Open Mic | Ep 02 | Ft. Dilip Prabhavalkar | The Kcraft | Qench Studioz

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • या भागाविषयी :
    अनेक वर्ष सातत्याने काम केल्यानंतर आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून बघताना बऱ्याचवेळा आपण आपल्या स्वतःशी मनोमन संवाद साधत असतो. मनोरंजन क्षेत्रातील अशीच ज्येष्ठ मंडळी जी आयुष्याच्या संध्याकाळी फक्त मागे वळून बघत नाहीयत तर या वयातही तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने काम करतायत अशा काही मंडळींना आम्ही त्यांचे विचार मांडण्यासाठी एक खुलं व्यासपीठ दिलं. ज्यात त्यांची मुलाखत घेणारं कोणी नाहीय.... कट म्हणून या 'स्वगता'मध्ये अडथळा आणणारं कोणी नाहीय. आहेत ते फक्त स्वतः आणि त्यांचा चाललेला स्वतः बरोबरचा संवाद !
    या सेगमेंटमधील दुसऱ्या भागात आपल्या भेटीला आले आहेत ज्येष्ठ लेखक आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर ! तुमचे कामाचे क्षेत्र कुठलेही असो...प्रत्येकाने आवर्जून पाहावं आणि ऐकावं असं हे 'स्वगत' आहे. हा भाग नक्की पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहचवा.
    सहभाग :
    दिलीप प्रभावळकर (ज्येष्ठ लेखक, अभिनेते)
    संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे
    प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.)
    विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर
    पार्श्वगायन : नेहा सिन्हा
    आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील
    आर्ट असिस्टंट : रविंद्र साळवे, लक्ष्मण बट्टलवाड
    छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर
    कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्मस्
    लाईट्स आणि ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स
    रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद
    केशभूषा : सुप्रिया तांबे
    संकलन : सुमंत वैद्य
    गिफ्ट्स : टीम क्वेन्च
    ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : अनिरुद्ध पोंक्षे, अवनी पोंक्षे, रेवती पोंक्षे
    गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर
    बेस्ट बॉईज : अलीम, अफझल
    लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद
    लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ
    स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था : टीम द क्राफ्ट आणि क्वेन्च
    लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited)
    प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
    ___________________________________________________
    खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
    १. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
    २. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
    ३. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
    ४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
    ५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
    ६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
    ७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
    ८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet K...
    ९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
    १०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
    ११. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
    _____________________________
    आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
    #dilipprabhavalkar #kedarshinde #shubhangigokhale #rajanbhise #zeemarathi #tipre #shriyutgangadhartipre #abbatipre #shalakatipre #shiryatipre #shyamalatipre #shekhartipre #reshmanaik #vikaskadam #sakhigokhale #bharatjadhav #belashinde #ashokpatki #ajayatul #nehasinha #titlesong #guruthakur #ankushchaudhari #muktabarve #oldmarathiserial #marathiserial #marathiserialstars #marathiserialupdate #albatyagalbatya #chimanrav #mahatmagandhi #lagerahomunnabhai #vidhuvinodchopra #rajuhirani #bollywood

КОМЕНТАРІ • 85

  • @jyotsnasahasrabudhe7747
    @jyotsnasahasrabudhe7747 Рік тому +11

    अत्यंत साधे , सौम्य,बुद्धिमान, व्यक्तीमत्व.पूर्वी आईं ,वडील असे मुलांची personality develope करतं असतं.आताच्या आईं,वडिलांना असा वेळ मिळत नाही. कोणी अपवाद असतीलही.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      ज्योत्स्ना ताई, प्रतिक्रियेबद्दल आभार !!!

  • @muktrang5310
    @muktrang5310 Рік тому +1

    अतिशय सुंदर, धन्यवाद सर तुम्ही नेहमी आमच्या जवळचे वाटता. अत्यंत निगर्वी व्यक्तीमत्व 😊

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      तुम्हाला हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला

  • @rama91152
    @rama91152 Рік тому +9

    Very humble personality! He is an institution unto himself! Thank you!

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      Thank you for your genuine comment.

