Dis Jatil Dis Yetil with lyrics | Asha Bhosle & Suresh Wadkar | Sudhir Phadke | Shapit | मराठी गाणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Рік тому +57

    “Haanji” is the perfect song to get you in the party mood.ua-cam.com/video/MTFaBGGmpaQ/v-deo.html

    • @MoreDushyant
      @MoreDushyant 11 місяців тому +16

      Tumch vay kiti❤❤❤

    • @tejaswinikanthale4894
      @tejaswinikanthale4894 5 місяців тому +5

      Q

    • @ashishgirhe1751
      @ashishgirhe1751 4 місяці тому

      😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@MoreDushyant

    • @balupahcpor
      @balupahcpor 3 місяці тому +1

      सुपर 👍👍👍👍👍👍👍👍 वावा खूप छान आहे 👌👏👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏

    • @pritilandge1207
      @pritilandge1207 2 місяці тому

      Pozishan a🖤👯🧡😄☺️😊🧡😄😊😅 0:00 ​@@balupahcpor

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 3 роки тому +123

    कितीही मोठे व्हा पण मागील दिवस विसरू नका कारण निसर्ग प्रत्येकाला एक संधी देतो तरीही माणसाने जमिनीवरच रहावे तोच खरा माणूस

  • @sachinshinde8429
    @sachinshinde8429 Рік тому +26

    खरंच यार खचलेल्या मनाला पुन्हा उभारी देत आहे हे गाणं,, परत परत ऐकावसं वाटत आहे हे गाणं,, असं वाटतं की आनंद शोधता-शोधता सगळच हरवून बसलोय आपण 😔

  • @panchuyelpale8979
    @panchuyelpale8979 2 роки тому +204

    दोघांनी मिळून कष्टाने संसार करायचा आहे.संकटांचा सामना करायचा आहे.आणि याच आशेवर जगायचे आहे की हेही दिवस जातील.सुख येईल लेकरं मोठी होऊन आपले नाव मोठं करतील.अजून काय.

    • @pradnyasirsat651
      @pradnyasirsat651 Рік тому

      Khup chaan

    • @machhindrasable5075
      @machhindrasable5075 6 місяців тому +1

      खरे आहे आई वडील मुलासाठी भरपूर कष्ट करतात मुलं मोठे होण्यासाठी

  • @sandipgovindgaikwad1918
    @sandipgovindgaikwad1918 3 роки тому +512

    खूप छान गाणं आहे मन भरून येत हे गाणं ऐकलं की डोळ्यात पाणी येत 😭😭 सुख दुःख या मध्ये फक्त जोडीदार चागला पाहिजे मग कशाचीच गरज पडत नाही

  • @karangaidhankar839
    @karangaidhankar839 3 роки тому +610

    जे मराठी गाण्यातून सुख मिळतं ते दुसरं कोणत्या भाषेत नाही...... 😊😊😊😊

  • @ramchandra9816
    @ramchandra9816 4 роки тому +432

    या गाण्यानी तर प्रत्येक नविन जोडप्यास कष्टाने संसार करण्याची प्रेरणा मीळते...अनेक वर्षं संसाराचा गराडा ओढता ओढता या गाण्याने जीवनाची खरी गोडी अन पेरणा मिळते सुखः दूखः त अशा भावपूर्ण शब्दांची गरज पडते आणि मग गाणं मन प्रसन्न करते
    सर्व कष्टाकरी जोडप्यांच्या आयुष्यात सूख समृध्दी नांदो हिच ईश्वराकडे प्रार्थना 😊🙏

  • @nivruttibhalerao4521
    @nivruttibhalerao4521 3 роки тому +1513

    मी ८५ सालापासुन रेडीओ ऐकत आलो , आज ही गाणी एैकली की पुर्वीचे दिवस आठवतात , मन हरवुन जाते . सुखाच्या शोधापाई खुप काही हरवुन गेले अस वाटते .

  • @ravishelke1843
    @ravishelke1843 3 роки тому +47

    दुःख भोगलेल्या प्रत्येक मानवी जीवास सुखाचे क्षण घेतांना आनंदाश्रू नक्कीच येणार.

