l हलगी ढोलकी जुगलबंदी सोबत शालन ताई यांची हळी ची गवळण l भास्कर खिलारे l

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 280

  • @rameshpitthalwad1726
    @rameshpitthalwad1726 6 місяців тому +10

    दिसायला साध्या भोळ्या....ह्या माय माऊल्या दोघीही अतिशय छान गातात...
    त्यांच्या गायनाला तोडच नाही....
    अभिनंदन.....
    ह्या गायक आणि वादन करणाऱ्या जोडींचे...💐🌹🌹🌹💐🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshkashid3503
    @sureshkashid3503 Рік тому +25

    डोळ्यात पाणी आले ओ, गावाकडच्या मातीतील कला पाहून, सर्व कलाकारांना शतशः प्रणाम

  • @dajikhade6679
    @dajikhade6679 Рік тому +5

    भाऊबंदकी ..... वरून अनेकांच्या नशिबाच्या भोगाने जीवनाचाच 🫴 तमाशा 👈 झाला , हें खिल्लारे भावा बहिणीसह एकत्र कुटुंब महाराष्ट्राची लोककला 👍तमाशा ✌️कला जपत आहेत, एक आदर्श आहे त्यांचा , खिल्लारे ताई दादा तुमचे .... मनस्वी अभिनंदन 🙏🙏

  • @adhikchavan-hm8mk
    @adhikchavan-hm8mk 19 днів тому +2

    परमेश्वरा या कलावंतास उंदड आयुष्य लाभो दया हि आपल्या रसिक मायबापा ची विनवणी

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 Рік тому +22

    कलाटचा आवाज ऐकला की दत्ता महाडीक यांच्या जुना तमाशाची आठवण झाली.खुप सुंदर

  • @ajaymusic637
    @ajaymusic637 Рік тому +15

    नमस्कार मी एक शाहीराचाच मुलगा आहे, आपल्या सारख्या हाडामासाच्या कलाकारांमुळे आमच्या सारख्या नवतरुण मुलांना प्रेरणा मिळते, आपल्या कलेला शिवशाही मानाचा मुजरा 😌🚩🚩🙏🙏

  • @agatrojadhav8623
    @agatrojadhav8623 Рік тому +17

    शालन ताई, तुमची ही गवळण मी 1976 साली पहिल्यांदा ऐकली होती. अजून पण तुमचा आवाज तोच आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या आजारातून उठून परत कार्यक्रम करता याचा आम्हाला अभिमान आहे. परमेश्वर तुम्हाला खूप खूप आयुष्य देवो. तुमच्या सर्व कलाकार खानदानी ला मानाचा मुजरा.

  • @dnyaneshwarkhade6071
    @dnyaneshwarkhade6071 Рік тому +15

    महाराष्ट्राची खरी कला दाखवल्या बद्धल आपले मनापासून आभार,सर्व कलाकाराचे मनापासून आभिनंदन💐💐

  • @anirudhkoli6011
    @anirudhkoli6011 Рік тому +12

    शब्द नाहीत बोलण्यासाठी तुमच्या कलेबद्दल फक्त सलाम करतो

  • @kashinathsonwalkar4707
    @kashinathsonwalkar4707 8 місяців тому +4

    काय शिस्तबद्ध गौळण सादर केली अगदी माझे मन भारावून गेले तुम्हा कलावंताचे किती कौतुक करावे ते शब्दात सांगणे कठीण आहे 🌹🌹🌹👏👏👏👌👌👌👌🙏🙏🙏

  • @sanjaymore6592
    @sanjaymore6592 Рік тому +11

    खूपच छान गौळण व जुगलबंदी हालगी ढोलकीची एकदम मस्त !! अभिनंदन पारंपारीक बाज जपत ही कला आपण जिवंत ठेवत आहात !!! सर्व बहीण भावाचे अभिनंदन !!! भास्करावाची ढोलकी व प्रभाकर यांची हालगी अप्रतिम !!!! शालन ताई चा आवाज व गायकी मस्तच ..........

