आंबा लागवड भाग-158 : खत व्यवस्थापन - पहीला व दुसरा टप्पा कधी व कसा द्यावा ? कोणती खते वापरावीत ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • 🥭 आंबा लागवड लेख : 8 🥭
    मार्गदर्शक - श्री.राहुल खैरमोडे सर
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    🔹Rahul khairmode Vlogs 🔹
    ♦️खड्डा भरताना कोणती खते टाकावीत ?♦️
    सिंगल सुपर फोस्फेट - १ Kg
    हुमिक ॲसिड- २ kg
    रिजेंट- ५० gr
    मिथिल पॅरिथिॲन(फंगिसाइड )- 100 gr
    लिंबोळी पेंड -१ घमेले (१० किलो )
    लेंडी खत -२ घमेली (२० किलो )
    शेणखत -६ घमेली (६० किलो )
    गांडूळखत -१ घमेले (१० किलो )
    पालापाचोळा वाळका थर पाऊण फुट
    मायक्रो.(सूक्ष्म अन्नद्रव्य) -५० gr
    🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
    एक वर्ष ते सहा वर्ष पर्यंत च्या
    झाडाना द्यावयाची खते
    वय १ वर्ष
    शेणखत : १ घमेले/१० किलो
    *नत्र (युरिया)*: ३०० Gr.
    सिंगल सुपर : ३०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : २०० Gr.
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    वय २ वर्ष
    शेणखत : २ घमेले/२० किलो
    *नत्र (युरिया)*: ६०० Gr.
    सिंगल सुपर : ६०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : ४०० Gr.
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    वय ३ वर्ष
    शेणखत : ३ घमेले/३०किलो
    *नत्र (युरिया)*: ९०० Gr.
    सिंगल सुपर : ९०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : ६०० Gr.
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    वय ४ वर्ष
    शेणखत : ४ घमेले/४० किलो
    *नत्र (युरिया)*: १२०० Gr.
    सिंगल सुपर : १२०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : ८०० Gr.
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    वय ५ वर्ष
    शेणखत : ५ घमेले/५० किलो
    *नत्र (युरिया)*: १५०० Gr.
    सिंगल सुपर : १५०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : १२०० Gr.
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    वय ६ वर्ष
    शेणखत : ६ घमेले/६० किलो
    *नत्र (युरिया)*: १८०० Gr.
    सिंगल सुपर : १८०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : १४०० Gr.
    🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
    🔸महत्वाचे🔸
    यापैकी
    ५०% नत्र पावसाळ्यापूर्वी व
    ५०% नत्र सप्टेंबर मध्ये द्यावे.
    **************************
    स्फुरद व पालाश पूर्ण - जुलै मध्ये द्यावे
    सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये ही गरजेनुसार द्यावीत.
    🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
    कोणतेही रासायनिक खत झाडाच्या खोडा लगत किंवा मुळापाशी द्यायचे नसते.
    झाड दगावण्याची शक्यता जास्त असते.
    त्यामुळे
    खोडापासून दुर झाडाची उंची पाहुन दिड ते तीन फुट अंतराने गोलाकार चर मारून खताचे मिश्रण चरीत भरावे व चर मुजवुन टाकावी .
    (नत्र स्फुरद व पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय पध्दतीनेही देता येते .. रासायनिकचा हट्ट नाही )
    श्री.राहुल खैरमोडे सर
    88 88 78 22 53
    88 55 900 300
    🙏🙏🙏🙏🙏

КОМЕНТАРІ • 175

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 Місяць тому +2

    आंबा बागेत बायो कन्ट्रोल एजेन्ट व बायो फर्टिलायझर चे शेड्युल कसे असावे

  • @vijayambhore6138
    @vijayambhore6138 7 місяців тому +1

    Sir chatni मार्च महिन्यात केलितर चलेल का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  7 місяців тому

      पाण्याची सोय असेल तर नक्की करा

  • @generalsinghthakur5845
    @generalsinghthakur5845 3 місяці тому +2

    नमस्कार सर आंब्याची झाडे आमच्याकडे जवळपास ३०ते ३५ वर्षांची आहेत तर त्यांना कुठली खते द्यावीत,कृपया थोडी माहिती द्यावी.

