शेतातील सवाळ,खाऱ्या पाण्यावर रामबाण उपाय आता ही मशीनच करेल तुमच्या जमिनीचे आणि पिकाचे रक्षण
Вставка
- Опубліковано 8 лис 2024
- याला म्हणतात लॉंग टर्म रिझल्ट.
श्री देवकाते साहेबांनी रा.तावशी ता .पंढरपूर सोलापूर हा रिपोर्ट पाठवला आहे
ते गेली सहा वर्षांपासून वॉटर कंडीशनर वापरतात लॅबोरेटरी रिपोर्ट प्रमाणे त्यांचं पाणी हे जेवढे पाहिजे त्यापेक्षा 13.36 पटीने ( 1336 %) जास्त जड आहे
मग त्या हिशोबानी माती कमीतकमी 5 ( 500 % ) पटीने जड व्हायला पाहिजे होती
पण तसं न होता वॉटर कंडिशनर मुळे येथे उलट झालंय पाणी 13.36 पटीने हार्ड आहे जड आहे पण माती चां EC मात्र 5 पटीने हलका आहे.
स्टँडर्ड पाणी पाहिजे 0.25 EC. मात्र आहे 3.34 EC
माती चां EC पाहिजे 1.0. मात्र आहे 0.2 EC
EC चे रूपणातर ppm madhe करण्याचा फॉर्म्युला.
1.0 EC = 640 ppm
स्टँडर्ड पाणी पाहिजे 160 ppm. मात्र आहे 2138 ppm
माती चां tds पाहिजे 640 ppm मात्र आहे 128 ppm
असं का घडलं याला कारण वॉटर कंडिशनर मध्ये पाण्याची द्रावण क्षमता प्रचंड वाढते आणि त्यामुळे मातीमध्ये असलेले कॅल्शियम मॅग्नेशियम यांचं विघटन होऊन ते पूर्णपणे सुट्टे होतात आणि पाण्याबरोबर विरघळून जातात हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे पण हा रिपोर्ट त्याचं एक सबळ पुरावा आहे.
पाण्यामध्ये चार प्रकारचे क्षार आहेत
सोडियम
कॅल्शियम
मॅग्नेशियम
आणि पोटॅशियम
त्यातल्या
सोडियम व पोटॅशियम ला न चिकटण्याचा गुणधर्म व निष्क्रिय राहण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलेला आहे.
समुद्राच्या पाण्याचा टीडीएस 35000 आहे EC 54.68 तरीही हजारो लाखो वर्षापासून भरती ओहोटी मार्फत समुद्राचे पाणी समुद्रकिनाऱ्यावर येते आणि परत जाते पण आपले समुद्रकिनारे चिकट बनत नाहीत पांढरे पडत नाहीत कडक होत नाहीत. याला कारण सोडियमला चिकटण्याचा गुणधर्म नाही. कुठल्याही मिठागराच्या जमिनी मीठ काढल्यानंतर पांढऱ्या पडत नाहीत चिकट होत नाहीत कडक होत नाहीत.
मात्र कॅल्शियम मॅग्नेशियम यांना चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलेला आहे आणि ते पाण्यामध्ये सक्रिय राहतात. कॅल्शियम मॅग्नेशियम मुळे पाण्याची द्रावण क्षमता वाढत नाही आणि त्यामुळे जमिनीमध्ये क्षार विरघळून जात नाही . उलट उलट दिवसेंदिवस ते वाढत जातात. जमीन पांढरी पडत जाते आणि नवीन पांढरी मुळी चालत नाही पूर्वी 30 एचपी चे ट्रॅक्टर लागायचा आता 60 एचपी ने पण काम होत नाही
शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या क्षार हा तुमचा प्रश्न कधी नव्हता ....कधीही नाही आणि कधीही नसेल तुमचा खरा प्रश्न कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचा चिकटण्याचा गुणधर्म आहे.
वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान हाच प्रश्न निकाली काढते ते शाराना बाजूला न काढता त्यांचा चिकटण्याचा गुणधर्म काढून टाकते आणि आपला प्रश्न निकाली निघतो क्षार बाजूला काढणं हे फक्त आरो प्युरिफायर ला शक्य आहे आणि ते तंत्रज्ञान फक्त पिण्याच्या पाण्यापुरतं मर्यादित आहे याची आपण नोंद घ्यावी.
वॉटर कंडिशनर मध्ये टीडीएस बदलत नाही हा त्याचा दुर्गुण किंवा ती त्रुटी नसून हा त्या तंत्रज्ञानाचा भाग आहे याची पण आपण नोंद घ्यावी.
वॉटर कंडिशनर समजून घेण्यासाठी एक सोपे उदाहरण लक्षात घ्या आपण मायक्रोवेव मध्ये जेवण गरम करतो त्यावेळेला आपल्याला काहीही आग दिसत नाही लाइटर लागत नाही डिझेल लागत नाही पेट्रोल लागत नाही गॅस लागत नाही मग ते जेवण कोण गरम करत तर त्यामध्ये तयार होणाऱ्या मायक्रोवेव्ह लाहिरी मुळे पाणी असलेले सगळे पदार्थ गरम होतात आणि त्यासाठी त्या लहरींचा आणि जेवणाचा खाद्यपदार्थाचा भौतिक संपर्क होत नाही. अदृश्य स्वरूपामध्ये काम चालतं त्याचप्रमाणे वॉटर कंडिशनर मध्ये आपण इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक लहरी तयार करतो आणि त्या लहरींमुळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आपला चिकटण्याचा गुणधर्म सोडून देतात किंवा त्यांना तो सोडून देण्यासाठी भाग पाडल जाते. आणि आपला प्रश्न कुठलाही रसायन न वापरता कुठल्याही देखभाल खर्च विना निकाली निघतो.
आमचा एकच ध्यास उत्कृष्ट वॉटर कंडिशनर चा विकास