Bakul | Spruha Joshi | Marathi Poems | Kavita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • About Event : 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वायर्ड एक्सप्रेशन्स आणि ठिक्करबिल्ला निर्मित
    'नवं कोरं' - कवितेच्या सावलीत घडताना.. (कविता, गझल आणि गप्पा)
    सादरकर्ते-
    स्पृहा जोशी, संकेत म्हात्रे, आदित्य दवणे, प्रथमेश पाठक.
    कधी - रविवार १९ जून, सायं. ६ वाजता
    साहित्य मंदिर सभागृह, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, वाशी, सेक्टर ६, नवी मुंबई
    ________________________
    For Brand Collaborations, Partnerships, or inviting us to your place, drop an email to: teamspruhajoshi@gmail.com
    _______________________________
    दुधाळ झर्‍याच्या आणि हिरव्या पाऊलवाटेच्या
    मध्ये तू दिसतेस,
    थरथरत उभी असलेली ..
    लोक चालत राहतात धुळीतून
    वाट होत जाते आणखी मळलेली ..
    तू तशीच उभी आहेस..
    थोडी मुळं हलवून इकडे तिकडे बघ तरी..
    तुझ्या आसपासच्या या मळकट करडेपणात
    तू किती सुंदर दिसतेयस!
    मी तुला खूप वर्षं बघतेय..
    आकाश निळी झालर,
    पाऊस त्याची रिमझिम,
    चंद्र मोतिया चांदणं देतो.
    तू हलत नाहीस पण जागची..
    थोडंसं मोहरल्यासारखं दाखवतेस फक्त..
    आपण आता इतकं बोलतोय म्हणून,
    पण पलीकडे हिरवेगार डोंगर आहेत
    उसळणारा समुद्र आहे..
    तुला नाही वाटत एकदा त्यांच्याकडे पहावंसं?
    त्या मळक्या पाऊलवाटेवरून दूर कुठेतरी जावंसं?
    पण.. तू आपली तिथेच नेहमी..
    दुधाळ झर्‍याच्या आणि हिरव्या पाउलवाटेच्या मध्ये थरथरत उभी..
    संध्याकाळच्या वाऱ्याची वाट पहात..
    आपण आता इतकं बोलतोय म्हणून,
    पण..
    तुझा आणि संध्याकाळच्या वाऱ्याचा
    जीव आहे ना एकमेकांवर?
    मला कसं कळलं?
    अगं, संध्याकाळचे दुखरे होऊन
    इतके घमघमता न दोघेही..
    आपल्यालाच वाटतं की जातायेता माणसं पहात नसतात..
    आपण आता इतकं बोलतोय म्हणून,
    पण अशी दुखरी गुपितं फार काळ लपत नसतात...
    - स्पृहा.
    तुम्हाला कविता कशी वाटली ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    खादाडी Playlist : shorturl.ae/TqKYC
    गंमत गाणी Playlist : shorturl.ae/GNnXC
    #SpruhaJoshi #Poems #Marathi #Food #Travel
    _________________________________
    Credits
    ________________________________
    Produced By :
    Spruha Joshi
    Nachiket Ashok Khasnis
    Location Partners :
    Tushar & Chiranjivi Kothawade, Studio Infinity
    Filming & Production Stills :
    Angad Joshi
    Shubhankar Havele
    Editors :
    Soham Kurulkar
    Yogesh Dixit
    Tanishq Mohite
    Riddhi Vaze
    Hair & Makeup: Bhagyashree Patil
    Styling : Tanmay Jangam
    Costumes: Cotton Village
    Partnerships and Brand Collaborations: Anurag Pathak
    ___________________________
    About Spruha Joshi :
    ___________________________
    Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
    Instagram: / spruhavarad
    Facebook: / spruhavarad
    Twitter: / spruhavarad
    ____________________________
    DISCLAIMER: This is the official UA-cam Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________

КОМЕНТАРІ • 277

  • @suthakur8590
    @suthakur8590 2 роки тому +1

    स्पृहा कवितेच शिर्षक छानच आहे .माझं कोंकणातील बालपण तू जागवलस . बकुळीच वर्णन आणि तिच्या मनीचे दुखर गुपित . बराच वेळ मी कोंकणातील फिरत होते . छानच .
    अशाच तुझ्या सुंदर सुंदर कविता आम्हाला ऐकलं . खूप खूप शुभेच्छा .

