भाग ४५ | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | BHAJAN SANGRAH |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • २२१.
    भावना दुखवू नका हो कुणी !
    बोलली भारत - माता झणीं ! ! ।।धृ0।।
    सुपुत्र सगळे माझ्या उदरी ।
    जन्मा आले बहु नर नारी ।
    उद्योगास्तव भिन्न वाटली ।।
    कुणि नच नीच - ऊंच यातुनी ।।१।।
    प्रदेश-भाषा ओळखि पुरती ।
    परि राष्ट्राला ती ना पुरती ।।
    म्हणुनि हिंदला हिंदिचि शोभे -
    पावली हा अनुभव घेउनी ! ।।२।।
    भारत - पुत्रे अम्हा म्हणाया ।
    कमीपणा वाटो न कुणाया ।
    तुकड्यादास म्हणे, राष्ट्रीयता -
    एकता, पाडू नका खंडुनी ! ।।३।।
    २२२.
    घेतो धर्माची आण, मनी नाही ईमान ।
    धर्म अशानं कळायचा नाही रे !
    धर्म पोरांचा पोयखेळ नाही रे ! ।।धृ0।।
    तीर्थक्षेत्री गेले, नाही एवढाच धर्म ।
    व्रत-जप केले, नाही एवढाच धर्म ।।
    दानपुण्य चाले, नाही एवढाच धर्म ।
    माळा-भस्म-टिळे,नाही एवढाच धर्म ।।
    ही तो धर्माची उपांग भाई रे ! ।
    धर्म पोरांचा पोरखेळ नाही रे ! 0।।१।।
    तत्त्वाचा विचार, तोच खरा धर्म ।
    सत्याचा आचार, तोच खरा धर्म ।।
    न्यायाचा व्यवहार, तोच खरा धर्म ।
    करुणा अन्‌ उपकार, तोच खरा धर्म ।।
    वर्म धर्माच समतेत राही रे ! ।
    धर्म पोरांचा पोरखेळ नाही रे ! 0।।२।।
    माझा धर्म न्याय अन तुझा धर्म न्यारा ।
    करी भांडाभांडी हा अधर्मचि सारा ।।
    मानवता ठेवा अन्‌ मग चर्चा करा ।
    तुकड्या म्हणे जगाची धारणा सुधारा ।।
    बोलण्या चालण्यात ताळमेळ पाही रे ! ।
    धर्म पोरांचा पोरखेळ नाही रे ! 0।।३।।
    २२३.
    घाबराला का तरुण गड्यारे ! तुझा पुढारी आला,
    पुढारी आला, पुढारी आला ।।धृ0।।
    सावध हो, चल ये मैदानी ।
    निज कर्तव्याला जागोनी ।
    उभाच बंसरिवाला, बंसरिवाला, बंसरिवाला ।।१।।
    गरुडावरती स्वारि करोनी ।
    उतरत जणु तो दिसे विमानी ।
    चक्र सुदर्शनवाला,सुदर्शनवाला,सुदर्शनवाला ।।२।।
    दुष्ट जनांना ठार कराया ।
    साधु सज्जन हृदयी धराया ।
    तुकड्या म्हणे धावला, म्हणे धावला, म्हणे धावला ।।३।।
    २२४.
    अरे ! रिकामा कशाला फिरतं ?
    तुझं गावच नाही का तीर्थ ? ।।धृ०।।
    गावी राहती गरीब उपवासी ।
    अन्नसत्र लावितोसि काशी ।
    हे दान नव्हे का अर्थ ? ।। तुझं0।।१।।
    तुझ्या गावाची शाळा ही मोडली ।
    धर्मशाळा तू शहरी का जोडली ?
    याने निघतो का जीवनात अर्थ ? तुझ0।।२।।
    गावी गरिबांची घरटी ही मोडली ।
    तू तीर्थासि मंदिरे ही जोडली ।
    गाव - गुंड करीती अनर्थ ।। तुझं0।।३।।
    आपुल्या गावाची सेवा जो करतो ।
    तोचि कीर्तीने, मानाने तरतो ।
    दास तुकड्या म्हणे होई सार्थ ।। तुझं0 ।।४।।
    २२५.
    मानवा ! का चिंता वाहतो ?
    होणारे ते चुके न केव्हा, प्रभु सगळे पाहतो ! ।।धृ0।।
    नर जन्माला आला जेव्हा ?
    तू कधि केले होते कामा ? ?
    परी तुझ्या पोटाची कळकळ, जन्मताचि वाहतो ! ।।१।।
    अजगर पडला पडुनी राही ।
    चालतसे मुंगीच्या पायी ! !
    अचूक त्याची खळगी भरण्या, जागिच कुणि दाहतो ! ।।२।।
    पोपट - मैना मारि भरारी ।
    कुठले त्यांना स्थान नोकरी ?
    परी चरुनिया, रोजची येती,मन्मनि उत्साहतो ! ।।३।।
    म्हणुनि सांगतो स्मर तू हरिला ।
    विसरु नको रे सहकार्याला ?
    तुकड्यादासा,अनुभव ऐसा,घडि-घडि मज राहतो ! ।।४।।

КОМЕНТАРІ • 16