  • @santoshwakchaure95
    @santoshwakchaure95 3 роки тому +316

    माझ्या आवडीच्या गाण्यांपैकी एक. गरीब परिस्थितीचे वर्णन करणारे व जगायला प्रेरणा देणारे तत्वज्ञानिक गाणे...Thanks to composer

  • @amarchaus975
    @amarchaus975 2 роки тому +31

    दिस भोग सारूनच आपल्या माय माऊलीने आपल्याला लहानाचे मोठे केले धन्य ती माऊली जिने आपल्या तळ हाता प्रणाने आपले पालन पोषण केले 🙏🙏😭

  • @drsandeeppawar4049
    @drsandeeppawar4049 3 роки тому +368

    त्या काळातली भावपूर्ण, अर्थपूर्ण, हृदयाला भिडणारी गाणी, संगीत होते... कित्येक वर्षे ती ऐकली तरी मनाला समाधान वाटते.. 💐

    • @arundhtihulgeri5164
      @arundhtihulgeri5164 2 роки тому

      AcchiBbyen

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 Рік тому +1

      खरं आहे भाऊ तुमचं म्हणणं मी सुध्दा जूने गाणे ऐकत असताना खूप भाविक होतो

  • @deeptisawant3890
    @deeptisawant3890 2 роки тому +70

    जुन्या गाण्याच्या सगळ्यांच्या जुन्या आठवणी आहेत ❤❤प्रत्येकाच स्वतःच्या अश्या आठवणी आहेत ❤❤खूप प्रसन्न वाटत ऐकून ❤

    • @tusharbhosale8331
      @tusharbhosale8331 2 роки тому

      तुमची एखादी आठवण सांगा

    • @123सोङ्स्
      @123सोङ्स् 2 роки тому

      दिस जातील दिस येतील भोग सरल सुख जाईन म्हणजे दिवस चांगले वेळ किती वाईट वेळ येते त्यातच माणूस शेतकरी वाईट दिवस आपली सुखी राहतं कष्ट करून शेतकरी लोकांचा स्वाभिमान वेगळा असतो म्हणून हे छान गाणं आहे खरं दे शेतात काम करतात ती हे गाणे ऐकवा त्यांच्या डोळ्यात पाणी येईल माझ्या घरातले शेतात काम असेच करतात आमच्याकडे खूप शेतीवर आहे कष्ट करणारे लोक आहेत खूपच छान

    • @sachinbhore6198
      @sachinbhore6198 Рік тому

      Yes

    • @sunilpimpale1508
      @sunilpimpale1508 Рік тому

      खरं आहे

  • @erad4295
    @erad4295 2 роки тому +155

    "दिस जातील, दिस येतील
    भोग संरल, सुख येईल"
    What a composition man ♥️♥️

  • @ganeshbhosale1909
    @ganeshbhosale1909 Рік тому +12

    खूप शांत होते मन हे गाणं ऐकले की.. सलाम त्या गायक आणि गायिका साठी 💕💕💕💕💕💕💕💕

  • @rajeshjogdand8813
    @rajeshjogdand8813 3 роки тому +205

    मी निराश झालो की हे गाणे ऐकतो.मला खुप प्रेरणा मिळते.तसेच जुने दिवस आठवतात.

  • @akash_gavale
    @akash_gavale 3 роки тому +121

    गायक/गायिका:-सुरेश वाडकर,आशा भोसले
    गीतकार:-सुधीर मोघे
    संगीतकार:-सुधीर फडके ही सगळी दिग्गज माणसं होती आता अशी माणसे पण नाय होणार आणि असं संगीत पण नाय मिळणार सॅल्यूट आहे या सगळ्यांना

    • @harishdakhare5612
      @harishdakhare5612 3 роки тому +2

      त्री "सु"त्रि गाणं आहे..

    • @hindustaniking5007
      @hindustaniking5007 3 роки тому +1

      👍🏻

    • @AjitSawant-nl3mf
      @AjitSawant-nl3mf 11 місяців тому

      अप्रतिम अर्थपूर्ण,जीवन आशेवरच जगायच असत, शेवटी ईश्वराची कृपा.

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 5 місяців тому

      संगीतकार श्रीधर फडके आहेत

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 5 місяців тому

      संगीतकार श्रीधर फडके

  • @deepnandedkar1390
    @deepnandedkar1390 3 роки тому +40

    मराठी गाण्यामध्ये जो गोडवा आहे तो कोणत्याच गाण्यात नाही. मनाला प्रसन्न करणारी आमची मराठी❤️❤️❤️
    सुरेशदा❤️

  • @prakashpandurangbudrukpati11
    @prakashpandurangbudrukpati11 Рік тому +1

    मला ह्या गाण्यामुळे खूप मोठी प्रेरणा मिळाली जीवनातल्या खूप काही चढ उतारा त बरंच काही प्रमाणात धक्के सोसले पण नियती ने ह्या गण्याप्रमाणे सर्व काही भोग अखेर संपले आणि खूप मोठी चिरंतर प्रेरणा मिळाली!

