सासू सुनेची विहीर | मातंग विहीर रिद्धपूर | Riddhpur Sasu Sunechi Vihir and Matang Vihir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2019
  • रिद्धपूरची सासू सुनेची पायऱ्यांची विहीर: वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना - डॉ. जयंत वडतकर
    महानुभाव पंथाची काशी अशी ओळख असलेले रिद्धपूर हे अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील एक गाव, चांदूर बाजार या तालुक्याच्या ठीकानाहून अवघ्या 5 किमी अंतरावर वसलेले हे गाव श्री गोविंदप्रभू यांच्या पदस्पर्शाने पावन असे स्थळ असून म्हईभट यांनी मराठी भाषेतील आद्य ग्रंथ लीळाचरित्र सुमारे ८०० वर्षापूर्वी लिहिला तो रिद्धपुरात. श्री गोविन्द्प्रभू यांनी याठिकाणी सुमारे १२५ वर्षे वास्तव्य केले असे म्हटले जाते आणि या काळात त्यांनी अनेक लीळा केल्यात, त्यातील एक संदर्भ म्हणजे येथील सासू सुनेची विहीर.
    आजपासून सुमारे साडे आठशे वर्षापूर्वी श्री गोविन्द्प्रभू यांनी सांगितलेल्या ठिकाणी रिद्धपुर येथील नागरिक केशव नायक यांनी ही विहीर खोदण्यास सुरुवात केली मात्र ती पूर्ण होण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढील बांधकाम त्यांच्या मुलाने पूर्ण केले. वास्तुकलेचा उत्कृष्ट असा नमुना असलेली ही पायऱ्यांची विहीर कातीव काळ्या दगडात बांधलेली असून आहे. या विहीरत उतरण्यास उत्तर दक्षिण व पूर्व अशा तीन बाजूंनी वैशिठ्पूर्ण अशा अरुंद पायऱ्या आणि पश्चिमेला श्री प्रभू चरनाकीत मंदिर आहे. मंदिराच्या मागील भिंतीलगत मुख्य विहिरीत एक चौरस आकाराची वेगळी विहीर बांधलेली असून याबद्दल येथे एक आख्यायिका प्रचलित आहे. या विहिरीवरून जेव्हा सर्व गाव पाणी भारत असे मात्र या विहिरीचे मालक केशव नायक यांची पत्नी आपल्या सुनेस विहिरीवर पाणी भरू देत नसे. सुनेने ही तक्रार गोविन्द्प्रभूकडे केली, प्रभूंनी त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यामध्ये भिंत घालून एक चौरस अशी स्वतंत्र अशी विहीर सुनेस करून दिली. त्यावरूनच या विहिरीचे नाव पुढे सासू सुनेची विहीर असे प्रचलित झाले.
    आम्ही गेलो तेव्हा या विहीरीची अवस्था गवत वाढल्याने, कचरा व गाळ साचल्याने बिकट झाली होती, मात्र अलीकडेच तिची स्वच्छता करण्यात आल्याने तिला पूर्वीचे स्वच्छ सुंदर रूप प्राप्त झाले आहे, पावसाळ्यात पाऊस भरपूर झाल्यास ती अशी तुडुंब भरते तेव्हा तिच्या सर्व पायऱ्या पाण्याखाली जाऊन तिचे सौंदर्य अधिकच बहरते.
    रिद्धपूर गावाच्या बाहेर आणखी एक विहीर असून मातंग विहीर अशी तिची ओळख आहे. त्याकाळी गावातील शिवाशिव टाळण्यासाठी गावातील उच्चभ्रूनी दलितांना गावाबाहेर राहण्यास भाग पाडले, हा भाग संपूर्ण खडकाळ, त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष, त्यामुळे मातंग दलितांनी श्री गोविंद प्रभूंकडे आपली कैफियत मांडली तेव्हा प्रभूंनी त्यांना एका ठिकाणी पायाच्या अंगठ्याने जमीन उकरून तेथे विहीर खोदण्यास सांगितले, आणि आश्चर्य झाले, या खडकाळ भागात पाणी लागले. आज हे ठिकाण अमरावती नरखेड रेल्वे लाईन जेथून जाते त्या पलीकडे असून आजपासून सुमारे ८५० वर्षापूर्वी समाजाला मानवतेचा पाठ शिकवणाऱ्या घटनेचा साक्षीदार असलेली ही विहीर आज मानवतेचे स्मारक म्हणून सुद्धा परिचित आहे.
    Camera & Gear used -
    1) Video shoot with : Canon Power Shot SX50HS and GoPro Hero 7
    2) Photographs - Canon Power Shot SX50HS and GoPro Hero 7
    Music credits-
    UA-cam Library - ua-cam.com/users/audiolibrary...
    Category -History & Education
    #Riddhpur#Sasu-SunechiVihir#ChandurBazar#Morshi#ShriGovindPrabhu#MahanubhavKashi#

