Budget 2025 : मध्यमवर्गीयांना खुश करणाऱ्या बजेटने काय दिले?
Вставка
- Опубліковано 31 січ 2025
- #Budget2025 #Nirmalasitaraman
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली आहे. यंदाच्या अर्थंसंकल्पात सामान्य जनता, नोकरदार, शेती, शिक्षण, रेल्वे, आरोग्य आणि टॅक्स स्लॅबसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या जाणार आहेत. त्याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी आज सकाळी निर्मला सीतारामन या सर्वप्रथम राष्ट्रपती भवनात गेल्या. याठिकाणी राष्ट्रपतींनी केंद्रीय अर्थसंकल्पा मंजुरी दिली. त्यानंतर निर्मला सीतारामन अर्थंसकल्प घेऊन संसदेत पोहोचल्या आणि त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्प संसदेत मांडला.