  • @harsh3391
    @harsh3391 5 місяців тому

    फार सुरेख लिहिली आहे कविता ! ....बकुळ माझ्या आवडत्या फुलांपैकी एक आहे 🤍🤍🤍

  • @vaishalikhoptikar4029
    @vaishalikhoptikar4029 2 роки тому

    तुझ्या व्यक्तिमत्त्वाचा हा पैलू खूप सुंदर हळूवारपणे तू उलगडुन दाखवते आहेस....खूप सुंदर अनुभूती आहे... तुझ्यातल्या कवयीत्रिला खूप टवटवीत ठेवलेस हे पाहून खूप अप्रूप वाटते...तू माझी खूप आवडती अभिनेत्री आहेस उंच माझा झोका या सीरियल मधील तुझी भूमिका अजरामर आहे.एक व्यक्ती म्हणून देखील मला तू खूप आवडतेस...तुझा बोलणं ऐकत रहावस वाटतं....पुढील वाटचालीस शुभेच्छा....बकुळ कविता खूप सुंदर लिहिलीय व ती खूप हळूवार सादर केली आहेस ....खूप आवडली....

  • @ashwinimedhekar9753
    @ashwinimedhekar9753 2 роки тому

    स्पृहा,किती सुंदर आहे कविता.
    संवेदनशील आणि उत्कट!
    कवितेचं वाचनही तितकच प्रभावी.बकुळ, ती पायवाट आणि तो परिसर .
    दृश्य साधेसेच पण तुझ्या शब्दांनी,प्रतिभेनी त्या बकुळीला गंधित केले आहेस.
    एक उत्कट,भावपूर्ण कविता.
    अशीच व्यक्त होत रहा.

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 роки тому

    बकुळ मी कधी पाहिले आहे की नाही, हे मला माहीत नाही. पण ह्या ‌तुमच्या विलक्षण काव्यातुन‌‌ अनुभवले.
    अतिशय खोल, सुंदर, नाजूक, आणि तरल‌ काव्य. खोलवर ठसा उमटवणार मनस्पर्शी सादरीकरण.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @eduwings4199
    @eduwings4199 2 роки тому

    Khupach sundar......agadi varyachya zuluke sarakhi kavita.......agadi halaki...shabdanchi sundar gunfan .....my favorite actor

  • @VIJAYSHINDE-zo7qu
    @VIJAYSHINDE-zo7qu 2 роки тому

    स्पृहा,
    ताई खूप दिवसांनी कविता केली मन प्रसन झालं त्यात ब्लॅक आणि व्हाईट मधे तू खूप छान दिसत होतीस नवीन कविता ही स्पृहा म्हणजे तुझ्या स्वतावर एक छान कविता आईकाईची आणि बगाईची आहे तसेच शेतकरी,पाऊस आणि सैनिक ह्या तिघांचं कॉम्बिनेशन करून एक कविता करावी ही आशा करतो .
    विजय शिंदे

  • @anjaligawai6215
    @anjaligawai6215 Рік тому

    खूप सुंदर कविता स्पृहा अप्रतिम तू कहितरी भन्नाटच लिहीत असतेस..बकुळीच्या फुलं म्हणजे माझी शाळेतील खास आठवण आहे.. खूप आवडतात ती फुल मला

  • @archanakulkarni1406
    @archanakulkarni1406 2 роки тому +1

    खूप छान कविता..... बऱ्याच दिवसांनी तू भेटलीस......

