गणेशचतुर्थी विशेष नैवेद्याचे ताट-1 | दिवसभर मऊ राहणारे उकडीचे मोदक,अळूचं फतफतं ओला पावटा मिक्स भाजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • नमस्कार, आज मी तुम्हाला गणेशचतुर्थी विशेष नैवेद्याचे ताट बनवून दाखवणार आहे. गणपती आगमन दिवशी गणपती बाप्पासाठी स्पेशल असा नैवेद्य आज मी आणि आई तुम्हाला बनवून दाखवणार आहोत. आजचे सर्व पदार्थ अगदी पारंपारिक आहेत. अगदी मऊ लुसलुशीत दिवसभर मऊ राहणारे उकडीचे मोदक सोबत अळूचं फतंफतं, आणि ओले पावटे आणि डांबा(शेवग्याच्या शेंगा) बटाटा टाकून मिक्स भाजी अशी आजची साधी सोप्पी सहज बनवून तयार होणारी थाळी आहे.
    आई आणि मी तुम्हाला अगदी झटपट बनवून दाखवतो.
    साहित्य:
    ओले पावटे, शेवग्याच्या शेंगा, बटाटा मिक्स भाजी
    ओले पावटे अर्धा किलो
    डांबे 4
    बटाटा 1
    4 कांदे, 1 टोमॅटो, अर्धा कप ओल खोबरं, पाव कप कप कोथिंबीर, 6 पाकळ्या लसूण आणि 2 छोटे तुकडे आलं चेचून घेणे.
    2 चमचे लाल मसाला, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद
    चविपुरता मीठ, तेल, पाणी
    अळूच फतंफतं साहित्य:
    25 ते 30 अळूची पाने
    शेंगदाणे पाव किलो
    वाटणासाठी साहित्य:ओल खोबरं अर्धा कप, मिरची 2, आलं, लसूण 12/15 पाकळ्या, कोथिंबीर पाव कप
    3 चमचे लाल मसाला,1 चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला
    कोकम 2,मीठ, तेल, पाणी
    मोदक साहित्य:
    1 वाटी तांदुळाचे पीठ
    2 वाट्या पाणी
    मीठ
    पाव चमचा तूप
    मोदकाच्या सरणाचे साहित्य
    1 वाटी ओल खोबरं
    पाऊण वाटी गूळ
    अर्धा चमचा वेलची पूड
    अर्धा चमचा जायफळ पूड
    2 चमचे तूप

КОМЕНТАРІ • 163

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 5 місяців тому +24

    किती सुंदर नैवेद्याचे ताट सजवले आहे दोघी गुणी सुगरण माय लेकीने.साध्या साध्या साध्या गोष्टी पण किती निगुतीने प्रेमानी करतात hi पॉझिटिव्ह वृत्ती त्या पदार्थांची रंगत आणखी वाढवते. कृष्णाई तुझ्यासाठी मिस्टरांनी तुझे किचन त्यातील भांडी आणि इतर वस्तू छान सिलेक्ट करून छान डिझाईन करून कलात्मक रित्या किचन सजवले आहे आज तर बाप्पासाठी सुंदर सजावट करून गणपती बाप्पांची प्रसन्न मूर्ति फुलांच्या सजावटीत स्थानापन्न करून प्रसन्न वातावरण निर्माण केले आहे.तुझ्या गुणांना तुझ्या मिस्टरांच्या गुणांची छान जोड मिळालीआहे.

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  5 місяців тому +1

      नेहमीप्रमाणेच प्रेरणादायी कमेंट ❤️😍

  • @AshutoshAshwi
    @AshutoshAshwi 4 місяці тому

    MOdak khup sundar

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 5 місяців тому +1

    Khupach sunder modak recipe. Kiti sunder jJevan kel liybhari.

