मुलांना घेऊन गेलो होडी हॉटेलात जेवायला😍| Hodi Seafood Restaurant | S For Satish |Vashi (Navi Mumbai)
Вставка
- Опубліковано 2 лют 2025
- मुलांना घेऊन गेलो होडी हॉटेलात जेवायला😍| Hodi Seafood Restaurant | S For Satish |Vashi (Navi Mumbai) #MulannaGheunGeloHodiHotelatJevayala #HodiSeafoodRestaurant #HodiRestaurantVashi #sforsatish
HODI SEAFOOD RESTAURANT (Vashi)
Plot No.11, Crown Plaza, Shop No.2,3,4, near AMPC Market, Sector 19, Vashi, Navi Mumbai, Maharashtra 400703
g.co/kgs/LaoShR
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.