पत्याच्या घरची भातशेती। भातकापणी।इंद्रधनुष्याने केले स्वागत।kokan rice farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 995

  • @vandanarane4779
    @vandanarane4779 3 роки тому +145

    ऊन पाऊस खेळ निसर्गाचा, तुम्हाला लाभ मिळतो त्याच्या सानिध्याचा, तुम्हा मित्रांच्या मार्फत आम्हीही या निसर्गाचा आस्वाद घेतो दुरून, आणि तुम्हा मित्रांची मस्ती आणि प्रेम बघून आम्हा सगळ्यांचा ऊर येतो अभिमानाने भरून, देवी पावणाई तुम्हा सगळ्यांना उदंड यश देवो, श्री स्वामी समर्थ

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 роки тому +2

      Thank u

    • @pramilabaviskar3703
      @pramilabaviskar3703 3 роки тому +1

      Agdi barobar

    • @prajaktapatne2506
      @prajaktapatne2506 3 роки тому

      खरच आहे देवी पावणारी तुम्हा सगळ्यांना उदंड आयुष्य आणि यश देवो

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 3 роки тому

      यमक छान जुळवला

    • @kunarwarekar9536
      @kunarwarekar9536 3 роки тому +2

      @@goshtakokanatli भात शेती कापताना पलासटीक मास जे डॅकटर चेहरा ढाकणयासाठी घालतात ते घालावे महणजे पातीची धार लागणार नाही

  • @bharatiganvir5017
    @bharatiganvir5017 3 роки тому +2

    Omg...किती ही मेहनत....शेतकऱ्यांची किती मेहनत असते.शेतकऱी अपार कष्ट करतो....तेव्हा.... अन्नाचा घास मिळतो.
    " अरे संसार...संसार... जसा तवा चुलीवर.....आधी चटके हाताला.... तेव्हा मिळते भाकर..... 😰😰
    अनिकेत, पत्या,पना..... grt.... keep it up .... 🤩🥰🤗

  • @uttamsapale4477
    @uttamsapale4477 3 роки тому +4

    आज निसर्गाचे पण आभार मानावे लागतील .भात कापणी चा पहिला दिवस आणि पाऊस येणार होता सर्व बाजुने अंधार केला होता. शेवटी त्या पावसाला पण हार मानावी लागली .कारण गोष्ट कोकणातील भात कापणी चा पहिला दिवस होता.आणि तुमच्या स्वागतासाठी आणि तुमची मेहनत पाहून इंद्रधनुश्य लागला .

  • @shraddhashetye1011
    @shraddhashetye1011 3 роки тому +1

    अनिकेत तुझे प्रयत्न खूप चांगले आहेत. खरंच, शेतकरी टिकेल तर सगळे टिकतील.
    आणि तुम्ही सगळी तरुण मंडळी शेतीकडे वळलात. खूप छान! आधुनिक गोष्टींचा जास्त वापर करा. जमिन आपली आई आहे.
    तुझे सुरुवातीपासूनचे शेती करतानाचे सर्व व्हिडिओ बघितले आहेत. आता भात तयार झाला ते बघून खरोखर आनंदाश्रू आले.
    सर्वांच्या कष्टाचं चीज झालेलं बघून खूप समाधान वाटलं.
    जय किसान!

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 3 роки тому +37

    सर्व प्रथम जगातील सर्व शेतकरीना एक लाइक.आजचा वीडियो खुप मस्त होता. तूझी आणि पत्याच्या पूर्ण परिवारानी खुप मेहनती चे काम केले आहे.त्या मेहनतीला खुप यश मिळू दे हिच सद्गुरू चरणी प्रार्थना.

