श्री. बाळूमामा मंदिर,मेतगे | बाळूमामांचे मूळ स्थान | संपूर्ण माहिती व दर्शन |Anandi Anand

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • संत श्री. बाळूमामा हे महाराष्ट्रातील तसेच कर्नाटक मधील बहुसंख्यांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांचा जन्म अक्कोळ तालुका चिकोडी जिल्हा बेळगांव येथे झाला. त्यांचे अध्यात्मिक गुरू श्री. मुळे महाराज होते. अप्पाचीवाडी येथील हलसिध्द तसेच विठ्ठल रुक्मिणी वर मामांची नितांत श्रद्धा होती. अप्पाची वाडी यात्रा, पट्टणकोडोली विठ्ठल बिरदेव यात्रा तसेच पंढरपूरची कार्तिक यात्रा मामांनी कधी चुकवली नाही. निपाणी जवळील मेतगे गावात मामांचे ४० वर्षांहून अधिक काळ वास्तव्य होते. माणसात दिसणारा देव म्हणून लोकांची मामांवर कायमच श्रद्धा होती. संकटात मामा आपल्या मदतीला आहेत हा विश्वास लोकांच्या मनात आजही आहे. मामांच्या भांडाऱ्याचे विशेष महत्त्व आहे. मामांनी आपल्या मेंढ्या घेऊन गावोगावी फिरून समाज मार्गावर आणण्याचे मोठे काम केले. फक धनगर समाज नाही तर सर्वांनाच जवळ केले. वयाच्या ७४व्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील अदमापुर येथे मामांनी समाधी घेतली.
    #anandianand #Balumama #kolhapur

КОМЕНТАРІ • 2

  • @assit.prof.ravindranivrutt9383

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 👏
    खूप छान चित्रीकरण आणि निवेदन 👍

  • @bhagwatsatav6442
    @bhagwatsatav6442 Рік тому

    🙏 जय बाळूमामा 🙏