  • @gitemaharaj2969
    @gitemaharaj2969 3 роки тому +256

    मनचा वेदना फार तीव्र होतात
    रोज या गाण्याला ऐकुन संसाराचा
    संगर्स करतो आहे एक दिवस माजा
    जीवनात पण आनंद येईल

  • @aakashsasane3983
    @aakashsasane3983 3 роки тому +29

    असल तो कुणा वाणी कसा ग दिसलं,तुझ्या माझ्या जीवाचा त्यो आरसा असंल....
    व्वा....खूप छान.

  • @sudarshankulkarni6007
    @sudarshankulkarni6007 3 роки тому +76

    हे गाणं जीवन जगण्यासाठी एक आशेचा किरण दाखवते, प्रेरणा देते....जो असल्याशिवाय माणूस जगु शकत नाही, म्हणून असं म्हणता येईल की या गाण्याने करोडो प्राण वाचवले आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली आहे

  • @amitdesai4797
    @amitdesai4797 3 роки тому +213

    पराभवाच्या कहाण्या लिहून ठेवत जा कारण यशस्वी झाल्यावर त्याच वाचून दाखवायच्या आहेत💐

  • @shrikantastekar9351
    @shrikantastekar9351 2 роки тому +5

    खूप भावनिक गाणं आहे. सुखाच्या शोधपाई सगळं हरवून बसलोय आपण असं वाटतंय कधी कधी. खूप आठवण येते लहानपणाची.

  • @dayanandmuntode7428
    @dayanandmuntode7428 3 роки тому +9

    आई -बाबाआपल्या जन्माला येणाऱ्या अंकुराबाबत किती भावूक झाले आहेत?आशाताई आणि वाडकर सरांनी ग्रामीण बाज असणाऱ्या या गीताला ंशतप्रतिशत न्याय दिला आहे ." हॅट्स ऑफ"दोघांनाही.कवी अनिल आपल्या एका कवितेत म्हणतात."उद्या तुझ्यामुळे आज आजचे न पहातो; तुझ्यकडे सदा लावून दृष्टी रहातो".येणारा भविष्य काळ. हा सुखमय असेल या भाबड्या आशेवर मानव जगत असतो;पण
    ह्या उद्याला अंत नसतो; हेच खरं आहे.

  • @nileshtambe6466
    @nileshtambe6466 2 роки тому +25

    जुन्या गाण्यांत जो अर्थ आहे तो आताच्या काळातील गाण्यामध्ये नाही,सुंदर गाण 👍❤️

  • @babytaishevalikar8099
    @babytaishevalikar8099 Рік тому +8

    गरिबीत जीवन जगत असतांना दुर्दम्य आशावाद .मन हेलावणारी.वाह काय आवाज. ❤

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 5 років тому +760

    मी बाबा होण्याच्या आधी हे खुप ऐकलं होतं आणि आता पण ऐकलं की डोळ्यासमोर माझी गरीबी उभी राहते, आता गेले ते दिवस आणि राहील्या त्या आठवणी

  • @yogeshkolpe6695
    @yogeshkolpe6695 Рік тому +3

    एक एक शब्द ऐकला की, असं वाटते की या पलीकडे काहीच नाही... अप्रतिम गाणी आहेत मराठी जुनी

  • @pratapjadhav7077
    @pratapjadhav7077 Рік тому +7

    खुप प्रेम दडलंय या गाण्यांच्या शब्दामध्ये.... ❤️

  • @anveshbhadugale4995
    @anveshbhadugale4995 3 роки тому +133

    हे गाणे ऐकले की मनाला खूप बरं वाटतं कितीही दुःख असलं तरी सुखाच्या आशेचा एक किरण दिसतो

  • @manishawaydande9995
    @manishawaydande9995 4 роки тому +135

    आज हे गाणं ऐकल्यावर रंडू आलं याच गाण्यांने मी माझा संसार सुरू केला होता मिस यू बाळा

  • @प्रा.दिपकगिरीगोसावी

    रात्री झोपताना आपसूक हे गाणं लागावं आणि मागील दिवसांच्या आठवणीत रात्रं जावी तरीही ताजेपण चेहऱ्यावर दिसावं यापेक्षा गाण्यामधला भाव काय असावा. जुनं ते सोनं ❤

  • @amolkubde9647
    @amolkubde9647 2 роки тому +28

    खूप सुंदर गाण आहे.जगण्याची नवीन ऊर्जा देते आणी परिस्तिथीशी लडण्याची हिम्मत देते.