  • @vinodshinde5416
    @vinodshinde5416 3 роки тому +8

    अनिकेत कमाल बुवा तुमच्या दोस्तीची
    कोरोना आला आणि सगळे कसे जगू हे विसरून गेले पण तुम्ही कसे जगावे हे जगाला शिकवले कमाल बुवा तुमची अशीच मैत्री राहूदे आयुष्यभर पना तुझ्या कामाला पण सलाम भरपूर मोठे व्हा गोष्ट कोकणातील टीम सर्वांनी

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 роки тому +3

    दादा खूप छान👏✊👍 तुम्हा सर्वांची मेहनत, पावसाचा लपंडाव , पान्यातुनच पारलेजीची चव, चिनुची पिल्ले ,पन्या हातची डाळ, आजीची प्रेमाने विचारपुस सर्वच खूप भारी💐❤🙏

  • @yogitasawant1337
    @yogitasawant1337 3 роки тому +1

    खूप छान नजरांना आहे इंद्रधान्युष... खूप hardwarking आहे 👌👌👌

  • @pravindesai3981
    @pravindesai3981 3 роки тому +6

    अनिकेत दादा तुझ्यामुळे शेतकरी किती मेहनत करतो आहे ते सर्व महाराष्ट्र बघतोय

  • @shrutikarane7976
    @shrutikarane7976 3 роки тому +2

    Khup bhari dada mastch kapni pn kartos ani video pn bhari

  • @santoshgawankar5417
    @santoshgawankar5417 3 роки тому +15

    खूप परिश्रम करावे लागतात भात शेती करण्यासाठी , सलाम सर्वांना 🙏🙏🙏

  • @MansiDiwale
    @MansiDiwale 3 роки тому +1

    भात बघितल्यावर वाटले🌾🌾🌾🌾 एवढ्यादिवसाची तुमची मेहनत पूर्णतः सफल झाली .👌👌👌👌👍👍👍👍

  • @sanjaykedar9222
    @sanjaykedar9222 3 роки тому +4

    आज तुम्हाला भात कापतांना पाहुन खुपच छान वाटले. तुमच्या शेतात कष्ट करण्याच्या व्हिडिओ मुळे आजच्या मुलांना शेतीकडे ओढ निर्माण होईल.
    व्हिडीओ पाहुन आमच्या गावच्या भात शेतीची आठवण ताजी झाली....

  • @arunathavale1598
    @arunathavale1598 3 роки тому +1

    पत्याची भातशेती एकदम फर्स्ट क्लास

  • @smarty536
    @smarty536 3 роки тому +3

    Khub sundor video 👌❤️ 👍👍👍

  • @pradeepnachnaekar5189
    @pradeepnachnaekar5189 Рік тому +1

    छान

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 роки тому +7

    मस्त अनिकेत,शेतकरी टिकेल तर सर्व सामान्य जगेल. खूप खूप शुभेच्छा.देव तुमचं भलं करो

  • @morelaxman6271
    @morelaxman6271 3 роки тому +1

    शेतकरी शेती मधे उत्पन्न धेतात ,
    आनी अनिकेत तु शेतकरीवर्ग उत्पन्न करसील हे नक्कीच भाऊ ,
    मानाचा मुजरा
    खूप आनंद झाला आजचा ब्लॉग बघुन,
    धन्यवाद ,

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 3 роки тому +4

    Kiti mehant ghetalit great ahet Tumi sarv video 😍 Bappa bless you

  • @anitadesai1111
    @anitadesai1111 3 роки тому

    फारच सुंदर इंद्रधनुष्य ...अभाळाने जणू कृपेचे छत्र तुमच्या शेतावर धरले होते. खूपच मेहनत घेतली भातकापणीला मानावे लागेल तुम्हां सर्वाना...🙌❤️कोकणातील निसर्ग खूपच सुंदर

  • @rasikapawar_
    @rasikapawar_ 3 роки тому +12

    Very exciting lifestyle yet very positive attitude. Hats off to you all people. May God bless you with good health,wealth and prosperity.