  • @sanjanakhandare8830
    @sanjanakhandare8830 2 роки тому +1

    Kaanala Aanand deun, manat utarnari he Kavita aahe tai😇...me tuzya saglyach Kavita ektey fkt ektch nhi tr tya Kavita... Lihun he ghetey... Khrch he bakul Kavita khup chan hoti.... Ani tuzya aavjat jey tu Tila sundarya Del aahe tey tr Uttam aahe. ..love you spruha tai❤💕💛

  • @worldofscience246
    @worldofscience246 2 роки тому

    खूप छान कविता...
    शाळेच्या वाटेवर एक झाड होतं बकुळीच....
    अगदी ते तस डोळ्यासमोर उभं राहिलं....त्या गंधा सकट

  • @musicmad52
    @musicmad52 2 роки тому +11

    स्पृहा ,खूप हळुवार आणि तरल. बकुळ कविता आवडली. अशाच छान छान कविता ,त्यामागचे तुझे विचार ऐकायला आवडतील. तुला मनःपूर्वक शुभेच्छा !

  • @madhurimali9557
    @madhurimali9557 2 роки тому

    ताई.. खूप जिव्हाळ्याचा विषय अगदी तसाच गुंफला आहेस यात.. संध्याकाळ...! Awesome..❤️

  • @shamar4408
    @shamar4408 2 роки тому +2

    Khup chan.. asach chan kavita gheun yet ja..

  • @kishorjoshi5408
    @kishorjoshi5408 2 роки тому

    स्पृहा....
    तुझी बकुळ..खूप खूप आवडली....
    विशेष करून शेवटच्या दोन ओळी... गद्द्यातून पद्य आता नवीन नाही माझ्यासाठी फॉरमॅट....पण आज पहिल्यांदा ते बकुळीचे झाड...डोळ्यासमोर उभे केलेस तू..
    खर तर मी कोणी कवी प्रेमी नाहीये....मला खूप कविता हा प्रकार समजतो असेही नाही...पण आज सकाळी च खर तर 6 वाजून दोन मिनिट झाली आहेत..
    रविवार असून लवकर जाग आली..चहा घेताना तुझी बकुळ समोर आली...
    अनेक दिवसांनी कविता ऐकताना ..rather बघताना त्यातला विषय..भावना दिसल्या...कोणाची तरी व्यथा बकुळीच्या रूपाने मांडली असावीस असे वाटले....जाऊ दे उगाच कवितेचा रसग्रहण वगैरे माझ्या कुवती बाहेर आहे..पण तरीही जे मनापासून जाणवले ते व्यक्त झालो.. 🙏🙏

  • @arnavlidbide3468
    @arnavlidbide3468 2 роки тому

    वा..!! बकुळे कडे बघण्याची मजा आणखीनच वाढली व बोलत राहायची ओढ लागली कारण कवितेची एक लाईन.."आपण आता बोलतोय म्हणून ...".👌👌

  • @mangeshsonawane3894
    @mangeshsonawane3894 2 роки тому +2

    मला सुचलेली एक...
    तुमच्या शैलीत ऐकायला आवडेल...
    'भटकंती'
    मी भटक्या मार्गांनी दुरवर चालतो,
    चालता चालता मागे वळून पुनः पुन्हा मी पाहतो.
    सोबतीला कुणीच नाही, अन हाता मध्ये हात नाही,
    भटकंतीचा मार्ग मोकळा एकटेपणाने पाहतो.
    वाटांवरच्या पाऊलखुणा वाटांमध्येच दडतात,
    पुढे पुढे मी जाताना अनोळखी नजरेने पाहतात,
    थांबलो जरी मी या वाटांवर, त्या मज ओळखीच्या भासतात,
    ओळख मजला त्याही मग नाखुषीनेच देतात.
    प्रवास माझा असा आगळा, ना जाणो का हा वेगळा.
    माझ्याच अंतरी मीच अनोळखी,
    चालण्यापरी का अपंग होई,
    कुणी न माझा अन मी न कोणा सोबती.
    वेडे पणाच्या आयुष्याचे सोहळे,
    होई भटकंतीच्या मार्गांवर मोकळे,
    तरीही चालण्यात पाय अडखळे,
    न जाणो मी मजलाच नेई कुठे
    न जाणो मी मजलाच नेई कुठे....
    शब्द : मंगेश सोनवणे
    ८००७०७३३३७