    • @bajiraomagadum2
      @bajiraomagadum2 5 місяців тому

      अरे वा. संगीत कलेतील निपुण कलाकार शाब्बास पारंपारिक बाज जिवंत ठेवल्या बद्दल. आभिनदंन तुम्हाला साष्टांग दंडवत करतो.

  • @dattatraykadam2529
    @dattatraykadam2529 Рік тому +7

    खूपच छान.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आपल्या ग्रामीण भागात असे कलाकार असणे म्हणजे भाग्यच आहे.. मला आठवते तमाशा कलावंत श्री दत्तोबा खिलारे यांनी एक वगनाट्य सादर केले होते.. वेडा झालो मी वचनासाठी अर्थात खेळ कुणाला दैवाचा कळला..त्यांनी घेतलेले वेड्याचे सोंग अजूनही मी विसरू शकत नाही. त्यांना अखंड दंडवत.

  • @shrikarjoshi5573
    @shrikarjoshi5573 Рік тому +27

    आपण सर्व जण खिलारे मंडळी जातिवंत हाडांचे कलाकारांना जोशी नागजकर यांचे अभिवादन अशीच परंपरा चिरकाल राहो हीच सदिच्छा आहे.

    • @shrikarjoshi5573
      @shrikarjoshi5573 Рік тому +1

      सर्व कलावंतांनी आपापल्या परीने प्रयत्न केला आहे.

    • @shrikarjoshi5573
      @shrikarjoshi5573 Рік тому +1

      आपण आपल्या नागज येथील बहिण सौ शारदा यांना सामावून घेतले तर बरे होइल असे मला वाटते.

    • @shrikarjoshi5573
      @shrikarjoshi5573 Рік тому +1

      आपले मोना बटाव हे वगनाट्य आहे ते अतिशय सुंदर सादरीकरण करत असता ते अतिशय उत्तम झाले आहे भावपुर्ण अभिवादन करतो आहे.

    • @shrikarjoshi5573
      @shrikarjoshi5573 Рік тому +1

      सर्व जण खिलारे मंडळी यांनी चांगला कार्यक्रम सादर केला आहे.

    • @martandsathe-j1d
      @martandsathe-j1d 9 місяців тому

      आपणास मल्हारमय प्रणाम यालाच म्हणतात सदरीकरण

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane3424 Рік тому +11

    उत्तम लावणी गायन हलगी व ढोलकी ची जुगलबंदी अवर्णनीय

  • @suhasmane7699
    @suhasmane7699 11 місяців тому +4

    मोठे तमाशा नावाला आहेत., नुसता दंगा जातीवत कलाकार , जबरदस्त आवाज हलगी ढोलकीची सुरेल जुगलबंदी वाह,,,, फार सुंदर.

    • @marutigargote8991
      @marutigargote8991 9 місяців тому

      जबरदस्त कला, मनाचा मुजरा

    • @anantshitri1865
      @anantshitri1865 Місяць тому

      खरं आहे...रसिक राहीले नाहीत...

  • @shivajisawant5643
    @shivajisawant5643 Рік тому +4

    खरी कला आपण बहिण भावांनी जीवंत ठेवली आहे. हि कला लोप पावत चालली असताना आपण आजही त्याच जमान्यातील जिवंत कला पाहू शकतो. केवळ आपल्या सारख्या कलाकरांमुळेच. माझा सलाम तुमच्या सर्व टिमला( संचाला).

  • @Lincstenstein74
    @Lincstenstein74 8 місяців тому +4

    खिलारे बंधु भगिनींना नमस्कार व धन्यवाद, आपली तमाशा कलेची आवड व सेवा धन्य करणारी व एकदम खानदानी. लहानपणी वडीलांसोबत तमाशा पहान्यातली मजा अनुभवली ,तीही कॅनडातून.
    आपणास काय मदत करु शकतो.