  • @ganeshshingare2665
    @ganeshshingare2665 3 роки тому +3

    युरिया लिक्वीड drip मधून सोडलं तर चालेल का 45 दिवस झाले अंबा लागवड करून

  • @vilasshinde789
    @vilasshinde789 Рік тому +2

    खूप चतुराई ने माहिती दिली नाही. किती वजन ची खते द्यावी हे मुद्दाम दिली नाही. ग्रेट. टाळले आहे. असेल व्हिडिओ नसलेले चांगले

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      वयानुसार खत व्यवस्थापन टप्पे आपणास पाठवतो .
      माझा Whats app no 88 88 78 22 53

    • @HansrajPalvi
      @HansrajPalvi 21 день тому

      ​@@rahulkhairmodevlogs26042:55 2:57

  • @karanpatil361
    @karanpatil361 Рік тому +2

    नत्र म्हणजे काय

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому +1

      झाडाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य.
      रासायनिक खता मध्ये अमोनिया सल्फेट किंवा युरीया वापरतात

    • @karanpatil361
      @karanpatil361 Рік тому +1

      @@rahulkhairmodevlogs2604 hyachya badlyat phosphet rich organic manure (prom) takle tar chalel ka

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому +1

      NPK
      N हा नायट्रोजन असतो .. तो युरीया खता मधून मिळेल

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      Call me in the evening

  • @prashu72
    @prashu72 3 місяці тому +2

    Sir !
    Majhi 30 years chi dharati hapus kalame ahet. Mi khat vyavasthavan kase karave ?
    Mukhya annadravya, duyyam annadravya, sukshma annadravya praman kiti asava ?

  • @allmixhindustan6560
    @allmixhindustan6560 11 днів тому +1

    सर खत टाकल्यावर पाणी टाकावे लागते का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  11 днів тому +1

      हो दादा.. हिवाळा सुरु होतोय. आठवड्यातून दोन वेळा पाणी द्या

    • @allmixhindustan6560
      @allmixhindustan6560 11 днів тому +1

      @@rahulkhairmodevlogs2604 dhanyawad दादा

  • @tusharsuryawanshi8322
    @tusharsuryawanshi8322 Місяць тому +1

    ८ August २४ ला आंबा लागवड केली त्यावेळी सिंगल सुपर फस्फेट, निंबोळी पेंड, हुमिक ऍसिड दाणेदार v थायमेट मातीत मिसळून दिले ,तसेच डी १४ ऑगस्ट ल क्लोरो v बुरशीनाशक v micronutrients चा फवारा दिला तरी पुढील खत व्यस्थापन कधी करावे v काय द्यावे

  • @SuyogPatil9575
    @SuyogPatil9575 3 роки тому +2

    आम्ही १२ जून ला लागवड केली आहे आणि त्यावेळी आम्ही कोणतेही खत दिलेले नाही आहे. आता आम्ही कोणते खत देऊ शकतो आणि कधी ?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      हो नत्र व स्फुरद द्या .
      युरीया ५० ग्रॅम व सिंगल सुपर फोस्फेट ५० ग्रॅम द्या

    • @SuyogPatil9575
      @SuyogPatil9575 3 роки тому

      @@rahulkhairmodevlogs2604 appreciate for your response 👍

  • @nileshkadam6566
    @nileshkadam6566 2 роки тому +3

    धन्यवाद सर 🙏

  • @kishorbobade399
    @kishorbobade399 3 роки тому +2

    खूप छान माहीती... उपयुक्त. Thank You...

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 6 місяців тому +1

    माझी 3 वर्षाची झाडे या जून मध्ये होतील तर त्यांचे खत व्यवस्थापन कसे करू प्लीज रिप्लाय

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 місяців тому

      माझा whatsapp no. 8888782253
      Send Hi
      खत व्यवस्थापन पाठवतो

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 Рік тому +1

    सर मी आमचे जंगल भागातील जागेत ६०/७० रूजलेली बाटी लावलेली आहेत.तेथे पाणी नियोजन नाही.त्यांना कोणती खत द्यायला पाहिजे?