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan4264 3 роки тому

    अनिकेत खूपच छान काम करत आहे.तुला शेतात काम करताना पाहून खूप भारी वाटल.तुला शेतात काम करताना पाहून लहानपणीचे शेतात काम करतानाचे दिवस आठवले.तुझी शेतीची आवड बघून छान वाटत.तुझे व्हिडिओ बघून अनेकांना शेतीची आवड निर्माण होईल.तुझे कष्ट बघून लोकांना शेतकऱ्यांचे कष्ट लक्षात येईल.असेच चांगले व्हिडिओ टाकत रहा.अशीच प्रगती करत रहा.खूप खूप शुभेच्छा.
    सुधीर चव्हाण सातारा

  • @archanapawshekar8836
    @archanapawshekar8836 3 роки тому +3

    Todne sope ni jodne avakhad manatat na tech ahe khup mehnati aahat tumhi..Mast video

  • @ganeshtalavanekar8798
    @ganeshtalavanekar8798 3 роки тому

    किती मेहनत घ्यावी लागते ते आज कळेल सर्वांना..कापणी,कातरणी किंवा सराईचा हंगाम सर्वात कष्टाचा...पाऊस पडायच्या भीतीने काम नाही थांबले हेच इच्छा शक्ती चे यश!!! इंद्रधनुष्य आणि आजीला पाहून छान वाटले☺️

  • @bhalchandragujar7940
    @bhalchandragujar7940 3 роки тому +5

    Vavar hai to power hai so keep it up all

  • @mitalikalamkar1460
    @mitalikalamkar1460 3 роки тому

    अनिकेत , कडक ऊन भात कापणी ,भात झोडणी ,आणि पाऊस येतानाची झालेली धावपळ हे बघूनच आम्हाला दमायला झाले, तर तुमची काय अवस्था झाली असेल हे समजू शकतो ,अरे संसार संसार आधी अंगाला चटके तेव्हा मिळतो तांदुळ . खरंच खूपच कष्टतालु आहात सर्व 👌👍

  • @sujatarevane4878
    @sujatarevane4878 3 роки тому +5

    Khup sundar videos astat 👌👌👌

  • @priyankaghag7882
    @priyankaghag7882 3 роки тому

    तेलुगू मध्ये महर्षि नावाचा मूव्ही आहे ज्याचा main moto होता की youth ला शेती विषयी आवड निर्माण व्हावी, नविन शेतकरी तयार व्हावे.पण तू आमचा रिअल लाईफ मधला महर्षि आहेस. तुझ्या मुळे खूप लोकांना शेती ची आवड निर्माण झाली, शेतकऱ्यांचे problems कळाले. तुझ्या मुळे खूप लोक पुन्हा एकदा गावाशी कनेक्ट झाले आहेत. तू आणि तुझी टीम असंच काम करत रहा आणि सगळ्यांचं प्रेम मिळवत राहा.

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 3 роки тому +12

    खूप भारी आहात तुम्ही👌👌👌सगळी पोरा मेहनती एकमेकाक मदत करणारी,खूप बरा वाटता ह्या सगळा बघून..काळजी घेवा रे पोरोनो आणि सोईन रव्हा,आज vlog चा end भारी केलंस प्रश्न विचारणारी आजी दाखवून ♥️♥️♥️♥️

  • @snehalv186
    @snehalv186 3 роки тому

    तुज्या मुळे खूप लोकांना प्रोत्साहन मिळते आहे. असेच पर्यंत सूर ठेव.

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 роки тому +3

    भात कापणी व्हिडिओ मस्तच, छान, मस्त, सुंदर व्हिडिओ. अनिकेत दादा,पत्या भाऊ नमस्कार.