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  8 місяців тому

      धन्यवाद आर्थिक सहाय्य करू इच्छित असाल तर संपर्क क्रमांक आहे 8983834774 यावर call करू शकता

    • @keshavbelhekar6423
      @keshavbelhekar6423 4 місяці тому

      याला म्हणतात तमाशाची खरी कला आणि जुनी कला धन्यवाद कलाकार बंधुंनो

  • @rajushinde5080
    @rajushinde5080 Рік тому +5

    अतीशय सुंदर या कलाकारांनी मराठी लोककला खऱ्या अर्थानं जीवंत ठेवाली या सर्वांचा विचार सरकारने करून मदत करावी

  • @रामशिंदे-ण7र

    हलगी आणि ढोलकी अप्रतिम जुगलबंदी रंगली आहे धन्यवाद

  • @vitthalgaikwad8461
    @vitthalgaikwad8461 6 місяців тому +2

    खूपच छान सादरीकरण खरे जातीवंत कलाकार आहात खिलारे ब.नधू तुम्ही अभिनंदन

  • @dattatraylondhe3734
    @dattatraylondhe3734 22 дні тому

    खिल्लारे कुटुंबाचे अभिनंदन व धन्यवाद. असे कलाकार सध्या दुर्मिळ होत आहेत.

  • @smartteacher3676
    @smartteacher3676 7 місяців тому +2

    गावाकडच्या मातीतील कला संपत चाललेले आहेत. आशा कलांचे जतन करणे अतिशय आवश्यक आहे. आणि कलाकारांना सहारा देणे गरजेचे आहे. गावाकडच्या यात्रेत असं सादरीकरण व्हायचं....... खिलारी मंडळींच अभिनंदन

  • @shashikantghag4689
    @shashikantghag4689 Місяць тому

    बरेच दिवसाची आठवण झाली . छान ताईन. सर्व कलाकारांना धन्यवाद .

  • @dattashelar9737
    @dattashelar9737 Рік тому +2

    अप्रतिम..निशब्द...
    एक छोटीशी इच्छा व्यक्त करतो मनापासुन...भविष्यात ही कला जिवंत राहावी..नवीन कलाकार तयार करावेत..
    महाराष्ट्रातील तमाम रसिकांना मी विनंती करतो..की, ही कला काळाच्या पडद्या आड जाऊ देऊ नका...जपा...कला आणी कलाकार...🙏

  • @ganeshkadam2218
    @ganeshkadam2218 8 місяців тому +1

    आंगावर शहारे आणणारा हा वाद्य प्रकार फारच छान हेच खरी जातीवंत कलाकार आहेत आवाज पण मणाला ......भाऊन गेला ओ ...खरच ही कला बुडत चालली आहे तरी नविण पिडीला यातुन .छान घेण्या सारख आहे तरी खरी कला हिच आहे वा भावा हलगी वाले❤

  • @nitinmore623
    @nitinmore623 6 місяців тому +1

    वा! वा! वा! अप्रतिम ! 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @tukaramlanghi8931
    @tukaramlanghi8931 5 місяців тому +1

    खिलारे परिवारातील सर्वच कलाकार वेगवेगळ्या कलांमध्ये निपून आहेत.

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 6 місяців тому +1

    जातिवंत कलाकार घराणे ओरिजनल गवळण एकच नंबर आवाज खिलारी कुटुंब जातिवंत तमाशा कलावंत अभिनंदन ताई किती गोड आवाज आहे❤

  • @satishkaka5342
    @satishkaka5342 Рік тому +2

    नमस्कार आपली मराठी रागंडी कला जिवंत पहिली समाधान वाटले वा खुपच छान

  • @preetiashwin11
    @preetiashwin11 6 місяців тому

    हलगीच्या आवाजानेच अंगावर काटा उभा राहील... एक चैतन्य संचारलं अंगात हलगी ची थाप आणि ढोलकीची साथ.. ऐकून...शब्दात सांगू नाही शकत एवढी भारी गण गवळण 👌👌👌🙏🙏मनाचा मुजरा मराठी मातीतील कलेला 🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @deepakbochare1100
    @deepakbochare1100 Рік тому +1

    अप्रतिम अत्यंत सुंदर अभिनंदन हीच खरी लोककला लोककलावंत जपतात अभिनंदन!!