  • @yogeshgore4799
    @yogeshgore4799 2 місяці тому

    Great 😊

  • @radhikamoorthy4392
    @radhikamoorthy4392 4 місяці тому

    Khup chan banavle modak ani alucha fadfada 👌👌👌

  • @ashwinikumbhar8198
    @ashwinikumbhar8198 4 місяці тому

    मोदक🤩👌

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 5 місяців тому

    So good👌👌recipes thanks for sharing 👍❤❤🌹🌹

  • @SwetaPednekar
    @SwetaPednekar 4 місяці тому

    Khupch chan tai❤

  • @gauri6660
    @gauri6660 5 місяців тому +2

    खूप छान 👌👌👌 गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम राहू दे तुमच्यावर 🙏

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 5 місяців тому +2

    अरे व्वा.... तुमच्या या लज्जतदार रेसीपी मुळे कोकणातील पारंपरिक रानभाज्या आणि पवित्र श्रावण मासातील नैवेद्याने भरलेले पंच पक्वान्नाचे ताट ......खरच पोट भरलं

  • @advocatevaibhav9924
    @advocatevaibhav9924 5 місяців тому

    very good preparation

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 5 місяців тому +8

    कृष्णाईकडे बघुन वाटतय गोड बातमी आहे.😊आणि ताई पण लेकीकडे थांबल्यात म्हणजे नक्कीच.

  • @swarangimanjarekar1897
    @swarangimanjarekar1897 5 місяців тому

    खुप छान ❤

  • @meghaarun5546
    @meghaarun5546 5 місяців тому +1

    Khupach changle vatle ❤

  • @aishwaryasawant132
    @aishwaryasawant132 4 місяці тому

    Khup chan

  • @aishwaryatapasi9941
    @aishwaryatapasi9941 5 місяців тому

    फार छान आणि सोप्प्या भाषेत समजण्या सारखे रेसिपी सांगितला...फार छान 👍👌👌

  • @prachimulgaonkar5864
    @prachimulgaonkar5864 5 місяців тому

    मस्तच गणेश आगमनाची थाळी 👌

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 5 місяців тому +2

    मस्त आहे विडीओ

  • @rekhadewoolkar9378
    @rekhadewoolkar9378 5 місяців тому

    कुषणाताई माझ्या मोदकाच्या पीठात गोळे गोळे राहातात,❤

  • @anitasamant2366
    @anitasamant2366 5 місяців тому +1

    Sagle recipes ekdum mast ahet

  • @sumitrakambli8873
    @sumitrakambli8873 5 місяців тому

    Khup mast

  • @sanketpowarvlogs545
    @sanketpowarvlogs545 5 місяців тому +1

    Mast recipe 😊

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 5 місяців тому

    कृष्णाई ...तुला अनेक शुभाशीर्वाद ❤❤❤

  • @Akshaydivya-i1t
    @Akshaydivya-i1t 4 місяці тому

    ekdam bhari

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 5 місяців тому +7

    एकदम मस्त..
    तुम्हाला दोघिंना एकत्र रेसिपी बनवताना बघून खूप छान वाटले.
    बाबिच्या लग्ना आधीची आठवण आली.😊

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  5 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ❤️

  • @TruptiGaonkar-u8j
    @TruptiGaonkar-u8j 5 місяців тому

    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @recipesbysandhya938
    @recipesbysandhya938 5 місяців тому +4

