सहजयोग ध्यान आणि आत्मसाक्षात्कार । ३ जानेवारी २०२१ । सायं ५. १५ वा . । प्रतिष्ठान पुणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • सहजयोग ध्यान आणि आत्मसाक्षात्कार । ३ जानेवारी २०२१ । सायं ५. १५ वा . । प्रतिष्ठान पुणे
    हिंदीत सकाळी 9.45 ते 10.30 वा. व मराठीत सायंकाळी 5.15 ते 6.00 वा.
    नवीन वर्षात सलग 12 तास 16 विविध भारतीय भाषेत देशभरात विनामूल्य सहजयोग-ध्यान प्रशिक्षण
    पुणे- कोविंड 19 ने संपूर्ण जगाला एका व्यासपीठावर आणून उभे केले आणि त्याचे नेतृत्व भारत देश करीत आहे ही गोष्ट अध्यात्मिक क्षेत्रातही निष्पन्न झाली असून या ऑनलाईन नियमित ध्यान साधने मध्ये जगातील 4 लाखा पेक्षा जास्त साधकांनी प्रतिदिवस आपली उपस्थिती दर्शवली. ज्यामध्ये वेगवेगळ्या वयो गटातील विविध जाती - धर्मातील व विविध देशातील साधकांनी सहजयोग ध्यान साधनेत सहभाग घेतला. "सर्व धर्माचे सार - आत्मसाक्षात्कार" हा भारतीय अध्यात्मिक वारसा श्री माताजी निर्मलादेवी यांनी अविरत पणे ५० वर्ष्यात सर्व देश्यांमध्ये पोचविला .
    श्री माताजी निर्मला देवी सहजयोग ट्रस्ट द्वारे राष्ट्रीय सहजयोग ट्रस्ट , नवी दिल्ली व सहजयोग प्रतिष्ठान, पुणे द्वारे सहजयोग सुवर्ण जयंती उत्सव निमित्त संपूर्ण देशभरामध्ये 16 विविध भारतीय भाषांमध्ये सलग 12 तास ऑनलाईन कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्कारा च्या अनुभूतीचा कार्यक्रम याचे निशुल्क प्रशिक्षण 3 जानेवारी 2021,रविवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. प्रत्येक सत्र हे 45 मिनिटाचे असून सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सलग 16 भाषांमध्ये ध्यान शिकवले जाणार आहे. प्रथम सत्र देववाणी संस्कृत भाषेमध्ये असेल ,त्यानंतर हिंदी, बंगाली , तेलगू,तामिळ, गुजराती,कन्नड , मल्याळम , पंजाबी, भोजपुरी, आसामी , मराठी, ओडिया , मैथिली, इंग्रजी आणि सिंधी असे एकूण 16 भाषांमध्ये संपूर्ण भारत देशातील साधक www.sahajayoga.org.in या वेबसाईटवर वर आणि learningsahajayoga या युट्युब चॅनेल वर सहजयोगध्यान साधनेचा अनुभव घेऊ शकतील.
    लॉकडाऊनच्या काळात सकाळ-संध्याकाळ ऑनलाइन ध्यानामध्ये शास्त्रीय संगीत व भजन तसेच नवीन साधकांसाठी ध्यान कार्यक्रम व ध्याना मधील गहनता येण्यासाठी नियोजित केलेल्या कार्यशाळेत देश-विदेशातील लाखो साधकांनी ऑनलाईन सहभागी होऊन ध्यान प्रक्रियेचा लाभ घेतला. ज्या आधारे ग्लोबल रेकॉर्डस ऍण्ड रिसर्च फाऊंडेशन (GRRF) द्वारा सहजयोग संस्था आशिया खंडातील सर्वात जास्त सामूहिकतेत ध्यान करून घेणारी संस्था आणि ऑनलाईन मेडिटेशन घेणारी सर्वात मोठी संस्था या नावाने पुरस्कार देण्यात आले.
    learningsahajayoga या युट्युब चॅनेल वर दररोज सायंकाळी ५ वाजता मराठी -हिंदी भाषेत सहजयोग प्रशिक्षण हा ६ आठवड्याचा कोर्स राबविला जातो. सहजयोग ध्यान साधना संपूर्णपणे विनामूल्य आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी अत्यंत सरळ व सोपी असून दैनंदिन १० मिनिट ध्यानाने प्रत्येक व्यक्ती आपल्या मध्ये परिवर्तन घडल्याचा अनुभव घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दैनंदिन कामात ऊर्जा , मानसिक सुरक्षा आणि रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी सहजयोग ध्यान अत्यंत प्रभावी आहे. या कार्यक्रमाची माहिती संपूर्णतः निशुल्क टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1800 2700 800 यावर उपलब्ध आहे.
    सध्याची परिस्थिती अत्यंत कठीण झालेली असताना या परिस्थितीत सहजयोग ध्यान निशुल्क ऑनलाइन कार्यक्रम शहरात आणि संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांसाठीसाठी फायदेशीर होत असल्याचे निष्पन्न होत आहे.
    दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या ऑनलाइन ध्यान साधने च्या कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्काराची अनुभूती या कार्यक्रमाचा आवश्य लाभ घ्यावा
    लाईव्ह ध्यान प्रशिक्षण कार्यक्रम दररोज सायंकाळी ५ वाजता
    / learningsahajayoga
    Facebook Page -
    learningsahajayoga
    निमंत्रक-
    सहजयोग ध्यान केंद्र
    पुणे, प्रतिष्ठान
    Toll Free Number
    1800 2700 800
    Whats App Number
    744 744 1505
    www.sahajayoga...
    www.sahajayoga...
    www.sahajayoga...
    --------------------------------------------------
    #learningsahajayoga
    #selfrealisation
    #meditation
    #kundaliniawakening
    #freemeditation
    #18002700800
    #सहजयोगध्यानआणिआत्मसाक्षात्कार
    #SahajayogaDhyan

КОМЕНТАРІ • 12