MLA Prakash Surve | बोलण्याच्या ओघात महवीकास आघाडी विजय होईल नंतर चूक केली दुरुस्त.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • नमस्कार आपण बघत आहात निर्भीड सम्राट न्यूज बातमी आहे मुंबई येथून.
    राज्या मधील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ५ टप्प्याचे मतदान प्रक्रिया पडली .
    या वेळी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर घरातून निघत मतदानाचा हक्क बजावला आहे.
    त्या मुळे या मतदान केंद्रावर मतदाराची तोबा गर्दी बघण्यास मिळाली आहे.
    मुंबई मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी मतदार राजा बाहेर पडला होता त्यामुळे रस्त्यावर पुलींग बूथ बाहेर मतदाराची मोठी गर्दी पाहण्यास मिळाली.
    यावेळी मागाठाणे विधानसभा मध्ये व बोरिवली विधानसभा मध्ये काही ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला होता अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती त्यामुळे रस्त्यावर व पुलिंग बूथ वर मतदाराची मोठी गर्दी पाहण्यास मिळाली होती.
    मागठाणे विधानसभा मतदारसंघांमध्ये दामू नगर या ठिकाणी सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदारांची मतदान करण्यासाठी रीघ लागली होती.
    मतदारांना होणाऱ्या त्रासाला व निवडणूक कर्मचाऱ्यांची हलगर्जिरीपणाची पाहणी करण्यासाठी मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे हे बूथ क्रमांक एक येथे आले होते
    त्यावेळी प्रकाश सुर्वे यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व मतदाराला होणाऱ्या त्रास कसा कमी होईल यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना खडसावलं.
    यावेळी निर्भीड सम्राटचे संपादक सिद्धार्थ काळे यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांचे प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
    यावेळी आमदार प्रकाश सुर्वे यांनी बोलण्याच्या ओघा मध्ये महाविकास आघाडी विजय होईल असा उल्लेख केला होता.त्या नंतर त्यांना आपण चुकीचं बोललो आहे.असे कळल्यावर त्यांनी महायुती विजय होईल आणि गुलाल आम्हीच उधळू असे सांगितले.
    या सर्व गोष्टीवरून सत्ताधारी पक्षातील आमदारांना देखील महाविकास आघाडी विजय होईल का असा विश्वास निर्माण होत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.
    बाकी एंडिंग पीच ऍड करा.

КОМЕНТАРІ •