मी बनविला छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ शिवाई देवी आकार असलेला शिवनेरी किल्ला.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024
  • दिवाळीतला किल्ला आला कुठून?
    लहानपणी दिवाळी जवळ आली की कधी एकदा मातीचा किल्ला करायला घेतो याकडे आम्हा मित्रांचं लक्ष लागलेलं असायचं. दिवाळीची सुट्टी लागर्क रे लागली, की किल्ल्यासाठी माती कुठून आणायची, दगड-विटा कुद्रत गोळा करायच्या, पोती कुठून मिळवायची याची चर्चा सुरू व्हायची. एकदा का है उस की मातीची पोती सायकलीच्या मागे लावून आणण्याची धावपळ सुरू व्हायची. किल्ल्याचं इतर सगळे बांधकाम साहित्य गोळा झालं, की पुढच्या चर्चा- किला कसा बनवायचा, कुठल्या तरी खऱ्या किल्ल्याची प्रतिकृती बनवायची, की काल्पनिक किल्ला बनवायचा? शिवाय, कुणाचा किल्ला चांगला होणार याची दरवर्षी चुरस लागलेली असायचीच.
    मातीचा काल्पनिक किल्ला बनवायची सगळ्यात सोपी पद्धत आहे ती अशी- भिंतीचा आधार घेऊन ओल्या मातीचा एक डोंगर बनवायचा. त्या डोंगराच्या टोकावर शिवाजी महाराजांची छोटी मूर्ती बसेल अशी थोडीशी जागा सोडायची, या डोंगराच्या उतारावर मध्ये पायऱ्या बनवून त्याच्या बाजूला दोन गोल बुरूज, तर कुठे कडेला गुहा बनवायची. मग त्यावर काचेचा तांबडा रंग द्यायचा. किल्ल्याच्या पायथ्याशी गोलाकार तटभिंत आणि दरवाजा करायचा. हा मातीचा डोंगर खरा किल्ला बाटायला हवा असेल तर त्यावर हिरवं गवत हवं. त्यासाठी लगेच डोंगरावर हळीच दिवाळीत मातीचा किल्ला बनवणं हे आपलं आवडीचं काम.
    पण या किल्ले बनवण्याची सुरुवात कशी झाली, माहितीय?हळीव चांगलं उगवावं म्हणून रोज किल्ल्यावर पाणी शिंपडायचं. तीन-चार दिवसांत हळिवांना कोंब फुटले की डोंगर हिरवा दिसायला लागायचा. हे सगळं सुरू असताना आम्ही तहान-भूक विसरून किल्ल्यापाशीच असायचो. दिवाळी होईपर्यंत किल्ल्याची अगदी काळजी घ्यायचो. तेव्हा कधीच प्रश्न पडला नाही, की ही किल्ला बनवायची पद्धत आली कुठून? मग पुढे कधी तरी मी कोल्हापूरच्या पांडुरंग पाटील यांचं 'माझ्या आठवणी' हे पुस्तक वाचलं. त्यातून मला बरीच नवी माहिती कळली. पश्चिम महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये दिवाळीच्या दिवसांत स्त्रिया अंगणात 'गवळणी' बनवून त्यांची पाच दिवस पूजा करत. आजही करतात. या गवळणी म्हणजे शेणाच्या मोठ्या गोळ्यांना त्रिकोणाकृती डोंगराचा आकार दिलेला असतो. त्यात गाईगुरांचं रोजचं ताजं शेण वापरतात. शेणाच्या डोंगरावर शेणाचीच शिवपिंड बनवली जाते. काही ठिकाणी या डोंगराला गोवर्धन पर्वत म्हणतात, तर कुणी त्याला गवळी राजाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या एका बाजूला उतारावर बोटांनी दाबून लहान लहान पायऱ्या बनवल्या जातात. डॉगराभोवती लहान लहान शेणाचे गोळे तयार करून गवळणी बनवल्या जातात. काही ठिकाणी या गवळणींबरोबर एक गवळी राजा आणि पाच पांडवही असतात. काही ठिकाणी या गवळणींना शेणाचेच लहान लहान हात-पाय बनवून जोडले जातात. काही गवळणींच्या डोक्यावर पाण्याचा हंडा दाखवला जातो. या सगळ्या आकृत्या लंबुळक्या आणि त्रिकोणी आकाराच्याच असतात. रोज या गवळणींना हळद-कुंकू लावलं जातं. डोंगरावर ताजी फुलं खोचली जातात. दिवाळीत मातीचे किल्ले तयार करण्याची पद्धत या गोवर्धन पर्वतातूनच सुरू झाली असावी असं म्हणतात.
    #agriculture #bee #beemix #experiment #automobile #farming

КОМЕНТАРІ •