श्री मळगंगा देवीची हळद दळणे कार्यक्रम क्षेत्र निघोज.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024
  • || श्री मळगंगा देवी प्रसन्न ||
    *कार्यक्रम :- श्री मळगंगा देवीला हळद लावणे.
    स्थळ :- श्री मळगंगा मंदीर निघोज
    व श्री मळगंगा मंदीर कुंड पर्यटन क्षेत्र.
    वार :- बुधवार
    दिनांक :- ५/४/२०२३
    वेळ :- सायंकाळी ४:०० ते ७:००
    निमंत्रक :- श्री मळगंगा देवी पुजारी निघोज
    गायखे (कोळी) परिवार.*
    श्री मळगंगा देवी निघोज येथील सालाबाद प्रमाणे यात्रा सुरू होत आहे. तरी या यात्रेची सुरुवात ही देवीला हळद लागन्यापासून होते. देवीला हळद ही हनुमान जयंतीच्या आधल्या दिवशी (चैत्र शुक्ल चतुर्दशी) ला ह्या वर्षी दिनांक ५/४/२०२३ रोजी लागणार आहे. पण त्या हळदीचा घाना म्हणजेच हळद दळणे हा कार्यक्रम श्री राम नवमी ला (चैत्र शुक्ल नवमी) ह्या वर्षी दिनांक ३०/३/२०२३ ला झाला.
    देवीला हळद लावण्यासाठी समस्त महीला वर्ग जमा होतो. हळद दळण्यापासून तर हळद लावण्यासाठी महिलांची गर्दी होते. ह्या कार्यक्रमात देवीला हळद लावण्यासाठी भाविक महिला ह्या निघोज गावातून तसेच बाहेर गावी असणाऱ्या महिला भक्त उपस्थित असतात. ह्या दिवशीच विशेष महत्त्व म्हणजे देवीला हळद लावण्यासाठी देवीच्या गर्भगृहात (गाभाऱ्यात) महिलांना प्रवेश मिळतो.
    देवीच्या हळदीचा सुंदर कार्यक्रम पाहण्यासाठी व देवीला हळद लावण्यासाठी नक्की उपस्थीत रहा.🙏
    ह्या व्हिडिओ मार्फत त्या कार्यक्रमाची माहिती सर्व भक्तांपर्यंत पोहोचावी असे उददिष्ट आहे.
    हा चॅनल कोणत्याही मनोरंजनासाठी नसून श्री मळगंगा देवीची महती सर्व भाविकांपर्यंत पोहोवण्यासाठी आहे.
    || ॐ श्री मळगंगा मातेय नम: ||

КОМЕНТАРІ • 4

  • @adityagund8619
    @adityagund8619 4 місяці тому

    संपूर्ण व्हिडीओ send करा

    • @gaykhe_4011
      @gaykhe_4011  4 місяці тому

      @@adityagund8619 हा देवीची हळद दळण्याच्या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ आहे. आणि देविला हळद लावली जाते तो व्हिडिओ दुसरा आहे.

    • @gaykhe_4011
      @gaykhe_4011  4 місяці тому

      ua-cam.com/video/DeRhrIReiWk/v-deo.htmlsi=6jNhms3p5To4WzHU

  • @patilbagomase9711
    @patilbagomase9711 Рік тому

    Chan hai