  • @prashantsawant8688
    @prashantsawant8688 3 роки тому +2

    खूप छान माहिती आहे सर पण या सोबतच नैसर्गिक आंबा लागवडीची माहिती दिली तर अजून आवडेल. धन्यवाद सर.🙏

  • @rajelakhuji2327
    @rajelakhuji2327 3 роки тому +1

    सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजेत व्हाट्सअप नंबर

  • @nanapanhale3300
    @nanapanhale3300 3 роки тому +2

    शेवगा लागवडीची माहीती टाका

  • @YouTuberr79
    @YouTuberr79 2 роки тому +1

    Dap kas ast ya sathi

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому

      खत व्यवस्थापन टप्प्या टप्प्याने करावे . रिझल्ट चांगले येतात

    • @YouTuberr79
      @YouTuberr79 2 роки тому +1

      @@rahulkhairmodevlogs2604 kont khat jast yogya tharel

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому

      8855900300
      call me in the evening

  • @pramoddeshmukh4738
    @pramoddeshmukh4738 6 місяців тому +1

    धन्यवाद आपण आपले काम करुन इतरांना मदत करता

  • @gajanansonawane5138
    @gajanansonawane5138 Рік тому +1

    आंबे बाग मोहर येणे पुर्वी किंवा सुरवात होत आहे तरी काही फवारनी करवी लागते किंवा कसे कृपया कळवावे 🙏🙏

  • @deepakrajput8702
    @deepakrajput8702 3 роки тому +1

    आता नव्याने खड्डा खोदून व नवीन रोपे आणून आंबा लागवड करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे. वैयक्तिक कॉल केल्यास चालेल का.

  • @दरोडेपोल्ट्रीफार्म

    सर आंब्याच्य झाडा खाली पीवर गावठी कोंबडी खत टाकल तर चालेल का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      हो नक्की चालेल कि
      फक्त तु वाळुन कुजलेले असावे .
      खत चर काढून टाका व चर मातीने मुजवा

  • @sagarmusale8733
    @sagarmusale8733 3 роки тому +1

    खूप छान sir महिती.......मला आपल्या सल्ल्याची खूप गरज आहे सध्या.

  • @sahildhanavade5330
    @sahildhanavade5330 3 роки тому +1

    दोन वर्षाचा हापूस आहे फुटवा कसलाच होत नाही त्यासाठी काय करावे

  • @agrinature_360
    @agrinature_360 Рік тому +1

    प्रत्येक झाडाला किती खत द्यावे

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 3 роки тому +1

    राहुल भाऊ गावरान आंब्याची रोपे कधी मिळतील.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      बांधलेत कलम .. दिवाळी नंतर मिळतील

  • @rajpawar6140
    @rajpawar6140 2 роки тому +1

    2 वर्ष ‌आंबा कलम‌ साठी 191919 खत वापरले तर चालेल का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому +1