  • @ketannikam6984
    @ketannikam6984 Рік тому +4

    अस्सल बावन्नकशी सोनं म्हणजे आपली मराठी गाणी ♥️😇🌍

  • @vedikavya9596
    @vedikavya9596 3 роки тому +59

    👌_*🙏🏻देवा या सर्वांच भलं कर 🙌🏻,देवा या सर्वांच कल्याण कर🙌🏻,देवा या सर्वांचा संसार सुखाचा कर🙌🏻🙏🏻*_

  • @gajananmaharajsolunkepatil1941
    @gajananmaharajsolunkepatil1941 4 роки тому +216

    ऐक मेकाची मन जाणून घेतली तर संसार खरच सुखाचा होईल

  • @Ap-oz3xh
    @Ap-oz3xh Рік тому +9

    ह्या गाण्यातून माझ्या आईवडिलांच्या भावना सहज समजतात ❤️

  • @hanumantghule8726
    @hanumantghule8726 3 роки тому +18

    कितीही संकटाचा असला तरी काळ च आहे ...!! कधीच थांबनार नाही .....

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 2 роки тому +3

    मा.सारेगम, आपणे दिस जातील दिस येतील,हे फार पुराणे सदाबहार अर्थ पूर्ण गीत श्रीमान आशा भोसले, सुरेश वाडकर यांनी मधुर आवाजात मनापासून गायली आहेत अभिनंदन धन्यवाद शुभेच्छा आभारी आहोत कापडणे जिल्हा धुळे

  • @yogeshsakare1067
    @yogeshsakare1067 2 роки тому +2

    काय जबरदस्त अर्थ आहे ह्या गाण्याला आजच्या दैनंदिन जीवनाला दिशा देणार गीत हे...

  • @audutnarule1128
    @audutnarule1128 4 роки тому +13

    आज काल खूप नवीन नवीन गाणी येतील ती शन भराचा आनंद देऊन हि जातील पण जुनी गाणी ही आपल्या ला मराठी चित्रपट सृषटीने आयुषयभरासाठी दिलेली पुंजी आहे....

  • @sandeepkamble923
    @sandeepkamble923 Місяць тому +1

    संसाराला प्रेरणा देणारे गीत आहे

  • @hrishikeshkhotlande735
    @hrishikeshkhotlande735 Рік тому +3

    तुम्ही मराठी तुम्हाला अशी सुंदर आणि जुनी व अर्थपूर्ण गाणी आवडणारी तसेच आम्ही सिमा‌ भागातील लोकांना दोन्ही भाषा आवडतात भावपूर्ण , संगीतमय , अर्थपूर्ण 👍🙏🙏🎉

  • @vishnupanthkayande3758
    @vishnupanthkayande3758 2 роки тому +2

    खूपच सूंदर हर्टली, दिस गेले आणि आले खूपच चांगले दिवस आले पण आठवण मात्र कायम आहे

  • @milindshishupal4321
    @milindshishupal4321 2 роки тому +14

    मराठी गाणी अप्रतिमच...कधीही ऐका....वेगळाच अनुभव 👍🏻

  • @Giteshgamer007
    @Giteshgamer007 Місяць тому +1

    जुन ते सोनं सुखाच्या हव्यासापोटी जुने सर्व गमावून बसलो

  • @mohankamble8859
    @mohankamble8859 3 роки тому +4

    ह्या सिनेमातील हे गाणे ऐकल्यामुळे मला माझ्या गत गरीब जीवनाची आठवण येते, आजहीडोळे भरून येतात गरिबी फार वाईट असते,संसार जीवनरूपी गाडा हाकताना ठेच लागत असते,👌👍