  • @rekhawalinjkar1902
    @rekhawalinjkar1902 3 роки тому

    अनिकेत तुझ्या कामाला सलाम तुझी सगळ्यांना मदत करायची जी वृत्ती आहे ती खरच खूप छान म तुम्ही सगळे मिळून एक मेकाना मदत करता खूप छान खरंच शेतकऱ्यांच्या कष्टाला सलूट पाऊस आल्यावर काय हाल होतात बापरे खरच

  • @janakirane4691
    @janakirane4691 3 роки тому +4

    So sweet Aniket 👌

  • @ashuscorner5169
    @ashuscorner5169 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🚩
    कमाल बुवा पनाची, ती तुमच्या सगळ्यांमध्ये खुप लहान आहे, पण तिची काम करण्याची लगबग कमालीची आहे. प्रचंड मेहनत आहे बुवा. तुमच्या मेहनतीपुढे निसर्गालाही नमतं घ्यावं लागलं. आणि तुमच्या मेहनतीची पोचपावती म्हणुन इंद्रधनुष्य रुपी सुंदर अशी भेट दिली...!
    🌈
    तुम्हा सगळ्यांच्या मेहनतीला मानाचा मुजरा..
    #कमालबुवातुंम्हासगळ्यांची..❤️🌹🙏

  • @dhanshreepalande4651
    @dhanshreepalande4651 3 роки тому +7

    Aaji smiling is very cute...really my lot of regards and love to Aaji.u r real hero of malvan hard work ,dedication and finally success....stay blessed always..

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 роки тому

    अनिकेत चिनी पिल्ले खूप मजेशीर आहेत, माणूस म्हणून खूप माया करतोस. पत्याची भात कापणी तुम्ही
    सर्वानी मदत करून, त्यात उनपाऊसाचा खेळ,..... पण जमवल. खूप मेहनत आहे, तेव्हां कुठे भाताच्या शेतीत दाण्याचे सुदंर मोती दिसतात. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या मेहनतीला सलाम 🙏🙏👍मस्त ब्लॉग👌👌

  • @baakbookmarathishorts
    @baakbookmarathishorts 3 роки тому +9

    खूप छान व्हिडिओ पाऊसा मुळे किती धावपळ होते ते समोरून पाहिले तुमच्या कष्टाला सलाम 🙏🙏❤️❤️

  • @ayyappanyadava6997
    @ayyappanyadava6997 3 роки тому +2

    Jai Jawan....Jai Kisan......Congratulations to Patya 👍

  • @shitaljagdale5187
    @shitaljagdale5187 3 роки тому +3

    भात लवकर होतो मानून कुकर la लाऊन मोकळे होनारायला बोलवा भात कडायल कशी मेहनत असते कळेल.so hard work boy's 🤗🤗🤗

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 роки тому

    अरे बापरे किती ही मेहनत करावी लागते खरच तुम्हां सर्वांना माझा सलाम आजूबाजूचे परिसर खुप सुंदर सुरेख होतं इंद्रधनुष्य खुप सुरेख होते आणि आजीचे हसू सुध्दा गोड होते चिनू व तिची पिल्लं खुप छान आहे पन्नाने खुप मेहनत केली खरच देव तुम्हाला यश देवो आणि तुमचे आयुष्य सुखात जावो

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 3 роки тому +3

    खुप छान व्हिडीओ दादा

  • @madhuriwadate9709
    @madhuriwadate9709 3 роки тому +2

    आरे वा! झाला शुभारंभ भात कापणीस. आजचा ब्लॉग नेहमी प्रमाणे छान 👍

  • @sanjaykumarasugade2380
    @sanjaykumarasugade2380 3 роки тому +3

    Unity is strength Devak kalji 💯💯👌👌🙏🙏👍👍🤔💕💕🤔🍫🍫

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 3 роки тому

    खुप धान video , पिल्लाची मस्ती जाम भारी, भात कापणी व झोडणी मस्त, पनाची फिरकी, कष्ट करण्याची तयारी,..... सुरेख इंद्रधनुष्य

  • @neetagamare7358
    @neetagamare7358 3 роки тому +21

    खुप सुंदर पत्या कमाल बुवा तुझी👌👌🌾 तु खुप छान नजारे दाकवतोस🙏❤️ अनिकेत तुला खरंच पुन्हा एकदा आभार.कोकणातला शेतकरी.❤️🙏

  • @medhakadam7744
    @medhakadam7744 3 роки тому

    भात कापताना जो शेतात सुगंध येतो ना तो मला फार आवडतो एक वेगळाच अनुभव येतो मस्त आमच्या कडे बसून भात कापतात माझं गाव लांजा तालुक्या मधील शिरवली व माझं सासर तळवडे आहे. मस्त वाटत लहान पणी आमची पण खूप शेती करत होतो. आता ते तुझ्या मार्फत अनुभवयाला मिळत आहे Thank you .