    मस्त

  • @arjunmyana2149
    @arjunmyana2149 5 місяців тому

    Very nice recipe 👍👍🙏🙏

  • @bhartichavan9436
    @bhartichavan9436 5 місяців тому +1

    Thali mast aahe

  • @shubhadavilankar793
    @shubhadavilankar793 5 місяців тому

    Mast bhaji

  • @shubhamgurav5759
    @shubhamgurav5759 5 місяців тому

    Sarv padarth khupch chan zaleyt

  • @JayshriPansare-cj9km
    @JayshriPansare-cj9km 5 місяців тому

    So yummy 👌 👍 😋

  • @dipalipandit3659
    @dipalipandit3659 5 місяців тому

    Khupach chhan thali, baghunch tondala pani sutale...😊👍👍👌👌❤❤

  • @aparnatelange5281
    @aparnatelange5281 3 місяці тому +1

  • @raajpatil1263
    @raajpatil1263 5 місяців тому

    Khup chan bappa ❤❤❤

  • @kishorphondekar3494
    @kishorphondekar3494 5 місяців тому

    एकदम उत्तम 🙏👌❤️

  • @rockstarsmit862
    @rockstarsmit862 5 місяців тому

    मस्त ताई😊

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 5 місяців тому +12

    अळू शिजवायला कुकर मिक्सर ची काय गरज. नुसत्या फोडणीत ही अळू छान शिजतं. व मूळ चव कायम राहते. कुकर च्या शिटीतून अर्क निघून जातो. कडधान्य शिजवायला कुकर ठीक. पण अळूसाठी गरज नाही. पूर्वीची जुनी माणसे कुठे हे कुकर वापरत होते? आणि अळूला चिंच गूळ हवाच. असे माझे स्पष्ट मत.(यामागे शास्त्रीय कारण आहे. अळू पाणथळ जागेत वाढतो. त्यामुळे तो कफ वातकारक असतो. त्यात त्रिकोणी स्पटीक असतात त्यामुळे चिंच गुळा ने हे दोष कमी केले जातात )शेवटी जरासे बेसन लावले की छान मिळून येते.

  • @girishsawant7438
    @girishsawant7438 5 місяців тому

    खूप छान बाबी 👌👌

  • @mamtaghare5527
    @mamtaghare5527 5 місяців тому

    Khup sunder kame velet zali

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 5 місяців тому

    छान 👌👌

  • @real_ak7
    @real_ak7 5 місяців тому

    Khupch Chan😊

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 5 місяців тому

    छान रेसिपी

  • @vcarts9267
    @vcarts9267 5 місяців тому

    Khup chan❤

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 5 місяців тому

    अप्रतिमच सर्व 😊

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 5 місяців тому +1

    आमच्याकडे पण कांदा टाकतात.गजानन महाराजांचा नैवेद्य पीठलं भाकरी कांदा असा आहे.साईबाबा कच्चा कांदा खायचे ,पुजेचं नैवेद्याचं ताट खुप छान बनवलय बाप्पा प्रसन्न होऊन छान आर्शिवाद देणार. छान गोंडस बाळ होणार
    🎉🎉❤❤

  • @aishwaryatapasi9941
    @aishwaryatapasi9941 5 місяців тому

    गणपती बाप्पा मोरया😍🙏🙏

  • @AshutoshAshwi
    @AshutoshAshwi 4 місяці тому

    🤩😍

  • @aishwaryatapasi9941
    @aishwaryatapasi9941 5 місяців тому

    मोदक 😍😋😋 all time favorite

  • @manjirijoshi2718
    @manjirijoshi2718 5 місяців тому +1

    व्वाह 👌👌

  • @vinayaknaik1579
    @vinayaknaik1579 5 місяців тому

    Great 🙏

  • @prathibasonar7795
    @prathibasonar7795 5 місяців тому

    Kup chan

  • @anujakolge7528
    @anujakolge7528 5 місяців тому

    Alucha phatpata khupch chhan distay, tyat gul ani chichecha kol taklyavar khupach chhan lagte

  • @sushantpatil6433
    @sushantpatil6433 5 місяців тому

    बाप्पा येणार म्हणल्यावर मोदक तर पाहिजेच 🤤

  • @manalidate5146
    @manalidate5146 5 місяців тому

    Apratim naivedyachi Thali👌👌🙏😊

  • @bhartimali7929
    @bhartimali7929 5 місяців тому

    Chan

  • @rekhavalunjkar
    @rekhavalunjkar 5 місяців тому

    Khoopch mast
    Bappana nakkich aavadanar

  • @sunillaykar8795
    @sunillaykar8795 5 місяців тому

    Mast

  • @abdullahmistry2164
    @abdullahmistry2164 5 місяців тому

    👍👍

  • @vaishaligaikwad1339
    @vaishaligaikwad1339 5 місяців тому +2

    मी पणकालापुरची आहे

  • @shubhamgurav5759
    @shubhamgurav5759 5 місяців тому

    Bhavjini ganptich decorecataion mstch kely

  • @cheta121
    @cheta121 5 місяців тому

    कृष्णाई take care...🎉

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 5 місяців тому

    Krushnai tu khoop nashibwan ahes tuzya angi asalelyaka kalechi kadar karanara titksch kalasakt jodidar tula milala. Ganapati bappachi sajawat v nevedyache padarth khoop chan.