  • @Ajpk2003
    @Ajpk2003 2 роки тому +1

    स्पृहा तुझ्या कविता छानच असतात. 🐣

  • @amitarenuse3662
    @amitarenuse3662 2 роки тому

    Kuuuup avdli..... Tu Nehmi ch Chaan lihites.... Mala kuup avdta Tuzya Kavita..... Kuuuup sade shbadh astat but Kuuuup meaningful.... Heart touching ani kuup premal arth astat...... Tu present pan Kuuuup Chaan kartes Tuza asscent Kuuuup avdtu mala 🥰❣️🥰❣️

  • @dhananjaykulkarni8139
    @dhananjaykulkarni8139 2 роки тому +1

    खूपच सुरेख कविता, स्पृहा, निरंतर लिहीत रहा, आम्हाला ऐकवत रहा.

  • @snehalambre9860
    @snehalambre9860 2 роки тому +2

    शाळेत असताना वेणीच्या पाऊण भागाएवढ्या उंचीचे चौपदरी बकुळीचे सर आम्ही माळायचो.कवितेचं नावच छान वाटलं.माझं लहानपण जागलं.बकुळीचं दुखरं गुपित मात्र आज कळलं.छान कविता.अभिनंदन

  • @ashvinikale3671
    @ashvinikale3671 2 роки тому +1

    Atishay sunder ani sahaj🥀🥀

  • @rutu11sherkar
    @rutu11sherkar 2 роки тому

    Amazing....khup jast sundar kavita Keli ahes...hrudayala sparsh karnari

  • @vaishudherange1318
    @vaishudherange1318 2 роки тому +1

    खूप छान लिहिलंय आवडली कविता

  • @jyotsnachandgude4270
    @jyotsnachandgude4270 2 роки тому +1

    अतिशय तरल हळवी कविता . सुंदर वातावरण निर्मिती . अप्रतिम सादरीकरण . समृद्ध शब्दकळा .

  • @prajaktaphakatkar1412
    @prajaktaphakatkar1412 2 роки тому

    Khopach Sundar Shabd Rachana, Asha hi Shabdat Ekhadya Fulache Mann Sadar Karta yeu shakate . Realy "Apratim"

  • @nitinvaidya3013
    @nitinvaidya3013 2 роки тому +1

    बकुळ कविता आवडली . तुला मनःपूर्वक धन्यवाद .

  • @vasudhakhandare3169
    @vasudhakhandare3169 2 роки тому +2

    स्पृहा तुझं कवितेचं सादरीकरण ,तुझा आवाज💖 खूप खूप कानाला सुखावणारी असतात😍😄👌

  • @rjoshi7211
    @rjoshi7211 2 роки тому +1

    खूपच सुंदर अप्रतिम

  • @siddhinevase3999
    @siddhinevase3999 2 роки тому +2

    Spruha tai..aik na .ekda tuzi fulanchi bag dakhav na🤩

  • @kavitatembulkar7992
    @kavitatembulkar7992 2 роки тому

    मस्तच हळुवार पणे गुपित उलगडलंस बकुळीचे

  • @vidyajoshi7930
    @vidyajoshi7930 Рік тому

    बकुळ कविता अतिशय सुरेख आहे.

  • @shubhadavyas8968
    @shubhadavyas8968 2 роки тому +1

    खूपच छान आणि हळुवार कविता आणि वाचनही!

  • @AparnaJawale
    @AparnaJawale 2 роки тому

    सुंदर, तरल अन तरीही स्थितप्रज्ञ बकूळ 👌👌

  • @ishwarijori2388
    @ishwarijori2388 2 роки тому +3

    किती सुंदर ... संध्याकाळचे दुखरे होऊन .... फार आवडली कविता .... सुंदर❤️❤️❤️

  • @nikitajane956
    @nikitajane956 2 роки тому

    woww....khoopach sundar tai! bakul phulancha jhad...kinva ekhadi bakula...doghinna lagu hoil ashi hi kavita.!.tai 'vistirna nabhachya khali' hi kavita khoop avdti aahe majhi, eykayla aavdel parat!

