विविध लग्नात पाहुणा बनून केलेल्या करामती पडल्या चांगल्याच महागात. वर्‍हाडींनी कोंडून दिला बेदम चोप.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 кві 2021
  • अंगात उंची कपडे,डोक्यावर टोपी, खांद्यावर रुमाल कपाळाला गंध, हातात आहेर टिपण्यासाठी वही व पेन घेवुन विविध मंगल कार्यालयामध्ये बोगस पाहुणा बनून लग्नातल्या आहेरांवर डल्ला मारणारा संदीप सगन धोतरे अखेर रंगेहाथ पकडला गेला, आणि मग काय वर्‍हाडी मंडळींनी त्याचा खरपूस पाहुणचार करत त्याचा मुक्काम जेलमध्ये केला.
    लग्नकार्यात आलेल्या लोकांकडून आहेर स्विकारुन त्यातील रक्कम हडप करण्याचा त्याचा प्रकार सुमारे ३ वर्षांपासून सुरू होता.
    लग्नकार्यात बारीकसारीक मदत करणे, आलेल्या पाहुण्यांशी गोड गोड बोलणे यामुळे तो कुणीतरी नातलग असेल म्हणून त्याच्यावर कुणीही संशय घेत नसायचे. आलेल्या पाहुण्यांकडुन आहेर स्विकारुन वहीत नाव लिहिण्याचे काम तो चोख बजावत असायचा. मुलीकडच्या नातेवाईकांना वाटायचे की तो मुलाच्या घरातला आहे. आणि मुलाकडच्यांना वाटायचे तो मुलीकडचा आहे म्हणुन त्याच्यावर कुणीच संशय घेत नसायचे.
    मग लग्न लागायचा टाईम झाला की हा भामटा आहेराचे जमा झालेले पैशे घेवुन पोबारा करायचा.
    अखेर याचा कारनामा उघड झाला तो ओतुर येथील शुभश्री लॉन्समधील लग्नात.
    रुपाली चंद्रशेखर बेनके यांच्या पुतनीचे तिथे लग्न होते. यावेळी त्यांचे पुतणे उमाकांत बेनके व सचिन बेनके हे आहेर घेवुन ते लिहिण्याचे काम करत होते. देवक आणण्यासाठी दोघेही निघुन गेल्यावर त्यांच्या जागी संदीप धोतरे येवुन बसला आलेल्या पाहुण्यांकडुन आहेर घेवुन ते वहीत टिपायचे काम करू लागला वहीत नावे लिहिता लिहीता तो आहेराची काही रक्कम स्वताच्या खिशात टाकत असल्याचे रुपाली बेनके यांनी पाहीले होते, त्यांना या बोगस पाहुण्यांची शंका आली होती पण पुतण्याचा ओळखीचा असेल किंवा दूरचा नातलग असेल असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. लग्न झाल्यानंतर बेनके यांनी आहेर वहीत जमा दाखवलेले पैसे व प्रत्यक्षात जमा पैसे यांचा ताळमेळ घेतला असता ८५०० रुपये कमी भरले. त्यामुळे त्यांनी त्यांचे पुतणे उमाकांत व सचिन यांच्याकडे आहेर स्विकारणार्या त्या व्यक्तीबाबत विचारले असता त्यांनी आपण त्यांना ओळखत नाही तो कुणीतरी पाहूणा असेल असे आम्हाला वाटले, पण तो आमच्या ओळखीचा नाही असे सांगीतले.
    आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रुपाली बेनके शुभश्री मंगल कार्यालयाच्या मालकाकडे त्या अनोळखी व्यक्तीची माहिती विचारली असता मंगल कार्यालयाचे मालक शैलेद्र ढमाले यांनी त्यांना वॉट्सअॅप वर एका व्यक्तीचा फोटो खात्री करण्यासाठी पाठवला. फोटोतला व्यक्ती तोच असल्याची बेनके यांची खात्री झाली व यानंतर मंगल कार्यालयाच्या मालकांनी ३० तारखेला लग्नकार्य असून तो व्यक्ती पुन्हा येणार असल्याची शक्यता असल्याचे बेनके यांना सांगीतले. त्यानुसार रुपाली बेनके व त्यांचे दोन्हीही पुतणे ३० तारखेला शुभश्री मंगल कार्यालयात आले असता त्यावेळी तो अनोळखी ईसम हा पुढील खुर्चीवर बसलेला त्यांना दिसला, साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यावर लगेचच तो ईसम खर्चावरून उठुन रुखवत मांडणीजवळील खुर्चीवर हातात वही घेवून बसला. यावेळी बेनके यांनी मंगल कार्यालयाचे मालक तसेच वधू व पयवर पक्षाच्या कार्यमालकांना बोलावून खुर्चीवर बसुन आहेर घेणारा व्यक्ती तुमच्या ओळखीचा आहे का हे विचारले असता त्याला कुणीच ओळखत नसल्याचे समजले.
    यावेळी बोगस पाहुणा संदीप धोतरे चा उपस्थित पाहुण्यांनी चांगलाच सत्कार केला व पोलीस कोठडीत त्याचा मुक्काम हलवला.
    जुन्नर तालुक्यातील या घटनेची राज्यात चर्चा होत असून आता अनेक जण आपण कसे फसलो गेलो याचीच चर्चा करत आहेत.
    जुन्नर टाईम्स, ओतुर