КОМЕНТАРІ • 158

  • @akashugalmugale8876
    @akashugalmugale8876 Рік тому +3

    जय श्री चक्रधर स्वामी महाराज ❤️😇🙏दंडवत प्रणाम 😇🙏 धन्यवाद प्रभु

  • @akashugalmugale8876
    @akashugalmugale8876 Рік тому +1

    जय श्री गोविंद प्रभु महाराज ❤️😇🙏दंडवत प्रणाम 😇🙏 धन्यवाद प्रभु

  • @amoshinde7756
    @amoshinde7756 3 роки тому +1

    किती सुंदर,अदभुत!धन्यवाद भाऊसाहेब..

  • @jiyamishra8885
    @jiyamishra8885 3 роки тому +3

    Great Information 👍

  • @sharadkumardhakade3180
    @sharadkumardhakade3180 4 роки тому +4

    खुप खुप धन्यवाद जयंतभाऊ ! याबद्दल पूर्वी फक्त ऐकलेले होते पण आपण स्वतः तेथे भेट देऊन तेथील इत्यंभूत माहिती या व्हिडिओद्वारा आम्हास पुरविली. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! आपण सुरू केलेला हा उपक्रम कधी बंद करू नका. शुभेच्छा!

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  4 роки тому +2

      धन्यवाद
      विदर्भातील दुर्लक्षित ठिकाणं दाखवण्यासाठी आपलं चॅनल आहे.
      हा उपक्रम सुरू राहील

    • @vandananagvekar4332
      @vandananagvekar4332 3 роки тому

      Thanks Dr. Jayant Sir, Aapan atishay durmil ashya ethihasatil sthalana tethe personally jaun aamhala mob. var (saddhya tari) pahnyasathi uplabddha karun dilat tyabaddhal shatashha dhanyawad. Vihiriche bandhkam? tyabaddhal kai bolave? Kharokharich 850 varshanpurviche bandhkam keval atulaniyach. Khupach ajod, dekhane aprateem ase bandhkam, kevha pahanyache bhagya labhate mahit nahi, parantu Aapan ashi durmil ani durlakshit aitihasik sthale shodhun sarvansamor pahanyasathi uplabdha karit raha, tyasathi Aapnas khup khup Shubhechha.

  • @hemlatapatil5218
    @hemlatapatil5218 3 роки тому +2

    खूपच प्रेक्षणीय आणि महानुभाव पंथाची ऐतिहासिक वास्तू👌
    धन्यवाद😊

  • @shashikantbagave3078
    @shashikantbagave3078 3 роки тому +4

    well done sir. आपले पूर्वज technicaly आपल्या पेक्षा 1000% हुशार होते

  • @suhasdhamorikar5890
    @suhasdhamorikar5890 2 роки тому +2

    Very important information on mahanubhav panth, and vidarbha civilization.

