Nana Fadanwis wada Menavali || Dholya ganpati Wai || २५० वर्षाहून अधिक जुना वाडा.
Вставка
- Опубліковано 12 лис 2024
- Dholya Ganpati Wai:
सातारा जिल्ह्यातील श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणरे ‘ढोल्या गणपती’चे मंदिर हे सर्व आबालवृद्ध गणेशभक्तांचे आवडते स्थान आहे.
गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला ‘ढोल्या गणपती’ असे परिचित नाव आहे. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रातच बांधले आहे.
Nana Fadanwis Wada Wai(Menavali):
बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस किंवा नाना फडणीस (जन्म : सातारा-महाराष्ट्र, १२ फेब्रुवारी १७४२; - पुणे, १३ मार्च १८००) हे पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते.
नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म साताऱ्याला झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण मिळाले. वयाच्या २०व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.
आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.
नाना फडणवीस वाडा हा ३४,६०२ स्क्वेअर फूट परिसरात पसरला आहे. वाड्याच्या उत्तरेस, पश्चिमेस, आणि दक्षिणेस दरवाजे आहेत.
उत्तरेकडचाच दरवाजा हा मुख प्रवेशमार्ग असून दक्षिणेचा दरवाजा आपल्याला थेट नदीच्या घाटावर घेऊन जातो. या वाड्याला संरक्षक तटबंदी असून तीन बुरुजही आहेत.
थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात १३ मार्च १८०० रोजी त्यांचा अंत झाला. वाई येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे.
.
.
.
Follow me on Instagram:- _Musafir_hu
Gadget i Used
Action Camera:-GoPro hero 7 black.
Drone :- DJI mavic mini.
Phone:- Redmi note 7 pro max.
#wai
#satara
#NanaFadanvisWada
#wadada
#Menvali
#MenvaliGhat
😍❤️
😇😇