КОМЕНТАРІ • 190

  • @virajrameshmahale8134
    @virajrameshmahale8134 Рік тому +14

    अतिशय हुशार बुद्धी जीव माणूस आहे याला पुरस्कार जाहीर करा

  • @hanumantgosavi6785
    @hanumantgosavi6785 2 роки тому +13

    जर हे काम मजबुरी म्हणून केले असेल तर तुम्हाला सलाम अणि सवय असी असेल तर तुमच्या सोबत जे घडले आहे ते योगच आहे

  • @santoshdungarwal2473
    @santoshdungarwal2473 2 роки тому +60

    आपल्या देशात टैलेंटेड लोकाची कमी नाही ?? काय उद्योग शोधलाय . वय।चा तरी विचार पाहिजे ना .

    • @harshthorat8455
      @harshthorat8455 2 роки тому +1

      Tyanche vai tya udoyala shobhnare ahe. Tarun mulga basla asta aher swaikairaila tar lokanna lagech doubt alla asta.

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy 2 роки тому +8

    व्यवस्थित पणे सत्कार करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा द्या

  • @bhauthorat6936
    @bhauthorat6936 2 роки тому +42

    आहेर घेणाऱ्यांनाच लाज वाटली पाहिजे

    • @dhanapatil8258
      @dhanapatil8258 2 роки тому +4

      भाऊ अर्थिक मदत म्हणुन हि पद्धत असते

  • @swapsakpal08
    @swapsakpal08 2 роки тому +54

    धोत्रे साहेब तुम्हीं राजकारणात सामील व्हा.

  • @366590
    @366590 3 роки тому +33

    चांगला business चालवला होता
    संदिपभाऊ तुमचा आवाज नाही हा

  • @chitrakshichitrakshi515
    @chitrakshichitrakshi515 2 роки тому +13

    त्याच्या.... महान कार्य बद्दल त्यांना हजार तोफांची सलामी

  • @hemantkulkarni1440
    @hemantkulkarni1440 2 роки тому +70

    या साठी पण डोकं लागत
    भाई
    खूप talented chor आहे हा
    😆😆😆😆😆😆😆

  • @k.kthakre9302
    @k.kthakre9302 3 роки тому +78

    लोक काय काय करतील काही भरवसा नाही राव😂😄😂😄

  • @shivajichavan2172
    @shivajichavan2172 2 роки тому +14

    जाऊद्याना लॉक डाउन मध्ये भरपूर लॉस झाला असेल त्याला कारण 25 लोकात् काय करणार 8500 रु तर तुम्ही फटाके वाझवणार haahaha

  • @user-ry8ps9dr8q0
    @user-ry8ps9dr8q0 2 роки тому +13

    आहेर घ्यायची सोडून द्या ना .... आहेर घेणाऱ्याला असेच पाहिजे

  • @sharadanaiksn
    @sharadanaiksn 2 роки тому +4

    कितने तेजस्वी लोग रेहते हॆ हमारे महाराष्ट्र मॆ 😎😂😂😂😂

  • @ravindrapatil1760
    @ravindrapatil1760 3 роки тому +10

    जबरदस्त मुस्काटात बसली

  • @prakashkubde148
    @prakashkubde148 3 роки тому +87

    काही म्हणा पण गड्याने बुध्दीचा पुरे पुर वापर केला............

