roshan.r.l.patil@vlog
roshan.r.l.patil@vlog
  • 165
  • 453 124
आजोबा पर्वत | Ajoba prvat | रामायण याच गडावर लीहले | वाल्मीक ऋषी
अजापर्वत’ उर्फ ‘आजोबाचा डोंगर’
बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला आजोबाचा डोंगर एखाद्या पुराण पुरुषासारखा दिसतो. या गडाची ३,००० फुट उभी भिंत ही प्रस्तरारोहकांसाठी एक आव्हान व आगळे-वेगळे लक्ष्य आहे.
इतिहास
पुराणकथेनुसार, याच गडावर बसुन वाल्मिकींनी रामायण लिहिले. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकींना ‘आजोबा’ म्हणत असत, म्हणूनच या गडाचे नाव आजोबागड असे पडले. गडावर वाल्मिकींचा आश्रम व समाधी आहे.
पहाण्याची ठिकाणे :
पहिली वाट पकडून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी साधारणतः अर्ध्या तासात पोहचावे. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाट नसल्याने आपल्याला मुक्काम आश्रमातच करावा लागतो. येथे गडावर रहाण्यासाठी एक कुटी आहे.जवळच पाण्याचा झरा आहे. जर मुक्कामाचा कार्यक्रम असेल तर जेवणाची सोय आपल्याला घरूनच करून आणावी लागते. आश्रमाजवळून पुढे धबधब्याच्या वाटेने चढत गेल्यास सुमारे एक ते दीड तासानंतर वर एक गुहा लागते. येथे लवकुशाच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत. येथे डावीकडे एक पाण्याचे टाके सुद्धा आहे. या गुहेपर्यंत जाण्यासाठी लोखंडी शिडा देखील लावल्या आहेत. याच मार्गाने आश्रमात परतावे. अशा प्रकारे मुंबईहून येणार्यांीसाठी आजोबाचा गड एक निसर्गरम्य अशी दुर्गयात्राच ठरते. गडाच्या माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी सोडल्यास पहाण्याजोगे विशेष असे काहीच नाही. अनेक दुर्गवीर रतनगड - आजोबाचा गड - हरिश्चंद्रगड असा ४ ते ५ दिवसांचा ट्रेक करतात.
पोहोचण्याच्या वाटा :
• मुंबईहून आसनगाव रेल्वे स्थानकावरून: गडावर जाण्याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे मुंबईहून आसनगाव रेल्वे स्थानकावर यावे.v येथून शहापूर या गावी रिक्षेने अथवा एस.टी. ने यावे.येथून पहाटेच एस.टी ने अथवा जीपने डोळखांब-साकुर्ली मार्गे’डेणे’ या गावी यावे. ‘डेणे’ गावातून जाताना मध्ये एक पठार लागते. पठारावर तीन वाटा एकत्र येतात. यातील एक बैलगाडीची वाट सरळ वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी घेऊन जाते. दुसरी वाट कात्राबाईच्या डोंगरात जाते आणि पुढे ‘कुमशेत’ या गावास जाऊन मिळते. तिसरी वाट मात्र जंगलात जाते. या वाटेने न जाणेच श्रेयस्कर.
• कल्याण - मुरबाड - माळशेज - डोळखांब या मार्गाने : कल्याण - मुरबाड - माळशेज - डोळखांब या मार्गाने सुद्धा डेणे गावी पोहचता येते.
• कसारा - घोटी - राजूर - कुमशेत मार्ग : गडावरचा माथा पहाण्यासाठी कसारा - घोटी - राजूर - कुमशेत मार्गेजाता येते.
राहाण्याची सोय :
गडावरती राहण्यासाठी आश्रम आहे. यात २० जणांना रहाता येते.
जेवणाची सोय :
येथे जेवणाची सोय नसल्याने जेवणाचे साहित्य आपण स्वतःच घेऊन यावे.
पाण्याची सोय :
येथे बारामाही पाण्याचा झरा सतत वाहत असतो.