      यासाठी खत व्यवस्थापन चे video नक्की पहा

  • @दरोडेपोल्ट्रीफार्म

    आंबा झाडाला जीवाअमृत कोणत्या ऋतू मध्ये आणि कसे द्यायचे.?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १३ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *UA-cam channel ची लिंक*
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      *सेंद्रिय खत व्यवस्थापन :*
      *जीवामृत*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *रासायनिक खताना उत्तम पर्याय*
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *काय आहे जीवामृत ?*
      जीवामृत हे खत नसून अनंत कोटी जीवाणूंचे विरजन आहे.झाडाची होणारी नैसर्गिक वाढ ही प्रामुख्याने सूर्यप्रकाश, हवा ,पाणी,जमीनीतील अन्नद्रव्ये व जमीनीतील अन्नद्र्व्यांच्या वाढीसाठी उपयुक्त जीवाणू यांच्यावर अवलंबून असते.त्यामुळे रासायनिक खतांचा वापर नकरताही नैसर्गिक साधन स्त्रोतांचा वापर करुन नैसर्गिक पध्दतीने जमीनीतील उपयुक्त जीवाणूची संख्या वाढवून विषमुक्त शेती करता येते व जमीनीची बिघडत चाललेली सुपिकता वाढवता येते. जंगलातील झाडे कोणत्याही रासायनिक द्रव्या शिवाय केवळ नैसर्गिक स्त्रोतांच्या उपलब्धतेवर उत्तम फलधारणा करतात.ते केवळ आणि केवळ जमीनीतील उपयुक्त जीवाणू मुळेच आणि हे शेती उपयोगी जीवाणू तयार करण्याची साधी सोपी आणि कमीत कमी खर्चातील पध्दत म्हणजे जीवामृत.
      मा.श्री.सुभाष पाळेकर सर.
      *जीवामृत : कसे तयार करावे ?*
      तयार करण्याची विधी
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      २०० लिटर
      जीवामृत असे तयार करा
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *आवश्यक साहीत्य*
      १) २०० लिटर पाण्याचा हौद/टाकी
      २) देशी गाईचे ताजे शेण - १० किलो
      ३) देशी गाईचे गोमुत्र - ५ ते २० लिटर
      ४) चणा डाळ बेसन पीठ १/२ किलो
      ५) देशी गुळ - उसाचा रस -१/२ किलो
      ६) मूठभर माती .
      🔸🔸🔸 *महत्वाचे* 🔸🔸🔸
      🔹देशी गाईचे ताजे शेण - सात दिवसाच्या आतील.गाईचे अर्धे व देशी बैलाचे शेण अर्धे असेल तरीही चालेल.
      जर्सी व होलस्टीन जातीच्या गायीचे नको.
      🔹गायीचे शेण व गोमूत्र - जी गाय कमी दूध देते अशा गाईचे उत्तम.
      शेण ताजे व गोमुत्र जेवढे जुने ते सर्वात चांगले.
      🔹बेसण पीठ देशी चणा डाळीचे
      🔹 देशी गुळ सेंद्रिय -
      चिरलेला बारीक किंवा
      गोड उसाचा ताजा रस चालेल.
      🔹 मूठभर माती - प्रदूषण विरहीत
      जंगलातील ,वडाच्या झाडा
      खालील किंवा शेताच्या
      बांधावरील ओलसर
      परंतु रसायनमुक्त माती
      असावी .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      प्रत्यक्ष कृती
      २०० लिटर च्या पाण्याच्या टाकीत प्रथम = शेण - बेसन पीठ- चिरलेला गुळ - मूठभर माती टाकून नंतर पाणी टाकावे.
      नंतर तयार झालेले द्रावण सकाळ व सायंकाळ असे किमान ७ ते ९ दिवस एकाच दिशेने काठीच्या साहाय्याने फिरवावे .द्रावण हालवून झाल्यावर व्यवस्थितपणे झाकण लावून गोणपाटाचे पोते टाकून झाकून ठेवावे .असे द्रावण तयार झाल्यानंतर मधील सात ते नउ दिवसात द्रावणातील जीवाणूना भरपूर खाद्य मिळाल्यामुळे अनंत पटीने वाढ होउन आपणास वापरण्यायोग्य जीवामृत प्राप्त होते.
      *जीवामृताचे फायदे*
      १)जीवामृत सर्वच शेती/फळबाग पिकासाठी उपयुक्त असे जमीनीची सुपिकता वाढवणारे नैसर्गिक द्रावण आहे.
      २) त्यामुळे त्याचे कोणतेही साईट इफेक्ट नसतातच.
      ३)कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी अत्यंत फायदेशीर .
      ४) विष मुक्त असे जीवामृत आपण नियमितपणे आंबा झाडाना दिले तर उत्पन्न , गुणवत्ता,दर्जा ,फळांचा आकार ,गोडवा व झाडांची
      रोगप्रतिकारक शक्ती यात प्रंचड सुधारणा अल्पावधित पहावयास मिळते.
      ५) जमीनीतील ओलावा जास्त काळ टिकून रहातो.
      ६) शेती मित्र गांडूळ शेताकडे आकर्षीत होतात .
      ७)उपयुक्त जीवाणू अपायकारक जीवाणूचा नाश करतात .
      🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      *जीवामृताचा वापर कसा करावा ?*
      द्रावण तयार झाल्यावर पुढील ५ दिवसात त्याचा वापर करणे उपयुक्त ठरते.आंबा झाडाना पंधरा दिवसाआड खालील प्रमाणे द्यावे.
      *लहानआकाराची झाडे*-
      ५०० मिली जीवामृत
      व ५ लिटर पाणी
      *मध्यम झाडे* -
      १ लिटर जीवामृत व ३ लिटर पाणी
      *मोठी झाडे*-
      १ लिटर जीवामृत व १ लिटर पाणी
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      स्प्रिंकलर च्या साहाय्याने देता येते .
      तसेच कीटकनाशक म्हणूनही स्प्रे च्या सहाय्याने किंवा फवारणी पंपाने फवारता येते.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      हेच प्रमाण कमी करुन अमृतपाणी ही तयार करता येते.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
      *ही माहीती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यत नक्की पोहचवा .*
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300
      8888782253(whatsapp)
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

    • @दरोडेपोल्ट्रीफार्म
      @दरोडेपोल्ट्रीफार्म Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @RANJANEKIRAN
    @RANJANEKIRAN 3 роки тому +1

    नमस्कार सर...!
    आंबा खोडकलम करायचे आहेत. कोणी आहे का ?