  • @shreyapalkar3975
    @shreyapalkar3975 3 роки тому +3

    Kadak Dada ek no...❤💫💯

  • @aseefhobyisgardenin
    @aseefhobyisgardenin 3 роки тому +1

    भात कापनी चा गणपति बाप्पा मोरया🌸👍🙏👌👌👌👍👏🌸🌸

  • @pravindesai3981
    @pravindesai3981 3 роки тому +5

    कोकणातल्या शेतकऱ्यांच खर सुख म्हणजे शेती

  • @somnathvishe3062
    @somnathvishe3062 3 роки тому

    खूप मस्त व्हिडिओ आहे नक्की पहा सर्वांनी 🙏
    तुम्ही जे एकमेकांना मदत करता🤝 ती खूप छान आहे
    कारण ह्या जगात अशी खूप कमी माणसे असतात जी अशी मदतीला धावतात ♥️♥️
    तुमच्या कार्याला सलाम अन् धावपळीच्या जीवनातील खरे हिरो आहात तुम्ही
    अनिकेत तूझी मेहनत खूप छान आहे घरी कोणी नसताना सगळी काम करून सर्वांना मदत करतोस
    मनु ची काळजी अन् बाकी च्या वाडीतली माणसांना आपुलकी ही खरी तुझी ओलख आहे
    खूप मोठा हो अन् नक्की होशील💯 आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत
    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @abhijitpatil6114
    @abhijitpatil6114 3 роки тому +5

    Thanks for such wonderful video that teach us value of food

    • @vihaanworld5098
      @vihaanworld5098 3 роки тому

      खूप छान,

    • @vihaanworld5098
      @vihaanworld5098 3 роки тому

      मला कोकण खूप आवडतं,माझ्या नोकरीची सुरुवात कोकणातून श्रीवर्धन,दापोली आणि रत्नागिरी
      नयनरम्य निसर्ग,कोकणातली निर्मळ माणसं मला खूप भावली,तुमच्या विडिओ चे बॅक ग्राउंड music अतिसुंदर

  • @yogitakudalkar67
    @yogitakudalkar67 3 роки тому

    भात कापणी पाहून खूप छान वाटल .. इंद्रधनुष्य मस्त आलेला....

  • @akashpatil8681
    @akashpatil8681 3 роки тому +4

    🥰😘 चला पत्या च्या घरी सोन येणार 🌾🌾🌾🌾🌾🌾

  • @kavitarane7805
    @kavitarane7805 3 роки тому

    खूप छान आणि चिनू छान पिल्लांचे भांडण खूप गोड आहे आणि इंद्रधनुष खूप मस्त चिनू ला कोणाची नजर नको लागायला 🐱🐈🐈

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 3 роки тому +6

    Great Aniket what a video superb. So much hard work in reaping and harvesting. Nice to see you all get together and help your friends.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 роки тому

      फार मैहनत घेताय तुम्ही,यश मिळणारच.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 роки тому