  • @ateeshshimpi3048
    @ateeshshimpi3048 3 роки тому +77

    इज्जत घालायची काम करतात राव लोक लाज वाटली पाहिजे ......

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 2 роки тому +62

    याच्या महान कार्याबद्दल याला चोररत्न किताबाने गौरवल पाहीजे.

  • @kisantambe4121
    @kisantambe4121 2 роки тому +13

    किती हुशार आहे मानसं या देशामध्ये

  • @sandeepthombare5572
    @sandeepthombare5572 2 роки тому +4

    लय राव धुतला हा तर आता स्वताच्या मुलाच्या लग्नात पण जाणार नाही.याला तर खूपच चेपला राव.

  • @rameshwarbhagwat1353
    @rameshwarbhagwat1353 2 роки тому +6

    काय करणार हा कुठ नोकरीला असणार नोकरी गेल्या मुळे के पुण्याचं काम करीत असेल

  • @devisingpatil804
    @devisingpatil804 2 роки тому +5

    जे म्हणतात मारु नका पहिले त्याना ठोका याचे सारखे नालायक आहेत म्हणूनच अश्या चोराची हिम्मत वाढते

  • @sandeepsawant6378
    @sandeepsawant6378 3 роки тому +11

    Good job

  • @Aw-si1cy
    @Aw-si1cy 3 роки тому +92

    3 idiots मूवी पाहून त्याला हे सुचलं असावं.
    त्या मूवी मध्ये एक dialogue आहे. शादी मे जाणे के लिये सिर्फ युनिफॉर्म लगता है युनिफॉर्म 😂😂

  • @mahendradusane6615
    @mahendradusane6615 3 роки тому +31

    नशिब दागीने नाही लांबवले
    पण अश्या प्रसंगी ओळखीची
    नात्यातलीच व्यक्ती बसलेली असते .

  • @ravindragiri7177
    @ravindragiri7177 3 роки тому +10

    चांगला सत्कार करायला पाहिजे

  • @thakare168
    @thakare168 2 роки тому +18

    कडक रे 👌🏻 सुपर आइडिया 😅सत्कार करा याचा

  • @eknathrajpure6659
    @eknathrajpure6659 3 роки тому +21

    राव ह्याचा सरकारनामा मथला सत्कार करा

  • @akashdoiphode5533
    @akashdoiphode5533 2 роки тому +7

    कोणी हि आहे आनु नये,आणला असला तरी तो घेतला जाणार नाही.

  • @malini7639
    @malini7639 11 місяців тому

    लग्नात आहेर घ्यायचे व द्यायचे बंद करा . लग्नात भरपूर खर्च कराय पेक्षा अनाथाश्रम रुध्द आश्रय .नर्मदा परि्क्रमा करताना लागणारे आश्रम जिथे गरज आहे तिथे मदत करा .

  • @rameshs9454
    @rameshs9454 2 роки тому +2

    काय डोके लावले भाऊने

  • @dhawre6ketan
    @dhawre6ketan 2 роки тому +18

    त्या लग्न हॉल मधील काही माणस मिळून असतील त्याची चौकशी करा

  • @hanumantgosavi6785
    @hanumantgosavi6785 2 роки тому +27

    संदीप धोतरे यांची सीबीआय ncb अणि ed चोकसी केली पाहिजे दिवसाला 8500 तर आतापर्यंत किती हे प्रकरण किरीट सोमय्या यांनी जनते समोर आणून द्यावे

    • @pramodkumbhar3448
      @pramodkumbhar3448 5 місяців тому +1

      😂😂😂😂

    • @deepakp691
      @deepakp691 5 місяців тому

      Kirit somayya swathach bp kadhnyat vyasta ahe mhanu ashe bhamte mokat ahe

  • @Royal_50227
    @Royal_50227 2 роки тому +30

    हा राजकारणात आला तर मोठा नेता होईल 😂😂

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 7 місяців тому

    त्या पेक्षा आहेर देणें घेणे हा प्रकार लग्नात बंद करा

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 роки тому +19

    याला मानलं पाहिजे.. ही आयडीयाची कल्पना आत्तापर्यंत कुणालाच का सुचली नाही.?

