कान्होबा निवडी आपुली गोधने | सुपरहिट गवळण | आबांच्या गोड आवाजात | अवश्य ऐका |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024
  • कान्होबा निवडीं आपुलीं गोधनें ||धृ||
    पांच पांच पोळ्या तीन भाकरी | दीड कानवला एक पुरी |
    आम्हा धाडिलें वैल्या दुरी | आमची ठकऊन खाल्ली शिदोरी ||२||
    परियेसी शारंगधरा | तुझा बैल चुकला मोरा |
    सांगुं गेलों तुझ्या घरा | पाठी लागला तुझा म्हातारा ||३||
    परियेसी हृषीकेशी | गाई म्हशींचे दुध पिशी |
    वासरे प्याली म्हणून सांगशी | उद्या ताक नाहीं आम्हाशी ||४||
    कान्होबा ओढाळ तुझ्या गाई | होत्या नव्हत्या कळंबा ठाई |
    शिव्या देती तुझी आई ||५||
    विष्णुदास नामा साहे | देवा तूंचि बाप माये |
    अखंड माझें हृदयी राहें ||६||

КОМЕНТАРІ • 6

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 місяці тому

    लय भारी आबा.नादखुळा आवाज आणि चालपण.फार फार फारच उत्कृष्ट.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹♥️♥️

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 місяці тому

    किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आपणा सर्वांना.खूपच सुंदर गौळण गायलीत.चाल पण फारच उत्कृष्ट लावली आहे.खूप खूप आवडली.पहाडी व उंच आवाजात गोडवा, ओठावर गौळण गायन , वादन फारच उत्कृष्ट वाटले.नादखुळा आहे आबांचे गायन, तल्लीन झालो, अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 місяці тому

    खुपच सुंदर गायन केल महाराज आबा धन्यवाद तबलावादक तात्या पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज खरच खूप सुंदर साथ केलीय आपण आबाना धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 місяці тому +1

    🙏🏻🌹 राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩

  • @bhaktigandh
    @bhaktigandh 2 місяці тому

    खूप छान

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 2 місяці тому

    अतिशयसुंदरगवळणअणिगायनजयहरी