Satish Kaushik Death | अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालय...अनुपम खेर यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिलीये...यासोबतच त्यांनी सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिलीय...कारमधून प्रवास करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले...वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय...अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की मला माहित आहे मृत्यू हे या जागाच शेवटचं सत्य आहे. पण मी माझा जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल असं लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं...४५ वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती! या ट्विटसोबतच त्यांनी अबिनेत्यासोबतचा एक फोटोही पोस्ट केलाय...विशेष बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच सतीश कौशिक यांनी सर्वांसोबत होळी खेळली होती...सिने कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील इतर लोकांसंबत खेळलेल्या हा होळीचे सर्व फोटो त्यांनी ट्विटर हँडलवर पोस्टही केले होते...अशात अचानक झालेल्या त्यांच्या निधनाने चाहत्यांसोबतच सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी हा मोठा धक्का आहे...सतीश कौशिक हे हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्मला आणि अभिनेते होते...ते मुख्यतः मिस्टर इंडिया चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात...त्यामंध्ये त्यांनी कॅलेंडरची भूमिका साकारली होती...सतीश यांना दोनदा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता...
    द कॉलम ही मराठी वाहिनी आहे. या वाहिनीचा शुभारंभ ऑगस्ट २०२१ पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यामध्ये मनोरंजन विश्वातील सर्व माहिती, चालू घडामोडी तसंच मनोरंजन क्षेत्रातील ताज्या आणि पारदर्शक बातम्या , चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम,मनोरंजक कथा, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाच्या विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
    आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
    Facebook: www.facebook.c...
    Instagram: www.instagram....
    Twitter: dc...
    Website : www.thecolumnn...
    #satishkaushik #satishkaushikdeath #ripsatishkaushik #satishkaushikvideo #satishkaushikstatus #satishkaushiknews #satishkaushiklatestnews #satishkaushikfunrel #satishkaushikcomedy #satishkaushik #thecolumn #thecolumnnews #thecolumnentertainment

КОМЕНТАРІ •