  • @shyamsamant235
    @shyamsamant235 3 роки тому +2

    Dandawat Pranam far sunder Banvali. Before 20 years I saw. Very good developed. Dandawat pranam

  • @milindlokhande6994
    @milindlokhande6994 Рік тому +1

    Dandavat pranam 🙏🙏

  • @ravindrawanare9108
    @ravindrawanare9108 Рік тому +1

    Dr saheb

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 3 роки тому +1

    अप्रतिम बांधकाम, ऐतिहासिक ठेवा आहे 👍

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  3 роки тому +1

      अगदी बरोबर. दुर्लक्षित ऐतिहासिक ठेवा

  • @dhirajthepekar7966
    @dhirajthepekar7966 3 роки тому +2

    Wow really i am very excited superbbbbbbbbbbb🌹🌹🌹🌹🌹

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 2 роки тому +1

    बरेचदा रिदधपुरला गेलो, पण माहितीच नाही त्यामुळे पाहण्याचा योग आला नाही, तुमच्या मुळे माहित पडलं, धन्यवाद 🙏

  • @poojabodke683
    @poojabodke683 3 роки тому +1

    दंडवत प्रणाम खूप छान

  • @teamyuvaeagles1453
    @teamyuvaeagles1453 4 роки тому +1

    खुप छाण वावटला हा वीडियो

  • @haripalpandit3738
    @haripalpandit3738 3 роки тому +1

    दडवत। प्रणाम। खुप। छाण। आहे। सर

  • @sunilbhat5589
    @sunilbhat5589 Рік тому +1

    DAANDVAAT PRANAAM ji 🙏🙏🙏🙏🙏🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

  • @sunilaware4494
    @sunilaware4494 3 роки тому +1

    दंडवत प्रणाम

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 4 роки тому +3

    ही विहीर पाहिल्यावर गुजरात मधील "राणिकी वाव"ची आठवण झाली.समृध्द भारत!समृध्द वारसा!

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  4 роки тому +2

      खरं आहे, आपल्या भागात अशी बरीच ठिकाणं आहेत. मात्र ती फारशी कुणाला माहीत नाहीत. अशीच दुर्लक्षित ठिकाणं दाखवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे.
      धन्यवाद

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 Рік тому +1

    छान माहिती

  • @vaishaligaykwad2237
    @vaishaligaykwad2237 3 роки тому +2

    खुप छान👌👌👌👌👌

  • @sanjay-pt8ke
    @sanjay-pt8ke 2 роки тому +1

    Very nice information and video by Dr. Wadatkar.

  • @nehapatil737
    @nehapatil737 3 роки тому +1

    खुपच छान आहे आता तिथे जायायची इच्छा झाली आहे

  • @mrunalbabhulkar5254
    @mrunalbabhulkar5254 4 роки тому +3

    Very nice vedio Matang veehir

  • @suhasambikar8543
    @suhasambikar8543 3 роки тому +2

    अद्भुत हे एक छान पर्यटन स्थळ होऊ शकते व त्यामुळे जतन पण होईल

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 5 місяців тому +1

    Sundar.

  • @allinonewithpavan2112
    @allinonewithpavan2112 Рік тому +1

    खूप सुंदर माहिती 👌👌👌

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 4 роки тому +1

    Beautiful sir.

  • @bbc3289
    @bbc3289 2 роки тому +1

    I like it

  • @kingkhan-dq6th
    @kingkhan-dq6th 4 роки тому +1

    ek number bhaoo

  • @prashantbaviskar46
    @prashantbaviskar46 4 роки тому +2

    दंडवत हाय बाबा दंडवत

  • @roshanroshan3737
    @roshanroshan3737 4 роки тому +9

    छान व्हीडीओ.
    एक सांगायचं आहे, केशवनायक हे त्या काळातील एक प्रतिष्ठित श्रीमंत व्यक्ती होते व ते श्रीगोविंदप्रभुचे भक्त पण होते .
    आपण म्हणालात की ते म्हाइंमभटाचे नातेवाईक असावेत हे मात्र खरं नाही.
    म्हांइमभट व केशवनायक हे नातेवाईक नव्हते . 🙏🙏

  • @Majhinokaricorner
    @Majhinokaricorner 3 роки тому +1

    Very nice 👌👌 Matang vihir

  • @hayatsyed7098
    @hayatsyed7098 4 роки тому +2

    Good job sir god bless you always for this job aameen😇🤲🌹🌹🌹 ❤

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 3 роки тому +1

    🙏🙏 दंडवत !