  • @thanedarkumarsurekha2902
    @thanedarkumarsurekha2902 Рік тому +5

    दिलीप प्रभावळकर एक प्रभावी व्यक्तिमत्व !
    प्रत्येक भूमिकेशी समरस होतात !
    त्यांची भूमिका मनावर कायमचा ठसा उमटवून जाते !
    उत्कृष्ट कलाकार !

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      अर्थात, अष्टपैलू व्यक्तिमत्व !!!

  • @sharadshiriskar8681
    @sharadshiriskar8681 Рік тому

    स्वागत..'स्वगत'..सारे सारे सांगता येण्यासारखे असूनही 'सार' हुकमी होतं

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      स्वगतामागचा विचार तुमच्यापर्यंत पोहचला हे वाचून आनंद वाटला.

  • @unmeshmore6524
    @unmeshmore6524 Рік тому +2

    खूप सालस आणि प्रामाणिक , निर्मळ व्यक्तिमत्त्व.... इतके अमाप लेखन करूनही कुठे अहंकार नाही.... त्रिवार वंदन...

  • @SKD1998
    @SKD1998 Рік тому

    Sundar vatla aikun. Moksha milalya sarkha vatla.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !

  • @Aham_Bharatiya_Asmi
    @Aham_Bharatiya_Asmi Рік тому

    We love you! Absolutely LOVE you

  • @shrinivaskulkarni1162
    @shrinivaskulkarni1162 3 місяці тому +1

    Prabhavalkar means really Prabhavi.Highly talented. So natural in his acting. Great.

  • @mithilarege830
    @mithilarege830 Рік тому

    Khup chan video

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      मिथिलाजी, कौतुकाबद्दल आभार !!!

  • @anjuscraftobsessions
    @anjuscraftobsessions Рік тому

    Dilip Prabhawalkaracha bolna aikna ha ek utkrushsta anubhav!

  • @kpatil1534
    @kpatil1534 Рік тому

    Ayushat ekach kalakar bhetay chi tivra iccha ahe 😢Dilip Prabhavalkar Sir❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      तुमची इच्छा लवकर पूर्ण होवो ही सदिच्छा !!!

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 Рік тому +1

    एकाच व्यक्तीमध्ये किती वेगवेगळे पैलू असू शकतात याच हे उत्तम उदाहरण आहे.दुसरी गोष्ट म्हणजे इतकं टॅलेन्ट असून ही down to earth असणं हे खरच प्रशंसनीय आहे.मी आपल्या चॅनेलची नियमित दर्शक आहे,असेच उत्तमोत्तम कलाकार आम्हाला ऐकायला मिळावेत ही अपेक्षा.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      प्राचीजी, तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल.

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 Рік тому +1

    दिलीपजी, आपले अनुभव, वयाच्या प्रत्येक वळणावर भेटलेली माणसे याचा इतिहास तुम्ही हळुवारपणे उलगडत नेला आहेत. खूप छान वाटले. पुण्यातील पुस्तक अभिवाचानाच्या कार्यक्रमाला येता आले नाही, परत तो प्रयोग असेल ना ?

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      विवेकजी, तुम्हाला हा मिनी एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला.

  • @savvylalit5944
    @savvylalit5944 Рік тому +1

    Wonderful actor. Equally wonderful personality. Salute to your work, Sir Dilip Prabhawalkar.

  • @gauripawgi3907
    @gauripawgi3907 Рік тому +1

    दिलीप भैयांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना ईश्वर चरणी करूया...आणि नवीन पीढीलाही त्यांचं मार्गदर्शन मिळत राहो...🙏💐
    सादर नमस्कार

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      सादर प्रणाम !

  • @Solapurtarunbharat-s7p
    @Solapurtarunbharat-s7p Рік тому +1

    दिलिप जी यांच्या वैविध्यपूर्ण भुमिका आणि त्याबद्दल त्यांची मते यापूर्वी अनेक मुलाखती द्वारे जाणून घेता आल्या होत्या . पण त्यांच्या मध्ये दडलेला लेखक व त्यांचा लेखन प्रवास हा पहिल्यांदा इतक्या विस्ताराने केवल आपल्या मुळे समोर आला आहे . नेहमीच एक कुतूहल कायम असायच की एकाच वेळी उत्तम भुमिका साकारणारे दिलीप जी विविध विषयांवर लिहु कसे शकतात . ते कुतूहल आज तुमच्या कार्यक्रम मुळे संपल धन्यवाद आणि पुढे अश्याच उत्तम कलाकृती तुम्ही समोर आणाव्यात ही सदिच्छा

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      कौतुकाबद्दल आपले मनापासून आभार !!!

