प्रगतशील शेतकरी अभ्यास भेट, बॅच 2 ,तालुका शहादा , जिल्हा नंदूरबार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #farmer #paanifoundation #farmercup2024 #shahada #smartfarmer #शेती #जैविकशेती
    दिनांक 22 जुलै 2024 रोजी शहादा तालुक्यातील प्रसिद्ध शेतकरी कृषी भूषण श्री हिरालाल ओंकार पटेल यांच्या शेतात तालुक्यातील पाच महिला गट मिळून एकत्र अभ्यास सहल आयोजित केली.
    हिरालाल पटेल यांना 1996 कृषी क्षेत्रातील प्रसिद्ध कृषी भूषण पुरस्कार मिळाला. नंदुरबार तालुक्यातील पहिला ठिबक सिंचन चा संच त्यांनी आपल्या शेतावर लावला तसेच केळीच्या टिशू कल्चर ची निर्मिती करून पाहिली त्याचप्रमाणे फळ शेती वनशेती🌿 यातही त्यांनी अनेक प्रयोग केले.
    ते बघण्यासाठी कळंबू येथील जगत जननी महिला शेतकरी गट तलावडी येथील राधे कृष्ण महिला शेतकरी गट मानमोडी येथील शिवशक्ती महिला शेतकरी गट व अन्नपूर्णा महिला शेतकरी गट आणि लक्कडकोट येतील एकलव्य महिला शेतकरी गट या गटांनी एकत्रित सहल आयोजित केली या दिवशी सकाळीच जोरदार 🌦️🌦️🌦️पावसाने हजेरी लावली होती तरी पण सर्व गट वेळेवर जेवखेडा गावामध्ये हजर झाले येताना सोबत छत्री रेनकोट आपापली पाण्याची बाटली व जेवणाचा डबा घेऊन सर्व महिला शेतकरी एखाद्या तुफाना सारख्या पाऊस आणि चिखलाशी लढून शेतीतील नवनवीन प्रयोग बघण्यासाठी सज्ज होत्या.✅
    -सकाळी नऊ वाजता जेव्हा सर्व गट एकत्र हिरालाल काका यांच्या शेतावर आले त्यावेळी सर्व गटांचे स्वागत मोरांच्या सुंदर आवाजाने झाले🌿🌿🌿
    त्यानंतर हिरालाल काकांना आपल्या सर्व गटांचा परिचय आणि गटांना एकमेकांचा परिचय करून दिला.
    सुरुवातीला खराब झालेल्या आंब्याच्या बागेत चंदन मिलीया डुबिया नवीन प्रकारचे आंबे इत्यादींची लागवड होती निलगिरीची मागच्या उन्हाळ्यात तोडणी झालेली होती त्यालाच आता नवीन फाटे येऊन त्यांची चांगली वाढ होत आहे पुढे चार-पाच वर्षात त्याचे चांगले उत्पन्न मिळेल असे काकांनी सांगितले
    गोड चिंच
    पुढे गोड चिंचेचे झाड दाखवून या झाडाच्या चिंचांची विक्री 1000 रुपये किलो प्रमाणे होते हे सांगितले.
    चंदन शेती
    शेतात रक्तचंदन साधे चंदन असे दोन प्रकारचे चंदन इतर शेतकऱ्यांना बघायला मिळाले त्या दोघांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांनी घेतली चंदनाच्या झाडांची संख्या हजारो ने आहे चंदन लागवडीला अनेक वर्ष झाल्याने चंदनाच्या बऱ्याच झाडांजवळ त्यांनी खाल्लेल्या बियांद्वारे व टाकलेल्या विस्टेतून लहान लहान रोपे आता या ठिकाणी नैसर्गिक रित्या उगवायला सुरुवात झालेली आहे.
    मिलीया डुबिया
    या शेतात मिलीया डुबिया या प्रजातीची झाडे नवीन रोपांपासून सहा-सात वर्ष वय असलेले झाड आपल्याला पाहायला मिळतात चंदनाला होस्ट प्लांट म्हणून याचा चांगल्या प्रकारे उपयोग केला गेला आहे.
    सफरचंद
    शहादा तालुक्यात प्रथमच याच शेतावर सफरचंदाची लागवड झालेली आहे सफरचंद म्हटले की काश्मीरची आठवण येते परंतु आम्ही डोळ्यांनी सफरचंद बघत आहोत सफरचंदा च्या झाडाला छान पैकी फुले आलेली आहेत.
    सुबाभूळ
    शेतातील चढ उताराच्या ठिकाणी आणि शेतात असणाऱ्या नाल्यांमध्ये लागवड केलेली आहे.
    निलगिरी
    मागील उन्हाळ्यात निलगिरीची लागवड केलेली असून ती सहा बाय आठ फूट या अंतरावर केलेली आहे आणि त्यामध्ये कर्टुले लागवड केलेली आहे हे शेत बघण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना खूप उत्सुकता होती याबद्दल हिरालाल काकांनी सविस्तर माहिती दिली.
    शेतात वनशेती किंवा फळ शेती शक्य होत नसेल तर शेताच्या बांधाने मिलीया डुबिया निलगिरी या प्रकारचे झाड लावून कशी उत्पन्न काढता येईल याविषयी सविस्तर माहिती.
    अशाच प्रकारे साग लागवड ,बांबूच्या अनेक प्रजातींची लागवड आहे ,महोगणी सीताफळ, शेवगा ,चिकू ,संत्रा ,सफरचंद आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजाती ,जांभूळ फणस, हनुमान फळ ,राम फळ ,तिवस लिंबू, पपई, केळी, हिरवळीचे खत हिंगाचे झाड ,नाला खोलीकरण व जलस्त्रोतांवर केलेले काम, गिर गाईचा तुपाचा कारखाना या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून या गटांसाठी त्यांनी आपला एक संपूर्ण दिवस काढला त्यांनी वेळेचे नियोजन कसे केले या सर्व विषयांवर हिरालाल काकांनी शेतकऱ्याशी चर्चा केली .
    सकाळी नऊ वाजल्यापासून तो साडेतीनवाजेपर्यंत हा अभ्यास दौरा सुरू होता या दौऱ्यासाठी उत्तर महाराष्ट्राचे विभागीय समन्वय श्री गुणवंत पाटील सर उपस्थित होते त्यांचेही मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभले. अशाप्रकारे शहादा तालुक्याची ही दुसरी सहल पावसाचा आनंद घेत हसत खेळत पार पडली .आतापर्यंत झालेल्या दोन सहलींमध्ये या ठिकाणी फार्मर कप मध्ये सहभागी असलेल्या अकरा गटांनी भेट दिली आहे.
    रोजच्या त्याच त्याच कापूस आणि मक्याच्या शेती ऐवजी वेगळेही काही करता येतो आणि भरपूर संधी आहेत असा विश्वास महिला शेतकरी गटांना वाटतो त्यांनी तसे बोलूनही दाखवले आणि काही मार्गदर्शन गरज पडल्यास आम्हाला मार्गदर्शन करा व वेळ मिळाल्यास घरातील पुरुष मंडळींनाही या अनोख्या प्रयोगांची पाहणी करण्यासाठी आम्ही घेऊन येऊ असेही सांगितले.
    🌱🌱 टीम शहादा 🌱🌱

КОМЕНТАРІ •