    पञ्याभाई खूप खूप शुभेच्छा भातकापणीला छान सुरुवात झाली क्रिकेट पाहताना जशी धागधूग लागते तसेच अनिकेत तू बोलताना झाले आता येईल जोरात पाऊस मग सगळे भिजणार नुकसान थोडे तरी होणार अशी भीती पण पाऊसाने दिशा बदलली व आनंद वाटला तुमच्या मेहनतीला व एकीच्या प्रेमाला व ताकदीला पाऊसही घाबरला कष्टाने केले तर ते चांगलेच होणार खूप पूर्वी तुमच्या आजोबांच्या वेळी शेतातली कामे लवकर होत असे कारण तेंव्हा एकञ कुटूंब पद्धती होत्या मनुष्य बळ खूप होते तेंव्हा पाऊसही खूपच होता अशीच एकी राहू द्या पे्म दिल्याने वाढते कमी होत नाही हे तुमच्याकडून शिकायला मिळाले सगळ्यांना छान व भरपूर फळ मिळो व भात कापणी छान होवो हीच परमेश्वर चरणी मनापासून प्रार्थना चिन्नू लय भारी गोड आहे पिल्ले मस्तच 👌👍🙏🙏🙏☺

  • @divyasapkale388
    @divyasapkale388 3 роки тому +4

    खुप छान वाटले भात कापणी बघुन.. पहिल्यांदा बघीतले.. keep it up bro👍

  • @asmaparvej5080
    @asmaparvej5080 3 роки тому +2

    Kharach khup mehnati aahat tumhi sagle vlog mast

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 3 роки тому +5

    Lay mehanti aahat.👌👍👍👍

  • @कोकणचानिल-च2ण

    खूप छान अनिकेत भातकापण आणि ते झोडणं खुप मेहनत लागते आणि त्यात पाऊस आला कि धावपळ होते पण आज पाऊसाने तुम्हाला चांगली साथ दिली आला नाय जेवढ कापलात ते झोडून घरी घेऊन गेलात पत्या भाई तुला पूर्ण तुझे मित्र मदत करतात तू पण त्यांना करतो मदत खुप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘😘

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 3 роки тому +3

    Excellent video and presentation 👏👌👍
    All the best to everyone..⚘⚘⚘⚘⚘⚘

  • @sheetalrane6004
    @sheetalrane6004 3 роки тому

    खरंच पावसाळी लावणी करणे खूप सोप आहे पण ते भात उन्हात राहून काम करणे खूप कठीण असते. या गोष्टी चा अनुभव आम्ही पण घेतला आहे खूप मेहनत घ्यावी लागते.शेतकऱ्यांना आणि ते तु प्रत्यक्ष पण सर्वान समोर मांडणे आणि प्रत्यक्ष तु आणि तुझ्या मित्रांसोबत करणे खूप भारी आहे मला अभिमान आहे तुझा कि मुंबई मध्ये राहणारा मुलामध्ये येवढी आपल्या कोकण भुमी ओढ आहे .खरंच खूप कौतुक करण्या सारखी गोष्ट आहे .असेच अनुभव आपल्या कोकणातले सर्वा समोर माडंत रहा. मला पण शेती करायला खूप आवडते .तुझ्या मुळे आमच्या शेतामध्ये काम करत होतो या जुन्या आठवणी ताज्या होतात खरंच बर वाटतं. धन्यवाद अनिकेत

  • @sanjanagurav4569
    @sanjanagurav4569 3 роки тому +3

    आजचा विडिओ खूप सुंदर❤️❤️ 🙏🙏कोकणात असल्याचे अनुभव घेत आहे..बाकी तुमच्या सर्वांच्या मेहनतीला मानावे लागेल 💐💐

  • @rajendrabhogte8286
    @rajendrabhogte8286 3 роки тому

    जय जवान जय किसान तुमच्या मुळे अनिकेत आम्ही इथे आनंदात आहोत जवान सीमेचे रक्षण करतात आणि तुम्ही शेतकरी राजा आमचे पोट भरता सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @prashanttoraskar8331
    @prashanttoraskar8331 3 роки тому +3

    Dada khup mast ahe video

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 роки тому

    खुप सुंदर व्हिडीओ👍👍👍👌👌👌👌तुमच्या मेहनतीला सलाम💐💐💐💐💐💐💐💐💐☺️☺️

  • @rutujamali7937
    @rutujamali7937 3 роки тому +6

    जगातल्या 3 गोष्टी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत💕
    अनिकेत चि आई😘
    गोष्ट कोकणातल्या अनिकेत चि स्माइल😊😇
    आणि आपल्या भाऊंची STYLE🥰👑

