रापण महोत्सव २०२३ ,कुणकेश्वर,देवगड.पारंपारिक मासेमारी,ताजे मासे आणि समुद्रातील रापण मारण्याचा अनुभव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • *🏝️रापण महोत्सव 2023*🏝️
    ● देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती(देवगड)
    ● श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट
    ● ग्रामपंचायत कुणकेश्वर
    ● कुणकेश्वर - कातवण रापण संघ
    ● सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅक
    यांच्या सहकार्यातून घेऊन येत आहोत
    रापण महोत्सव 2023
    ● स्थळ - कुणकेश्वर बीच
    ● दिनांक ४ व ५ नोव्हेंबर
    ● वार ,शनिवार व रविवार
    ● सायंकाळी 3 ते 10 या वेळेत .
    कोकण म्हटलं की आठवतो सुंदर निसर्ग आणि त्या रम्य निसर्गाच्या कुशीत वसलेली पुरातन मंदिरे आणि निळाशार अथांग समुद्राचे धवल सुंदर असे किनारे.
    सागराचे सान्निध्य लाभल्याने उकडा भात आणि माशाचे कालवण ही कोकणी माणसाची स्वर्गीय सुखाची थाळी. मग माशांचा प्रकार काहीही असो, कोकणी माणूस प्रत्येकाच्या आगळ्यावेगळ्या चवीला मानाचा मुजरा करून यथेच्छ उदरभरण करीत असतो. अर्थात मासे उड्या मारत ताटात कधीच येत नसतात. ते पकडण्यासाठी अनेक प्रकार आहेत. त्यात रापणीची मासेमारी म्हणजे एक संस्थानच! त्याचा रुबाब, त्याची अदब, सारेच आगळे आणि वेगळे! अलीकडे रापणीची ही संस्कृती कोकणच्या किनाऱ्यावरून अस्तंगत होत आहे. म्हणूनच या संस्कृतीच्या वेगळेपणापासून ते अर्थकारणापर्यंत आणि गीतांपासून नियमांपर्यंत अशा सर्व बाजूंची ओळख करुन देणारा महोत्सव म्हणजे
    रापण मोहोत्सव - 2023
    या महोत्सवाची वैशिष्ट्ये
    स्थानिक मच्छीमारांसोबत मासे पकडण्याचा आनुभव ,
    रापण ओढायचा आनंद , रापणीच्या जाळ्यात सापडलेले ताजे मासे वेचने व त्या मिळालेल्या ताज्या माश्यांचे विविध पदार्थ चवीने चाखण्यासाठी कुणकेश्वरच्या सागर किनारी आवर्जून या.
    त्याच बरोबर कोकणी पद्धतीचे शाकाहारी जेवण , उकडीचे मोदक, अळूवडी, सहित.
    मग येताय ना?
    रापणमहोत्सव 2023 ला कुणकेश्वर मध्ये रापणी चा आगळा वेगळा आनंद अनुभवायला.
    येवा देवगड आपलाच आसा..
    Dear viewers kindly support us.
    / @suvarnkokanvlog
    Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal
    Mr. Ashish Natalkar, Devgad
    Music:
    Editing -: Mr. Ashish Natalkar
    Location -:
    Follow us on Facebook : / suvarn-kokan. .
    Follow us on Instagram : www.instagram....
    #rapan #traditionalfishing #traditionalfishcatching #fishing #fishfestival #fishcatching #fishing #fishingvideo #fishinglife

КОМЕНТАРІ • 15

  • @malvaniviranbazar608
    @malvaniviranbazar608 11 місяців тому +1

    👌👌👌

  • @vanitasawant7790
    @vanitasawant7790 11 місяців тому +1

    Khup chan 🎉🎉

  • @dreamerindevgad
    @dreamerindevgad 11 місяців тому +1

    Amazing Video🔥

  • @snehalrane3546
    @snehalrane3546 11 місяців тому +2

    खूपच छान
    या सर्वांच्या मेहनत मुळे ताजे मासे खायला मिळतात .

    • @Suvarnkokanvlog
      @Suvarnkokanvlog  11 місяців тому

      होय…धन्यवाद🙏🙏

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 11 місяців тому +2

    Ek number bhava khup chhan mahiti Dili 👌👍🙏💝🆗

    • @Suvarnkokanvlog
      @Suvarnkokanvlog  11 місяців тому

      धन्यवाद दादा😍😍🙏🙏🙏🙏

  • @smmalvani7712
    @smmalvani7712 11 місяців тому +1

    अप्रतिम विडिओ दादा 👌 विडिओ बघून खूप भारी वाटलं 😍

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 11 місяців тому +1

    खुप छान,रापण महोत्सव आम्हाला मुंबईवरून आपल्या यु ट्यूब चानलवरून आनंद घेता आला, धन्यवाद 🌹🙏

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 11 місяців тому +1

    khup chan anubhav , mumbait ghari basan rapan mahostav anubhavak milalo. asech mahostav karan koknatalo aso anubhav sanglyanka miltat, aani koknat pan lonkanka hatbhar lagta. jay kokan

    • @Suvarnkokanvlog
      @Suvarnkokanvlog  11 місяців тому

      धन्यवाद दादा …जयकोकण

  • @sameershirwadkar4204
    @sameershirwadkar4204 11 місяців тому +2

    Mast video aashish.
    Ani mast planning kela aahe kunkeshwar gramstani❤

    • @Suvarnkokanvlog
      @Suvarnkokanvlog  11 місяців тому

      धन्यवाद दादा🙏🙏