  • @amoljadhav6726
    @amoljadhav6726 2 роки тому +1

    Amba zada la gomutra deyche ka

  • @s.rmangofarming6010
    @s.rmangofarming6010 3 роки тому +1

    सर आंब्याला m45 ड्रीप ने देऊ शकतात

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      हे बुरशी नाशक आहे . झाडावर फवारणी करा .
      आळवणी करायची असेल तर ड्रिप मधून देवू शकता

  • @adeshkarangutkar3495
    @adeshkarangutkar3495 2 роки тому +1

    Hallo Rahul sir mi adesh devgad madhi katta ithe sadyavar amche ghar ani ambyachi ani narlachi jhade lavun 10 varsh jhali ani ajun tya jhadana ky fale nahi ani ata noveber madhe gavtala aag lagun ambyachi jhade jalali ani amhi gavi yeun tyala bharpur pani ghatle tar tyana pavi futun ali ahe tari mala margdarshan kara plese mi tumhala what's app var photo pathvu ka

  • @akshadapote1939
    @akshadapote1939 2 роки тому +1

    🐻

  • @vivekkhandagale3462
    @vivekkhandagale3462 3 роки тому +1

    आंब्याच्या रोपाला बकरीने खाल्ल्याने त्याची वाढ होत नाही. तरी यावर काय उपाय करावेत

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      खाल्लेल्या भागाच्या थोड खालील बाजुस कट मारा .
      खत व्यवस्थापन करा .. झाड चांगले येते

  • @milindkatle3061
    @milindkatle3061 2 роки тому +1

    वीस वर्ष वयाच्या झाडांसाठी खत व्यवस्थापन कशा प्रकारे करावे लागेल

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому

      पहीला टप्पा
      नत्र (युरीया) 1500 ग्रॅम
      लिंबोळी पेंड 8०० ग्रॅम
      रिजेंट अल्ट्रा 200 ग्रॅम

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому

      ua-cam.com/video/clGuLda3SZ0/v-deo.html

  • @yashrajgolande6326
    @yashrajgolande6326 Рік тому +1

    2 month rope ahe sir khat konte vaprave

  • @madhurideshmukh6407
    @madhurideshmukh6407 Рік тому +1

    NPK एक वर्षाच्या झाडाला किती द्यावे

  • @adeshkarangutkar3495
    @adeshkarangutkar3495 2 роки тому +1

    Reply plese🙏🙏🙏

  • @pravin271188
    @pravin271188 3 роки тому +1

    khup chhan mahiti ,,NARAL sathi sudhha margdarshan karawe ..mansoon suru ahe towar khat deta yeil

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      हो हे खत व्यवस्थापन नारळासाठी ही चालेल

  • @sushmakamble4024
    @sushmakamble4024 3 роки тому +1

    सर माझ्या घराच्या अंगणात, दोन आंबा झाड आहेत. त्याचे वय 7 वर्ष आहे.तरी देखील झाडास फळच नाहीत. मोहर पण येत नाहीत. फळभाजी काय उपाय करावेत.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      यासाठी आपल्या चॅनेल वरील खत व्यवस्थापन चे video नक्की पहा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      माझा whatsapp no 8855900300

  • @dadamore2274
    @dadamore2274 3 роки тому +1

    कलाकार टाकून किती दिवसानी खत देने

  • @namratakarle6159
    @namratakarle6159 2 роки тому +1

    Kokom che rope ahet ka?
    Cost

  • @yuvrajpatil4260
    @yuvrajpatil4260 3 роки тому +1

    सर आंबा बेड करत असताना जिथे कलम बांधली आहे तिच्या वर माती गेली तर चालेन का कारण कलम ची जी जॉइन्ट आहे ती जमिनीपेक्षा फक्त 3 इंच वर आहे