  • @abhishekparab133
    @abhishekparab133 3 роки тому

    आजच व्हिडिओ बघून भाताच्या एका शिताच महत्व समजलं ❤️❤️❤️

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому +3

    शेतकऱ्याच्या इच्छा शक्ती पुढे पावसाचे पण काही चालले नाही... 🙏🙏🙏🙏🙏 परमेश्वर नेहमी कष्टाळू लोकांचा पाठीराखा असतो 🙏🙏🙏🙏

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 3 роки тому

    या जगात शेतकरी आहे म्हणून माणूस जगतो आहे पण शेतकरी मरतो आहे कारण त्याच्या कडे कोणाचं लक्ष नाही मातीतून प्रेमळ नात्यातून एकत्र येऊन काम करतो तो शेतकरी सलाम आहे गोष्ट कोकणातली टीम ला कारण शेतकरी किती मेहनत करतो आणि त्या नंतर फळ मिळत त्यासाठी किती कष्ट लागतात है लोकांन पर्यंत पोहचवत आहात यांनी आहे अनेक शेतकरी पण घडतील आणि कुठे तरी जाऊन शेतकऱ्याला मोकळा श्वास घेऊन जगता येईल

  • @afreenshaikh4455
    @afreenshaikh4455 3 роки тому +5

    Nice video 😘😘

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 3 роки тому +2

    Wah kamal Baba Tumha sarvanchi patya Panya Phulpakhru Kakee n Aniket tumhi Bhariii aahat srv....👌👍mst vlog bhatkapnicha👌👌

  • @sangeetamhaddalkar5371
    @sangeetamhaddalkar5371 3 роки тому +3

    Great aahat tumhi sarwa 🙏, October heat madhye bhar unha madhye ubhe rahun kapni karna khupach kathin aste,tula ani tuzya friends na👍👍👍👍👍 ani tumchya dosti la salaam

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 3 роки тому +2

    एवढ्या उन्हात आपली माणसं काम करतात,, किती मेहनतीचं काम आहे दादा, मानलं पाहिजे तुम्हाला😊🙏👌
    #SamreshVlogs

  • @seemadhanavai4272
    @seemadhanavai4272 3 роки тому +5

    Very nice 👌🏻👌🏻❤️❤️😍😍👍🏻👍🏻

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 роки тому +1

      Thank u

    • @seemadhanavai4272
      @seemadhanavai4272 3 роки тому +2

      Very good and best of luck 👍🏻👍🏻❤️❤️❤️❣️❣️❣️👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @sonamkhare1599
    @sonamkhare1599 3 роки тому +2

    Khup chan video 👍👍👌👌

  • @मीमाणगावकर
    @मीमाणगावकर 3 роки тому +5

    Khup bhari Dada 😊

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 3 роки тому

    शेतकरी किती कष्ट करतो आज प्रत्यक्ष बघायला मिळालं
    खूप छान व्हिडिओ झाला...

  • @santoshkhale4634
    @santoshkhale4634 3 роки тому +4

    My Favourite Rainbow.....🌈🌈🌈🌈

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 3 роки тому

    खूप छान विडिओ अनिकेत पत्याची भात कापून झोडनी हि झाली अच्याणक पाऊस आला सगळ्यानी खूप मेहनत केली खूप छान

  • @vrishalirane4600
    @vrishalirane4600 3 роки тому +4

    U guys r great 👍💖 n rainbow beautiful 😍❤

  • @arpitikhankar1934
    @arpitikhankar1934 3 роки тому

    माझ्या परिचयातील सर्व MPSC & UPSC च्या विद्यार्थ्यांना आवर्जून तुझे व्हिडिओ बघण्यास सांगील.. जेणे करून त्यांचा कृषी आणि भूगोल (पाऊसाचा अंदाज) ह्या दोन्ही विषयांचा बराच सराव होईल. इतक्या सरळ , सोप्या आणि logical भाशे मध्ये समजावणं शिषक मंडळी ला पण नाही जमायचं.
    नागपूर वरून तुम्हा सर्वांना प्रेम.. All the best and keep growing 💗