  • @sarthakgaikwad8383
    @sarthakgaikwad8383 2 роки тому +1

    मराठी चित्रपट शापित
    ......... गीत दिस येतील दिस जातील
    समीक्षाकार ...........संतोष केशव गायकवाड
    मराठीमधील या गाण्याचे स्वर अप्रतिम आहे ग्रामीण भाषेचा अप्रतिम शब्दसाज ग्रामीण जीवनाची संस्कृती उभारण्याचे काम करीत आहे खरंच माणसाच्या जीवनाला सुखाचे आणि दुःखाचे आवाहन आहे माणूस गरीब असो वा श्रीमंत असो त्याला जोडीदार जर भक्कम जिद्दीचा मिळाला तर माणूस कुठल्याही दुःखा वरती विजय प्राप्त करू शकतो माणसाने गरीब जरूर असावे कारण गरिबाला दुःखावर मात करायला सदैव जिद्दच उपयोगी पडते माणसा च्या जीवनामध्ये आशेचे किरण जागृत करणारे यशस्वी गीत मी ऐकले आणि जीवनाचा पूर्ण सारांश या गीतांमधून प्रकट झाला माणसाचे ध्येय आकांक्षा जिवंत ठेवण्याचे काम फक्त मराठी भाषाच करू शकते असा आशावाद नव्हे तर इतर कुठल्याही भाषा क्या गीता इतक्या श्रीमंत नाहीत म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी मराठी आहे म्हणून.

  • @kishorsatpute7087
    @kishorsatpute7087 4 роки тому +110

    वाघ मागे सरला म्हणजे ह२ला असे नसून तो मागे उडी मोठी घ्यायला सरलेला असतो

  • @tukarampatil6769
    @tukarampatil6769 2 роки тому

    फारच सुंदर इमोशनल गाणी आहेत. ही ऐकुन आहे असे मला वाटते की आपण आपल्या गणगोतात जावे व शेतकरी म्हणून पुढील उर्वरित आयुष्य काढावे. पण आता फारच उशीर झाला आहे. सत्तरी पार केली आहे. दुसऱ्या ची चाकरी करुन आयुष्य पार केले.

  • @SaishaSavitri3183
    @SaishaSavitri3183 3 роки тому +29

    मला खूप आवडते हे गाणं गहिवरून येते दुःखी मनाला पुन्हा उभारी मिळते मलाही वाटते भोग सरल सुख येईल पण कधी

  • @srushtikoli6842
    @srushtikoli6842 Рік тому +1

    काय सांगाव या गाण्यांबद्दल अस वाटत की अश्या एका शांत जाग्यावर जाऊन हे गाणे अयकत रहावं असेच आंनदमय गाने निसर्गराजा भाग-1 यामध्ये आहेत ऐका खूप प्रसन्न वाटत🎶

  • @gauravkharat4845
    @gauravkharat4845 4 роки тому +68

    गेलेला दिवस परत येत नाही परंतु येणारा दिवस नक्कीच छान येईल

  • @ratnakhare1419
    @ratnakhare1419 3 роки тому +93

    हे गाणं माझं स्वप्न होत. तीस वर्षांपूर्वी. पण आता. ते सगळ संपल आहे माझा मुलगा हेच माझं जीवन राहिलाय

  • @keshavmagar1326
    @keshavmagar1326 2 роки тому +10

    मनाला आशेचे कीरन दाखविणारे हि गाणी आहेत.

  • @dhanu7565
    @dhanu7565 Рік тому +1

    हे गाणं माझ्या येणाऱ्या बाळाच्या चिंतेत मी ऐकते, खूप छान वाटत

  • @vedikavya9596
    @vedikavya9596 3 роки тому +4

    देवा,
    जे जे चांगलं,
    जे जे उत्तम,
    जे जे उत्कृष्ट,
    जे जे हितकारक,
    जे जे सुखकारक,
    जे जे ऐश्वर्यसंपन्न,
    ते सर्व सर्व सर्वांना मिळत आहे

  • @मोक्षसाधनभजनीमंडळयेसगावनं.3मा

    शब्द रचना आणी त्याला गुंफलेले स्वर म्हणजे अत्यंत मन प्रसन्न होऊन जाते ,जुनं ते सोनं ...