  • @apurvagawde4105
    @apurvagawde4105 Рік тому +1

    अत्यंत सुंदर, निर्मळ, बुद्धिवान आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. आणि येवढे यशस्वी असूनही अजिबात अहंकार नाही......

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      अगदी खरंय !!!

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 Рік тому +1

    प्रभावळकर साहेबाना ऐकणं म्हणजे एक पर्वणीच आहे. खुप छान.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      प्रसन्नजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 Рік тому

    Nice

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      कौतुकाबद्दल आभार !

  • @shraddhadawalkar1989
    @shraddhadawalkar1989 Рік тому

    काही व्यक्ती आणि त्यांचे लिखाण आपले आयुष्य समृद्ध करून जातात..त्या पैकीच एक म्हणजे दिलीप काका (आपुलकीने काका म्हणत आहे) आपण आहात. आणि अशी आमचे आयुष्य समृद्ध करणारी व्यक्ती आम्हाला आयुष्यात निदान एकदा तरी समोरासमोर भेटावी आणि त्यांचा हात ( ज्या हातांनी 'ते' लिखाण केलंय) हातात घेऊन त्यांना सांगता यावे की का मी 'असं' म्हणत आहे ते.. बस एवढीच त्या विधात्याच्या चरणी प्रार्थना🙏खूप धन्यवाद The Kcraft

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      तुमची इच्छा लवकर पूर्ण होवो ही आशा करतो.

  • @nileshdeshpande446
    @nileshdeshpande446 Рік тому +1

    Eagerly waiting

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      Glad to hear that Nilesh ji! Do share the link with your friends and family. See you on 17 June 2023, Saturday, 10 am.

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 Рік тому +1

    Thanx Craft ase दर्जेदार कार्यक्रम करत आहात त्या बद्दल

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      गीताजी, कौतुकाबद्दल आभार !!! आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांची साथ असेल तर आमचा उत्साहही द्विगुणित होईल. या एपिसोडची लिंक अधिकाधिक share कराल.

  • @rupalikarnik7574
    @rupalikarnik7574 Рік тому +2

    Thanks for this Kcraft.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      Our pleasure. See you on 17 June 2023, Saturday, 10 am.

  • @adityasuryavanshi3687
    @adityasuryavanshi3687 Рік тому +3

    Oh god, this is going to be so good.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      Yes. Indeed ! See you on 17 June 2023, Saturday, 10 am. Click on the same link to watch the premier.

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Рік тому

    Ateeshay sahaj sundar abhinay ani titkach paradarshi vyaktimatv.abhineta,lekhak mhanun pan ani manus mhanun pan ji akrutrim lavchikta havi tyache murtimant udaharan.khup khup dhanyawad dilipji amche aayushy sukhakar karnya baddal.aayushyaman,kirtiman bhava🌷🌷🌷🙏🙏🙏🤗

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      विद्याजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !!!

  • @pankajgogte7618
    @pankajgogte7618 Рік тому

    मनोगत फारच पटकन संपले ...... आड जिभेने खाल्ले आणि पडजीभ बोंबलली असे झाले.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      पंकजजी, ओपन माईक ही मिनी सिरीज आहे. त्यामुळे त्याच्या प्रसारणाची वेळही कमी आहे. सर्व प्रेक्षकांचा विचार करून 20 मिनिटांचा कमाल अवधी या सेगमेंटसाठी निवडण्यात आला आहे.

  • @vishakha60
    @vishakha60 Рік тому +1

    Hatts of to this amazing personality. Thank you Kraft for this 😊

  • @ganeshpalekar1233
    @ganeshpalekar1233 Рік тому +1

    Kharach Dilip Prabhavalkar mhanje ek acting institute aahe. Trivaar Vandan tumhala 🙏🙏❣️❣️🌹🌹

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      गणेशजी 🙏🏻

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 Рік тому +1

    Manapasoon Dhanyawaad, Team Kcraft!!!

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      आभार ! हा मिनी एपिसोड पाहण्यासाठी नक्की भेटूया 17 जून रोजी, शनिवारी सकाळी 10 वाजता, The Kcraft च्या UA-cam चॅनलवर !!!!