  • @SantoushKadam
    @SantoushKadam 5 місяців тому

    Nice

  • @avinashkumbhar3233
    @avinashkumbhar3233 5 місяців тому

    Bhari

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 5 місяців тому

    Ganapati,bappa,prasanahowo,sundarthankyou

  • @sushantpatil6433
    @sushantpatil6433 5 місяців тому

    हे पारंपारिक ताट एक नंबरच

  • @riyabrid8897
    @riyabrid8897 5 місяців тому

    👌🏻👌🏻

  • @aparnapotdar8468
    @aparnapotdar8468 5 місяців тому +1

    फदफदमधे चिंच गुळ टाकतो चवछान लागते

  • @SheelaChavan-f8y
    @SheelaChavan-f8y 5 місяців тому +3

    अळु करताना आम्ही अळु असाच शिजवुन घेतो मस्तच शिजतो.आम्ही कुकर किवा मिक्सर मध्ये कधीच अळु करत नाही
    पातेल्यात अळु त्यावर हिरवी मिरची. खोबर.जिर आणि कांदा असे घालून पातेल्याला झाकण मारून बारीक गॅस करून पाच मिनिटात अळु एकदम म ऊ शिजतो नंतर एक गड्डा लसुण टाकुन त्यावर मोहरी हिंगमसाला हळद टाकून जर दिवशी अळु टाकावा.नंतर चिंच गुळ आणि चवीनुसार मीठ टाकावे सुंदर अळु होतो अळु असाच छान शिजतो.असो

  • @vaishaligaikwad1339
    @vaishaligaikwad1339 5 місяців тому +1

    😀😍🤗👌👍🌹

  • @snehatawde2074
    @snehatawde2074 5 місяців тому

    ताई थाळी खूपच छान झाली अळू ची भाजी लय भारी malpua ची रेसिपी लवकर दाखवा मला गावी गणपतीला नैवद्य करायचा आहे

  • @SudhakarDesai-y9t
    @SudhakarDesai-y9t 5 місяців тому

    🎉🎉🎉❤❤

  • @makarandsinkar5359
    @makarandsinkar5359 5 місяців тому +4

    नैवेद्य आहे तर लसूण कसा घालता?

  • @durgapatil7513
    @durgapatil7513 5 місяців тому

    मला नक्की आवडेल तुम्ही नॉनव्हेज थाळी ऑर्डर करायला.

  • @jyotipatil3206
    @jyotipatil3206 5 місяців тому

    👌🏻

  • @meenapande7694
    @meenapande7694 5 місяців тому

    🙏🙏

  • @katkarminu
    @katkarminu 5 місяців тому

    😋😋😋
    ताई अळू भाजी खाताना खाजत नाही मग वडी का खाजते

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 5 місяців тому +10

    *मंगलमूर्ती मोरया*🙌🙌
    बाबी अभि कसा आहे किती दिवस झाले अजिबात दिसला नाहीये व्हिडीओ मध्ये.

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  5 місяців тому

      लवकरच तुम्हाला दादाचे देखील व्हिडीओ पाहायला मिळतील

  • @vivekanandkumbhar
    @vivekanandkumbhar 5 місяців тому

    ❤❤

  • @manoharlavate2129
    @manoharlavate2129 5 місяців тому

    अळू देठं एकत्रित कापताना अनुभवी कापतील😂
    दोन्हीही भाज्या मस्तच

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 5 місяців тому +3

    तू कोकणातील मातीची भांडी कोल्हापूरच्या घरी नेली का? छान वाटले आई आणि तुला रेसिपी बनवताना बघून.

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  5 місяців тому

      काही भांडी रत्नागिरीहुन आणली आणि काही भांडी नवीन आणली आहेत.
      खूप खूप धन्यवाद

  • @jyotiathavale4452
    @jyotiathavale4452 5 місяців тому

    गणपती च्या नैवेद्य त कांदा नाही घालत

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  5 місяців тому

      आमच्याइकडे कांदा लसूण वापरतात तसे व्हिडीओत सांगितले आहे

  • @kamininarkhede687
    @kamininarkhede687 5 місяців тому +3

    Aai kolhapur lach rahate ka?

