श्री स्वामी समर्थ तारक मंत्र | तारक मंत्र जप | Shri swami samarth mantra
Вставка
- Опубліковано 11 лют 2025
- श्री स्वामी समर्थ तारक मंत्र | तारक मंत्र जप | Shri swami samarth mantra
॥ श्री स्वामी समर्थ ॥
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
गुरुः देवो महेश्वरा
गुरु शाक्षात परब्रम्हा
तस्मै श्री गुरुवे नमः
निशंक होई रे मना निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे
मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
आज्ञेविना काळ ही नाणी त्याला
परलोकीही ना भिती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
उगाचि भितोसी भय हे पळु दे
वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
खरा होई जागा श्रद्धेसहीत कसा
होसी त्याविण तू स्वामी भक्त
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
नको डगमगू स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई
आठवी रे प्रचिती न सोडिती तया
जया स्वामी घेती हाती
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
निशंक होई रे मना निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे मना
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
#viral #swamisamarth #dattaguru #god #marathi#tarakmantra #tarakmantrra #shreeswamisamarth #shreeswami #shreeswamianubhav #shreeswamisamarthakkalkotmaharaj #shreeswamisamarthvideo