किल्ला सिंधुदुर्ग - माहिती | Sindhudurg Fort

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • सिंधुदुर्ग जिल्यामधील प्रमुख आकर्षण म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला.हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1662 ते 1665 ला बांधला.हा किल्ला मालवण समुद्रकिनाऱ्यावरून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्यावरती जाण्यासाठी प्रतिव्यक्ती 100 रुपये देऊन बोटीने प्रवास करावा लागतो.
    सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमिपूजन नोव्हेंबर 1662 मध्ये मालवण समुद्रापासून 3 किलोमीटरवर असलेल्या मोरयाचो धोंड्यावर गणेश पूजन करून कुरटे बेटावरती मुहूर्त चिरा लावला.
    सिंधुदुर्ग किल्ला हा 48 एकरावर पसरलेला आहे. किल्ल्याची तटबंदी 3.5 किलोमीटर एवढी आहे.तसेच या किल्ल्यावर 42 बुरुज आहेत. किल्ल्याच्या मागच्या बाजूला निशानकाठी हा महत्वाचा बुरुज आहे या बुरुजावरून संपूर्ण सिंधुदुर्ग किल्ला नजरेत राहतो.किल्याच्या तटबंदीवर 30 ते 40 शौचयालये आहेत तसेच 45 दगडी जिने बांधलेले आहेत.
    किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराज यांनी शिव राजेश्वर मंदिर उभारले आहे.तसेच श्री भवानी मंदिर ,श्री जरीमरी देवी मंदिर ,श्री महादेव मंदिर,भुयारी मार्ग,साखर विहीर, दूध विहीर, दही विहीर अश्या गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे आणि हाताचे ठसे आहेत. किल्ल्यावरती जाधव , वायंगणकर, यादव , फाटक अशी घराणे सुद्धा वास्तव्यास आहे आणि आजही पालखी मिरवणूक ,नगारा वाजविणे ,पुजा आणि इतर 18 जबाबदाऱ्या नित्यनियमाने करत आहेत.
    तर मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ल्याची थोडक्यात माहिती सांगितली ती कशी वाटली हे कंमेंट्स करून नक्की कळवा.🙏🚩😍
    धन्यवाद.
    || छत्रपती शिवाजी महाराज की जय || 🚩🚩🚩
    अधिक माहितीसाठी मी खालील yotube चॅनेल वरून माहिती मिळवली
    #roadwheelrane
    • तुम्ही पण मोरयाचा धोंड...
    • राजाराम महाराजांनी शिव...
    सिंधुदुर्गकिल्ला#सिंधुदुर्गफोर्ट#मालवण#छत्रपतीशिवजीमहाराज#राजकोट#जलदुर्ग#मालवणकिल्ला#देवबाग#तारकर्लीसमुद्रकिनारा
    sindhudurgfort#malvan#fort#devbag#tarkarli#malvanfort#shivlanka#jaldurg#gadkillemalvanbeach#sindhudurg#chatrapatishivajimaharaj#shivajimaharaj

КОМЕНТАРІ • 2