  • @madhavdole9788
    @madhavdole9788 2 роки тому

    फारच सुंदर कविता. खूपच आवडली

  • @Tejashri_Limaye_Bhawe
    @Tejashri_Limaye_Bhawe 2 роки тому

    खूप छान हलकी फुलकी कविता! स्वतःच्या संसारात शांतपणे रंगून गेलेली एखादी साधी स्त्री चित्रित केली आहेस. पण संध्याकाळचा वाऱ्याची उपमा भावली मनाला!

  • @shubhangideshkar3146
    @shubhangideshkar3146 2 роки тому +1

    सुंदर आणि हळुवार

  • @kajaldalavi8622
    @kajaldalavi8622 2 роки тому +1

    Khup chan vatali kvita

  • @saylijanjirkar3231
    @saylijanjirkar3231 2 роки тому +1

    खूप च छान कविता होती स्पृहा ताई, तुझ्या कडून देव्हारा ही कविता ऐकायला आवडेल!!❣️😊

  • @ganeshrajguru
    @ganeshrajguru 2 роки тому

    मॅम छान आहे ही कविता.आणि खर सांगू का मॅम मी कधी कविता वाचत नव्हतो की कधी ऐकत नव्हतो पण मी जेव्हा पासून ती मैत्रीची कविता ऐकली आहे ना तेव्हा पासून मला कवितांची आवड निर्माण होऊ लागली आहे .आणि मी खरंच तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो की तुम्ही कधी छान शी कविता अपलोड कराल.. अस्याच छान छान कविता तुम्ही अपलोड करत रहा .,🙏🙏👌👌🎉🎉

  • @swatigokhale1302
    @swatigokhale1302 8 місяців тому

    सुंदर कविता.अप्रतिम बकुळ.

  • @kalpanavaidya686
    @kalpanavaidya686 2 роки тому +1

    खूप छान कविता

  • @Sunakshi_1504
    @Sunakshi_1504 2 роки тому

    अतिशय सुंदर स्पृहा ताई

  • @gauripuranik8145
    @gauripuranik8145 2 роки тому +2

    Apratim - I think Bakul tree is listening to you feeling shy and saying kahitarich ♥️♥️♥️

  • @saurabhkshirsagar7302
    @saurabhkshirsagar7302 2 роки тому +1

    खूप सुंदर कविता ताई तुमची बकुळ सुंदर असं निसर्गाचं वर्णन👌👌👌

  • @gaurianekar470
    @gaurianekar470 2 роки тому

    Khupach sundar kavita aahe Spruha!

  • @manishakulkarni3911
    @manishakulkarni3911 2 роки тому +1

    क्या बात है! आवडली प्रचंड 💐🌹😘

  • @pbsartists7324
    @pbsartists7324 2 роки тому

    तुझी बकुळ आवडली , कविता तुझी तुझ्या मनातली..

  • @pragati2024
    @pragati2024 Рік тому

    खूप जास्त सुंदर कविता ❤

  • @shardahasabnis4979
    @shardahasabnis4979 2 роки тому +1

    खूप आवडली

  • @swagvwithswapnil8205
    @swagvwithswapnil8205 2 роки тому +1

    वाह...👌👌
    फार,फार शांत आणि सुंदर💖💓

  • @Nisha-wh8jh
    @Nisha-wh8jh 2 роки тому +2

    ह्रदयस्पर्शी!

  • @suhasgurav1637
    @suhasgurav1637 2 роки тому +1

    खूप छान

  • @manishajadhav2154
    @manishajadhav2154 2 роки тому +1

    खुप खुप अप्रतिम कविता स्पृहा ....very happy to listen to your new poem ..that too directly from you ...love you

  • @gosavisheela3126
    @gosavisheela3126 2 роки тому +1

    खूप सुंदर... 👌👌

  • @artipadhye5529
    @artipadhye5529 2 роки тому +1

    शब्दांची सुरेख गुंफण....रोजच्याच आजूबाजूच्या घटना, पण लक्षवेधी वर्णन🤗👌..कायम अशाच छान कवितांचा आस्वाद घेता येऊ दे स्पृहा ताई😍🥰

  • @archanakanitkar7816
    @archanakanitkar7816 2 роки тому +1

    Bakul fule bakuliche zaad maza weak point aahe. THE FAVORITE.