  • @pramodkurme936
    @pramodkurme936 Рік тому

    नत्र म्हणजे नक्की काय

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १२ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *UA-cam channel ची लिंक*
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *वनस्पती मधील अन्नद्रव्य*
      *कमतरता कशी ओळखावी?*
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      *महत्वाचे*🔸🔸🔸🔸🔸🔸
      *Google Playstore* वरुन
      *Plantix* हे शेतीविषयक application downlode केल्यास
      झाडाचा पानांचा व फळांचा फोटो काढल्यास करावयाचे रासायनिक व सेंद्रिय दोन्ही व्यवस्थापन लगेच समजते .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      1: *नञ*
      ☝रोपांची वाढ खुरटलेली राहते.
      ☝पाने लहान व फीक्कट
      हिरवी होतात.
      ☝पानांच्या शिरा काही वेळा निळ्या
      दिसतात.
      ☝कधी कधी सरसकट पाने पिवळी
      दिसतात.
      2: *फाॅस्परस*
      ☝पाने फीक्कट हिरवी उभट व
      अरूंद दिसतात.
      ☝खोङाच्या व पानाच्या
      खालच्या बाजूस जांभळट
      रंग दिसतो.
      ☝रोप खुरटलेली व खोङ पातळ
      बारीक दिसते.
      ☝फळे,रंगहिन होतात.
      3: *पालाश*
      ☝कमतरतमुळे हरीत
      द्रव्य ,कङेकङील हिरवा
      जाऊन पिवळसर लाल होतात.
      ☝जून्या पानांपासून ते
      शेंङ्याकङील पाने सुकतात.
      ☝फळांचा आकार लहान रहातो.
      ☝ऊत्पादनात घट होते.
      ☝फळांची गोङी कमी होऊन
      आम्लाचे प्रमाण वाढते.
      ☝फळांंचा टिकाऊपणा कमी होतो.
      4 *कॅल्शिअम*
      ☝फळांच्या खालील बाजूस
      खोलगट काळा चट्टा पङतो.
      ☝फळे नरम पङून लहान ,सूकलेली
      दिसतात.
      ☝फळे तङकतात कमी टिकतात.
      ☝शेंङा वाळतो.
      ☝फळांच्यावरील शेंंङ्याकङची बाजू
      सूकते.
      5: *मॅग्नेशिअम*
      ☝पाने कङापासून पिवळी पङतात.
      ☝पानांच्या शिरा
      हिरव्या,दिसतात.
      ☝फळे निस्तेज व
      मऊ पङतात.
      6: *सल्फर*
      ☝खालची पाने हिरवी व वरची पाने,
      पिवळसर होतात.
      ☝पान सूकून व नंतर गळतात.
      ☝शेंंङ्याकङील नविन पाने व लहान
      पाने दूमङलेली दीसतात.
      ☝मूख्य पानांच्या शिरा जांभळ्या
      दिसतात.
      7: *मॅंगनिज*
      ☝शिरा हिरव्या व पानांचा भाग
      पिवळा पङतो.
      ☝फळांच्या गुणवत्तेवर ऊत्पादन
      कमी मिळते.
      ☝पानांवर चौकटिदार नक्शी दिशते.
      7:🌱 *झींक*🌱
      ☝रोपे खुरटलेली राहतात.
      ☝पानांतील शिरा चट्यासारख्या
      पिवळ्या पङतात नंतर पाने
      सूकतात.
      ☝फुले व फळे कमी प्रमाणात
      लागतात.
      ☝फळांची साल पातळ रहाते.
      ☝फळांचा आकार लहान रहातो.
      8: *बोराॅन*
      ☝नविन शेंङ्याकङील वाढ खुंटते.
      ☝फळांवर तांबङे ठिपके
      पङून फळे तङकतात.
      ☝पानांवर सूरकुत्या पङून पिवळे दिसतात.
      ☝पाने कडक लागतात.
      ☝नवीन पानांची टोके तडकतात.
      9:🌱 *काॅपर(तांबे)*
      ☝कोवळ्या पानांतील हरीत द्रव्यांचा
      अभाव दिसतो.
      ☝पान पिवळी पडून
      वाढ ,खुंटते,नंतर गळून पडतात.
      ☝पानांचा तळाकडील भाग हिरवा
      रहातो.
      10:🌱 *लोह*🌱
      ☝पानांच्या मुख्य शिरा हिरव्या रहातात.
      ☝शिरांचा मधील भाग पिवळट पांढरा दिसतो.
      ☝फळांचा आकार लहान रहातो.
      *कमतरता ओळखुनच योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन करा.*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *ही माहीती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यत नक्की पोहचवा .*
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300
      8888782253(whatsapp)
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      ua-cam.com/video/Ug_6Ko2_hfk/v-deo.html
      हा पहा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      झाडाला आवश्यक असणाऱ्या १६ अन्नद्रव्यांपैकी
      एक अन्नद्रव्ये म्हणजे नत्र

