Mahalaxmi dipawali Pujan 2023 श्री महालक्ष्मी दिपावली पुजन २०२३
Вставка
- Опубліковано 10 гру 2024
- श्री महालक्ष्मी दिपावली पुजन दिनांक: १२-११-२०२३ वेळ:- सायंकाळी ०५:५९ ते ०८:३३
दिपावली श्री महालक्ष्मी पुजनाचे संपूर्ण साहित्य
श्री महालक्ष्मी कलश प्रतिमा किंवा घरातील तांब्याचा कलश, श्री महालक्ष्मी मुखवटा, सरस्वती मूर्ती, गणपती मूर्ती, महालक्ष्मीनारायण मूर्ती, कुबेर मूर्ती, कुबेर कुंजी, कुळदेवताचे टाक, कुळदेवीचे टाक, वास्तु पुरुष स्थान देवाची प्रतिमा, दोन अखंड सुपारी, लेखणी, वही, पिवळे वस्त्र आसन,धने, आयुर्वेद (हळकुंड,जष्ठी मध,लवंग,वेलची,मरुडशिंग), जानवे जोड ३, कापसाचे वस्त्र ५, कवडी १, कमळ बी १, गंध, हळद, कुंकू, तांदूळ, पिवळी फुले, दुर्वा, बेल, तुळस, एक पिवळ्या फुलांची वेणी, सुवासिक गजरे, शृंगार सेट (आरसा, काजल, लाली, लाल शेंदुर, बिंदी, मेहंदी, फणी, हिरव्या बांगड्या, इ. ), घरातील सुखा मेवा (काजू, बदाम, पिस्ता, काळे मनुका, साधा मनुका, आक्रोड, शेंगदाणे, अंजीर), श्रीफळ दोन, विड्याची पाने ०२, आंब्याच्या झाडाची पाने ८, एक सोन्याचं नाणं किंवा एक चांदीच नाणं, घरातील अष्ट धान्य ( वेगवेगळे अष्टधान्य तुर डाळ, मूग डाळ,चणे,गहू,तांदूळ, पावटा,राजमा,मटकी, इ.), ओटीच साहित्य, गूळ खोबरे १ वाटी, ५ फळ ( ऋतू फळ कोणतेही ) दिवा, कापसाची फुलवात, केळीच पान, सहा केळी, पळी भांड, ताम्हण, समई, घंटी, चौरंग, चलनातील प्रत्येकी एक नोट पुजना साठी, अत्तर, धुप, कापूर, पूजेसाठी एक नविन केरसुणी, पिवळी मिठाई, रांगोळी, बत्ताशे, लाह्या, तुमची जन्मपत्रिका.
टिप: श्री महाराज आध्यात्मिक मार्गदर्शन केंद्र, पुणे. देण्यात आलेलं साहित्य देवतांची मुर्ती नसेल तर अखंड सुपारी घ्यावी. इतर साहित्य घरातील वापरणे.
पूजेची मांडणी
रुंद असा एक चौरंग घेऊन त्याच्यावर नवीन कापड घालावा, पाटावर वरच्या बाजुस मध्य भागी तांब्याचा कलश ठेवणे. कलशात स्वच्छ जल, एक अखंड सुपारी, एक सोन्याचं नाणं किंवा एक चांदीच नाणं, दुर्वा, बेल, तुळस, आंब्याच्या झाडाची पाने ८ लावा, श्रीफळ ठेवा. श्रीफळा स महालक्ष्मी मुखवटा लावा, पाटावर उजव्या हातावरती श्री सरस्वती मूर्ती तांदूळ पसरवून त्यावर ठेवणे. पाटावर वर डाव्या हाताला तांदूळ पसरवून श्री महालक्ष्मीनारायण मूर्ती यांची प्रतिमा ठेवा. पाटावर वरच्या बाजुस मध्य भागी श्री कुबेराची मूर्ती ठेवा. पाटावर वर थोडे तांदूळ पसरवून चलनातील प्रत्येकी एक नोट व नाणे ठेवावे. श्री महालक्ष्मीच्या पुढे क्रमाने एक मुठ तांदुळ याप्रमाणे पाच मुठ तांदुळ मांडणे. प्रथम अक्षता वर श्री गणेशाची मूर्ती, दुसरे कुळदेवताचे टाक, तिसरे कुळदेवीचे टाक, चौथे वास्तु पुरुष स्थान देवाची प्रतिमा, पाचवी दोन विड्याची पाने, एक सुपारी, एक नारळ, ओटीचे साहित्य, खण पुजनासाठी ठेवावा. देवीची ओटी ह्याच विड्या सोबत ठेवा. (कलश प्रतिमा) पुढे घरातील अष्टधान्य व सुखा मेवा मांडा. आयुर्वेद (हळकुंड,जष्ठी मध,लवंग,वेलची,मरुडशिंग) ठेवावा. डाव्या हाताला घंटी ठेवणे. पाटाच्या दोन्ही बाजूस दोन समई ठेवणे. देवी पुढे मध्यभागी वाटी मध्ये एक वाटी मध्ये बत्ताशे व एक वाटी मध्ये लाह्या ठेवणे. त्यापुढे पिवळी मिठाई ठेवणे. तांदूळ पसरवून नवग्रहाचे यंत्र किंवा तुमची चांदीची जन्मपत्रिका ठेवणे. वहीच्या मुख्य पानावर स्वस्तिक काढणे व त्यावर लेखणी ठेवा.
श्री महाराज अध्यात्मिक मार्गदर्शन केंद्र,पुणे.
www.bhaijimaharaj.com
+91 8888804493