  • @manishaprabhune3731
    @manishaprabhune3731 2 роки тому

    Mohak Sundar 👍👍

  • @nakuljoshi1485
    @nakuljoshi1485 2 роки тому

    किती सुंदर

  • @Asmiitadhoble
    @Asmiitadhoble Рік тому

    कविता नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर मनाला भावणारी स्पर्शून जाणारी..

  • @gauriudan
    @gauriudan 2 роки тому

    बकुळीच्या झाडासारखी सुगंधित आणि संध्याकाळच्या वाऱ्यासारखी मनाला मोहणारी कविता ❤️🌼🌼

  • @yogeshpuranik80
    @yogeshpuranik80 2 роки тому

    Khupach Sundar kavita

  • @ravindrajadhav420
    @ravindrajadhav420 2 роки тому +1

    Chaan

  • @umapatil5942
    @umapatil5942 Рік тому

    Khup sunder kavita🎉

  • @smitasaraf7950
    @smitasaraf7950 2 роки тому +1

    वा किती सुंदर वर्णन , अप्रतिम

  • @anuradhamohod5664
    @anuradhamohod5664 2 роки тому +2

    Khup sundar 👌

  • @jayalokhande3144
    @jayalokhande3144 11 місяців тому

    खुप छान ताई ❤❤

  • @revatimore5573
    @revatimore5573 2 роки тому

    khup sundar gg❤️❤️❤️

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 роки тому +1

    Apartim kavita mam

  • @swetadhoptey8877
    @swetadhoptey8877 2 роки тому

    खूप छान हळुवार कविता.....आत्मधुंद सुगंध धुंद "Bakul"...आठवणीत सुगंध जपणारा "Bakul"

  • @purushottamsumbekar2375
    @purushottamsumbekar2375 2 роки тому +1

    फारच सुंदर, तरल भावना 👍🙏🌷

  • @pramilatrivedi4132
    @pramilatrivedi4132 2 роки тому

    बहुत सुंदर रचना है आपकी। और कविता बोलने की पद्धति तो अप्रतिम है।🌹🌹

  • @subhashdipke895
    @subhashdipke895 Рік тому

    फारच छान

  • @aneetadeshmukh9617
    @aneetadeshmukh9617 2 роки тому +1

    Eagerly waiting

  • @ameypatankar3849
    @ameypatankar3849 2 роки тому

    Masta, khup chan

  • @g1k236
    @g1k236 2 роки тому +1

    Beautiful Spruha

  • @priyankahowal
    @priyankahowal 2 роки тому +1

    ❤️

  • @prachisoman1844
    @prachisoman1844 2 роки тому +1

    स्पृहा👌👌👌उत्तम कविता💐

  • @meghadeshpande8633
    @meghadeshpande8633 2 роки тому +1

    वाह .. संध्याकाळच्या वाऱ्यावर जडलेला जीव .. अहाहा

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 Рік тому

    वाह मस्त

  • @abhijeetsalvekar
    @abhijeetsalvekar 2 роки тому

    Khup Chan

  • @patilharshal4483
    @patilharshal4483 Рік тому

    अतिशय सुंदर कविता आहे ताई 👌👌👌👌

  • @mangalkolekar1110
    @mangalkolekar1110 4 місяці тому +1

    स्पृहा दीदी तुमच्या कविता इतक्या छान असतात साध्या सोप्या सरळ शब्दात खूप छान असतात तुमच्या कविता इतक्या छान असतात की
    ती कविता लक्षात राहते शब्द आणि शब्द पाठ होऊन जाते आपोआपच आजची कविता सुद्धा छानच होती त्यापैकी तुझ्याच आत राहिले दडून कोणीतरी ही कविता सुद्धा मनाला भावली तुमचं लेखन सादरीकरण खूपच उत्कृष्ट असतं आज पर्यंत जितक्या कविता वाचल्या त्यापैकी तुमच्या कविता मला खूप छान वाटल्या तुमच्या कविता म्हणाला भावल्या

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 2 роки тому +1

    Spruha ,great subject , aamchya shalechya magchya anganat bakuliche zad hote... You can try to write script of film or natak as your writing is compatible for both.