  • @bhagwatsawant2328
    @bhagwatsawant2328 3 роки тому +1

    Nc info

  • @dineshpatil3249
    @dineshpatil3249 4 роки тому +2

    Bharich

  • @user-sj0099
    @user-sj0099 3 роки тому +2

    Jai lahuji jai matang

  • @varshakavishwar4898
    @varshakavishwar4898 2 роки тому +1

    Dandwat pranam

  • @jaywantshinde7497
    @jaywantshinde7497 3 роки тому +7

    रिद्धपुरचे नागरिक झोपा काढतात का येवडा सुंदर पुरातन खजिना आहे ,, परंतु विहिरीची साफ सफाई जमत नाही का,, या पुरातन विहिरीत किती गवत उगवले आहे

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  3 роки тому +2

      हा व्हिडिओ केल्यानंतर त्या विहीरीची स्वच्छता करण्यात आली. आता भरपूर पाणी आणि विहीर स्वच्छ आहे

    • @jaywantshinde7497
      @jaywantshinde7497 3 роки тому +1

      @@explorewithdr.jayantwadatkar tx

    • @jyotinikam5151
      @jyotinikam5151 3 роки тому

      सुंदर वास्तू चे संवर्धन नाही !

  • @VaibhavAKhandare
    @VaibhavAKhandare 3 роки тому +3

    The thing is that boy taking pride in telling the fact that this was the first well opened for dalit is the tyranny in itself.

  • @shyamsundarborkar442
    @shyamsundarborkar442 3 роки тому +1

    महंत आणि त्याच्या अनुयायी किंवा तेथिल पुजारी संघटनांनी परस्परांत पुढाकार घेऊन स्वच्छता अभियानाचे सहर्ष योगदान करून स्वच्छतेची काळजी घ्यावी. ही एक काशी म्हणून प्रसिद्ध आहे पण निष्काळजीपणा ची घोर विटंबना वाटते. निस्वार्थ सहर्ष दंडवत श्रीमानजी.

  • @shilpasawalakhe3442
    @shilpasawalakhe3442 4 роки тому +2

    I liked your videos.. People want to hunt different famous historical places which are far away...from your video I learnt that first we need to explore our own city our own Vidharbha ...which has beautiful historical monuments.....and has a great and ancient history....
    Thank you sir the way you covered the places and make us know about the great history of our own Vidharbha.....

  • @vinayaksalve2441
    @vinayaksalve2441 2 роки тому +1

    Nice keep up best wishes

  • @dineshshinde8816
    @dineshshinde8816 4 роки тому +2

    छान व्हीडीओ

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 3 роки тому +10

    या विहिरीचे बांधकाम करणारे ज्ञानी कौशल्यवान माणसे कोण होती ? त्यांच्या बद्दल चा इतिहास अज्ञातच राहिला. मात्र लोकांच्या दयेवर दक्षिणेवर नैवद्यावर जगणारे मात्र खूप मोठे झाले..

  • @anandraohambarde8356
    @anandraohambarde8356 4 роки тому +3

    Very nice video

  • @shitaldesale9474
    @shitaldesale9474 3 роки тому +1

    Very nice

  • @neelupatel6185
    @neelupatel6185 3 роки тому +1

    Dandvat

  • @kamalvairal81
    @kamalvairal81 3 роки тому +1

    Dandvtpranam

  • @mithileshnagrikar2711
    @mithileshnagrikar2711 Рік тому +2

    Govind prabhu yanchya jivanavar aadharit ekhadya chitrapatat aahe ka

  • @malini7639
    @malini7639 4 роки тому +2

    खुपच छान व्हिडीओ ईतकी छान वास्तु आहे पण स्वच्छ ता पाहिजे गवत झाड झुडपे वेळीच काढले पाहिजे
    रिद्धपुर ला जळगाव वरून कसे जाता येईल

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  4 роки тому

      धन्यवाद ! आधी अमरावती पर्यंत पोह़चलो की तेथून 35 कीमी अंतरावर चांदूर बाजार पर्यंत बस ने जाता येईल. काही माहिती लागली तर मला संपर्क करू शकता

    • @nileshbansod4646
      @nileshbansod4646 3 роки тому

      Train ahe na

  • @akyachavan1243
    @akyachavan1243 3 роки тому +1

    Nice video sir

  • @aneeshwairagade9505
    @aneeshwairagade9505 4 роки тому +6

    Really liking your extremely informative videos Just one thing, if you could give the coordinates or google maps location in the description, it would be great! a lot of these places are not reliably mapped and having a google maps location would help tourists and history enthusiasts locate these places with ease.