  • @dnyaneshwardheple1810
    @dnyaneshwardheple1810 4 роки тому +4

    खूपच सुंदर गाणे आणि या वाईट वेळेत खूप धीर सुटला होता पण हे गीत ऐकून खूप प्रेरणा मिळाली

  • @swapnilchinchawade9598
    @swapnilchinchawade9598 Рік тому

    काय कल्पकता आहे या जुन्या गाण्यांमध्ये नविन पिढीने शिकण्यासारखे बरेच आहे खरचं जुनं ते सोनं होतं आणि आजही आहे उद्या ही राहील

  • @ramnathchaulkar628
    @ramnathchaulkar628 4 роки тому +9

    गीताचे अर्थपूर्ण शब्द, दांपत्यातील आत्मविश्वास दर्शवतो। आवाज, संगीत अनुपम।

  • @vinayakkendre3910
    @vinayakkendre3910 10 місяців тому

    खूपच सुंदर गान आहे. जगण्याची नवीन ऊर्जा देते मन भरून येत हे गान ऐकलं की डोळ्यात पाणी येतं ❤❤ पुन्हा पुन्हा आयकवस वाटत हे गाणं

  • @saiprasadpatil1231
    @saiprasadpatil1231 2 роки тому +4

    Heart touching lyrics...its really touches the emotions . True ...hats off

  • @amitkatkar.9222
    @amitkatkar.9222 Рік тому

    अप्रतिम चित्रपट आणि सर्व गाणी ....काही तरी घेण्यासारखे चित्रपट होते त्या काळात

  • @munde853
    @munde853 2 роки тому +6

    असे गाणे ऐकून मन प्रसन्न होते आणि डोकं शांत होतं🙏🏻

  • @ratanyadkikar7093
    @ratanyadkikar7093 2 місяці тому

    हे गाणं ऐकले की लहानपण आठवत. किती गोड ❤❤आणि अर्थपूर्ण गाण आहे

  • @Mrsantoshjamadar
    @Mrsantoshjamadar 4 роки тому +26

    हे गाणं ऐकलं ना मना मध्ये एक वेगळीच भावना तयार येते.....💝

  • @amollate7206
    @amollate7206 2 місяці тому

    हे गाणं ऐकायला सुरवात केल्यापासून माझ्या जीवनात खूप आनंद आला आहे❤❤

  • @JakirAli-hs2ns
    @JakirAli-hs2ns 4 роки тому +121

    दुःखाचे दिवस राहत नाही.💐

  • @shakilnaikwadi5960
    @shakilnaikwadi5960 3 роки тому +161

    काळ आणि वेळ नेहमीच बदलत राहतील,हा कोरोना महामारीचा काळ लवकरच सरेल !👍

  • @ashippatel8005
    @ashippatel8005 5 років тому +248

    दिवस वाइट आहे म्हणून रड़त नाही बसायाच
    प्रतेक वाइट वेलेला समोरे जाउन्न त्याच्याशी झुंजाव लागेल

  • @sarikaraut8465
    @sarikaraut8465 День тому +1

    Wavvvvvvvv ❤❤❤❤

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 2 роки тому +11

    आशताई सुरेश वाडकर यांनी गायलेल सुधीर मोघे ने लिहिले आणि बाबुजी सुधीर फडके यांच्या सुरवळीतून जन्मला आलेल कालाजयी गाणं जो पर्यंत मराठी भाषा आणि संस्कृती राहिलं हे गाणं पणं असंच ताजंतवन राहिलं

  • @vyankeshdhavalshankh6016
    @vyankeshdhavalshankh6016 2 місяці тому

    वा ... खूपच छान आहे हे गाणं
    मन एकदम प्रसन्न होते

  • @menane6368
    @menane6368 2 роки тому +3

    जुन्या गाण्यात जगण्याची उर्जा मिळते

  • @nitinkalyankar6424
    @nitinkalyankar6424 3 роки тому +2

    खरच डोळ्याला पानी येत गाण एकल्या वर

  • @nitinhatagale5924
    @nitinhatagale5924 4 роки тому +13

    मला खरचं समजत नाही..यार या गण्या ला डीस्लिक का केलं...त्यांना जीवन काय आहे हे माहीत नसावं... असं वाटतं 🥰 खरचं खुप छान गाणे🙏

  • @sharadpatil4540
    @sharadpatil4540 Рік тому

    खरोखर देवा भातुकलीच्या खेळा मधली राणी त्याचे बोल त्या गाण्याची स्तुति अजून माणसाला कळलीच नाही रे पण धन्य ते आमचे संगीतकार I love you 💖🚢⚓

