Poem sung by ME for My Dearest Mother (AAI) on Her Birthday - आई

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • आई तूच माझी लाडकी ,आई तूच माझी लाडकी
    रणरणत्या उन्हात देशी आम्हाला तू सुखद सावली
    जन्मो जन्मी तूच मिळावी प्रार्थना हि ईश्वर चरणी
    आई तूच माझी लाडकी, आई तूच माझी लाडकी
    नरसिंहाला उणीव भासे आईच्या त्या प्रेमाची
    म्हणून येई साक्षात कृष्ण देवकीच्या पोटी
    आई तूच माझी लाडकी
    परीसाच्या त्या शोधामागे धावे दुनिया सगळी
    सांगा कुणी तरी आहे आई परीसाहुनी ती वेगळी
    आई तूच माझी लाडकी
    वात्सल्याचे धनी तू आई , प्रेमाचे तू प्रतिक आई
    दोन घरांची सेतू आई , सप्तसूराहुनी गोड आई
    आई तूच माझी लाडकी
    त्याग तुझे प्रत्येकासाठी , संस्कारांची तूच शिदोरी
    नाही क्रूरता कपट नाही करुणेची तू बेट माउली
    आई तूच माझी लाडकी
    दूध तुझे हे अमृत देई , बळ सामर्थ्य बुद्धी देई
    दिशाहिनाला दीपस्तंभ ती अथांग सागर प्रेमाची
    आई तूच माझी लाडकी
    तूच जनननि तूच सारथी तुझ्यात वसते मौल्य संस्कृती
    निस्वार्थ सेवा निर्लोभी वृत्ती, हाक बाळाची तुझी कमाई
    आई तूच माझी लाडकी
    किती तू प्रेमळ, किती तू सोज्वळ
    किती तू निर्मळ, किती तू प्रांजळ
    तुझ्या कौतुकेस शब्द पडे कमी,
    तुझ्या गुणांची केली मी ओवि
    आई तूच माझी लाडकी
    आई आई आई
    आईच्या वाढदिवशीच्या निमित्त एक खास भेट
    Written by Amit More

КОМЕНТАРІ • 3