  • @dilipthorat8898
    @dilipthorat8898 3 роки тому +1

    Jhad nirogi rahnyasathi kay karave

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी करा

  • @nileshpanadiboarwelpanisho2297
    @nileshpanadiboarwelpanisho2297 3 роки тому +1

    नमस्कार सर मी अगोदर खडे घेतले नाही
    आता घेतले तर चालले का,खूप मस्त माहिती
    आणि प्रत्येक कॅमेन्ट ला उत्तर देता,

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      धन्यवाद दादा ..
      ऱोपे लावले असेल तर खड्डा काढण्याची आवश्यकता नाही . गोलाकार चर काढून खत व्यवस्थापन करता येइल

  • @LaxmikantGawale1990
    @LaxmikantGawale1990 3 роки тому +1

    Npk - humic acid - urea - phosphoric acid - combi (micro nutrients) ha kram kasa asnar sir..ya mdhe tumchya vicharani kay ad karayla have

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      खत व्यवस्थापन पहीला टप्पा haa video नक्की पहा .

  • @themarathivlog4906
    @themarathivlog4906 2 роки тому +1

    Sir 2 year ch zad ahe laun 5 months zalet kalmach ahe pn ajun komb yetat ani sukun jatat yavar ky karave nakki sanga sir 🙏🙏

  • @nikhilshinde8190
    @nikhilshinde8190 3 роки тому +1

    Sir galachya matimdhe aamba lagvad karta yeu shakte ka

  • @bajiraonikam8216
    @bajiraonikam8216 2 роки тому +1

    राहूलजी कलम लावून दोन महिणे झाले तरी नवीन पाने आजून फुटत नाही .,काय उपाय योजना करावी ,

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому

      झाड लावल्यावर २० दिवसानी खत व्यवस्थापन सुरु करा . पहीला - दुसरा - तिसरा टप्पा द्या .
      youtube वर आपल्या चॅनेलवर हे ३ video पहायला मिळतील .
      लिंक पाठवतो

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому

      ua-cam.com/video/clGuLda3SZ0/v-deo.html
      पहीला टप्पा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому

      ua-cam.com/video/b3O9L8faKZ4/v-deo.html
      दुसरा टप्पा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому

      ua-cam.com/video/mfJQVCt_ZWo/v-deo.html
      तिसरा ट्प्पा

  • @mulshiwaters5312
    @mulshiwaters5312 Рік тому

    very confusing video.. kadhi Pausa adhi mhanta nantar June madhe mhanta.. pls help

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      हा माझा whatsapp no .
      88 88 78 22 53
      माझ्या प्रत्येक बांधवासाठी नक्की सर्व मदत करेन

  • @pratikshadhande6424
    @pratikshadhande6424 3 роки тому

    कलम केल्यानंतर किती वर्षांनी फळ लागायला सुरुवात होते

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      एक वर्षांचे रोप लावल्यास तीन वर्षांनी फलधारणा घ्यावी

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 3 роки тому +1

    आपला मोबाईल फोन नंबर द्या..

  • @KG-km8st
    @KG-km8st 3 роки тому +1

    Thank you for your support you are Genius and🙏 guiding us.

  • @sasteganesh3239
    @sasteganesh3239 3 роки тому +1

    धन्यवाद सर. माझ्याकडून एक चुक झाली आहे.
    सध्या पावसाचे दिवस आहेत. तुम्ही खाली लिहले आहे की रासायनिक खते खोडापाशी किंवा मुळावर टाकली की झाड दगावते.
    मी अर्धा किलो युरीया 30 लिटर पाण्यामधे मिसळून 20 रोपांच्या खोडाजवळ पाणी टाकले आहे. झाडे जळतील काय?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      पाणी द्या भरपुर

    • @sasteganesh3239
      @sasteganesh3239 3 роки тому

      @@rahulkhairmodevlogs2604 सर आज दुपारीच टाकला आहे पाण्यात मिक्स करून. आत्ता लगेच पाणी देणे गरजेचे आहे का सकाळी दिले तरी चालेल? सकाळ पर्यंत जळतील का रोपे?

