आली गवर आली सोन पावली आली || जेष्ठा गौरी आगमन || SagarPawarVlogs ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन झाल्यानंतर भाद्रपदातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन होते. भारतीय परंपरा, संस्कृतीत गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक ठिकाणी गौराईचे पूजन महालक्ष्मी स्वरुपात केले जात असल्यामुळे याला महालक्ष्मी पूजन असेही संबोधले जाते. २५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ०१ वाजून ५८ मिनिटांनी अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन झाले.
    गौरी किंवा महालक्ष्मी पूजन:
    अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरींचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. म्हणून याला ज्येष्ठा गौरी पूजन असेही संबोधले जाते.
    नैवेद्यांचे विविध प्रकार:
    रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू, पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ यांसारखे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. तसेच शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे आदी पदार्थांचाही नैवेद्यात समावेश केला जातो. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरी पूजनाच्या सायंकाळी महिला हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतात. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे.
    गौरी विसर्जन:
    तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे किंवा महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या वा सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा, असे एक एक जिन्नस घालतात. हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तूंचा त्यात समावेश असतो. गौरींची किंवा महालक्ष्मींची पूजा व आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. गौरींचे विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती घरभर व झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते, अशी समजूत आहे.
    Songs in the video : आली गवर आली सोन पावली आली
    Majha Morya : • Majha Morya - Official...
    References: maharashtratim...
    #गौरी_आगमन #गौरी_पूजन #जेष्ठा_गौरी_आगमन

КОМЕНТАРІ • 55