गणपती गडद
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- गणपती गडद... नावातच या ठिकाणाचे वैशिष्ट्य दडले आहे. गडद म्हणजे कातळातली गुहा किंवा गुफा. गणरायाच्या नावानेच 'गणपती गडद' हे ठाणे दुर्गम जागी भटकंती करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या निसर्गरम्य ठिकाणी जायचे, तर तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील कल्याण, तिथून मुरबाड तालुका आणि या तालुक्यातील सोनावळे या सुंदर गावी जावे लागेल. कल्याण ते मुरबाड हे अंतर साधारण २७ किलोमीटर आहे. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम. नसेल, तरी हरकत नाही. कल्याण ते मुरबाड अशी एसटी सेवा उत्तम आहे. तिथून खासगी वाहनांनी सोनावळे गाठता येते. माळशेज घाटमार्गेही या ठिकाणी जाता येते. त्यासाठी सरळगाव, उमरोली, धसई आणि सोनावळे असा प्रवास करावा लागतो. यासह मुरबाडहून म्हसा जंक्शन आणि तिथून धसई हा मार्गही आहे.
वेळ आणि इतर जोडट्रेकचे गणित पाहून, यातला मार्ग तुम्ही निवडू शकता, तर सोनावळे हे गडदेच्या पायथ्याचे गाव. या ठिकाणाला पहिल्यांदाच भेट देणार असाल, तर गावातून वाटाड्या सोबत घ्यावा. कातळ पहाडातले हे ठिकाण दूरवरून पाहताना कातळात कोरलेले झरोके दुरून खिडक्यांसारखे दिसतात आणि आपली उत्सुकता आणखी ताणली जाते. सोनावळ्यातून निसर्गाच्या कुशीतून गणपती गडद गाठताना आपण त्या वातावरणात रमून जातो. हा छोटा ट्रेक जेव्हा आपण गडदेत पोहोचतो, तेव्हा येथे आल्याचे सार्थक घडवतो.
पावसाळ्याच्या या दिवसांत लेण्यांच्या माथ्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे पाण्याची एक चादरच गडदेसमोर पाहायला मिळते. या कातळगुहेत बाप्पाच्या दोन प्राचीनमूर्ती आणि आता नव्याने ठेवलेल्या अनेक मूर्ती पाहायला मिळतात. ढाकोबा, दुर्ग या रांगेतले हे ठिकाण कुणालाही भेट देता येण्यासारखे आहे. बाप्पाचे दर्शन घेऊन येथे विसावताना तुमचे मन या कातळलेण्यात हरवून जाते. गणपती गडद या ठिकाणच्या भेटीसह तुम्ही गोरख-मच्छींद्रगड (देहरी गाव), सिद्धगड (उचले गाव) किंवा अहुपे घाटपायथा (खोपिवली गाव) यांपैकी कोणत्याही जोडट्रेकचे नियोजन करू शकता. गडदेतला बाप्पा पाहताना, सभोवतीच्या निसर्गातच जणू बाप्पाचे मनोहारी रूप दडल्याची जाणीव होते आणि या पर्यावरणात असणाऱ्या दैवताला जपण्याची जाणीवही दृढ होते.
Google map:-maps.app.goo.g...
Khup chan sir ❤
Jabardast sir
thanks सर
Hii my name is anurag