  • @harshawate2412
    @harshawate2412 3 роки тому +1

    सर आंबा कलम संपूर्ण माहिती
    फायदे/दुष्परिणाम,सखोल माहिती
    यावर व्हिडिओ तयार करावा ही विनंती.
    हापूस वर हापूसचीच किंवा केशरवर केशरचीच काडी(सायन) लावली तर चालेल का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      गावरान किंवा रायवळ जातीच्या कोयी वर/ बाटावर कलम केले तर फलधारणा जास्त होते

    • @harshawate2412
      @harshawate2412 3 роки тому

      Ok sir thank you sir

  • @LaxmikantGawale1990
    @LaxmikantGawale1990 3 роки тому +1

    Good morning sir....very informative video

  • @s.rmangofarming6010
    @s.rmangofarming6010 3 роки тому

    सर माझे एक वर्षाची आंब्याची बाग आहे नवीन फांद्यांना बोळ पाडून आत मधून पोखरून टाकत आहे काय कारावे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      यासाठी कोवळ्या पालवी विषयी असणारे video पहा

  • @shardakhopade6546
    @shardakhopade6546 3 роки тому +1

    Sir mi vachl hot ki gud ( jagary) water mdhe mix krun ghaltat,,, khr ahe ka he?

  • @prjaktagavand2778
    @prjaktagavand2778 3 роки тому +1

    Khup sundar mahiti aste sir tumchi

  • @prakashwaghmare5021
    @prakashwaghmare5021 3 роки тому +1

    Very nice information thanks

  • @madhurideshmukh6407
    @madhurideshmukh6407 Рік тому

    Sir, नत्र सेंद्रिय कोणते असते

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      सेंद्रिय खत दुकानात संपर्क करा त्याना ..
      सेंद्रिय NPK मागा .. नक्की मिळेल

  • @flyingdutchman5
    @flyingdutchman5 3 роки тому +1

    धन्यवाद सर... १५-२० वर्षांची झाडे आहेत. छाटनी केली आहे ८ दिवसांपूर्वी. please खतांची मात्रा सांगा. आणी १५-२० वर्षाच्या झाडांना देखील आत्ता फक्त नत्र व september मध्ये बाकीचे खत द्यावे का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      पहीला टप्पा - जुन
      दुसरा - augest NPK

    • @flyingdutchman5
      @flyingdutchman5 3 роки тому

      @@rahulkhairmodevlogs2604 ok... Thank you sir...🙏

  • @uttampandhare6528
    @uttampandhare6528 3 роки тому +1

    सर ...
    केशर आंबा खते ,छाटणीविषयी चे वेळापत्रक मिळेल का?

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 3 роки тому +1

    Systematic information

  • @sasteganesh3239
    @sasteganesh3239 3 роки тому

    आंबा, कदंब, पारीजातीक झाडावर लाल लाल ठिपके पडले आहेत. हे काय आहे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      सूक्ष्म अन्नद्रव्ये कमतरता आहे .
      micro nutriant हे खत द्या

  • @dineshkolte5259
    @dineshkolte5259 3 роки тому +1

    Best information

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      Dinesh ji ..
      आज खुप धावपळ झाली आपला फोन उचलु शकलो नाही

  • @SikandarKamble-ly1xt
    @SikandarKamble-ly1xt 3 роки тому +1

    Thank you sir

  • @harshawate2412
    @harshawate2412 3 роки тому +1

    खूप छान माहिती

  • @kailasdhamdhere9515
    @kailasdhamdhere9515 3 роки тому

    सर झाडे लावून एक महिना झाला आहे.पालवी फुटली नाही अजून कोणते खत टाकावे.

  • @dnyaneshwarganjave5467
    @dnyaneshwarganjave5467 2 роки тому

    Thanks sir
    Knolegebale vidio

  • @adityadhokchaule4799
    @adityadhokchaule4799 3 роки тому

    मस्त

  • @sopanlawande8858
    @sopanlawande8858 3 роки тому +1

    नमस्कार सर खूप छान आणि महत्त्वाची माहिती दिली मी सुद्धा ३ जूनला लागवड केली आहे धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vishnudhoke5591
    @vishnudhoke5591 3 роки тому +1

    मला असे वाटते सर खते देण्यापूर्वी झाडांच्या मुळाजवळील तन काढले गेले पाहिजे.