  • @kaushikipokale4889
    @kaushikipokale4889 5 місяців тому +3

    खूपच सुंदर पण नैवेद्याला कांदा लसूण वापरत नाही आणि अळीला गुळ तर पाहिजेच

    • @antaranarkar2876
      @antaranarkar2876 5 місяців тому

      Amchakade vapartat

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  5 місяців тому

      आमच्याकडे नैवेद्याला कांदा लसूण वापरतात

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 5 місяців тому

    आई कोल्हापूर ला गेली वाटत पण अभि कुठे दिसतच नाही

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  5 місяців тому

      आई खास रेसिपी शूट साठी कोल्हापूरला आली आहे.

  • @aparnapotdar8468
    @aparnapotdar8468 5 місяців тому +5

    थाळि छान बनविलि आमच्याकडे नैवेद्याला कांदा लसुण वापरत नाहि

    • @jyotigupte3771
      @jyotigupte3771 5 місяців тому

      @@aparnapotdar8468 आम्ही पण कुठल्याच नैवेद्यासाठी कांदा लसूण वापरत नाही तसेच नैवेद्यासाठी मेथी कारले ह्या कडू भाज्या तसेच वाटाणे निश्चिद्ध मानले जाते.प्रत्येकाची पद्धत वेगळी असते.बाबेच्या आईने आणि बाबेने सुरवातीलाच सांगितले त्यांच्याकडे कांदा लसूण चालते.त्यांचे पण बरोबर आहे.मनाचा भाव आणि भक्ती शुद्ध असेल तर ह्या सगळ्या वर वरच्या गोष्टी आहेत

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  5 місяців тому

      हा
      धन्यवाद

  • @babitas6400
    @babitas6400 5 місяців тому +1

    Nice recepies. Babe tu pregnant aahe vatte. Kaku readymade tandulache pith ghetle tar chalte ka?

  • @makarandsinkar5359
    @makarandsinkar5359 5 місяців тому

    फोडणीमध्ये लसूण ठेचून घाला. मग आलू घाला. चिंच गूळ घाला

  • @monikadeshmukh
    @monikadeshmukh 5 місяців тому

    Tai tuz lagn kadhi zal

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 5 місяців тому +3

    ताई अभि दादा बरा आहे ना. त्याची एकही रेसिपी विडीओ आला नाही आहे.

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  5 місяців тому

      लवकरच तुम्हाला दादाचे देखील व्हिडीओ पाहायला मिळतील

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 5 місяців тому

    कांदा नेवैद्य?

  • @gurmitkaurarnejaarneja4399
    @gurmitkaurarnejaarneja4399 5 місяців тому

    Please show how to make rishibaji when ganpati ji will come🙏during ganpatiji garlic is not used

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 5 місяців тому

    Recip mastch pital badi Or vessal plz link or shop nama

    • @sujatabanerjee8702
      @sujatabanerjee8702 5 місяців тому

      Recipe vessel name dear

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  5 місяців тому

      पितळेची भांडी पुण्यातून आणली आहेत

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 5 місяців тому +3

    आपण आपलि रेसिपीज तुमच्या बोलत का वर्णन करून सागु शाकत नाही का?

    • @ashokkamble6735
      @ashokkamble6735 5 місяців тому

      बोलीभाषेत का सांगत नाही.

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 5 місяців тому

    Tumi marriage rukawat faral order hota ka plzz reply me

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  5 місяців тому

      आम्ही रुखवत घरी बनवले होते
      त्याचा व्हिडीओ अपलोड केला आहे नक्की पहा

  • @priyankab2647
    @priyankab2647 5 місяців тому

    पावटे कोवळे आहेत

  • @truptig-e3o
    @truptig-e3o 5 місяців тому

    Aluvadichi recipe dakhva na.

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  5 місяців тому

      हो लवकरच अपलोड करणार आहे

  • @komalpatane324
    @komalpatane324 5 місяців тому +1

    Tandul kuthla waprala modaka sathi

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  5 місяців тому +1

      आम्ही रेशन चे तांदूळ स्वच्छ धुऊन ते सुकवून पीठ तयार केले आहे

  • @manishawaghdare136
    @manishawaghdare136 5 місяців тому

    Modkana tadul kontey waprle

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  5 місяців тому

      आम्ही रेशन चे तांदूळ स्वच्छ धुऊन ते सुकवून पीठ तयार केले आहे