  • @Siddheshgavankar28
    @Siddheshgavankar28 2 роки тому +2

    awesome ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍

  • @Urmiartandcraft.9049
    @Urmiartandcraft.9049 Рік тому +1

    Khup chan Tai...mala pn aawad aahe kavita karaychi lihite siddha pn kadhi kuna samor sadar karaychi himmat nahi keli..suruwat karavishi wate tumchya kd pahun. pn ajun wat kahi disat nahi

  • @ashwinipjoshi
    @ashwinipjoshi 2 роки тому +1

    Wow....just Wow😍🌼

  • @GoodLuck-gc7pv
    @GoodLuck-gc7pv 2 роки тому

    मी रामानंद वाठ ....एक कविता आहे खूप बघितले नाही भेटली ताई ती कविता मला......
    " झुळ झुळ वारे वाहू लागले, लाल पालवी तरूवरी
    फुला फुलांनी लवल्या वेळी, आंबेराई मोहरली
    आभाळाचे निळे निळे पण, कुहू कुहु कोकीळ करी
    वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी......"
    मी तूझ्या कविता खूप ऐकतो आता एक विनंती ही कविता एकदा ऐकायची आहे अन् लेखक पण कोन आहे सांग कृपा करून......

  • @VIJAYSHINDE-zo7qu
    @VIJAYSHINDE-zo7qu 2 роки тому +1

    I am waiting

  • @cancer4684
    @cancer4684 2 роки тому +1

    Sundar, shravaniya and spruhaniya. Yes and all the best for SNDN5, take care stay safe. Mi mage Avadhut guptena request Keli hoti Tu lihilelya lyrics or kavitana music dyave. Pls convey him if possible.👈🙏

  • @2911girish
    @2911girish 2 роки тому +1

    एक खूप वेगळ्या आणि तशा फारशा माहीत नसलेल्या पण उल्लेखनिय कवीयत्री -रजनी परुळेकर नुकत्याच निवरतल्या.
    त्यांची कुठलीही कविता सादर कराल ?
    विलक्षण ताकदीची कवियत्रि आहे.

  • @rajalkar1934
    @rajalkar1934 2 роки тому +1

    कार्यक्रमासाठी काही पूर्व नोंदणी आवश्यक आहे का?

  • @shilpaj0076
    @shilpaj0076 2 роки тому +1

    खूप छान दिसत आहेस आज

  • @ahmadpathan2345
    @ahmadpathan2345 2 роки тому

    Good

  • @pranalimagi9984
    @pranalimagi9984 2 роки тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @smitanagarkar9602
    @smitanagarkar9602 6 місяців тому

    Hello spruha... Mala mahit aahe tu khup aaagau ahes 😂😂 agdi mazyasarkhi 😂 god god bolte video madhe amchyashi fkt... Pn... Le me tell u.. Ur like an freshness spirit or mood changer for me sometimes... Baki kavita tr baghaylach nko.. Nivval apratim.. A... Ani ho.. Mala tula sangayla avdel ki mi kavyapremi fakt tuzyamule zale ani... Hoo...ata bheten mi ya kavitela... Thet mazya kavitanchya diary chya panavr...!

  • @kanchanjoshi4410
    @kanchanjoshi4410 2 роки тому

    मळक्या वाटेवरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे दुःख तर तिला खूपत नसेल?? आणि स्वतः च्या सुवासाने ती ते दूर करण्याचा मूक प्रयत्न तर करत नसेल???

  • @nandkishorbanubakode3096
    @nandkishorbanubakode3096 10 місяців тому

    What is special in Evening Breez ?