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 Рік тому

    Dilp prabahvalkar loksatta chya hasyarang madhe tatus he character lihayche ka? Kahitari nakkich tyancha hota tyat

    • @thekcraft
      @thekcraft  10 місяців тому

      पुढच्यावेळी आले की नक्की विचारू त्यांना याबद्दल !!!

  • @GK-uy1cu
    @GK-uy1cu Рік тому

    Kiti sundar shabdat mandle aahe 🙏🏼

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      हा भाग आपल्याला आवडला हे वाचून आनंद वाटला.

  • @Twocompany212
    @Twocompany212 Рік тому

    Dilip kakanchi ek suddha mulakhat/pustak/natak me baghaycha Kiva vachaycha sodla nai.
    Me 30 varsha chi asun chimanrao gundyabhau, vasu chi sasu hi nataka UA-cam var baghitli
    Bokya Satbande he pustak tar me vayachya 10 varshapasun aj dekhil vachte.
    Tyanna bhetava he mazya wishlist madhe kityek varshapasun ahe!! 😢 Halli te Mumbai madhe nasun punyat sthayek astat tyamule bhet kadhi hoil mahit nai pan laukar ha yog yava hi ch prarthana.
    Maze/ aple daivat Pu La yancha darshan kadhi zala nai pan kakanna bhetun Ani Tyanna namaskar karun dhanya dhanya vatel he Matra nakki!!! 😊😊

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      दुर्वाजी, तुमची इच्छा लवकरच पूर्ण होवो ही देवचारणी प्रार्थना !!!!

  • @rakeshchalke7846
    @rakeshchalke7846 Рік тому

    Dilip sir you are great person.

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 Рік тому

    आतुरतेने वाट बघत आहोत.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      भेटूया 17 जून रोजी, शनिवारी सकाळी 10 वाजता. या एपिसोडची लिंक अधिकाधिक share करा.

  • @republic980
    @republic980 Рік тому

    Sharadashram soc. Rahat hote sharadhram shyalet hote ka mahit nahi sharadashram madhil baryach mulana kata kata ne janechi savay ahe

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      पण प्रथितयश लोकांची ही परंपरा शारदाश्रमला असेल हे विसरायला नको, नाही का?

  • @manalihegishte7468
    @manalihegishte7468 Рік тому

    लवकर १७ तारीख येऊ दे

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      दिल्ली अभी दूर नही | आणि हो लिंक अधिकाधिक share कराल या व्हिडिओची !!!!

  • @rohangosavi1044
    @rohangosavi1044 Рік тому +1

    साधसरळ व्यक्तिमत्त्व अष्टपैलू नट

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 Рік тому +2

    Baapre Dilip kaka tumhi kiti multi talented ahat aaj kalal tumchya baddal khup kahi navin goshti gr8 gr8 respect for u .

  • @borkarrohan5
    @borkarrohan5 Рік тому +1

    Dilip Prabhavalkar Yana Baghna, Aaikna, Vachna Mhnje Ek Parvanich ahe.. Saumya , Shanta.. Khup Positive Personality Ahe...

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      अगदी खरंय रोहन !

    • @nayanajoshi8616
      @nayanajoshi8616 Рік тому +1

      खूप मेहनत आणि नम्र स्वभाव. ..मृदू भाषा. .यामुळे आज हा आनंद मिळतो आहे असेच नव नवीन प्रयोग करत रहा त्यासाठी खूप खुप शुभेच्छा.

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 Рік тому +1

    Dusara bhag ? Pahila bhag kon hote

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      पहिल्या भागात ज्येष्ठ लेखिका, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी यांनी आपलं स्वगत सादर केलं होतं. त्या पहिल्या भागाची लिंक खाली देत आहे.
      ua-cam.com/video/tRANtzsj268/v-deo.html

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 Рік тому

    Atyant sadhe wyaktimatwa, tyanche bolane aikatana aapale ch Kaka, Mama bolat ahet ki kaay asa bhas whava itake premal bolane, bolanyat kuthehi "ga" chi badha nahi!
    Khoop sunder jhala karyakram!
    Manapasoon Dhanyawaad, Team The Kcraft!! 🙏🙏

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!