  • @rajkadale4103
    @rajkadale4103 Рік тому +1

    या वयात देखील ईतका जबरदस्त आवाज ताईंना सलाम व त्यांच्या गायनाला वंदन

  • @kanifnathwadekar1613
    @kanifnathwadekar1613 Рік тому +11

    अतिशय सुंदर हलगी ढोलकी व गायन
    खिलारे बंधू भगिनी तुमचे हार्दिक अभिनंदन !
    प्रभाकर, दिनकर, व भास्कर सर्व कलेत तरबेज आहेत
    खूप खूप छान वाटले ऐकून👌👌👌👌

  • @bhanudaspawar736
    @bhanudaspawar736 Рік тому +3

    हलगी चे आणि ढोलकीचा आवाज ऐकून माझ्या अंगावर शहारे मस्त कलाकार

  • @baburaojadhaov.n.6400
    @baburaojadhaov.n.6400 7 місяців тому

    पारंपारिक लोककलेचा वारसा जपणाऱ्या खिल्लारे भावाचे हार्दिक अभिनंदन

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 Рік тому

    खिलारे परिवाराला मानाचा मुजरा. काय बाज, काय लोर काय‌ ताल काय आवाज. ही कला पाहून ऐकुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या.गेला तो जमाना आता फक्त आठवणी राहिल्या.तो काळ आता येणार नाही ही कल्पना सुद्धा करवत नाही गण आठवणी मुळे मनाला हुरहूर वाटते.धन्यवाद तुमच्या या जुन्या कलेला आणि तुम्हा सर्व परीवारासाठी..

  • @rohidaskharat9746
    @rohidaskharat9746 Рік тому +3

    तुमचा एक संच कला म्हणजे साक्षात कलेचे आम्हाला खूप सखत भेट आहे 💐🙏

  • @gulabraophalke3237
    @gulabraophalke3237 8 місяців тому +1

    पन्नास वर्षांपूर्वीच्या दिवसाची आठवण झाली.आवाज कीती गोड आहे.

  • @भानुदासभागवत
    @भानुदासभागवत 8 місяців тому +2

    वा..ताई...माझं.बालपण.आठवलं.....
    1972/73दरम्यान.असाच.ओरिजनल.गौळणी.ऐकल्या.आता.नाही.....😢

  • @JagnnathNamdev
    @JagnnathNamdev Місяць тому

    खरोखरच.हि.अशी.कला.क्वचीतच.ऐकायला.मीळत.आहे.या.पुढेही.अशीच.सादर.करावी.एकचाहता.खुपच.छान.आवाज.

  • @SampatPund
    @SampatPund Місяць тому

    खूपच छान गवळण म्हटली महाडिक अन्नाची आठवण झाली असे कलाकार पुन्हा होणे नाही

  • @marutigaikwad8129
    @marutigaikwad8129 Рік тому +1

    निळा जय भिम
    आपल्या परिवारांच्या आंगी खरोखर
    जातीवंत अप्रतीम कला आहे.
    आशी कला व कलावंत या पुढे होणार नाहीत.

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 9 місяців тому +1

    तमाशा हीच महाराष्ट्राचे लोककला आहे खरी लोककला

  • @रफिकशा
    @रफिकशा Рік тому +3

    शबीर शाह औरंगाबाद एकदम झक्कास खीलारे।भाऊ।आतीं सुंदर आवाज गोंड खुपखुप सुंदर ताईं अतिशय सुंदर 😀😀😀😀😀😀😀

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane3424 Рік тому +12

    राष्ट्पती पदक सन्मानित विठाबाई नारायणगावकर यांच्या कलेचा वारसा जोपासणारे खिलारे मंडळी चे अभिनंदन