सूचना:
गडावर सापांचे वास्तव्य असल्याने, योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
@roshan.r.l.patil95 @JeevanKadamVlogs
@Raanvata07
@DDSahyadriNews
#ajobaparvt #अजापर्वत #आजोबापर्वत #वाल्मीकिरामायण #वाल्मीकऋषी #लवकुष #लवअंकुश #lavkush
#ajaparvt
Переглядів: 855

Відео

पद्मदुर्ग | padmhadurga | कासा किल्ला | संपूर्ण इतिहास
Переглядів 4087 місяців тому
जय शिवराय पद्मदुर्ग किल्ल्यावर कसे जायचे ? या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मुंबई किवा पुण्याला जावे लागते किवा आपण विमान, रेल्वे किवा स्वताच्या गाडीने देखील जावू शकतो. मुंबई मधून पद्मदुर्ग किल्ल्याचे अंतर १७५ किलो मीटर आहे. मुंबई किवा पुण्यामधून आपल्याला अलिबाग किवा रोहा पर्यंत जावे लागेल. तेथून राजपुरी गावामध्ये बसने किवा टॅक्सीने जावे लागते आणि राजपूरी गावातून बोटीने जावे लाग...
शेतकरी माय बापा साठी येकदा व्हिडिओ पूर्ण पाहा
Переглядів 458 місяців тому
या मध्यामिक विद्यालयाच्या विद्यार्थिनीचा भाषण ययेकदा पाहा अंगावर काटा येईलच #शेतकरी #रॉयल_शेतकरी #शेतकरीbrand
chandrayan 3 Ganpati decoration | चंद्रयान 3 गणपती decoretion
Переглядів 68311 місяців тому
chandrayan 3 Ganpati decoration | चंद्रयान 3 गणपती decoretion
jejuri ganpati decoration | सोन्याची जेजुरी गणपती decoretion 🥰🙏🙏
Переглядів 33311 місяців тому
jejuri ganpati decoration | सोन्याची जेजुरी गणपती decoretion 🥰🙏🙏
jejuri ganpati decoration | जेजुरी गणपती डेकोरेशन | Eco-friendly Decoration
Переглядів 9 тис.11 місяців тому
jejuri ganpati decoration | जेजुरी गणपती डेकोरेशन | Eco-friendly Decoration
गणेश घाटातून भिमाशंकर जाताना सावधान😳😳 | bhimashankar trek🏞️ | Murbad to bhimashakar #bhimashankar
Переглядів 1,3 тис.Рік тому
गणेश घाटातून भिमाशंकर जाताना सावधान😳😳 | bhimashankar trek🏞️ | Murbad to bhimashakar #bhimashankar
😱😱इ पीक पाहणी करा नायतर पीक विमा मिळणार नाही | E pik pahani
Переглядів 298Рік тому
😱😱इ पीक पाहणी करा नायतर पीक विमा मिळणार नाही | E pik pahani
पीक विमा शेतकऱ्याची फसवणूक | जास्तीत जास्त नुकसान भरपाई साठी हे करा
Переглядів 2,6 тис.Рік тому
पीक विमा शेतकऱ्याची फसवणूक | जास्तीत जास्त नुकसान भरपाई साठी हे करा
sidhaagad Adventure trek | सिद्धगड |
Переглядів 142Рік тому
sidhaagad Adventure trek | सिद्धगड |
पदरगड | Padargad Fort | Chimney Climbing Padargad | History full information
Переглядів 392Рік тому
पदरगड | Padargad Fort | Chimney Climbing Padargad | History full information
LOHAGAD | लोहगड | Lohagad Vlog
Переглядів 283Рік тому
LOHAGAD | लोहगड | Lohagad Vlog
आई एकवीरा माऊली | karla caves | Ekvira Aai temple | लोहगड ते एकवीरा vlog 🚩
Переглядів 131Рік тому
आई एकवीरा माऊली | karla caves | Ekvira Aai temple | लोहगड ते एकवीरा vlog 🚩
JANJIRA HISTORY HINDI |LOCAL GUIDE
Переглядів 188Рік тому
JANJIRA HISTORY HINDI |LOCAL GUIDE
