द्राक्षे पिकातील सर्वात धोकादायक कीड खोड अळीचा धोका वेळीच ओळखा द्राक्षे पिकातील खोड अळीचे नियंत्रण
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- द्राक्षे पिकातील पहिल्या काळात दुय्य्म असणारी ही कीड आता मुख्य किडी म्हणुन ओळखली जात आहे या किडीच्या संपुर्ण नियंत्रणासाठी जुन व जुलै हे महिने खुप महत्वाचे आहेत याची करणे समजुन घेताना प्रथम या किडीचा जीवनक्रम समजुन घ्यावा लागेल यामध्ये अंडी , अळी , कोषावस्था व भुंगेरे अशा चार अवस्था मधुन ही कीड जाते व या किडीच्या नियंत्रणासाठी भुंगेरे अवस्था महत्वाची आहे कारण प्रजननाच्या दृष्टीने याच अवस्थेत मादी अंडी घालण्यासाठी द्राक्षे बागेत जागा शोधत असते व जुन्या झाडाच्या सुटलेल्या सालीच्या आतल्या बाजुस ही मादी अंडी टाकते
म्हणुनच हीच अवस्था या किडीच्या नियंत्रणासाठी सर्वात सोपी आहे या काळात झाडाची जुनी झालेली साल काढुन टाकली व पाच दिवसाच्या अंतराने तीन वेळा रासायनिक कीटकनाशक सोबत 10000ppm निंबोळी तेलाचा अर्क व चांगल्या दर्जाचे स्टिकर वापरले तर या किडीचा प्रादुर्भाव कमी करता येईल त्याच बरोबर जेविक कीटकनाशकाची फवारणी खोड ओले चिंब होईपर्यंत घेतली तरीही याचा खुप फायदा होतो
याविषयीचे मार्गदर्शन या व्हिडीओ मध्ये करण्यात आले आहे
Nice sir 👍
चांगली माहिती दिली आहे
खूप महत्वाची माहिती
Nice
Very well explained and thanks 🙏🙏🙏🙏🙏
Thanks and welcome
एकरी किती लिटर पाणी फवारले पाहिजे खोडे ओलांडे धुवायला
साधारणपणे खोडे पाऊसाने भिजली नसल्यास प्रति झाड 1 लिटर व खोड पाऊसाने भिजुन त्याची साल मऊ असल्यास प्रति झाड 500 मिली असे द्रावण वापरावे