  • @ravindratupsoundar6239
    @ravindratupsoundar6239 3 місяці тому +1

    अप्रतिम अतिशय छान आहे 👌

  • @subhashyadav2316
    @subhashyadav2316 9 місяців тому

    अतिसुंदर...अप्रतिम...सलाम सर्व खानदानी कलाकार बंधू भगिनी

  • @sudampalwe4884
    @sudampalwe4884 Рік тому +45

    खिल्लारे कुटुंब एकच नंबर!50 वर्षे मनाने मागे गेलो. आम्ही शाळकरी मुलांना तमाशा पहायला रात्री पायी 10 te12 किलोमीटर जावे लागे. Dattoba तांबे, खेडकर, काळू बाळू, चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे तमाशे पाहायला मिळणे म्हणजे तो आनंद काय सांगावा.

    • @vishnumurkunde8971
      @vishnumurkunde8971 Рік тому +1

      पन्नास वर्ष मागे नेले या परिवाराने वा:!!काय ताल ठेका स्वर देहभान विसरया झालेकि

    • @SureshPathare-l9s
      @SureshPathare-l9s Рік тому

      बरोबर 😊

    • @kailaspabal8957
      @kailaspabal8957 Рік тому +2

      सद्ध्या हे कुटुंब कुठे आहेत...पत्ता, फोन मिळेल काय

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  Рік тому

      8879902887 संपर्क क्रमांक

    • @atksuraj5712
      @atksuraj5712 10 місяців тому

      ववव्वववववववववववववववववव््ठ न​@@kailaspabal8957

  • @arunmore8081
    @arunmore8081 Рік тому +1

    मानाचा मुजरा तुम्हा सर्व कलाकारांना...
    ..दुर्मिळ चाली आणि गवळणी

  • @yogeshkahandal5299
    @yogeshkahandal5299 Рік тому +2

    खरचं कवतुक करावं तितकं कमीच आहे आता ह्या नव युगात असे जून ते सोन म्हणतात ते खरच आहे . असे आवाज पण खूप कमी कलाकार मंडळी कडे आहे. खुप छान अंगावर काटा येतोएकूण. व्वा खूप छान आवाज आहे ❤❤❤❤

  • @tukaramlanghi8931
    @tukaramlanghi8931 5 місяців тому

    खरोखरच निसर्गाने यांची कलेबाबत अप्रतिम निर्मिती केली आहे.

  • @amitkamble8152
    @amitkamble8152 Місяць тому

    जब्बरदस्त! नाद नाही करायचा.
    हालगीवर तर फिदाच झालो.

  • @dineshmane7123
    @dineshmane7123 Рік тому +3

    ...अस्सल कला आणि हे खरे जातिवंत कलाकार!!
    दंडवत यांच्या कलेला !!!

  • @bandufasatepatil5838
    @bandufasatepatil5838 14 днів тому

    ढोलकी वाल्यांचे व कडकनी वाल्यांचे खूप खूप धन्यवाद

  • @radhakrushnakende1000
    @radhakrushnakende1000 Рік тому +3

    ,,, ,,,, खुपच छान गवळन गायली सरव ‌कलाकाराना‌ माझा मानाचा मुजरा

  • @shahajimali289
    @shahajimali289 10 місяців тому +1

    क्या बात है।
    याला म्हणतात पारंपरिक बाज..
    शाहीर शहाजी माळी, कोल्हापूर

  • @netajipatil6077
    @netajipatil6077 10 місяців тому +2

    सर्व कलाकारांचे अभिनंदन 8:45

  • @rameshdevare6627
    @rameshdevare6627 2 місяці тому +2

    जुन हे सोन

  • @vinayakkalamkar5083
    @vinayakkalamkar5083 8 місяців тому

    तुम्हा सर्व कलाकाराना माझा मानाचा मुजरा अप्रतिम संगीत आणि गायन लयभारी🙏🙏

  • @SudhakarPatole-b5o
    @SudhakarPatole-b5o Місяць тому

    Khupch chan ❤

  • @raghunathghule9265
    @raghunathghule9265 Рік тому

    अप्रतिम कला, अभिनंदन सर्वांचे माझ्या गावात आलो की काय असं वाटलं ,पूर्वी असे खेळ गावात यात्रेला होत असे आपण ही कला जिवंत ठेवलीत पुन्हा एकदा अभिनंदन व शुभेच्छा