    • @rajbhiseentertainmentchann887
      @rajbhiseentertainmentchann887 2 роки тому +1

      सुचली ही असेल पण मार खायला कोन तयार होणार भाऊ. हा माणूस मार खायला खूप ताट आहे.

  • @suhasnaniwadekar3173
    @suhasnaniwadekar3173 2 роки тому +2

    हे मोदी हो याला मुख्यमंत्री करा, चोर विरुद्ध चोर, लै वसुली करल

  • @_NiteshMhatre
    @_NiteshMhatre 3 роки тому +21

    Maru naka bolanara tyacha partnar ahe vatoy..😂😂🤣🤣

  • @gopalolivkar5640
    @gopalolivkar5640 2 роки тому +2

    ईकडे विदर्भात पाठवा त्याले

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu 2 роки тому +6

    मंगल कार्यालयाचा मालक मारण्यापासुन का वाचवत आहे काय. आहे. गौडबंगाल

  • @baderbtlti6106
    @baderbtlti6106 5 місяців тому

    👌🙏

  • @kalyandeokate9276
    @kalyandeokate9276 2 роки тому +1

    Nice business

  • @rupeshjagtap6136
    @rupeshjagtap6136 2 роки тому

    कडक

  • @babasahebdabhade7042
    @babasahebdabhade7042 3 роки тому +6

    मस्त हाणला भामटा

  • @vijaychandekar208
    @vijaychandekar208 Рік тому +1

    याला highway वरील toll वर ठेवाला पाहीजे कोटी ची कमई करीला,

  • @Dashing-sq4dr
    @Dashing-sq4dr Рік тому +2

    काहीतरी कला पाहिजे राव

  • @sachinshingan4695
    @sachinshingan4695 3 роки тому +7

    हाना हाना याला लय हाना

  • @rahulpadwal1897
    @rahulpadwal1897 2 роки тому +9

    Ram Ram Pahune dya ikade aaher😅😅

  • @MUKUND_DESHPANDE12
    @MUKUND_DESHPANDE12 3 роки тому +35

    पत्रिकेवर लिहिलेले आहे आहेर देणे घेणे नाही पण आपण बिन्डोक

  • @vivekpingale2049
    @vivekpingale2049 3 роки тому +10

    जेवणारे पण असे किती असतात.

    • @prajwalbellekar2323
      @prajwalbellekar2323 2 роки тому +18

      जेवण करू दे रे भाऊ पोटाला च खातात ते

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 2 роки тому +3

      अन्नदान सर्व श्रेष्ठ दान

    • @avinashchoudhari8679
      @avinashchoudhari8679 2 роки тому +3

      Jewan karu de pn chori nko

    • @kiranasmr5760
      @kiranasmr5760 2 роки тому

      Fekun kiti detat , tyapeksha kuni jevat asel tar ky vite ahe.

    • @sachinphoenix5711
      @sachinphoenix5711 2 роки тому

      भुकेइतकच खातो माणूस

  • @vanitabhise3557
    @vanitabhise3557 2 роки тому +30

    जर मी चुकी करत नसेल तर हा व्यक्ती 3 वर्षा पूर्वी बदलापूर मध्ये शोप owner ला फसवले होते. हा cheater आहे. मार खायला खूप strong आहे. खूप मारले आहे याला.

    • @sanildoshi9857
      @sanildoshi9857 2 роки тому +1

      Yache kay krayche te yala tabyat Ghetlyavr Tharvuya yachya Gotyach kadhlya pahijet

  • @anantsutar1942
    @anantsutar1942 2 роки тому +1

    हा एक आणि रेठरे खुर्द ता. कराड मधील बजरंग दळवी नावाची व्यक्ती....

