श्री

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • पिठोरी अमावस्येनिमित्त श्री करवीर निवासिनी मंदिरात ६४ योगिनी पूजन संपन्न
    को.दि.27: आज श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्येनिमित्त श्री करवीर निवासिनी मंदिरातील परिवार देवता असणाऱ्या आणि भक्तांना शुभाशुभ फल देण्याचा अधिकार ज्यांना प्रत्यक्ष जगदंबेने दिला आहे अशा 64 योगिनींचे पूजन विधिवत संपन्न झाले.
    श्री करवीर निवासिनी मंदिराच्या भिंतींवर साक्षी विनायकापासून गोपाल कृष्णापर्यंत 64 योगिनींची शिल्पे साकारलेली आहेत. जगदंबेच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना शुभाशुभ फल देण्याचे अधिकार प्रत्यक्ष आदिमातेने या योगिनींना दिले आहेत. त्यामुळे श्री जगदंबेच्या दर्शनानंतर या योगिनींचे दर्शनही भक्तांनी करावे असे सांगितले गेले आहे.
    प्रतिवर्षी पिठोरी अमावस्येला या 64 योगिनींची विधिवत षोडोशोपचार पूजा केली जाते. आजही परंपरेप्रमाणे हे पूजन पार पडले. वेदमूर्ती महामहोपाध्याय सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीपूजक अजित ठाणेकर, माधव मुनीश्वर यांनी संकल्प आणि पूजन केले. यामध्ये आवाहन, स्नान, धूप, दीप नैवेद्य आदि षोडशोपचारांचा समावेश असतो. तर सौ दीपा ठाणेकर,सौ राधिका ठाणेकर, सौ. मोहिनी दिवाण, सौ. अश्विनी ठाणेकर, सौ. अमिता ठाणेकर, सौ. उर्मिला ठाणेकर, सौ. गौरी जोशी आणि सौ. प्रियांका जोशी यांनी योगिनींसह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलांच्या ओट्या भरून त्यांना प्रसाद दिला.
    यावेळी प्रसाद लाटकर, गजानन जोशी, चिन्मय देवधर, संतोष जोशी, अमित देशपांडे, केदार स्वामी आणि विनायक दिक्षीत यांचे सहकार्य लाभले.

КОМЕНТАРІ • 19