JANJIRA | मुरुड जंजिरा किल्ला |संपूर्ण ईतिहास | full history
Переглядів 475Рік тому
JANJIRA | मुरुड जंजिरा किल्ला |संपूर्ण ईतिहास | full history
Mumbai to Elephanta | मुंबई ते एलिफंटा | घारापुरी लेणी | बेट / Island
Переглядів 1,5 тис.Рік тому
Mumbai to Elephanta | मुंबई ते एलिफंटा | घारापुरी लेणी | बेट / Island
Harihar Fort Nashik |हरीहर किल्ला | हर्षगड
Переглядів 79Рік тому
Harihar Fort Nashik |हरीहर किल्ला | हर्षगड
महाराष्ट्र सरकार नवीन योजना७५००० रुपये भाडे मिळवा | *उपयोगात नसलेली जमीन कमुन देईल हजारो रुपये*
Переглядів 135Рік тому
महाराष्ट्र सरकार नवीन योजना७५००० रुपये भाडे मिळवा | *उपयोगात नसलेली जमीन कमुन देईल हजारो रुपये*
PM किसान योजना 2000 रू. हफ्ता मिळवा New Registration 2022 Online Apply | pm kisan mobile app
Переглядів 76Рік тому
PM किसान योजना 2000 रू. हफ्ता मिळवा New Registration 2022 Online Apply | pm kisan mobile app
तुमचा धान्य तुम्हाला बरोबर मिळत का ?/पिळवणूक थाबवा/रेशन दुकानदार
Переглядів 178Рік тому
तुमचा धान्य तुम्हाला बरोबर मिळत का ?/पिळवणूक थाबवा/रेशन दुकानदार
शेतकऱ्यांना 50000₹ मिळणार या शेतकऱ्यांना/ दुसरी यादी| कर्जमुक्ती यादी
Переглядів 186Рік тому
शेतकऱ्यांना 50000₹ मिळणार या शेतकऱ्यांना/ दुसरी यादी| कर्जमुक्ती यादी
kedarnath temple Decoration
Переглядів 1652 роки тому
kedarnath temple Decoration
Kedarnath Ganpati Decoration / Ganpati decoration
Переглядів 116 тис.2 роки тому
Kedarnath Ganpati Decoration / Ganpati decoration
GANPATI GADAD | गणपती गडद लेणी | मुरबाड | शोध गडद लेण्यांचा
Переглядів 1942 роки тому
GANPATI GADAD | गणपती गडद लेणी | मुरबाड | शोध गडद लेण्यांचा
हत्यारांची दुनिया | ऐतिहासिक स्वर्ग | शाहू पॅलेस | shahu palace | kolhapur
Переглядів 1222 роки тому
हत्यारांची दुनिया | ऐतिहासिक स्वर्ग | शाहू पॅलेस | shahu palace | kolhapur
रायगड राज्याभिषेक सोहळा 🚩 | खेळ रण वाघिणीचा | मर्दानी खेळ रायगड|Rajyabhishek sohala | रायगड | Raygad
Переглядів 2422 роки тому
रायगड राज्याभिषेक सोहळा 🚩 | खेळ रण वाघिणीचा | मर्दानी खेळ रायगड|Rajyabhishek sohala | रायगड | Raygad
हडसर किल्यावर सापडला ७०० जुने कारंज्याचे अवशेष ? | 700 Year old fountain part ? | Hadsar
Переглядів 282 роки тому
हडसर किल्यावर सापडला ७०० जुने कारंज्याचे अवशेष ? | 700 Year old fountain part ? | Hadsar
आंबा | हापूस | प्रवास हापुस चा | Hapus mango | Mango farming #mangalore
Переглядів 682 роки тому
आंबा | हापूस | प्रवास हापुस चा | Hapus mango | Mango farming #mangalore
Hadsar fort 🚩 | हडसर किल्याचे रहस्य | hadsar fort history in marathi | हडसर चा इतिहास
Переглядів 1932 роки тому
Hadsar fort 🚩 | हडसर किल्याचे रहस्य | hadsar fort history in marathi | हडसर चा इतिहास
Birds / Animals एक घास चीउ चा / वसा निसर्ग रक्षणाचा
Переглядів 3112 роки тому
Birds / Animals एक घास चीउ चा / वसा निसर्ग रक्षणाचा

КОМЕНТАРІ