  • @sandeshbhawar5483
    @sandeshbhawar5483 3 роки тому +15

    आता सगळे मिऴुन संदीप भाऊ ना चांगला असा आहेर देतील हां हां हां

  • @niilesh8991
    @niilesh8991 2 роки тому +2

    *आपले चरण कुठे आहेत*

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial 3 роки тому +3

    Well Done😃😃😃😃😃😃

  • @maheshyele3385
    @maheshyele3385 3 роки тому +9

    आता हेच राहिल होत

  • @manojsalve8949
    @manojsalve8949 3 роки тому +1

    लई बसली असेल राव .

  • @nitinnalawade1977
    @nitinnalawade1977 2 роки тому

    Chan manus

  • @chandrakanatpardhi7619
    @chandrakanatpardhi7619 3 роки тому +15

    ऐकावं ते नवलच,,😜😜😜😜😡😡😡

  • @sahyadriarun3327
    @sahyadriarun3327 2 роки тому

    नविन काही नाही , राजकारन्याचा जातभाई अाहे हा, तुरूंगात जाईल परत बाहेर येऊन त्या चोरून जमवलेल्या संपत्तीचा भरपुर ऊपभोग घेईल, महत्वाच म्हणजे ऊजळमाथ्यान जगल हा😃😃

  • @Chagan.932
    @Chagan.932 12 днів тому

    Mr नटवरलाल😂

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Рік тому

    हे बघुन टोपी वर टोपी चित्रपट आठवला राव सेम सेम झाला कि गेम निबार चोपला राव 💰🤤🐆🐆

  • @shampatil9614
    @shampatil9614 3 роки тому +1

    Mast

  • @omshinde9268
    @omshinde9268 3 роки тому +11

    बाबा चमत्कार 😂😂😂

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 2 роки тому +10

    आरे बाबा...परत तिथंच कशाला जायचं...खाल्ले ना बेनकें चे दणके...🤣🤣🤣

  • @user-oh8tb1en6m
    @user-oh8tb1en6m 3 роки тому +13

    पोट वाईट असतं

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 3 роки тому +6

      मान्य आहे पोट वाईट असते, पोटासाठी चांगले उद्योग व्यवसाय आहेत,अशी भामटेगिरी योग्य आहे का?

    • @amitkirve1051
      @amitkirve1051 2 роки тому +4

      पोट वाईट आहे काम करायला काय झाले 😊😊😊

    • @manojjain4885
      @manojjain4885 2 роки тому +1

      पोट वाईट असते पण पोट तर सगळ्यांना आहे, तुम्हाला आम्हाला पण आहे मग काय सगळ्यांनी असेच करायचे का ???

  • @nandkishorjagtap7899
    @nandkishorjagtap7899 3 роки тому +2

    हा हां

  • @siddharthpatil3028
    @siddharthpatil3028 2 роки тому +3

    Manus Tin Wela Chori Karto,Chouthyanda Sapadto

  • @umeshahirrao1238
    @umeshahirrao1238 Рік тому +2

    याला पण एखादा अवार्ड देण्यात यावा लवकरात लवकर🤣🤣🙏🙏

  • @pihustatuscreator8085
    @pihustatuscreator8085 2 роки тому +8

    लोक काय करतील हे सांगता येत नाही 😂😂

  • @santoshborde453
    @santoshborde453 2 роки тому +5

    8500 दिवस तर मग महिना किती कमावतो

    • @shrikant285
      @shrikant285 2 роки тому +1

      Lagnachya season madhech kamavun basat asel

  • @shreyashshivsharan5046
    @shreyashshivsharan5046 Рік тому

    लग्न शिजन आला कि याला सुगी आल्या सारखेच असेल

  • @ganeshghube3649
    @ganeshghube3649 2 роки тому

    Kay Dering aahe..

