलिंगाची श्री गणेश मुळे गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी स्थापना झाली.
    गाईच्या कानासारखे म्हणून गोकर्ण तर महाबलशाली रावणाने अनेक प्रयत्न करुनही आत्मलिंग हलले नाही म्हणून महाबळेश्वर (महा+बळ+ईश्वर) अशा प्रकारे महादेवांच्या या आत्मलिंगास गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले व कर्नाटकच्या कुमठा तालुक्यातील हे ठिकाण गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले आहे.हे ठिकाण मोक्षाचे द्वार समजले जाते.
    गोकर्ण महाबळेश्वर आत्मलिंग माहात्म्य
    या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत पण या सर्व तीर्थक्षेत्रांत कर्नाटक राज्यात उत्तर कन्नड जिल्हयात अत्यंत पवित्र व प्रेक्षणीय समुद्र किनारी गोकर्ण हे तीर्थक्षेत्र आहे.या ठिकाणी महाबळेश्वर नावाचे स्वयंभू शिवलिंग (आत्मलिंग) आहे.रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळविले त्याची श्रीगणेशाने या क्षेत्री स्थापना केली.
    आत्मलिंगाची उत्पत्ती कशी झाली ?
    कालाग्नीसारखा एक महाकाय पशु होता.त्या पशुला तीन शिंगे होती.एकदा ब्रम्हा-विष्णू-महेश शिकारीसाठी गेले होते.त्यांनी त्या पशूची शिकार केली.त्यांनी त्या पशूची तिन्ही शिंगे काढली.त्या प्रत्येक शिंगाखाली एकेक प्राणलिंग होते.ती तिन्ही लिंगे त्या तिघांनी घेतली.यातील आत्मलिंग हे शंकरांना मिळाले होते.जो या आत्मलिंगाची तीन वर्षे पूजा करील तो स्वतः ईश्वर होईल.हे आत्मलिंग ज्या स्थानी असेल ते स्थान कैलास होईल.रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगाला पीळ बसला व ते गोकर्ण म्हणजे गाईच्या कानाच्या आकारासारखे झाले पण ते जमिनीच्या बाहेर आले नाही.तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले.
    स्वत भगवान सदाशिव,भगवान विष्णू,ब्रम्हदेव, कार्तिकेय,गणेश व सर्व देवादिकांनी या ठिकाणी वास्तव्य केले असे गुरुचरित्रात सांगण्यात आले आहे.
    गोकर्णक्षेत्रात असलेले भगवान शंकर त्यांचे केवळ स्मरण करताच सर्व पातकांचा नाश होतो.
    सूर्याशिवाय अंधाराचा नाश होत नाही त्याप्रमाणे गोकर्णक्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पापनिष्कृती होत नाही.हजारो ब्रम्हहत्या केलेला मनुष्यही गोकर्णक्षेत्री जाताच पापमुक्त होतो.
    या क्षेत्राचे माहात्म्य इतके थोर आहे, की कार्यसिद्धीसाठी ब्रम्हदेवाने आणि विष्णूने येथे तप केले आहे.जो कोणी गोकर्णक्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो ब्रम्हपदाला जातो (संदर्भ- गुरुचरित्र अध्याय ७ वा व स्कंध पुराण)
    या गोकर्णक्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत. सत्ययुगात शिवलिंग श्वेत पाषाणाचे होते.त्रेतायुगात ते तांबूसवर्णाचे होते,द्वापारयुगात ते पीतवर्ण आणि कलियुगात ते कृष्णवर्णाचे होते, गोकर्ण महाबळेश्वराचा अधोभाग खूप गोल आहे.तो सप्त पाताळापर्यंत गेलेला आहे परमपवित्र असे हे गोकर्णक्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे. तेथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते तसेच रविवारी,सोमवारी व बुधवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा गोकर्ण क्षेत्री केलेले समुद्रस्नान,शिवपूजन, पितृतर्पण,अन्नदान,होमहवन अनंत फळ देणारे आहे.या ठिकाणी श्री गणेशाचे सुद्धा मंदिर आहे तसेच गोकर्णापासून ३० कि मी अंतरावर मुरुडेश्वर हे अत्यंत प्रेक्षणीय स्थळ आहे.हे गोकर्णक्षेत्र पुण्यवान स्थान आहे,म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभ या पवित्र क्षेत्री ३ वर्षे वास्तव्यास होते.
    *_____________________________*
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    #mahabaleshwartemple #mahabaleshwartemplehistory #mysteryofmahabaleshwartemple #mahabaleshwar #maharashtra #mahabaleshwartemple #mahabaleshwar templemaharashtra #thegunavanteshwartemple #panchgangatemple #sivatemple #murdeshwarcave #hindutemple #murdeshwar #murdeshwarstory #gokarnatemplestoryMarathi #templeaatmalinga #dharm #thestoryofmurudeshwar #gokarnaganeshstory #beliefs #gokarnais theonlyatmalinga #thestory #bestnews #latesthindinews

КОМЕНТАРІ • 10