  • @amarkamble371
    @amarkamble371 4 роки тому +29

    जीवनात सुख दुख येत असतात आपण कशासाठी भितो . आपले मन नेहमी आनंदी ठेवलो ना आपल्या इच्छा पुर्ण होतील

  • @sarikawalade2876
    @sarikawalade2876 3 роки тому

    हे गाणं मी १५ वर्षाची असताना तेव्हा पासून ऐकत आहे ह्या गाण्याशी अगदी मनाच नात जुळल आहे ...... आज मी २३ वर्षाची झालेय आणि माझ लग्न सुद्धा झालेय तरी पण ह्या गाण्याची ओढ मनाला आजही आहे ........ कारण माझं जीवनच अस आहे.........i like song

  • @Re-gt3qp
    @Re-gt3qp 2 роки тому +9

    Very meaningful songs in Marathi it is truly peacefull

  • @subodhkasare
    @subodhkasare 3 роки тому +2

    खूप खूप सुंदर असा आवाज आणि गाण्याची लेखणी सुद्धा खूप सुंदर 👌👌👌

  • @vishalsalave8704
    @vishalsalave8704 4 роки тому +6

    संसाराचा खरा अर्थ या गाण्यातून समजतो..
    Very nice❤

  • @kalidaskamble6992
    @kalidaskamble6992 Рік тому +1

    मला जर कधी उदास वाटू लागले तर मी हेच गाणं ऐकतो हे गाणं ऐकल्यानंतर जगण्याची नवीन उमेद तयार होते , जुन ते सोन

  • @laxmansasane2911
    @laxmansasane2911 3 роки тому +4

    खुपच छान गाणं ,मस्त

  • @prakashwagh1123
    @prakashwagh1123 2 роки тому +1

    सुख म्हणजे काय हे या गाण्यातून जाणवते.

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 3 роки тому +6

    आशेचा किरण सतत तेवत ठेवणारे भावपूर्ण गीत.

  • @prafulpote3615
    @prafulpote3615 3 роки тому +1

    सुखी संसाराची नाळ आहे हे गाणं
    ज्याला समजल, तो संसार करेल
    ज्याला नाही कळणार, त्याची.....

  • @s.s.s.songsandvideomakersl6911
    @s.s.s.songsandvideomakersl6911 2 роки тому

    अतिशय वेदना मांडणारं गीत.... नवनिर्मिती मांडणारं गीत

  • @gopalkarke8535
    @gopalkarke8535 4 роки тому +3

    अप्रतिम .. एकत राहावे नेहमी

  • @umeshsurvase6232
    @umeshsurvase6232 Рік тому +1

    हे गाणे मी माझ्या लहानपणापासून माझी आई वडिलांसोबत ऐकत आलो आहे आज माझ्या चालू जीवनामध्ये त्या गाण्याचा प्रत्येक क्षण मी अनुभवला आहे आणि ही गोष्ट खरी आहे दुःखा मागून सुख है नक्कीच येते

  • @akshaywashivale13
    @akshaywashivale13 3 роки тому +27

    मनाला भावनार गाण❤️😍💗

  • @parmeshwarmore2768
    @parmeshwarmore2768 Рік тому +2

    मनाला भारी लागत हे गाणं मी खूप आयकतो ❤❤

  • @pathan3aktar384
    @pathan3aktar384 4 роки тому +155

    पहिल्या दिवसाची आठवण येते डोळे भरून येतात

    • @umeshthaokar6004
      @umeshthaokar6004 4 роки тому +6

      जुने दिवस आठवतात

  • @nileshbhoir8487
    @nileshbhoir8487 3 роки тому +1

    Khup chan...........heart touching. ..

  • @manishamane5247
    @manishamane5247 2 роки тому +97

    I am pregnant and this song actually representing my situation🤗

  • @ashokdalvi7731
    @ashokdalvi7731 2 роки тому

    हे गाणं अतिशय सुंदर आहे जे जुने दिवस होते ते परत बघायला भेटणार नाही गाणं ऐकून जुन्या आठ्ठावानी ताज्या झाल्या

  • @maheshlokhande5727
    @maheshlokhande5727 5 років тому +5

    आयुष्य अंनंदात जगण्याचे गीत 🙏👍

  • @sandiplohar503
    @sandiplohar503 4 місяці тому

    मनाची ओढ हरवून टाकणारं गाणं❤❤