  • @Ram.21.
    @Ram.21. 10 місяців тому

    Aher ghenare hunda ghenare sarvat adhi hanle pahije

  • @sqrqzqvlogs1077
    @sqrqzqvlogs1077 4 дні тому

    Main scene 04:15 & 04:35 😂😂

  • @arjunkamble3257
    @arjunkamble3257 3 роки тому +10

    🏆🏅🏆🏅 arshad meheta

  • @SUNNY-gv3pr
    @SUNNY-gv3pr 2 роки тому

    Hi

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 2 роки тому

    Ase anek jan jyancha vadhu varanshi ,pahunyanshi duranvaye hi kahihi sambadh nahi tarihi lagnala javun jevun alyachya che prakar ghadlyache vachnat aale aahe. Ekate kinwa with family samandh nasatana lagn karyalayat javun bhojanacha aswad ghevun alyache hi prakar aikivat ,vachanat anekanchya ale asatilach. Tari lagn karyalay management ne kadak surksha vyavastha thevavi. Jogojag cameras thevavet.

  • @arbaazs2138
    @arbaazs2138 2 роки тому

    Chor Engineer asel nakii....💯🙄😂😂😂😂😂

  • @babasahebdabhade7042
    @babasahebdabhade7042 Рік тому

    लय हाणला भामटा

  • @hanumantpatole3011
    @hanumantpatole3011 3 роки тому +2

    जावदे गरिब आहे

  • @panash6
    @panash6 2 роки тому +2

    नीट विचार केला तर कळेल की बेरोजगारी, corona च maar , महागाई यामुळे काही लोकांना असे काही उद्योग करावेसे वाट तायत

  • @youranant
    @youranant 2 роки тому +1

    Trafiq signal movie baghun idea suchli asavi tyala , tyat pn paise kamavayche bharpur upay aahet

  • @SRTECH220
    @SRTECH220 2 роки тому +1

    Yala dya re ekada bharat ratna

  • @rohanpatil2821
    @rohanpatil2821 3 роки тому

    😱😱😱😱😱😱

  • @amolnavale3891
    @amolnavale3891 3 роки тому +5

    🤭🤭😂

  • @vishalpatil-qw4jo
    @vishalpatil-qw4jo 2 роки тому +4

    मोदीने बेरोजगारी वाढवल्याने असे लोकांना करावे लागत आहे

  • @user-qg6gm9od5f
    @user-qg6gm9od5f 3 роки тому +5

    याच गाव कोणते आहे

  • @__life__2424
    @__life__2424 2 роки тому

    🤣🤣🤣🤣

  • @chhayascreationschhayabhos6159
    @chhayascreationschhayabhos6159 2 роки тому +2

    😂😂😂😂😂😂

  • @hanamantshinde1260
    @hanamantshinde1260 9 місяців тому

    Kay Nibar Buddhi Ahe Raw

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 Рік тому

    Asach daku nagpur district mdhla narkhed gavcha aahe MLA pn tyacha anubhav aalay tyacha photo aahe mazyakde

  • @rahulpadwal1897
    @rahulpadwal1897 2 роки тому +7

    Pahununya Manasala maru naye 😅😅😅

  • @santoshthorat9760
    @santoshthorat9760 2 роки тому

    😂😂😂🤣🤣🤣🤣

  • @mr.asp_2608
    @mr.asp_2608 2 роки тому

    🌹👌🌹👌🎅👌

  • @abhayshiral1166
    @abhayshiral1166 Рік тому

    Ya mansane rajkarnamadhe jayala pahije hote. Khup pudhe gela asata... 😂😆🤣 🙆🤦

  • @satishhawaldar3406
    @satishhawaldar3406 2 роки тому

    अवघड आहे 🤣🤣🤣

  • @dhawre6ketan
    @dhawre6ketan 2 роки тому

    चोर 1 नसतो तर अनेक असू शकतात

  • @sunny6939
    @sunny6939 3 роки тому +4

    चांगल्या घर चा दिसतोय राव

  • @Radhanagari3030
    @Radhanagari3030 2 роки тому +1

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @namdraskar4853
    @namdraskar4853 3 роки тому

    कोणत्या गावचा आहे,,,,चुन्दरं भामट