  • @laxmangaonkar7481
    @laxmangaonkar7481 3 роки тому +3

    Chhan ,👌👌👍❤️

  • @vishalkoli8336
    @vishalkoli8336 3 роки тому

    छान माहिती दिली आहे आणि खूप छान झाला व्हिडियो मस्तच आहे कमाल बुवा तुमची

  • @klpnagaikwad5408
    @klpnagaikwad5408 3 роки тому +5

    छान विडिओ👌👌 👍👍

  • @sumanysawant7611
    @sumanysawant7611 3 роки тому

    जय जवान, जय किसान।🌾🌾🌾
    एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ .👍👌आणि अहाहा!इंद्रधनुचा नजारा अप्रतिम!
    भात झोडणीची वेळ,आलं आभाळ भरून
    उडे तारांबळ,ऊन-पावसाचा खेळ
    इंद्रधनुची कमान पाहता,मन गेले आनंदून.
    Thanks Aniket 👑

  • @shraddhakambli975
    @shraddhakambli975 3 роки тому +3

    Salute to you and your friends 👍✌️😍🥰

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 3 роки тому

    भात लावणी पण कठीण आणि कापणी पण कठीण तुम्हा सर्वांना हॅट्स ऑफ vidio 1 no

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 3 роки тому +3

    हिमरातून भात झोडूचा म्हणजे रक्ताचा पाणी होता ,खुप कठीण काम असा पण तुम्ही खूप मेहनती आहात 🙏🙏

  • @rupalibugde3234
    @rupalibugde3234 3 роки тому

    ईद्रधनुष्य मस्त दिसते आणि तुमची धावपळ खुप झाली विडीओ खुप छान होता👌👌

  • @nareshgiri9068
    @nareshgiri9068 3 роки тому +3

    Good Very Hardworking bro

  • @vaibhavdesai4494
    @vaibhavdesai4494 3 роки тому

    भात बघूनच पोट भरता वा मस्त अनिकेत

  • @chetanraut677
    @chetanraut677 3 роки тому +6

    श्रीगणेशा केलाच तर ❤️

  • @nikhildarade6672
    @nikhildarade6672 3 роки тому

    मित्रा तुला आणि तुझा सर्व मित्रांना यश लाभो ईश्वर चरणी हीच प्रार्थना

  • @nileshmahajan9422
    @nileshmahajan9422 3 роки тому +3

    Bhava you are always best and great we always love you 🙏💯

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 3 роки тому +2

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! Bhat kaapani, zodani , khupach mehnatichi kaame karata re babanno 😲😲 Shetakari Raja la kadak SALUTE !!! Kaalaji ghya sarvani sarvanchi . 👍🏻👍🏻 Chinu ani tichya leki 👌👌

  • @rushikeshdarekar6820
    @rushikeshdarekar6820 3 роки тому +3

    Khup chan dada❤️😍👌

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 роки тому

    दादा तुम्हाला खूप छान नदी लाभली आहे या रणरणत्या उन्हात तेवढाच एक आधार सर्व श्रम थोडे हायसै झाले पण दादा तुम्ही सर्वानी फुल कपडे घाला तेवढाच बरा वाटात साडी लावण्याची आयडिया छान 🙏💐🙏

  • @MiAdivasiVlogger
    @MiAdivasiVlogger 3 роки тому +3

    खूप महत्वाचे आहे 🙏🙏🙏🙏

  • @rajatpatade4085
    @rajatpatade4085 3 роки тому +2

    दादा खुप भारी वाटल की तुम्हीं एवढी मेहनत घेतली भात कापणीला आणी भात झोडणीला एकदम हटके 💖