यश व सुखाची गुरुकिल्ली ‘कर्म-धर्म संयोग’ - 'Karma-Dharma connection' - Key to success & happiness
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- आधुनिक जगात प्रगत तंत्रज्ञान व सर्व सुख-सुविधा असूनही आरोग्य व मनःशांती या गोष्टी दिवसेंदिवस अवघड होत चालल्या आहेत. या उलट प्राचीन भारतीय ज्ञान हे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अतिशय फलदायी आहे, हे आता लोकांना पुनःश्च पटू लागले आहे. दिनांक ३० जुलै २०२३ रोजी पुण्यात बाणेर येथे झालेल्या किर्लोस्करवाडी संमेलनात निरामय वेलनेस सेंटरच्या संचालिका सौ. अमृता चांदोरकर यांचे 'कर्म-धर्म संयोग' या विषयावर व्याख्यान झाले. या प्रसंगी सौ. चांदोरकर म्हणाल्या की, आपल्या विचारांत प्रचंड शक्ती असून त्या स्पंदनांतून होणाऱ्या कृतीमधून आपले भविष्य घडत जाते. सातत्याने सकारात्मक विचार व सोबत निष्ठापूर्वक कर्म केल्याने आपले जीवन साकारते. याच कर्माला शाश्वत वैश्विक तत्त्वे, विवेक व नीतिमूल्यांची जोड दिली की होतो धर्म. कर्मात या गोष्टींचा अभाव असेल तर तो होतो अधर्म.
अशा कर्म-धर्म संयोगातून आपले अंगीभूत गुण उपयोगात आणून आपण स्वतः आणि आपले कुटुंब, समाज, देश, मानवजात व चराचर सृष्टी यांच्या प्रति आपली कर्तव्ये म्हणजेच धर्म निभावत वाटचाल करीत राहणे अभिप्रेत आहे. या कामी योगसाधनेची महत्त्वाची भूमिका असते. असे केल्याने आपला स्थूल व सूक्ष्म देह सुदृढ व सक्षम होऊन त्यातून निर्धारित कार्यात यश मिळून आयुष्य सर्वार्थाने सार्थकी लागेल यात शंका नाही. निरामयचे स्वयंपूर्ण उपचार हे याच प्राचीन शास्त्रांचा कालसुसंगत आविष्कार असून सव्वा लाखाहून अधिक रुग्णांना आजपर्यंत त्याचा लाभ झालेला आहे. वैश्विक ऊर्जेच्या माध्यमातून विना औषध, विना स्पर्श पद्धतीने लहान-मोठ्या सर्व रोगांवर यशस्वी उपचार होऊ शकतात हे एक तपाहून जास्त काळ निरामयने सिद्ध केलंय.
-----
'Karma-Dharma connection' - Key to success & happiness
Health and mental peace are increasingly becoming rare in the modern world despite the presence of advanced technology and all material comforts. In contrast ancient Indian knowledge proves extremely useful in attaining physical and psychological wellbeing, which people are realizing once again. Mrs. Amruta Chandorkar, Director, Niraamay Wellness Center spoke on the Karma-Dharma connection at the Kirloskarwadi Sammelan event on 30th July 2023 in Baner in Pune. On this occasion Mrs. Chandorkar said that our thoughts have tremendous power and the work resulting from those vibrations shapes our future. Constant positive thoughts, along with conviction in action, shape our life. Dharma implies ethically doing this work with discretion in line with the eternal cosmic principles. Lack of this implies Adharma.
We are expected to keep working by discharging our duties towards the self, family, society, nation, humanity and entire creation by utilizing our innate qualities, thus establishing the Karma-Dharma connection. Yogic practices play a vital role in achieving this. This ensures without doubt that our physical and subtle body becomes healthy and capable thereby bringing success in the scheduled work and holistic fulfillment in life. The Swayampurna Upchar method of Niraamay is a contemporary application of these ancient holistic sciences that has benefitted over 1.25 lakh patients till now. Niraamay has proved for over 12 years that all kinds of ailments, big and small, can be successfully treated via cosmic energy without medicine, without touch.
#karma #dharma #success
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / channel
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.