  • @शाहिरदिलीपपिंपळेआणिपार्टी

    व्वा व्वा लय भारी👌👌 सलाम खिलारे कुटुंबाला 🙏🙏🙏

  • @vijaybhalerao8939
    @vijaybhalerao8939 Рік тому

    ढोलकी हलकी जुगलबंदी नाद खुळा अस आजचा तमाशा मधे बघायला मिळत नाही जून ते सोन खूप छान

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs Рік тому

    अप्रतीम व्हिडिओ आणि सुंदर चालीवर हळीची गवळण म्हटली आहे आपले अभिनंदन आणि शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस

  • @vijaykamble2061
    @vijaykamble2061 8 місяців тому +1

    बेस्ट भैरवी रागात गवळण👌

  • @GangaramKokade
    @GangaramKokade 3 місяці тому

    आपण खरंच जातिवंत कलाकार आहात आपणा सर्वांचे अभिनंदन सर्वच कार्यक्रम खूप छान👍🌷🌹🌷🥴👍 न्हावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 3 місяці тому

    कला कीती ही चांगली असो इथुन पुढे या वर पोट भरनारनाही हौस म्हणून कला जोपासा मुलांना चांगल्ं शिकवा नोकरी व्यवसाय करातरच टीकाल माझी कळकळीची विनंती हा तमाशा खूप वेळा मी पाहिले आहे.

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode6689 Рік тому +3

    Mind-blowing presentation,Khilare brothers' and sisters. Grand salute to
    all of you. God bless you.

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  Рік тому

      या कलाकारांना जर आर्थिक मदत करू इच्छित असाल तर 8879902887 फोन पे व गूगल पे आहे.किंवा संपर्क करू शकता

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 Рік тому

    खिलारे बंधू व भगिनी .👌🌹🌹 परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो🤚

  • @deelipkhankal3065
    @deelipkhankal3065 Рік тому +1

    खूपच सुंदर
    जुना, हलगी ढोलकी चा खरा बाज आपल्या कडून पाहवयास मिळाला
    आपल्या तमाशा मंडळाचे अभिनंदन, व पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐🌹💐💐

  • @shantarammahadik6565
    @shantarammahadik6565 Рік тому

    ह्या भावंडांची कला बघुन जुन्या तमाश्याच्या आठणी जाघ्या झाल्या खिलारे बंधू व भगिनी परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @gkojgkwmjh3032
    @gkojgkwmjh3032 Місяць тому +1

    शब्बीर शहा औरंगाबाद मराठवाड़ा महाराष्ट हुन नंबर ऐक हालीकी पटु आनी ढोलकी पटु कीती सुति करावी कलत नाही खुब खुब सुंदर चाल आनी आवाज़ ❤🐅🐅

  • @bandufasatepatil5838
    @bandufasatepatil5838 14 днів тому

    खूप सुंदर गवळण गायिली धन्यवाद

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Рік тому +1

    हालगी,ढोलकी जुगलबंदी आता बघायला मिळत नाही धन्यवाद खिलारे बंधूना

  • @hemantwaghamare8234
    @hemantwaghamare8234 Рік тому +2

    I feel and became emotional it's called gramin voice.
    I heard such voice in my Village in tamasha I remember thank you all artist...