  • @with2046
    @with2046 Рік тому +1

    दंडवत प्रणाम सर्वाना माझा
    मी महानुभाव पंथ महाराष्ट्र मधील मंदिर बघण्यासाठी चॅनेल सुरुवात केले कृपया मार्गदर्शन करा प्लीज 🙏🙏

  • @umeshbibishnedeokule8444
    @umeshbibishnedeokule8444 3 роки тому +1

    Nice

  • @sumitmahabare2891
    @sumitmahabare2891 3 роки тому +1

    स्वच्छतेचा अभाव😞

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  3 роки тому

      बरोबर आहे. परंतु हा व्हिडिओ केल्यानंतर तेथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आता तो परिसर नियमित स्वच्छ केला जातो.

  • @deepakbambatkar224
    @deepakbambatkar224 9 місяців тому +1

    विहीर खरच पुरातन व सुंदर आहे पण गवत वाढलेले आहे स्वश्चता दिसत नाही स्थानिक प्रशासन ने लक्ष घालावे ही सूचना नाही विनंती आहे.

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  6 місяців тому +1

      मी व्हिडिओ केल्या नंतर संपूर्ण विहीर स्वच्छ झाली व आम्ही पाठपुरावा केला त्यामुळे पुरातत्व खात्याचेही काम सुरू होणार आहे.

  • @sagarwankhade4399
    @sagarwankhade4399 3 роки тому +2

    ही विहीर ज्या ठिकाणी आहे त्याचा location पण सांगा....

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  3 роки тому

      रिद्धपूर गावातच आहे, गावात गेलो की कुणीही सांगेल.

    • @sagarwankhade4399
      @sagarwankhade4399 3 роки тому

      @@explorewithdr.jayantwadatkar माझाच शेताच्या आत आहे ही विहीर

  • @duryodhanzine7782
    @duryodhanzine7782 Рік тому +1

    आता सर्व विहिरी सुनांनी च घेतल्या

  • @sachingumfekar6227
    @sachingumfekar6227 3 роки тому +1

    Sir ashti uthe visit deu shkta ka

  • @lakshayjeetsingh2075
    @lakshayjeetsingh2075 3 роки тому +1

    Please isthan ki leela hindi m dubara do

  • @mr.shree_ff7504
    @mr.shree_ff7504 3 роки тому +1

    मातंग विहीर हे नाव कसे दिले?

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  3 роки тому +1

      गावाबाहेर मातंग समाजासाठी एक दुसरी विहीर बांधली आहे, तीचे नाव मातंग विहीर आहे

  • @vijayakhaparde4647
    @vijayakhaparde4647 3 роки тому

    Matag ha konta smaaj ??

  • @atharvaligde3201
    @atharvaligde3201 3 роки тому +2

    He lonar. Aundha nagnath same ahe architecture

  • @swatigawade3389
    @swatigawade3389 4 роки тому +2

    Yadavkalin bavdi aahe...asha vihiri rajasthan madhe mothya pramanat aahet....vidarbha...marathwadyat hi aahet kahi...

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  4 роки тому +1

      होय, काळ तोच आहे. विदर्भात त्या काळातील 7-8 विहिरी मला माहिती आहेत

    • @ANlove2004
      @ANlove2004 4 роки тому

      Nice 👌❤️ information

  • @nikhilkapate9347
    @nikhilkapate9347 2 роки тому +1

    दंडवत प्रणाम

  • @ambulkarprakash
    @ambulkarprakash 4 роки тому +1

    छान माहिती