" हक्क "मराठी चित्रपटाचं trailer

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • हक्क नावाचा चित्रपट ज्यावेळेला माझ्याकडे आला त्या वेळेला अपहरण नावाचा एक चित्रपट मी आधीच केला होता ज्याची कथा अगदी हुबेहूब हक्क चित्रपटासारखीच होती
    निर्माते पलटू श्रीवास्तव यांना मी ते सांगितलं पण त्यांचं म्हणणं असं होतं की आपली कथा फारच वेगळी आहे आणि ती अतिशय वेगळ्या पद्धतीने शूट होणार आहे
    चित्रपटाची नायिका स्मिता शेवाळे हीची निवड झाली
    याआधी स्मिताने मी दिग्दर्शित केलेल्या अथांग या चित्रपटांमध्ये काम केलं असल्याने माझा आणि तिचा चांगला परिचय होता. त्यामुळे या चित्रपटांमध्ये तिच्यासोबत काम करणं सोपं झालं, चित्रपटाची भाषा ही मराठी गोंडं भाषा होती,
    त्यामुळे या चित्रपटाचे संवाद कठीण होते सहजासहजी पाठांतर होणारे संवाद या चित्रपटांमध्ये नव्हते, rehearse sons बऱ्याच कराव्या लागत होत्या लेखक पण सेटवर असल्याने तसं सोपही जात होतं.
    निर्माते पलटू श्रीवास्तव यांचा मुलगा अशोक श्रीवास्तव याचा माझ्याशी आधीपासून परिचय होता, त्यांनी त्याच्या वडिलांना सांगितलं होतं की चित्रपटाचा नायक जर घ्यायचा असेल तर मिलिंद गवळी यांनाच घ्यायला हवं.
    मला माझ्यावर असा विश्वास ठेवणारी माणसं अतिशय आवडतात आणि त्यासाठी मी खूप प्रामाणिकपणे प्रयत्नही करत असतो, बऱ्याच वेळेला निर्माता किंवा दिग्दर्शक याला एखादा कलाकार नको असतो पण त्याला नाईलाज आणि त्याला घ्यावं लागतं आणि मग त्यांच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला ते सतत जाणवत असतं की आपण त्यांना आवडत नसतो पण त्यांचा नाईलाज झालेला असतो अशा ठिकाणी माझा comfort zone निघून जातो पण हक्क या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेला तसं काही झालं नाही अतिशय अनुकूल परिस्थितीमध्ये मला हा चित्रपट करायला मिळाला दिग्दर्शक सुरुवातीला खूप सावध होते कारण हक्क करण्याच्या आधी मी एक चित्रपट दिग्दर्शित केला होता त्यामुळे त्यांना अशी भीती होती की त्यांच्या दिग्दर्शनामध्ये मी ढवळाढवळ करेल पण पहिल्या सीन मध्येच त्यांच्या लक्षात आलं की दिग्दर्शकाला मी खूप रिस्पेक्ट करतो आणि त्याच्या कामांमध्ये मी कधीही ढवळाढवळ करत नाही उलट तो जे सांगेल तशाच पद्धतीचं त्याला आवडेल असं काम करायचा मी सातत्याने प्रयत्न करत असतो,
    आणि विषय किंवा भूमिका ही मला अतिशय आवडेल अशीच होती जंगलामध्ये शूटिंग नॅक्सलाईट हा नायक त्यामुळे बंदूक गोळ्या डाकू जंगल औरंगाबाद पासून काही अंतरावर जंगलामध्ये या चित्रपटाचे शूटिंग झालं कडाक्याच्या थंडीत शूटिंग करावं लागत होतं त्यामुळे तोंडातून शब्द फुटत नव्हते, त्यात गोंड भाषेमध्ये संवाद बोलायचे होते, काही वेळेला तारांबळ उडाली पण काम करायला अतिशय मजा आली
    माझं काम अतिशय छान झालं असं अनेक जण म्हणाले
    आता लोकांच्या बोलण्यावर माझा फार विश्वास नाही आहे कारण बरेचशे लोक तोंडावर चांगलं बोलतात
    अभिनय करत असताना तुम्हाला त्या त्या क्षणाला जाणवत असतं की तुमचं काम चांगलं होतंय का वाईट होतंय कोणाला विचारायची गरज भासत नाही
    चित्रपटांमध्ये दोन अतिशय निसर्ग रम्य वातावरणात शूट केलेली गाणी आहे जी मला आजही खूप आवडतात
    Hero la romantic गाणी करायला मिळाली तर ती पडद्यावर छानच वाटतात, त्यात हाणामारी गोळ्या बॉम्ब
    त्यात सामाजिक आशय सामाजिक प्रश्न मांडलेला एक छान चित्रपट तयार झाला
    आजही तो Channel var बघायला मिळेल

КОМЕНТАРІ • 1