  • @ramraotupe3742
    @ramraotupe3742 Рік тому

    खिलारे कुटूंबाला मानाचा मुजरा लय भारी👌👌👌👌👌👌👌👌

  • @pravinmarathe8703
    @pravinmarathe8703 Рік тому

    मराठी मातीतील अप्रतिम कला सादरीकरण 👌

  • @VasantShinde-q5n
    @VasantShinde-q5n Місяць тому

    खिलायें बंधू बहीनबाई माना मांधाता मुजरा💓💗❤️💯

  • @bawgeshridhar5396
    @bawgeshridhar5396 Рік тому +1

    लय भारी जुगलबंदी उत्कृष्ट गायन 💐💐💐💐

  • @babanraokamble6452
    @babanraokamble6452 Рік тому

    या गरीब कलाकारांनीच महाराष्ट्राची लोककला जोपासली आणी जिवंत ठेवली आहे.

  • @ajinathvidhate2178
    @ajinathvidhate2178 Рік тому

    हलगी ढोलकी जुगलबंदी खूपच छान गायन खूपच सुंदर

  • @subhashshinde79
    @subhashshinde79 Рік тому +1

    क्या बात है खिलारे बंधू भगिनी
    एकच नंबर

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 11 місяців тому

    वा व्वाह बहारदार 🎉
    मन प्रसन्न झाल 😊

  • @omtheking7433
    @omtheking7433 Рік тому

    खिलारे कुटुंबातील सगळ्याना माझा नमस्कार. खुप छान.

  • @madhukarthokare3606
    @madhukarthokare3606 5 місяців тому

    सर्वच कलाकार अगदी अप्रतिम .

  • @dattaraodukare6814
    @dattaraodukare6814 8 місяців тому

    किती गोड आवाज आहे माझ्या मायीचा 🙏

  • @vasantnikale4963
    @vasantnikale4963 6 місяців тому

    खिलारे बंधू आणि भगिनींना मानाचा मुजरा

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 Рік тому

    शब्द नाही तुमच्या कलेला माझ्याकडे सलाम करतो तुमच्या कलेला

  • @shivmatsangeet6075
    @shivmatsangeet6075 Рік тому

    खूप छान सादरीकरण केले आहे.
    लोककलेचा अस्सल मराठमोळा बाज आपण जपला आहे. सर्व कलाकारांच अभीनदऺन आणि पुढील कारकीर्दीस खूप खूप शुभेच्छा.

  • @uttampalande953
    @uttampalande953 Рік тому

    ताई आवाज छान आहे. संगीत चांगले आहे. तुमच्या कलेला मनापासून शुभेच्छा.

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 Рік тому

    वा खूप खूप छान सादरीकरण... धन्यवाद

  • @bhimrajkakade3555
    @bhimrajkakade3555 Рік тому

    वा अतिशय सुंदर याला याला म्हणतात खरी कला

  • @shubhamjadhav4887
    @shubhamjadhav4887 11 місяців тому

    अतिशय सुंदर सलाम आपल्या कलेला

  • @rs-nl2ob
    @rs-nl2ob 6 місяців тому

    ओरिजनल कलाकार 👌👌

  • @NamdevSarawale
    @NamdevSarawale 7 місяців тому

    अतिशय सुंदर गायण आहे सलाम स्त्रीशक्ती ला

  • @shahirrahulsable4646
    @shahirrahulsable4646 9 місяців тому

    शालनताई आपल्या आवाजाला मानाचा मुजरा

  • @आपलं.मराठी.मनोरंजन

    आत्ता जे तमाशे होतात त्यामधे हिंदी गाणे डान्स याचा चाहता वर्ग जास्त असल्यामुळे या अशा जुन्या गवळणी गण पहायला मिळत नाहीत,तीच उणीव आपण या चॅनेल च्या माध्यमातून भरून काढताय त्याबद्दल आपले आभार ,आणि आपल्या चॅनेल ला @आपलं मराठी मनोरंजन या लोककला प्रेमी चॅनेल कडून पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @rajubhandare6625
    @rajubhandare6625 6 місяців тому

    खुप छान मनापासून धन्यवाद मीसुद्धा एक गायक आहे

  • @tanajisutar7231
    @tanajisutar7231 6 місяців тому

    पारंपारिक लोककला खूप छान

  • @amolkumarofficial5821
    @amolkumarofficial5821 5 місяців тому

    हलगी ढोलकी खूप छान 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